कुलदेवतेचे आयुष्यातील, मनातील स्थान, भूमिका

Submitted by सामो on 8 November, 2019 - 14:18

हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत. राम, कृष्ण, विष्णू, विठ्ठल , शंकर, ब्रह्मदेव अशा कालापरत्वे आता मुख्य असलेल्या देवता आहेतच पण पूर्वेची देवता इंद्र, पश्चिमेची वरुण, दक्षिण - यम, उत्तर - कुबेर, वगैरे दिकपालही आहेत. अनेक देवी आहेत, काही देवींचे पुत्र जसे पार्वतीचा स्कंद व गजानन वगैरे वगैरे. कुलदेवता तर निराळ्याच - एकविरा, शांतादुर्गा, जोतिबा वगैरे.
नक्की कोणाची उपासना करायची व का? त्याचेही ढोबळ नियम आहेत.
उदाहरणार्थ - लक्ष्मीची समृद्धीसाठी, नरसिंहाची ऋणमुक्तीकरता (ऋणमोचन स्तोत्र घ्या ना), गणपतीची बुद्धीसाठी वगैरे.
.
परवाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर, नवर्‍याच्या त्वचेवरील तीळाची बायॉप्सी झाली. नंतर ५-६ दिवस लागले निकाल यायला. पण तेवढ्या काळात जी घालमेल झाली ती (वाईट रीतीने) अवर्णनियच, न विसरता येणारी होती Sad पण या काळात मी कुलदेवतेला शरण गेले कारण एकच माझ्या सासूबाई तिचं नेहमी करायच्या व त्यांचे आयुष्य बरेचसे खडतर गेलेले असले तरी त्यांना दैवाची साथ होती. म्हणजे आमच्या एकविरा आईचा वरदहस्त असावा, देवीची कृपा असावी अशी त्यांची मनःशांती व धैर्य होते
मला मात्र या ६ दिवसात अचानक एकविरा देवीची आठवण आली व मी रोज स्तोत्र म्हणू लागले, तिच्या तस्बिरीपुढे उपरती झाल्याप्रमाणे, हात जोडू लागले. ६ दिवसांनी, निकाल चांगला आला, benign आला वगैरे ठीक आहे.
पण मला काही प्रश्न पडले.
(१) आपल्या जीवनात कुलदेवतेचे महत्त्व काय असते व का असते? खरच ही देवता आपल्या पाठीशी उभी रहाते का? त्या म्हणण्यात काही तथ्य आहे का?
(२) जीवनात गुरुचे महत्व काय असते व का असते?
(३) अन्य देवांचे आपल्या आयुष्यात नक्की काय स्थान असते?
उदाहरणार्थ, गेल्या काही दिवसात, मला असे आतूनच वाटले की आपल्याला यातून ना राम, ना शंकर , ना गणपती, कोणी जर बाहेर काढू शकेल तर फक्त देवी काढू शकेल. हा आडाखा कितपत अचूक आहे? मी भारतात असतेवेळी बरेचदा एकविरेला गेलेले आहे परंतु दर वेळी डोकं दुखणे किंवा काहीतरी तत्सम घडत असे. एकदा तर पायथ्याशी पोचल्यानंतर पित्त झाल्याने अन्नही उलटलेले होते.
अजुन एक ज्यादिवशी नवर्‍याचि बायॉप्सी झाली त्याच दिवशी नेमके माझ्या हातून, मराठी सप्तशती वाचणे घडले. म्हणजे मी पहील्यांदा ओढीने पूर्ण मराठी सप्तशती आयुष्यात पहील्यांदा त्या दिवशी वाचली होती सकाळी व नंतर त्याच दिवशी रुटीन चेक अपमध्ये तो तीळ सापडला व डॉक्टरांनी ताबडतोब बायॉप्सी केली. हाही योगायोगच की.
अर्थात हे सर्व श्रद्धेचे, मनाचे खेळ आहेत असेही एक म्हणता येइल पण 'कुलदेवता' याविषयी अधिकारी किंवा जाणकार लोकांचे अनुभव ऐकायला आवडतील.
______________________
दुर्गा सप्तशतीच्या शेवटच्या एका अध्यायात 'एकविरा' देवीचा उल्लेख येतो. तामसी गुणप्रधान देवी आहे असे वाचल्याचे स्मरते. म्हणजे रागीट, संतापी असावी. तसेच तिचे जे मंत्र मला सापडले त्यात तिचे नाव, महामारी, कालरात्री, क्षुधा, तृषा आदि तामसी शक्तींशी निगडीत सापडले. वरती माझा डोके दुखणे, उलटी होणे हे माझे अनुभव सांगीतले आहेतच.
______________
बायॉप्सीच्या निकालानंतर मात्र तिच्याविषयी सर्व माहीती नेट विंचरुन शोधून काढली. विष्णूदासांनी लिहीलेली स्तोत्रे, परशुरामकृत रेणुका स्तव व अनेक मंत्र. आता रोज सकाळ संध्याकाळ , तिचे स्तोत्र म्हणण्याचा नियमच स्वतःला घालून घेतलेला आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा, चुकून 'ललित लेखन' ग्रुप निवडला गेला. धार्मिक ग्रुपमध्ये हा धागा टाकायचा होता. पण आता मी ग्रुपच काढून टाकलेला आहे.

