"यंटायर पॉलिटिकल सायन्स" ही डिग्री कुठे मिळेल ?

Submitted by जिद्दु on 13 September, 2020 - 04:10

माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. नोटबंदीत माझ्या मालकाचे दिवाळे वाजल्याने मी बेकार झालो होतो. मोठ्या प्रयत्नाने दुसरी एक नोकरी मिळाली पण जीयसटीच्या घिसाडघाईने त्या मालकाचेबी बारा वाजले. शेवटी असाच हताशपणे फिरत असताना एका सद्गृहस्थांनी मला चहाची टपरी टाकण्याचा सल्ला दिला. आणि त्यात नशिबाने मला चांगले यश आले. माझ्या टपरीजवळच प्रभातशाखा भरत असल्याने त्या लोकांची भरपूर वर्दळ असते. त्या लोकांच्या सल्ल्याप्रमाणे मी चहाबरोबरच भज्यांचा ठेला पण सुरु केला आणि कमी काळातच मला चांगली बरकत आलीये. तिथे शाखेला सकाळी काही व्हीआयपी मंडळीही अधूनमधून हजेरी लावतात. हे वेडेवाकडे सुटलेले हाफचड्डी-इन केलेले केसाळू लोक पाहिल्यावर मला तर अस्वलाचीच आठवण यायची. पण फार बिगशॉट मंडळी असतात ही. त्यांना मी चहा-भजी फुकट देतो नेहमी. तेबी खुश होऊन चार कामाचे सल्ले देतात .
तर आता मुळ मुद्यावरच येतो. त्यातल्या एका अस्वलकाकांनी मला अजून शिकण्याचा सल्ला दिलाय, ते म्हणतात "यंटायर पॉलिटिकल सायन्स" ची डिग्री घे मगच पुढचा मार्ग सांगेल. मी बऱ्याच बहिस्थ विद्यापीठांत चौकशी केलीय पण मला अशी डिग्री कुठे सापडली नाही. मला शिक्षणाची खुप आवड आहे. कृपया मला ही डिग्री कुठे मिळेल याबाबत कुणी काही मार्गदर्शन करेल का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथेच मायबोलीवर Lol

बादवे, प्रोफाईल पिक्चर मध्ये कुणाचा फोटो आहे?

मायबोलीची आफिश्याल इनिव्हर्सिटी असताना दुस्रीकडं कुठं आणि कशापायी जावं मानसानं.

जिद्दू यांच्या मायबोली लिखाणाची उत्तुंगता पाहता त्यांनी या विषयात पीएचडी केलीय असे वाटले होते. असो.
गुरू व गुरुकुलाच्या शोधात कुठेही जायची गरज नाही, आपली मायबोली हार्वर्डला पण मागे काढेल ज्ञानार्जनात. हीरा यांचा सल्ला माना.

बादवे, प्रोफाईल पिक्चर मध्ये कुणाचा फोटो आहे?>>>

यशवंतराव होळकर यांचा.

कुठल्याही फोटोवर दोन क्षण प्रेस केले की गुगल पाचसहा पर्याय दाखवते, त्यात गुगलवर हा फोटो शोधा हा एक पर्याय असतो. त्यावर क्लिक केले की गुगल त्या फोटोचा इतिहास भूगोल दाखवतो.

फोटो कुठूनतरी घेतलाय/चोरलाय वगैरे शंका असल्यास हा पर्याय वापरून बघायचा.

सर्व प्रतिसादकांचे आभार Happy
पण माझा शोध अजून संपला नाहीये. मी ती डिग्री मिळवणारच.

@आसा - यशवंतराव माझे प्रेरणास्थान आहेत _/\_
पोस्टमन या युट्युब चॅनेलसाठी संजय सोनवणी यांनी यशवंतराजेंची पराक्रम गाथा सांगणारी दोन-तीन भागांची सीरिज बनवली होती. आता ती तिथे दिसत नाहीये पण पोस्टमनच्या साईटवर त्यांचे बाकी इतिहासाचे लेख सापडतायेत. इतिहासाचा मोठा अभ्यास आहे या माणसाचा. दुर्दैवाने शिवाजीराजे आणि सम्भाजीराजे सोडले तर यशवंतराजेंसारखा पराक्रमी मराठी मनुष्य नसेल कोणी पण ते अजूनही दुर्लक्षितच आहेत.

कोणाला इच्छा असल्यास स्टोरीटेल ऍपवर "झंजावात" हे यशवंतराजांचे चरित्र संजय सोनवणी यांच्याच धारदार आवाजात उपलब्ध आहे ऐकायला. तिथे सॅम्पल चेक करून पहा. इतर इतिहासप्रेमींना फॉरवर्ड करा तुम्हाला आवडल्यास.
https://www.storytel.com/in/en/series/28934-Zanjawat

हे त्यांचे स्वतःचे युट्युब चॅनेल
https://www.youtube.com/c/SanjaySonawani/videos

>>दुर्दैवाने शिवाजीराजे आणि सम्भाजीराजे सोडले तर यशवंतराजेंसारखा पराक्रमी मराठी मनुष्य नसेल कोणी पण ते अजूनही दुर्लक्षितच आहेत.<< +१
महादजी शिंद्यांना घ्या या वरच्या पराक्रमी पुरुषांच्या यादित. यशवंतराव होळकरांची ब्रिटिशां विरुद्धची कामगिरी तरी चित्रपट्/सिरियल द्वारे लोकांसमोर यायला हवी...

त्यापेक्षा फोटोग्राफी शिका म्हणजे 100 करोडहून जास्त कमवाल ते पण वर्क फ्रॉम होम करून.
किंवा वांग्याची शेती तर बेस्ट होईल- हजारो एकरचे रियल इस्टेट प्रोजेक्ट्स, टाऊनशीप्स, साखरकारखाने, प्रीमियम शिक्षणसंस्था - हे सगळं मिळवता येईल.
पॉलिटिकल सायन्स करून हा असा पैसा मिळवता येत नाही. 16 तास काम आणि वर सोशल मीडियावर कोणीही तुमच्याबद्दल लिहू शकतो. बघा चालेल का.
त्यापेक्षा दुसरा पर्याय निवडला तर तुमच्यावर कोणी काहि लिहिलं तर त्याला मारहाण करून वठणीवर आणण्याची सोय आणि वर त्या मारहाणीलाच खरी पुरोगामी लोकशाही संस्कृती म्हणून सर्टीफिकेट पण भेटेल.

Lol भारी लिहिलंय. पावत्या मिळाल्याच आहेत.

पण तुम्हांला दूर दूर पर्यंत फेकता येत असेल तरच यंटायर पोलिटिकल सायन्सची पदवी मिळेल हं.