मनोरंजन

तो मेघ सावळा ....

Submitted by पुरंदरे शशांक on 27 June, 2013 - 10:28

तो मेघ सावळा ....

तो मेघ सावळा बरसुन राही अवतीभवती
मी मला सावरुन घेता होइन त्याची पुरती

तो भुलवत जाई मला वेडिला चिंब भिजवुनी
मी अलगद जाते कवेत त्याच्या भान हरपुनी

तो अंकुर फुलवी उजाडलेल्या रानावरती
मी धरा होउनी पेलिन माझ्या अंकावरती

तो अलगद येउन फुंकर घाली ह्रदयावरती
मी फुलून येईन रानफुलातुन खडकावरती

तो फूल होउनी मजेत डोले वार्‍यावरती
मी जपून ठेविन पाकळीसहि अलगद हाती

तो स्वैर कोसळे टपोर निर्मळ थेंबामधुनी
मी धरू पाहते त्याला हिरव्या हातामधुनी

तो शीळ घालतो मधुमधुरशि वेणूमधुनी
मी वेडी राधा भुलून जाइन मला विसरुनी

तो मिटवुन सारे अंतर येतो धावधावुनी

शब्दखुणा: 

सत्यवान-सावित्री

Submitted by डॉ अशोक on 25 June, 2013 - 11:18

सत्यवान-सावित्री

यम (सावित्रीला): तू याला परत माझ्या कडे घेऊन आलीस? कां?
सावित्री: तो यांचा निर्णय आहे. माझा नाही.
यम (सत्यवानाला): तू परत आलास माझ्याकडे ? कां?
सत्यवान (गप्प)
सावित्री: मी सांगते. त्यांना आता जगावसं वाटत नाही...
यम: ते कां?
सावित्री: ते आता आधीचे राहिले नाहीत. आधी ते फूल पाहिलं की हरकून जात. चांदण्यात फिरायला त्यांना खूप आवडे. लहान मुलांची त्यांना खूप आवड होती.
यम: मग?

बस थांबा

Submitted by मोहना on 24 June, 2013 - 20:49

"आई, पट्टा काढू?"
"काढ."
"पण पोलिस आला तर?"
"मग नको काढू."
"पण मला काढायचा आहे."
"कर बाई तुला काय करायचं असेल ते." नेहमीप्रमाणे संभाषणाचा अंत.
मी गाडी बसथांब्याजवळच्या सायकल लेनमध्ये थांबवली होती. बसथांब्यावरुन लेकाला आणायचं होतं. जवळपास गाडी थांबवायला जागा नव्हती त्यामुळे हा पर्याय. पण खात्री नव्हती असं थांबवणं कायदेशीर आहे की नाही, तितक्यात.
"आई, पण पोलिसानी पकडलं तर?" लेक पट्ट्याबद्दल विचार करत होती, मी चुकीच्या जागी गाडी थांबवली आहे त्याचा.
"बघू. खोटं बोलावं लागेल."
"पण तसं करायचं नसतं, खरं सांगितलं तर देतील तुला सोडून. तू मला तसंच सांगतेस ना की खरं सांग, मी ओरडणार नाही."

थेंब थेंब

Submitted by पुरंदरे शशांक on 17 June, 2013 - 00:26

थेंब थेंब

थेंब थेंब अलवार
घेती मातीत आकार
कणसात उमलोनी
मोती झाले दमदार

थेंब थेंब मेघातला
मातीविण तळमळे
नदी नाल्यात वाहता
जलसंजीवन झाले

थेंब थेंब नाजुकसा
पानांवरी झुलतसे
गंध होऊनी फुलात
वार्‍यालाही लावी पिसे

थेंब थेंब डोळ्यातला
मन डोही डुचमळे
वारा सोसाट्याचा येता
पापणीच्या कडा आले....

