धर्म

युगांतर - आरंभ अंताचा भाग १४

Submitted by मी मधुरा on 28 July, 2019 - 23:59

ऱथ महाली पोचला. भीष्म व्यथित मनाने आपल्या कक्षात जाऊन बसले. 'गुरुंनी केलेले शाब्दिक आघात, त्यांचा अपूर्ण राहिलेला न्याय, आपल्यामुळे दुखावलेली, उधवस्त झालेली अंबा..... ! हस्तिनापूरा, वचनबद्ध नसतो, तर गुरुंवर हत्यार चालवण्याचे महापाप करण्याआधीच इच्छामृत्यू घेतला असता मी!'
विचित्रवीर्य तोल सांभाळत भीष्मांच्या कक्षाबाहेर आला, "भ्राता भीष्म...." त्याच्या हाकेने विचारांतून बाहेर पडत भीष्मांनी मागे वळून बघितले. उठून त्याला धरत आसनावर बसायला भीष्मांनी मदत केली,"युवराज, आपण का आलात? मला बोलावले असते.... मी सेवेत हजर झालो असतो."

शब्दखुणा: 

युगांतर - आरंभ अंताचा भाग १३

Submitted by मी मधुरा on 28 July, 2019 - 04:43

"भीष्म, सर्व कुशल आहे ना?"
"होय राजमाता. काहीवेळा पूर्वीच नगरीत जाऊन येणे झाले. हस्तिनापुरी सर्व स्वस्थ आहे."
"नाही भीष्म, मी नगरीबद्दल बोलत नाही."
"मग राजमाता?"
"विचित्रवीर्य च्या विवाहानंतर मी पाहातेय... तू अस्वस्थ दिसतो आहेस. सर्व ठिक आहे ना?"
भीष्म काहीच बोलले नाहीत. सत्यवतीने तलम गुंडाळलेले संदेशवस्त्र त्यांच्या हाती दिले.
भीष्मांनी उलगडून ते वाचले. 'अद्य शीघ्रंम् आगच्छतू!'
"परशुरामांनी पाठवलेला संदेश दास घेऊन आला होता तू महालात नव्हतास तेव्हा."
"आज्ञा असावी राजमाता. माझ्या गुरूंनी मला बोलावलेले आहे."

विषय: 
शब्दखुणा: 

युगांतर- आरंभ अंताचा भाग १२

Submitted by मी मधुरा on 27 July, 2019 - 06:00

भीष्मांनी रथ नदीकाठी थांबवला. मनातली घालमेल त्यांना महालात बसू देत नव्हती. नदीकाठी बसून गंगामातेशी बोलून त्यांना मन शांत करावेसे वाटू लागले. त्यांनी नमन करून गंगेला आवाहन केले. एकदा.... दोनदा.... तिनदा.... पण गंगामाता कुठेच दिसेनात. भीष्म अस्वस्थ झाले.
"माते.... आपण प्रकट का होत नाही?"
भीष्म नदीतटावर वाकून हातात जल घेण्याचा प्रयत्न केला, परंतू जल त्यांच्या हातात येईच ना.
" त्या रुष्ट झाल्या आहेत वसूदेव...."
भीष्मांनी वळून पाहिले. एक सुंदर स्त्री उभी होती. तिचे सौंदर्य दैवी भासत होते.
"आपण कोण देवी?"

शब्दखुणा: 

युगांतर- आरंभ अंताचा भाग ९

Submitted by मी मधुरा on 24 July, 2019 - 05:24

हस्तिनापुराच्या महालात युवराज देवव्रत चिंताग्रस्त होऊन फेऱ्या घालत होते. महाराजांची प्रकृती गेल्या सप्ताहात बरीच खालावली होती. वैद्यांनीही हात टेकले होते. तरीही राजवैद्य सतत प्रयत्न करत होते. महाराजांची प्रकृती अशी खंगावत चाललेली पाहत रहाणे आता देवव्रतसाठी कठीण झाले होते. माताश्री आणि पिताश्री यांचे प्रेम कधी एकत्र लाभलेच नाही. माताश्री तर पित्याची सेवा करण्याचा आदेश देउन निघून गेल्या आणि पिताश्रींची तब्येत अशी! आपण वैद्यकशास्त्र अवगत केले असते तर आज ही वेळच आली नसती. तत क्षणी बाकी सर्व विद्या देवव्रतला व्यर्थ वाटत होत्या.

शब्दखुणा: 

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ७

Submitted by मी मधुरा on 22 July, 2019 - 02:07

नगरातील कोळ्यांच्या वस्तीत आनंदोत्सव चालला होता. जाळ्यात अडकलेल्या विशाल माश्यामुळे सर्वजण खुश होते. आपल्या राजाला हा मासा भेट देउन त्यांची खुशामत करावी म्हणून माश्यासह मासेमार राजमहालात आले. महाराज सुधन्वा च्या समोर माश्याला कापण्याचा कार्यक्रम सुरु झाला. कापताना मासेमाराला काहीतरी विचित्र जाणवले..... त्याने कडेच्या बाजूने छेदत मासा कापला. सगळे अचंबित. आत दोन मानवी बालके होती. माश्याच्या पोटी! एक पुत्र आणि एक पुत्री. पण कोणाची? माश्याची? ऱाजा आणि प्रजा स्तब्ध.
भानावर येत राजाला प्रश्न पडला. आता काय करायचे ? या चमत्कारिक जन्मलेल्या बालकांना पहायला सारी नगरी जमली.

