शिक्षण

शिक्षण आणि आपण

Submitted by सारेग on 25 March, 2015 - 03:07

शिक्षण सर्वदूर पोहचवण्या साठी आपले सरकार भरपूर पैसा खर्च करते, भरपुर मनुष्यबळ खर्ची पडते. यातून साध्य काय होते? आपल्या कडच्या शिक्षणामुळे लोकं फक्त अर्धवट शहाणी होतात, नको तिथे आडवी जातात. शिक्षणाने आयुष्य सुखकर व्हायला मदत व्हावी ; पण तसे होताना दिसत नाही, उलट शिक्षण आहे चांगली पदवी आहे म्हणून अहं वाढत जातो. कामं करायची म्हणजे मानसं वैतागतात अगदी स्वतःसाठी सुद्धा काही करायचे तर दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतात नव्हे तो स्वतःचा अधिकार मानतात. स्वतःच्याच घरात प्रमुख पाहुण्या सारखे राहून मानसन्मानाची वाट बघतात. बेकारांच्या फौजा तयार व्हायला ही वृत्ती पण कारणीभूत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

तडका - बाणा,...

Submitted by vishal maske on 24 March, 2015 - 21:42

बाणा,...

जुना बाणा,नवा बाणा
यात फरक असु शकतो
जशी वेळ येईल तसा
हा फरक दिसु शकतो

कधी-कधी मात्र स्वार्थासाठी
बाणा सुध्दा अडलेला असतो
कठोर बाणा अन् नरम बाणा
एकमेकांनाच जोडलेला असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका - आरक्षणाचा विचार

Submitted by vishal maske on 23 March, 2015 - 22:50

आरक्षणाचा विचार,...

आरक्षणाच्या बाबतीत
हलगर्जीपणा नसावा
विकासाच्या वाटेवरून
कुणी सुध्दा उणा नसावा

उगीच विचार करू म्हणत
टाळा-टाळीचा प्रकार नसावा
आता आरक्षणाच्या मागणीचा
विचारपुर्वक विचार असावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका - आरक्षणाचा एल्गार

Submitted by vishal maske on 23 March, 2015 - 11:18

आरक्षणाचा एल्गार

सरकार वरील रोषाची
अजुन भावना गेली नाही
दिल्या गेलेल्या शब्दाची
म्हणे पुर्तता झाली नाही

आता सरकार वरती असा
कठोर आरोपाचा मार आहे
धनगर समाज आरक्षणाचा
आंदोलनात्मक एल्गार आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

लैंगिक शिक्षण : कसं व केव्हा द्यावं

Submitted by मंजूताई on 23 March, 2015 - 01:21

लैंगिक विषयावर मुलांशी कसं व केव्हा बोलावं: ह्या विषयावर सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरमतर्फे मैत्रेयीने पालकांशी संवाद साधला. त्याचा हा वृत्तांत.

शब्दखुणा: 

तडका-ठाव मना-मनाचे

Submitted by vishal maske on 22 March, 2015 - 13:45

ठाव मना-मनाचे,...

कुणासाठी ठाव असतो
कुणासाठी घाव असतो
वेग-वेगळ्या मनामध्ये
वेग-वेगळा भाव असतो

जसे मनं बदलतील तसे
कधी अर्थ बदलु शकतात
कुण्या मनात उचलणारे
कुणा मनी आदळू शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका - आरोप-प्रत्यारोप करताना

Submitted by vishal maske on 21 March, 2015 - 20:59

आरोप प्रत्यारोप करताना,...

समजु शकणार्‍या गोष्टींचे
कधी गैरसमज होऊ नयेत
फालतु अफवांच्या बळीही
आपल्या भावना जाऊ नयेत

प्रत्येक गोष्टीतली सत्यताही
चिकित्सकपणे जाणली जावी
आरोप-प्रत्यारोप करताना
आपली बुध्दी ना हिनली जावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शब्दखुणा: 

तडका - शुभ-अशुभ

Submitted by vishal maske on 21 March, 2015 - 10:59

शुभ-अशुभ

कुणासाठी गारवा असतात
तर कुणासाठी उब असतात
कुणासाठी शुभ तर कधी
कुणासाठी अशुभ असतात

वेग-वेगळ्या भावनेच्या
वेग-वेगळ्या दृष्टी असतात
वेग-वेगळ्या नजरेमधून
वेग-वेगळ्या गोष्टी असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शब्दखुणा: 

तडका - गुढी पाडवा

Submitted by vishal maske on 20 March, 2015 - 22:22

गुढी पाडवा

पारंपारिक असली जरी
नव्या-नव्याने थाटली जाते
नव-वर्षाच्या स्वागताला
रूढीची गुढी नटली जाते

मना-मनात आपुलकी अन्
आनंदाचा गोडवा असतो
मरठी माणसांचं नवं साल
असा हा गुढी-पाडवा असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शब्दखुणा: 

काका

Submitted by vishal maske on 19 March, 2015 - 13:02

काका,...

काका तुम्ही सोडून गेलात
याला मन संमत नाही
अन् श्रध्दांजली देण्याची
आमच्यामध्ये हिंमत नाही

गहिवरलं काळीज जरी
धरणी स्थिर राहिली नाही
आभाळाची भकास काया
अशी कधीच पाहिली नाही

कानात गुंजतो अजुनही
काका तुमचा आवाज
कसा विश्वास ठेवावा की
तुम्ही नाहित इथे आज

तुमच्या विचारानं विचार
समाजाचे बदलत आहेत
तुमचे उपदेशात्मक बोल
कानावरती आदळत आहेत

तुमचं हूबेहूब चित्रही
डोळ्यांपूढं साकारतं आहे
काका तुमच्या जाण्याला
मन आज नाकारतं आहे

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - शिक्षण