पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन - मान्यवरांच्या प्रतिक्रिया

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन नुकतेच सॅन फ्रान्सिस्को - बे एरीयामध्ये पार पडले. या संमेलनाविषयी मला अनेक मान्यवराशी - संमेलनाध्यक्ष गंगाधर पानतवणे, संगीतकार सलील कुळकर्णी, तरुणांचे नेते अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ कवी शंकर वैद्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॅा. दा. ग. गोरे - बोलण्याची संधी मिळाली. मी बहुतेकांना संमेलनाच्या वादाविषयी, संमेलनातून काही सकारात्मक निष्पन्न झाले की नाही आणि मराठी साहित्य इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याविषयी विचारले. त्यांची मते ध्वनिमुद्रीत करुन पॅाडकास्टच्या माध्यमातून आपल्यापुढे ठेवली आहेत.

जे लोकं आयट्यून्स वापरतात ते हे पॅाडकास्ट manthan असे आयट्यून्स मध्ये शोधून डाऊनलोड करु शकतात.
जे लोकं आयट्यून्स वापरत नाहीत, त्यांच्या साठी या पॅाडकास्टचा दुवा खाली देत आहे.
http://feeds2.feedburner.com/marathi-manthan

ज्यांना वरील दुवा उघडता येणार नाही त्यांच्या साठी ध्वनीमुद्रणाचा थेट दुवा खाली देत आहे.
http://vpuranik.com/podcasts/manthan/sammelan-pratikriya.mp3

मराठी साहित्य पॅाडकास्टच्या माध्यमातून लोकांपुढे यावे हा माझा या पॅाडकास्टमागचा उद्देश आहे. ज्यांना शक्य असेल त्यानी या पॅाडकास्टचे दुवे आपल्या मित्र - मैत्रीणींना पाठवावेत. आपआपल्या आयपॅाडमध्ये, गाडीमध्ये, व्यायाम करताना आपल्याला पॅाडकास्ट ऐकता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात, पॅाडकास्ट ऐकणाऱ्यांची संख्या वाढत आहे - त्यांच्या पर्यंत पोचण्याचा हा प्रयत्न आहे.

विषय: 
प्रकार: