ट्रेनिंग सेंटरसाठी नाव सुचवा

Submitted by विनिता.झक्कास on 19 July, 2020 - 09:22

नमस्कार मंडळी __/\__

एक मदत हवी आहे. मल्टी स्पोर्टस आणि आर्टस अशा बर्‍याच कला शिकवणार्‍या ट्रेनिंग सेंटरसाठी छानसे मराठी / संस्कृत नाव सुचवा.

कराटे, टेबलटेनिस, हॉर्स रायडिंग, ते अभिनय, लेखन, सादरीकरण अशी बरेच विभाग ह्यात असतील.

येवू द्या पटापटा नावे!!

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नाव तर काही सुचत नाही पण सुरू झाल्यावर कळवा. हॉर्स रायडिंग करायची इच्छा आहे खूप दिवसांची. शक्य झाल्यास येईन मी. पिक्चरमध्ये दाखवतात तशी रायडिंग आली पाहिजे. सुसाट वेगात घोडेस्वार येतो आणि समोरचं साडेचार पाच फूट लाकडी कुंपण ओलांडून दिसेनासा होतो. मागे फक्त उडालेला धुरळा राहतो.

Biggrin काय नावं सुचवलीत.
जोक्स अपार्ट....
मी सिरियसली विचारले आहे. कृपया लक्षात घ्या.
यातली काही नावं मला आवडलीत, धन्यवाद Happy

बोकलत, तुमची पहीली अ‍ॅडमिशन.... डन Happy मागे फक्त धुरळा राहील याची काळजी मी घेईन. Happy

गुरूकुल नाव कूल आहे
मोहोब्बतेने फेमस केलेय
फक्त अजून किती जणांनी हे आधी वापरले असेल. कदाचित युनिक नसेल.

जोक्स द अपार्टच पण च्रप्स यांनी सुचवलेले झक्कास ट्रेनिंग सेंटर सुद्धा हट्के वाटले Happy

तारांगण सुद्धा ठेवू शकता, विविध प्रकारचे तारे तिथे चमकायला येणार

विकास

घरातील मुला मुलीचे नाव ( बहुतेकदा हे लकी असते)

झक्कास चांगले आहे की.

३डी ट्रेनिंग सेंटर. "धमक, धाडस, आणि धमाल" ह्या ३डी भोवती मार्केटींग कँपेन करता येईल. मुलांना + पालकांना म्हणायला सोपे आहे - "काय अरे आज का बुडवलं ३डी". "आज कराटे होतं, मला बोर होतं". "फक्त धमालच्या दिवशी जायचे असेल तर पुढच्या महिन्यात बंद करेन." .... Wink Happy

गुरुकूल लिस्टमधे आहे Happy
सीमंतिनी, मार्केटींगची भारी आयडीया दिलीत. धन्यवाद Happy

मोहीनी, विपू करतेय, बघा.

मनःपूर्वक धन्यवाद मंडळी __/\__

वैजयंतिमाला यांच्या नृत्यप्रशिक्षणसंस्थेचे नाव भारतीकला मनरम असे होते/आहे. रम् धातूचा अर्थही खेळणे असाच आहे. गुजरातीमध्ये रमत म्हणजे खेळ. (आ तो रमत रमाडे राम- खूप जुने गाणे) यावरून काही सुचू शकेल.

लईच इंटरन्याशनल असाल तर Daring, Dashing, Delight असलं काय करा... हाय काय नि नाय काय... पोरास्नी म्हणता याया होवं

वा! सीमंतिनी, च्रप्स खूपच सुरेख सुचवलेत Happy

मला ह्याचा नक्कीच उपयोग होईल.
सर्वांचे खूप खूप आभार __/\__

नर्मन म्हणजे काय?

तुमच्या सहकार्यांबद्द्द ल फार फार धन्यवाद मंडाळी __/\__

एक मदत अजून कराल का? नावाची उपलब्धता कुठल्या साईटवर चेक करायची?
नवीन नाव रजिस्टर करण्यासाठी आधी ते अव्हेलेबल आहे की नाही ते पण बघावे लागेल ना! प्लीज हेल्प __/\__

हो हो सगळ्यांना बोलावणार आहेच Happy मलाच तुम्हांला भेटायला आवडेल

नितिनदा, नाव निवडण्यात तुम्ही काही मदत करु शकाल का? अस्ट्रोलॉजी?

अरे वा! भरारी किंवा इंग्रजीतलं लाँचपॅड? आपल्या ट्रेनिंग सेंटरला शुभेच्छा!! Happy

विभागांची विविधता पाहता एक युनिव्हर्सल नाव आणि त्याअंतर्गत विभागनिहाय इतर नावे ठेवता येतील..

युनिव्हर्सल अकादमी
यु चेतक अश्वारोहण अकादमी
यु "ची पॉवर" कराटे अकादमी

इत्यादी..

नांव पक्के झाले की सांगेनच. आपल्याला हवे ते नांव साईट वर अव्हेलेबल पण हवे. Happy

पाटीलसाहेब, चांगली आयडीया! माझ्या डोक्यात पण असेच काहीतरी होते. __/\__
सर्व नावे सुचवणार्‍यांचे आभार __/\__

बाहूबली.

मराठी + संस्कृतचा आग्रह नसेल तर -

फिट्टम् फॅट / फॅट्टम् फिट

आधी वेबसाईट डोमेन कुठले उपलब्ध आहे ते बघा >> हो. धन्यवाद उ बो. Happy

धन्यवाद बिपिनचंद्र, मानवजी __/\__