पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन - मान्यवरांच्या प्रतिक्रिया
पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन नुकतेच सॅन फ्रान्सिस्को - बे एरीयामध्ये पार पडले. या संमेलनाविषयी मला अनेक मान्यवराशी - संमेलनाध्यक्ष गंगाधर पानतवणे, संगीतकार सलील कुळकर्णी, तरुणांचे नेते अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ कवी शंकर वैद्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॅा. दा. ग. गोरे - बोलण्याची संधी मिळाली. मी बहुतेकांना संमेलनाच्या वादाविषयी, संमेलनातून काही सकारात्मक निष्पन्न झाले की नाही आणि मराठी साहित्य इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याविषयी विचारले. त्यांची मते ध्वनिमुद्रीत करुन पॅाडकास्टच्या माध्यमातून आपल्यापुढे ठेवली आहेत.