शब्दखुणा: 

मनात घर करणारा चित्रपट : 'अनुमती'

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 15 June, 2013 - 07:55

डोळ्यांना सुखावणारं आल्हाददायी निसर्गचित्रण, श्रवणेंद्रियांना शांत करणारं मधुर पार्श्वसंगीत, मनाची पकड घेणारी व गुंतवून टाकणारी पटकथा आणि आपल्या कसदार, विलक्षण ताकदीच्या अभिनयाने हा सारा पट जिवंत करणारे, मनावर ठसा उमटवून जाणारे अभिनेते.... 'अनुमती' चित्रपटात ह्या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात! एक संपन्न, समृद्ध अनुभव देताना तुमच्या-आमच्या मनात ही 'अनुमती' घर करून जाते हे निश्चितच!

बोलक्या रेषा - ५

Submitted by बोलक्या रेषा on 14 June, 2013 - 00:25

आता मायबोलीवर नियमीत पहा !! बोलक्या रेषा!!!

BoRe5.jpg

प्रताधिकार : श्री. घनश्याम देशमुख. श्री. घनश्याम देशमुख यांच्या परवानगीने प्रकाशीत.

विषय: 

शाळेतील गमतीदार प्रसंग

Submitted by टोच्या on 12 June, 2013 - 09:35

'शाळेतील दिवस' हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. शाळेत असताना प्रत्येकाच्या बाबतीत अशा काही गमती जमती, प्रसंग घडतात कि त्याची कधीही आठवण झाली कि आपली हसून हसून पुरेवाट होते. असे प्रसंग तुमच्याही बाबतीत घडले असतील तर करा शेअर…

सुरुवात माझ्यापासून करतो.

विषय: 

दोन ओळी विनोदाच्या.!!

Submitted by उदयन.. on 12 June, 2013 - 02:31

काही दिवसांपुर्वी फेसबुक वर दोन ओळ्या वाचल्या.. आजकाल या प्रकारच्या दोन ओळ्यांचे विनोद नुसता धुमाकुळ घालत आहेत

फोन जनरल मोड मे हो ना चाहिये
सायलेंट मोड मे तो मनमोहन भी है...

फोन के नाम अ‍ॅपल या ब्लॅकबेरी होना चाहिये
एस३ , एस ४ तो रेल डब्बे के भी नाम होते है

इन्सान को दुखी होना चाहिए
खुश तो मोगॅम्बो भी होता है

प्यार सच्चा होना चाहिए
अंधा तो कानून भी है...
.

हाच प्रकार मायबोलीवर मराठी मधे आणण्याचा प्रयत्न आहे... आपण सुध्दा हात भार लावावा

१) कथा नेहमीच पुर्ण लिहाव्यात

क्रमशः तर विशाल सुध्दा ठेवतो....;)

२) कधीतरी तिरुपतीला सुध्दा जावे

विषय: 
शब्दखुणा: 

एक थेंब कृपेचा रे...

Submitted by पुरंदरे शशांक on 11 June, 2013 - 05:27

एक थेंब कृपेचा रे...

कृष्णमेघ गगनात
रुप तुझे नयनात
बरसवी अंतरात
तुझ्या कृपेचे अमृत

नांगरुनी रे भुईला
किती शिणलो थकलो
तण विखारी काढता
वारं वार खंतावलो

प्रेमबीज पेरियले
अशा बरड भूमीत
भाव शिंपूनिया ठेवी
रोप थोडे पल्लवीत

मेघ बरसवी आता
झडकरी देवराया
सुकुनिया जाई रोप
आटली का तुझी माया

नाही मागणे अफाट
नसे आस सागराची
तहान ती अति अल्प
एक थेंब चातकाची

एक थेंब कृपेचा रे
मजलागी धाड देवा
परिपूर्ण जीवनाचे
भाग्य लाभे वेड्या जीवा

बोलक्या रेषा - ४

Submitted by बोलक्या रेषा on 9 June, 2013 - 23:47

आता मायबोलीवर नियमीत पहा !! बोलक्या रेषा!!!

BoRe4.jpg

प्रताधिकार : श्री. घनश्याम देशमुख. श्री. घनश्याम देशमुख यांच्या परवानगीने प्रकाशीत.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन