उलटे चालत जायचे आहे..

Submitted by नोझिपा मरारे on 3 December, 2019 - 09:33

महाराष्ट्रात जर फसवणीस साहेबांना त्यांचे आवडते विरोधी पक्ष नेते पद मिळाले तर दक्षिणेतील एका प्रसिद्ध देवस्थानाला घरापासून उलटे चालत जाईन असा नवस बोललो होतो. तरी या साठी काय काय तयारी करायला हवी ? काय काळजी घ्यायला हवी याबाबत माहिती हवी आहे. अनुभवी व जाणकारांचे अनुभव वाचायला आवडतील. हातकाही पुरूषांना उलटे चालत जाताना वेगळी काळजी घ्यावी लागते का ? (जर कुणी असेलच तर म्हणून असू द्यावी माहीती. ऐन वेळी कुठे धागा काढत बसू ?)
मायबोलीकरांकडून सहकार्याच्या प्रतिक्षेत.

प्रस्थानाचे ठिकाण - तळेगाव, पुणे
आगमनाचे ठिकाण- (नाव सांगितले तर नवस फिटेल काय ? ) प्रसिद्ध स्थळ दक्षिणेतले.

अंतर १२२० किमी.
चालणा-याची स्थिती - वय ३५ वर्षे, उत्तम आरोग्य
सोबत - शेवटच्या २५ किमी मधे १५ जण येणार आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
उलटे चालत?
म्हंजे डोके खाली (जमिनीकडे) पाय वर (आकाशाकडे) Rofl

माता-पिता यांच्या भोवती एक प्रदक्षिणा = पृथ्वीची प्रदक्षिणा.
पृथ्वीचा परीघ = ४०,००० की.मी.
तुम्हाला जायचंय : १२२० किमी.
१२२०/४०००० = ०.०३
माता पिता यांचे भोवती उलट चालत ०.०३ एवढी प्रदक्षिणा करा.

हतकाही पुरुष ही काय भानगड आहे? बादवे फडणवीस साहेबांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले म्हणून उलटे चालत जाणार मग उंदिरमामा मु. मं. झाल्याबद्दल लोटांगण घालत जाणार काय...

बालाजीचा डोंगर उलटा चढणार आहात का? मग एक करा हातात मोठ्ठा आरसा धरा व तो पहात पहात उलटे चालत रहा. कधी ना कधी पोचालच.

चालत कशाला जाताय? धावत जा. सावरखेड एक गाव पिक्चर बघा. त्यात ते डाकू उलटे धावत असतात. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल.

फडणवीसांकडून शिका काही तरी राव. घरापासून उलटे चालत जाईन असा नवस होता ना? कुणाच्या घरापासून ते स्पष्ट नव्हते. त्या प्रसिद्ध देवस्थानाजवळ एखादे घर पहा. आणि तिथून करा सुरुवात. फेडून टाक नवस. हाकानाका Wink

मून वॉल्क शिका मायकेल जॅकसनवाले.. लेस एफर्ट मोअर डिस्टन्स.. प्लस येणाजाणारयांचे मनोरंजन

पुणे ते तिरुपती ११२० किमी काटकर दाखवत आहेत.
तुम्ही उलटे जायचे म्हणून १०० जास्त घेतले आहेत का?

तुम्ही खाली डोकं नी वर पाय अशा प्रकारे उलटं हातांच्या साहाय्याने चालत गेलात तर तुमच्या मेंदूत रक्ताभिसरण वाढून त्याची कार्यक्षमता वाढून साधारण पातळीला येईल.

माझ्या माहितीप्रमाणे टूण्णा नावाच्या एका गाढवाला अशा प्रकारच्या व्यायामाचा फायदा झाला होता...

हे बघा, या माणसाकडे चौकशी करा. तो नक्की मदत करेल
https://www.youtube.com/watch?v=XVQCkM6X-Aw

(फक्त पुढून येणार्‍या म्हशींना आणि रेड्यांना चुकवण्याकरता एक रिवर्स कॅमेरा बसवून घ्या )

मी वर नीट वाचले नाही की काय?
हा चला ना गडे उलटा चालायचा नवस आहे?
तुमचा नवस लवकरात लवकर पुर्ण व्हावा. Happy

<< महाराष्ट्रात जर फसवणीस साहेबांना त्यांचे आवडते विरोधी पक्ष नेते पद मिळाले तर दक्षिणेतील एका प्रसिद्ध देवस्थानाला घरापासून उलटे चालत जाईन असा नवस बोललो होतो. >>

------- फसवणीस साहेब... Happy

मी वर नीट वाचले नाही की काय?.….नवस कसा फेडायचा या बाबत उपाय .... बाहुल्याला उलटे धरून देवस्थानाला जायचे...नवस फिटेल

रच्याकने, पाठीला फेअर आणी लवली लावून चाला, >>
रच्याकने उलटे चालू नका. उगाच गटाराबिटारात पडाल. रच्यामधून चाला.

कडेला गटार मधोमध खड्डे...
या देशात माणसाने उलटे चालायची सोय राहिली नाही.
गरीबाने नवस फेडावा तर कसा..
की गरीबांना नवस करायचा हक्कच नाही??
स्वतण्त्र धाग्याचा विषय

चांगले नवस बोलावे.
उदा: मला सुट्टी मिळाली तर ट्रेकिंगला जाईन
मला लॉटरी लागली तर युरोप ट्रीपला जाईन
मला बोनस मिळाला तर नवा सेलफोन घेईन
वगैरे.

माझे आवडते फसवणीस साहेब हेच विरोधी पक्षनेते व्हावेत म्हणून मी नवस केला होता. नाहीतर हे पद राधाकृष्ण विखे पाटील किंवा नारायण राणे यांच्या कडे गेले असते. नवसाला देव पावला आहे. त्यामुळे आता नवस सोडून शब्द पाळला पाहिजे असे मला वाटते.

तिरुपतीहून तळेगावला सरळ चालत जा आणि मग एका कालयंत्रातून भूतकाळात प्रवास करा. मग तुम्ही प्रकाशाच्या वेगापेक्षा थोड्याश्याच अधिक वेगाने तिरुपतीच्या दिशेने गेलात तर तुम्ही स्वतःला उलटे चालतान बघू शकाल.

पाव जर बघायचेच असेल तर विडिओ काढून रिवाईंड करून नाही बघू शकत का?
देवाला फसवून नवस पुर्ण केला तर अर्थ आहे का त्याला?

हो बरोबर आहे. मग खरोखर उलटे चालत जाणे भाग आहे. मग मूल प्रश्नाकडे येतो.
जाताना घ्यावयाची काळजी:
- सोबत कुणी सरळ चालणारा/री असल्यास उत्तम
- तरीपण अधून मधून मागे बघत चला
- चक्कर येऊ शकते - थोडी औषधे सोबत बाळगा
- सरळ चालतानी आपण (हातकाही पुरुष) टाचा आधी टेकवतो. त्यामुळे जोड्यांच्या टाचांची झीज जास्त होते. साधारणपणे जोड्यांच्या टाचा जाडच असल्यामुळे प्रश्न येत नाही. पण उलटे चालताना जाड चवडे असलेले जोडे तुम्हाला घ्यावे लागतील.
- तळेगावात चोर्‍या-मार्‍या फार होतात. डोळ्यासमोरून माल लंपास होतो, तर मग उलटे जाणार्‍यांची काय कथा! काळजी घ्या.
- उलटे चालताना पाठीवर पडण्याचा जास्त संभव आहे. बॅकगार्ड वापरा (मिळत असल्यास. नाहीतर त्या वस्तूचा शोध लावा आणि वापरा)
- समोर ढांग टाकण्यापेक्षा मागे टाकणे अवघड असते. त्यामुळे उलटे चालतानी जास्त पावले चालावी लागतात. त्यामुळे धाप लागेल. जास्त वेळा वरखाली झाल्यामुळे खिशात शाईपेन असेल तर शाई बाहेर येऊ शकते. शाईपेन ठेवू नका. धाप-प्रतिबंधक औषधे घ्या.
- सावकाश आणि कडेकडेने जा; वाटेत कुणी चॉकलेट दिले तर घेऊ नका.
- पायाला घाण लागू नये म्हणून जसे जपाल, तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो!

एव्ढे करण्यापेक्षा देवाकडे पाठ करून एक ऊंच उडी मारायची जी थेट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या पार गेली पाहिजे. आणि अशी मारायची की पृथ्वी फिरत फिरत उडी मारलेल्या जागी आली की आपलीही ऊडी पुन्हा मूळ जागी येत पुर्ण झाली पाहिजे. मग काय बस्स पाठ वळवायची आणि घ्यायचे देवाचे दर्शन..

मी पूर्वी करायचो हे, दूरचा प्रवास करायला.
पण मग केवळ वैमानीकच नव्हे तर इस्रो नासाच्या लोकांनी येऊन विनवण्या केल्या की त्यांना भीती वाटते विमान, अंतराळयान चालवताना. म्हणुन सध्या थांबवले आहे.

Pages