आधी लक्षात पण राहाणार नाही इतकं अरबट चरबट खायचं आणि मग उलटी झाल्यावर एकविरा आई तामसी म्हणून बिल फाडायचं... Wink तरी काही वाईट झाल नाही म्हणजे सासूवर नाही तर तुमच्यावर देवीचा वरदहस्त नक्की आहे. Happy निकाल चांगला आल्याबद्दल अभिनंदन.

सामो तुमच्या श्रद्धेने तुम्हाला दिलासा मिळाला. सगळंनीट झालं त्यामुळे बरं झालं.. बाकी विपू जरा बघा

देवीचा जर वरदहस्त असता तर तुम्हाला का मनस्ताप झाला असता?
मी नास्तिक आहे पण एका मित्राने आस्तिक गृपवर ॲड केले आहे. तिथे दुर्गा सप्तशती ,बटुक भैरवचे अनुभव ,उपासना, त्याचे फायदे पोस्ट होत असतात.तुम्हाला आवडत असेल तर तिथे ॲड करतो.WA नं विपु करा.

हाहाहा सिमंतीनी नाही ग, उलट त्या दिवशी पाहुण्यांच्या सरबराईत खायलाच झाले नव्हते. पण तुझा मुद्दा लक्षात आला. पण एकंदर ३ वेळा माझ्या दर्शनात विघ्न आल्याचे आठवते. पण तुझ्या म्हणण्याचा मतीतार्थ लक्षात आला.
_________________
प्राचीन प्लीज विपू बघ.
_________________

केशव तुलसी, मी पहाते तो ग्रुप. धन्यवाद.

एक गोष्ट कधीच विसरू नका जगाचा नाही पण पृथ्वी वरील सजीव सृष्टी चा निर्माता आहे.
फक्त माणूस हा एकच प्राणी उत्क्रांत होतो हेच
मोठे गूढ आहे
एक पेशिय जीव सर्व जीवांचे जनक आहेत.
हे सायन्स नी सुद्धा नाकारले नाही
त्या मध्ये फक्त माणूस हा एकच कमजोर प्राणी उत्क्रांत होतो हे कोडे अजुन तरी सुटले नाही.
देव म्हणजे दुसरा तिसरा कोन नसून मानवाला उत्क्रांत करणारा alien आहे .
विशाल विश्वात तो प्राणी आपण शोधू शकत नाही..
33 कोटी देव,आणि बाकी etc आपणच ठरवले आहे .
आज जगातील कोणत्या ही कोण्यातील कॉम्प्युटर ला आपल्या इशाऱ्यावर नचवणे काही अवघड नाही.
तसे जगातील कोणत्याही प्राणी,वनस्पती ,आणि सर्व सजीवांना आपल्या पेक्षा प्रगत जीवना
हवे तसे नाचवणे काही अवघड नाही हातचा मळ आहे

देवीचा जर वरदहस्त असता तर तुम्हाला का मनस्ताप झाला असता? >> Happy आपल्या आयुष्यात जे काही 'रायता फैल गया' प्रसंग असतात ते आपले आपल्याला निस्तरायला वैतागवाणे, अशक्य असतात. देवावर भार टाकल्याने रोजचा दिवस ढकलणे सोपे होईलच असे नाही (उदा: जिला रोज मैलभर चालून पिण्याचे पाणी आणावे लागते, ती रामनाम घेत हंडा सांभाळत चालेलही पण कधी कधी मनस्तापही करेल...). श्रद्धा, सबुरी, आणि प्रयत्न या तिवईवर आयुष्याचा घडा नीट बसतो. यातलं एक कमी पडलं की सगळं डचमळतं...

