कालसुसंगत धर्मशास्त्र

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 29 November, 2019 - 00:36

हिंदू धर्मातील जुनाट कर्मठ चालीरीती , परंपरा आणि कालबाह्य , तर्कविसंगत शास्त्रनियम व रूढी फेकून देवून नवीन कालसुसंगत धर्मशास्त्र निर्मितीच्या प्रयत्नांकरिता हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !!!

धर्मशास्त्रात काही "स्थिर तत्त्वे" व काही "चल तत्त्वे'" आहेत असे म्हटले जाते . "कर्म" आणि "क्रिया" या भिन्न आहेत जसे की स्वतःच्या शारीरिक क्रिया म्हणजे जेवणे , न जेवणे , आंघोळ , शौचक्रिया इत्यादी . ह्या क्रिया म्हणजे कर्म नव्हे . कर्म तेव्हाच बनते जेव्हा त्या क्रियेमागे विशिष्ट हेतु अस्सतो . व त्या हेतुनुरूप ते कर्म चांगले अथवा वाईट ठरते .

स्थिर तत्त्वे जसे की मूलभूत नीतिशास्त्र कधीच बदलत नाही उदां. चोरी करणे , खोटे बोलणे , दुसऱ्या व्यक्तीला त्रास होइल असे वागणे हे पाप आहे हे नियम कधीच बदलत नाहीत . एका अर्थाने त्यालाच #कर्मविपाक नियम म्हणतात . म्हणूनच "पुण्य परोपकार पाप ते परपीडा" अशी वचने रूढ झाली .

चल तत्त्वे ही मुख्यतः क्रियेसंबंधी असतात . उदाहरणार्थ काय खावे , प्यावे , कुठे कुणाकडे खावे , काय केल्यास आंघोळ करावी इत्यादी . या चल तत्त्वात कालानुरूप बदल संभवतात . आणि तेच धर्मनियम मंडळाने बदलले आहेत .

dharma.jpg

पंचागकर्ते अनंत (मोहन) दाते यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात 'कालसुसंगत-आचारधर्म' या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. 'सध्याच्या काळातील जीवनव्यवस्था, विभक्त कुटुंब पद्धतीचा विचार करून २१ विद्वान अभ्यासकांनी एकत्र येऊन हा ग्रंथ तयार केला आहे. लोकमान्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विवेकशास्त्री गोडबोले, पंचांगकर्ते विद्याधर करंदीकर, श्याम जोशी, प्रभाकर पाध्ये, पंचांगकर्ते ओंकार दाते, अरुण वझे, प्रकाश दंडगे गुरुजी, बाळासाहेब दीक्षित, किशोरशास्त्री पाटणकर, विद्यावाचस्पती माधव केळकर, व. दा. भट, श्रीराम भट, वसंतराव गाडगीळ, वीरेंद्र कुंटे, धुंडीराज वेदपाठक आदी उपस्थित होते.

गिरी म्हणाले, 'ज्याला धर्माचे ज्ञान प्राप्त करायचे असेल त्याने वेदांचा आधार घ्यायला हवा; तेव्हाच खरा धर्म कळतो. ज्या ठिकाणी लौकिक प्रयत्न संपतात, त्या ठिकाणी वेदांतून अलौकिक प्रयत्नांतून सकारात्मक वलय निर्माण करता येते. धर्मातील नियम सोपे करून सांगणारे कोणीतरी हवे. ते सांगताना मूळ उद्देशाला धक्का न लागता आजच्या काळात त्याची सुसंगती कशी बसवता येईल याचा देखील विचार केला पाहिजे. आज धर्माचे मूळ विचार टिकविण्याची आवश्यकता आहे. भारतीय हिंदू वैदिक संस्कृती तेजाने तळपत आहे. अशी प्रभावी परंपरा सुरु राहीली तर देशाचे मांगल्य टिकेल,' असेही त्यांनी सांगितले.

विवेकशास्त्री गोडबोले म्हणाले, 'पूर्वीच्या ग्रंथाचे संदर्भ आज जसेच्या तसे वापरण्याला मर्यादा येतात. म्हणून या ग्रंथांचा मूळ उद्देश न बदलता, कालसुसंगत-आचारधर्म या ग्रंथाची मांडणी करण्यात आली आहे.' मोहन दाते म्हणाले, 'चाळीस वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. लोकांच्या शंकांचे निरसन करीत असताना ज्या ग्रंथांचा संदर्भ दिला जातो, ते ग्रंथ दोनशे ते पाचशे वर्षे जुने आहेत. त्यामुळे या नवीन पिढीसाठी विभक्त कुटुंबपद्धतीसाठी २१ व्या शतकातील २१ विद्वान अभ्यासकांनी एकत्र येऊन दोन वर्षे काम करून कालसुसंगत-आचारधर्म या ग्रंथाची मांडणी केली. यामध्ये पूर्वीचे काही नियम काळाप्रमाणे बदलले आणि काहीचे विश्लेषण केले. जन्म ते मृत्यूपर्यंतचे सगळे संस्कार या ग्रंथात आहेत.'

यापुढे जुनाट कर्मठ आणि मध्ययुगीन आंधळे धर्मनियम हिंदू समाजावर थोपणारी तथाकथित " शास्त्र " ग्रन्थ रद्दीत काढून कालसुसंगत आचारधर्माचे पालन करणे नक्कीच सोपे पडेल .

" कालसुसंगत आचारधर्म "
मूल्य - रुपये - १५०/-
ग्रन्थ उपलब्धता - दाते पंचांग .
पुणे - ०२०-२४४४४६२३
सोलापूर - ०२१७-२६२५३०९

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही दिवसापूर्वी थोडस चाळलय हे पुस्तक. सुतक व सुवेर यासंबंधित नियम बदलले आहेत . अन्य ही बऱ्याच गोष्टीबाबत सुधारक मतांचा स्वीकार केल्याचे जाणवते . उदा . मासिक पाळी वगैरे बाबतीत काळानुसार पाळणूक शक्य नसल्याचे मान्य केले आहे .

>>>>>>>>>> मासिक पाळी वगैरे बाबतीत काळानुसार पाळणूक शक्य नसल्याचे मान्य केले आहे .>>>>>>>>> छान.