कारवी चे फुल

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

कारवी (कारव)ही ८ वर्षातुन येकदाच फुलते आणि त्यानंतर ही झुडपं मरतात. यानंतर नवीन कारवीची झुडपं वाढत राहतात आणि त्याना पुन्हा ८ वर्षानी फुलं येतात. या फुल येण्याच्या दिवसात डोंगर निळ्या जांभळ्या फुलानी बहरुन जातो. आदिवासी या फुलं येण्याला कारवेल आली असे म्हणतात.कारव साधारण १-२ इन्च रुंद आणि २ ते ४ मिटर ऊंच वाढते ( सरळ काठी सारखी पण बांबु सारखे झुडुप वाढते). सह्याद्रीच्या पर्वत रांगात ही झुड्पं सापडतात. आदिवासी यांचा वापर मुख्यत: झोपड्यांचे कुड (भिंती ) बनवायला करतात.
karvi

विषय: 
प्रकार: 

मस्त. धन्यवाद माहिती आणि फोटो दोन्हीबद्दल.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

फुल गोड आणि माहितीही गोड आहे.

अजय, मस्तच आलांय फोटो.. नुकताच काढलास का? कुठे बहरलीये कारवी?? दोन वर्षापूर्वी अंबोली घाटात कारवी फुलली होती...

sarivina - हा फोटो दोन दिवसांपुर्वी पालघर जवळ काढलाय. या वर्षी कारवी नॅशनल पार्क् मुबईत फुलली. आणि काहि दिवसात हा बहर ओसरेल

अजय, तुला कसे काय माहिती ही हीला कारवी म्हणतात?

bee - मी वयाच्या पंधरा वर्षापर्यंत गावीच (पालघर) रहायचो आणि अजुन सुद्धा महिन्यातुन दोन तीन वेळा गावी जातो. त्यामूळे झाडा झुड्पांची ओळख अजुन कायम आहे Happy

फोटू सुंदर.. Happy

छान.............. कारवीची फुले, माहिती, फोटो..............