कोसबाड हिल

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

येका आर्टिस्ट कँपच्या निमित्ताने कोसबाड ला गेलो होतो (बाकि सगळे आर्टिस्ट आणि मी गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा म्हणतात तसं..). कोसबाड डहाणु जवळचे येक आदिवासी गाव. अनुताई वाघ यांची कर्मभुमी.
http://www.geocities.com/grammangal/Anutai_info.html
गोखले एज्युकेशन ट्र्स्ट इथे कृषि विद्यालय चालवते, त्यांनी फुलवले वैभव बघावे असे आहे. अगदी दुर्मीळ वनस्पती, फुले तसेच चिकु, आंबे , नारळाच्या बागा मस्त जोपासल्यात. आजुबाजुला आदिवासी पाडे, त्यांची घरं हा लँडस्केप करायला उत्तम सेटअप.
आम्ही वेगवेगळ्या स्पॉट्स वर पेंटिंग्स करत असताना बाजुला बरीच आदीवासी मंडळी जमा व्हायची. त्यातल्या लहान पोरानी कुठुन तरी तयार चिकु आणि कैरया आणुन दिल्या.झाडावरच तयार झालेले चिकु अतिशय गोड असतात, बाजारात मिळणार्‍या फळाना ती चव कधीच नसते. त्या पोरांना त्याचे पैसे देवु केले ते त्यानी नाही घेतले.
दुपार नंतर येका घरातुन चहा आला, तो काळा चहा काहींना नको होता तर थोड्यावेळाने कुठुनतरी तो माणुस कोल्ड्रिंक घेउन आला. त्या फाटक्या कपड्यातल्या माणसाचे मन मात्र मोठे होते. त्याच्या खिशाला भुर्दंड नको म्हणुन कसंबसं समजाउन त्या बाटल्या आम्ही पर्त पाठवल्या. त्या तीन दिवसात जी आपुलकी बघायला मीळाली ती क्वचीतच दिसतेर हल्लिच्या दिवसात.

तीथल्या येका झोपडीत कूडावर काढलेले हे वारलीचित्र, लग्नात काढलेल्या या चित्राला चौक म्हणतात. हल्ली वारलीचित्राच्या नावाखालि काहीहि खपवले जाते त्यामुळे या पारंपारीक चित्राला जास्त महत्व
warli_painting.jpg
हे आमचे तेथले छोटे मित्र
friends.jpg
ही मी तीथे केलेली काही चित्र.
kosabad.jpg
_
kosbad1.jpg
_
kosabad2.jpg

विषय: 
प्रकार: 

फोटो आणि चित्रे फारच अप्रतीम...

अजय मस्त आहेत चित्र. खासकरुन झोपडी आणि वड.

वाह अजय! घराचे चित्र फारच सुंदर! आणि दुसर्‍या चित्रातील केळीची पाने आणि त्याच्या मागची जरा दूरची पार्श्वभूमी मस्तच! दुसर्‍या चित्रात पावसाळ्याचा थंडगार भास होतोय.

अजयभाऊ,
घराचे चित्र एकदम मस्त आलेय हं!
एकदम सही!
Happy

धन्यवाद. जलरंगात लँड्स्केप करायचा छंद थोडा सिरिअसली घ्यायला लागलोय. आणि वर्षभरात थोडि बरी चित्र काढता येतील असे वाटते.

वा अजय, मस्त भटकंती झाली तुमची.
जलरंगातील चित्रे पण सुरेख आलियत. Happy मला घराचे चित्र जास्त आवडले..
वर्षभरात बरी कसली तुम्ही तर जलरंगात एकदम मास्टरच होवुन जाल.:) अशीच उत्तरोत्तर प्रगती राहो

फोटो आणि चित्रे फारच अप्रतीम आहेत.