मनोरंजन

सुमल्याची आश्रमवारी... (४)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

दुसरे दिसां, भल्या फाटेचीच उठून सगळी मंडळी आपापली आन्हिका आटपून, आयलेलो नाश्तो, चाय संपवून, तयार होवन काल भेटून गेलेल्या 'सफेदीकी चमकार' ची वाट बघी होती. सगळ्यांबरोबर सुमल्याही अगदी तयारच होता, बाबल्यान सगळा व्यवस्थित बघून घे म्हणान सांगितलेला त्येच्या बरोब्बर ल़क्षात होता! जावन परत रिपोर्ट देवचो होतो तेका! आणि एक गाडी घेवन कालचोच शिष्य सगळ्यांका घेवन जावक आयलो... "जय श्रीकृष्ण, जय गुरुदेव...चलाव, आज आश्रम पाहूयात.... " आश्रमाचो फेरफटको मारुक सगळे गाडीयेत चढले.

विषय: 
प्रकार: 

सुमल्याची आश्रम वारी!!... (३)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सुमल्याक बातमी देवक बाबल सुमल्याक हाकारतच तेच्या घरच्या ओसरीर येऊन ठेपलो.

"सुमल्याऽऽऽऽऽ गो सुमल्याऽऽऽऽऽ!! चल, हिकडे ये बघया चटचट!! गो सुमल्या!! अगो, चल लवकर, माका कामा आसात गोऽऽऽ! काय फक्त तुझ्या पाठसून बातमे देवक धावत रवतलय काय दिसभर?? चल, चल!! "

"रे, काय झाला, मेल्या वराडतस कित्या धोतराक आग लागल्यासारखो?? काऽऽऽय, काय झाला?"

विषय: 
प्रकार: 

सुमल्याची आश्रम वारी!!... (२)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

अरे, अरे काय ह्या?? ऑँ?? हयसर सगळे जमलेसत काय कारणान, तुम्ही झगडतसात काय कारणा काढून, अरे शोभता काय ह्या?? अशान काय्येक होवचा नाय हातून, समाजल्यात?? तर आता हो धयकालो बंद करात आणि मुद्याचा काय ता बोलाक लागात!!"

"मी काय म्हणतय काकानुं, असा केल्यान तर? म्हणजे बघा, एक तर तुम्ही जावात, तुम्ही म्हणजे कशे, जरा वडीलधारे नाऽऽऽय, मगे तुमका समाजतला कसा वागूचा, काय बघूचा… होय का नाय रे??"

"होय, होय…" सगळ्यांनीच होकार भरलो!! सगळ्यांचा एक झटक्यात झालेला एकमत बघून पारही अचंबित झालो!!

विषय: 
प्रकार: 

कोडे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

7. 189493
8. 499707
9. 074355
10. 300590
11. 291709
12. 958640
13. 448106
14. 210362
15. 098598
16. 000241
17. 683596
18. 284933
19. 119785
20. 543019
21. 728724
22. 987319
23. 293486
24. 088198
25. 250453
26. 426329
27. 660141
28. 769721
29. 691859
30. 280351
31. 138620
32. 879021
33. 614955

विषय: 
प्रकार: 

सुमल्याची आश्रम वारी!!...(१)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

"रे बाऽऽऽबल, खयं चललय मेल्या सकाळच्या पारी इतक्या घाईत?? कोणच्या म्हशीक रेडकू झाला काय मेल्या?? तुका काय बारशाचा आवताण आसा रेऽऽऽ??" सकाळच्या चायच्या भांड्याक भायेरसून राख फासता फासता, सुमतीन बाबलाक साद घातली!

बाबलो थयच थबकलो. सुमल्याचो आवाज तेह्वाच वळाखलो त्येनी, नायतर इतक्या प्रेमळ भाषेत त्येचो उद्धार करणारा दुसरा कोण असताला!! "गो सुमल्या, अगो आयलय तरी कधी परतान? माका काय खबरच नाय!! कोण काय बोलूक पण नाय ता..."

"तर रे मेल्या!! तू येकदम मामलेदारच मां, तुका सगळे बातम्ये पोचवूक!! लोकांकनी काय काम धंधे नाय आसत काय मेल्या?? तुझे पाठसून बातमी पुरवत धावतले ते!!" इति सुमल्या.

विषय: 
प्रकार: 

विसूनाना उवाच... (३)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

नमस्कार मंडळी!!! कसे आहात? मजेत ना? मी? मीही मजेत. तुम्हीं हल्ली थिएटरमधे गेलय का मंडळी सिनेमा बघायला?? मी गेलोय. परवा, सहकुटुंब सहपरिवार सिनेमा बघायला जायचा योग आला. आता योग आला म्हणजे काय, की मला जवळ जवळ ओढूनच नेला घरच्यांनी!! हल्ली सहसा मी बाहेर पडत नाही, अन सिनेमा बघायला तर त्याहून नाही.

विषय: 
प्रकार: 

बारा ए. वे. ए. ठि. एक खरे सत्य

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बाराचे ए. वे. ए. ठि. हे जसे होण्यानंतर गाजते तसे ते होण्यापूर्वीही गाजत असते. मुळात ए. वे. ए. ठि होणार की होणार नाही यावर बर्‍याच लोकांचे विशेषतः 'बाहेरच्यांचे' एकमत नसते.

प्रकार: 

आवाज कुणाचा

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

माणसाच्या आयुष्यात 'आवाजाच' अगदी म्हणजे अगदी महत्वाच स्थान आहे. माणूस जन्माला आल्यापासून जो ' आवाज' करायला सुरुवात करतो, तो जन्मभर आवाज करत किंवा ऐकत मार्गक्रमण करत असतो.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन