शिक्षण

तडका - नियम,...

Submitted by vishal maske on 8 April, 2015 - 10:51

नियम,...

कुठे लादले जातात तर
कुठे लादून घेतले जातात
माणसांसाठीचे नियम कधी
माणसांकडूनही कातले जातात

कधी नियम वाढवले जातात
कधीे ते तुडवले जाऊ शकतात
तर कधी-कधी नियम सुध्दा
हवेत उडवले जाऊ शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रशासकीय कृपा,...?

Submitted by vishal maske on 6 April, 2015 - 10:10

प्रशासकीय कृपा,...?

मोबाईल वापरण्याची हौस
प्रत्येकाच्या मनी दिसु शकते
मात्र कुठे मोबाईल वापरणे
हि अराजकता असु शकते

हल्ली तर जेलमधील कैद्यांचाही
मोबाईल वापराचा सोहळा आहे
कैद्यांच्या या मोबाईल वापरावर
प्रशासनाचाही काना डोळा आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - तंबाखु

Submitted by vishal maske on 5 April, 2015 - 11:47

तंबाखु,...!

कुणी विरोधात आहेत तर
कुणी-कुणी हितचिंतक आहेत
तंबाखु टिकवण्याच्या बाता
आता भलत्याच भंपक आहेत

तंबाखुच्या योग्य-अयोग्यतेवरती
अकलेचे कांदे ना फूत्करले जावे
ज्यांनाही तंबाखुने बरबाद केले
त्यांनाच वास्तव विचारले जावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - धुसफूसीची कुजबुज

Submitted by vishal maske on 4 April, 2015 - 20:50

धुसफूसीची कुजबुज

कितीही नाही म्हटले तरीही
मनी मतभेद स्पर्शले जातात
कुणाची धुसफूस होताच
लक्ष सर्वांचे आकर्षले जातात

प्रत्येक धुसफूसीची कुजबुज
जणू सांकेतिक बरबादी असते
तर कुणाची अंतर्गत धुसफूस
बाह्यजनांची लक्षवेधी असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - विज्ञानाचा विचार

Submitted by vishal maske on 3 April, 2015 - 22:19

विज्ञानाचा विचार,...

आधुनिकतेला स्विकारत
कुणी इथे विज्ञानी आहेत
तर विज्ञानाच्या युगातही
कुणी भलतेच अज्ञानी आहेत

विज्ञाना शिवाय जरी इथे
आधुनिक क्रांती घडत नही
तरी मात्र कुणा-कुणाला
सत्य पचनी पडत नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मराठी माणसांची शान

Submitted by vishal maske on 3 April, 2015 - 11:13

मराठी माणसांची शान,...

महाराष्ट्राची शान मराठी
महाराष्ट्राची जान मराठी
मराठी माणसांची अस्मिता
महाराष्ट्राची त्राण मराठी

जगभरात माय मराठीचा
गौरवणारा झेंडा आहे
मराठी माणसांची शान
मराठीचा अजेंडा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - माणूसकीचे मारेकरी

Submitted by vishal maske on 2 April, 2015 - 21:58

माणूसकीचे मारेकरी

माणसांकडून निष्ठूरतेच्या
हद्दी ओलांडल्या गेल्यात
गतानुगतिकतेच्या भावना
माणसांतुन कोलांडल्या गेल्यात

इथे माणूसकीचे मारेकरी
मना-मनात जागत आहेत
माणसांशी वागताना माणसं
माणसांप्रमाणे ना वागत आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - स्रीयांची सुरक्षितता

Submitted by vishal maske on 2 April, 2015 - 10:05

स्रीयांची सुरक्षितता,...?

नराधमी मनात अजुनही
वासनांध वासना आहेत
स्रीयांवरील अत्याचाराच्या
रोज वाढत्या घटना आहेत

प्रगतशील भारत आपला
महासत्तेच्या मोक्यात आहे
स्रीयांची सुरक्षितता मात्र
अजुनही धोक्याक आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका - फेकू दिनाचे आयडॉल

Submitted by vishal maske on 1 April, 2015 - 11:05

फेकू दिनाचे आयडॉल,...!

फसवणारे फसवत गेले
फसणारेही फसत गेले
करकरीत सत्य सुध्दा
कुणाला फेकू भासत गेले

प्रत्येकाच्याच मना-मनात
फसवा-फसवीचे स्टॉल झाले
तर कुणी-कुणी फेकू दिनाचे
इथे चक्क आयडॉल झाले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका- फसवा-फसवी दिन

Submitted by vishal maske on 31 March, 2015 - 21:33

फसवा-फसवी दिन,...

आपण फसु नयेत म्हणून
कुणी तयारीत बसले जातात
हलगर्जीपणामुळे कधी
कुणी सहज फसले जातात

कुठे फसवल्याचा हर्ष तर
कुठे फसल्याचा शीन असतो
फसणार्‍या अन् फसवणारांचा
हा फसवा-फसवी दिन असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - शिक्षण