Submitted by पुरंदरे शशांक on 27 June, 2013 - 10:28
तो मेघ सावळा ....
तो मेघ सावळा बरसुन राही अवतीभवती
मी मला सावरुन घेता होइन त्याची पुरती
तो भुलवत जाई मला वेडिला चिंब भिजवुनी
मी अलगद जाते कवेत त्याच्या भान हरपुनी
तो अंकुर फुलवी उजाडलेल्या रानावरती
मी धरा होउनी पेलिन माझ्या अंकावरती
तो अलगद येउन फुंकर घाली ह्रदयावरती
मी फुलून येईन रानफुलातुन खडकावरती
तो फूल होउनी मजेत डोले वार्यावरती
मी जपून ठेविन पाकळीसहि अलगद हाती
तो स्वैर कोसळे टपोर निर्मळ थेंबामधुनी
मी धरू पाहते त्याला हिरव्या हातामधुनी
तो शीळ घालतो मधुमधुरशि वेणूमधुनी
मी वेडी राधा भुलून जाइन मला विसरुनी
तो मिटवुन सारे अंतर येतो धावधावुनी
मी संपुन जाइन कृतार्थतेने त्याच्या चरणी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकापेक्षा एक सुंदर द्वीपदी
एकापेक्षा एक सुंदर द्वीपदी
खूप सुंदर कविता !!
आहा... किती तरल, किती
आहा... किती तरल, किती अलवार... जियो
खुप छान. आवडली.
खुप छान. आवडली.
खूपच सुंदर. आवडली. सगळीच कडवी
खूपच सुंदर.
आवडली. सगळीच कडवी छान आहेत.
खरोखर एकापेक्षा एक ,सहमत
खरोखर एकापेक्षा एक ,सहमत वैभवशी.
सुरेख! आवडलीच
सुरेख! आवडलीच
(No subject)
सर्वांचे मनापासून आभार - असाच
सर्वांचे मनापासून आभार - असाच लोभ असू द्यावा....
फारच छान. एकदम ओघवती....
फारच छान. एकदम ओघवती....
वा ! आशय, मांडणी .....
वा ! आशय, मांडणी ..... छानच.
वृत्तहाताळणी देखील बरीच चांगली जमलेय.
मिसली होती! अत्यंत आवडली.
मिसली होती! अत्यंत आवडली.
खुपच सुंदर! आवडली
खुपच सुंदर!
आवडली
अहाहा...नितांत सुंदर !!
अहाहा...नितांत सुंदर !!
वा! अप्रतिम!!
वा!
अप्रतिम!!:)
आहाहा! अतिसुंदर! प्रत्येक
आहाहा! अतिसुंदर! प्रत्येक ओळच छान आहे.
सर्व जाणकार, रसिक,
सर्व जाणकार, रसिक, मान्यवरांचे मनापासून आभार .....
मस्तच रे शशांक.. अंकावरती
मस्तच रे शशांक..
अंकावरती नाही समजलं, टायपो?
वाहवा ! सुंदर रम्य काव्य
वाहवा !
सुंदर रम्य काव्य !
(अंकावर म्हणजे मांडीवर , कुशीत या अर्थाने वापरलेला आहे तो.)
मस्त.. आवडली.
मस्त.. आवडली.