शब्दखुणा: 

युगांतर- आरंभ अंताचा भाग ६

Submitted by मी मधुरा on 21 July, 2019 - 06:22

ब्रह्मदेवांचा क्रोध ! ज्यामुळे त्यांनी स्वपुत्री मृत्यूलोकात धाडली! देव - देवतांना भोगाव्या लागलेल्या या शापप्राप्त यातनांच्या अग्निकुंडात बळी पडला अजून एका अप्सरेचा! अद्रिका! मृत्युलोकी मस्य रुप धारण करण्याचा ब्राह्मदेवांचा शाप भोगण्यासाठी ती धरेवर अवतरली. धरेवरून पहटेच्या काषायवर्ण सुर्यदेवांचे रुप पाहून तिला मनोमन आनंद झाला. सुर्यदेवांचे प्रतिबिंब यमुनेच्या जलप्रतलावर पडलेले होते. नदी प्रवाहावर येणाऱ्या अलगद लाटांनी त्या प्रतिबिंबाला अस्थिर करत सर्व जलास केशरी छटा दिली होती. सुर्यदेवाच्या त्या लोभस रुपाकडे पाहत अद्रिकेने भानूदेवाला नमन केले आणि यमुनेच्या जलप्रवाहात प्रवेश केला.

शब्दखुणा: 

युगांतर - आरंभ अंताचा भाग ५

Submitted by मी मधुरा on 21 July, 2019 - 00:11

चंद्रदेवाने त्याची ताऱ्यांची सभा आकाशात मांडली आणि महाल दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. महाराजांचा रथ पोचला आणि दास-दासी लगबगीने आरती आणि गुलाब पुष्प घेऊन आले. आरतीने महाराजांचा त्यांच्या भावी पत्नीसोबत प्रवेश झाला. महाराज्यांच्या नावाचा जयघोष झाल्यावर भावी महाराणींचे नाव सर्वत्र घोषित करण्याकरिता दासांनी नावाची विचारणा महाराजांना केली. शंतनूने क्षणभर चकित होऊन सुंदरीकडे पाहिले. जिला जीवनसंगिनी बनवायचे, तिचे नावही त्याने विचारले नव्हते. दिलेले वचन तत्परतेने पाळत होता की तिचा परिचय त्याला तिच्या नेत्रांतून मिळाला होता.... कोण जाणे!

शब्दखुणा: 

युगांतर - आरंभ अंताचा भाग ४

Submitted by मी मधुरा on 20 July, 2019 - 12:13

पुर्वेला लाली शिंपडत पहाट हरित तृणांवर दवाचा वर्षाव करू लागली. पक्षांनी किलबिलाट सुरु केला आणि हस्तिनापुर नगराला जाग आली. महालात दास-दासींचा वावर चालू झाला. महाराज दास महराजांच्या कक्षेत फलाहार घेऊन गेला. पण महाराज तिथे होतेच कुठे?

हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र

Submitted by कोहंसोहं१० on 19 July, 2019 - 10:56

आपल्या प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये काळाच्या अगदी छोट्या परिमाणापासून म्हणजे त्रुटीपासून (१ त्रुटी म्हणजे ०.३ मायक्रोसेकंद) ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत वेळेची गणना केली आहे. आजच्या लिखाणापुरते आपण मोठ्या कालपरिमाणाविषयी (ब्रह्मदेवाच्या आयुष्याविषयी) पाहू.
हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती ग्रंथामध्ये या कालपरिमाणाचा उल्लेख येतो.

विषय: 

थोडेसे हिंदू धर्मा विषयी....

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 18 July, 2019 - 11:46

हिंदू धर्म हा किती प्राचीन आहे याविषयी जाणकारांमध्ये बरेच मतभेद आहेत. हिंदू म्हणजेच "आर्य सनातन वैदिक संस्कृतीच्या" ऋषींचे मत मानायचे तर प्रत्येक १५००० ते २०००० वर्षांनंतर येणाऱ्या प्रलयानंतर मानव हळू हळू पुन्हा एकदा मानव बनू लागतो... ऋषी त्यांच्या स्मृतीतून, त्यांच्या अंतरचक्षुनच्या समोर या साऱ्या सृष्टीचे, तिच्या जडण घडणीचे जे ज्ञान ऋतम्भरा प्रद्नेने दिसते ते मांडतात. म्हणून ते स्वत:ला या वेदांचे निर्माते म्हणवून घेत नाहीत तर "उद्गाते" म्हणवून घेतात.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - धर्म