>> श्रद्धा, सबुरी, आणि प्रयत्न या तिवईवर आयुष्याचा घडा नीट बसतो. यातलं एक कमी पडलं की सगळं डचमळतं...>> सुंदर वाक्य!!

श्रद्धा, सबुरी, आणि प्रयत्न या तिवईवर आयुष्याचा घडा नीट बसतो. यातलं एक कमी पडलं की सगळं डचमळतं... >> वाह!

याबरोबरचं मी स्वत: नशीब, नियती, प्राक्तन जे काही म्हणतात यांनाही मानते, इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर, मी हे नक्कीच महत्वाचे मानते.

अर्थात केवळ देव, देवी, गुरु यांवरील श्रद्धेमुळे आणि सबुरीमुळे मी उभी आहे, प्रयत्नांना काही विशिष्ठ बाबतीत अजिबात यश मिळालं नाहीये.

याबरोबरचं मी स्वत: नशीब, नियती, प्राक्तन जे काही म्हणतात यांनाही मानते, इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर, मी हे नक्कीच महत्वाचे मानते. >>> मी हेच महत्वाचे मानते.

>> याबरोबरचं मी स्वत: नशीब, नियती, प्राक्तन जे काही म्हणतात यांनाही मानते, इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर, मी हे नक्कीच महत्वाचे मानते
+१.

>> श्रद्धा, सबुरी, आणि प्रयत्न या तिवईवर आयुष्याचा घडा नीट बसतो. यातलं एक कमी पडलं की सगळं डचमळतं...
छान वाक्य.

खरं आहे, आपल्या वाट्याला एखादा अनुभव का आला ह्याचे विवेचन मनाला आवश्यक वाटते पण काही तर्कसंगती लागत नाही तेव्हा मनाची समजूत घालायला 'नशीब' हा कॉन्सेप्ट उपयोगी पडतो. उदा: सनी देवलला डान्स शिकवण्याची नोकरी लागली म्हणजे नशीबच फुटकं म्हणायचं. कित्ती प्रयत्न केले तरी यश मिळणे कठीण, श्रद्धा कुठे आणि कुणावर ठेवावी, आणि सबुरी मध्ये ३० वर्ष गेली... आपली कुलदेवी आठवायची का त्याची...

(कठीण प्रसंगांचे अनुभव लिहीण्यापेक्षा असले न घडलेले पण डरावने सिनारिओज बरे! Wink )

नक्कीच काही जवळच्या माणसांच्या बाबतीत कुलदेवी, बाप्पा किंवा सदगुरु यांच्या कृपेचे अनुभव बघितले आहेत, अगदी आश्चर्यकारक आणि positive. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव पण पटला.

मी स्वतः दुर्गा त्रिशती वाचते नवरात्रात मला बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. आमच्या कुलदेवीला पण खूप मागे कोकणात जाऊन आलो, घरी रोज स्मरण करते, माहेरच्या आणि सासरच्या कुलदेवतेचे. मला आवडतं मनापासून.

i was stuck in the similar fundamental question few years back and i asked to one of my guide in life. Why a family or group has a kul devata or devi. got the answer as "we have genetical relations with devi or devta and more or less the powerful godess/ god heads our Kul in all possible ways. A person has to undergo many shifts on mental and physical levels in life where blessing are needed. So they are responsible in blessing us, recharging us. There is a say to take blessings from your kul devta in regular time intervals like yearly or 6 monthly to be in touch with devine.

मोर ओर लेस, यानंतर मला एक छान अनुभव आला. मला कॉन्सिव्ह होत नव्हतं. माझ्या सासूबाईंनी कुलदेवतेचा दर्शन घेतल आणि साकडं घातलं. प्रार्थना पूर्ण झाली. माझ्या घरी मुक्ता आली. विश्वास आणिक द्रुढ झाला.

उर्मिला आपले अनुभव आवडले. खरच होतं असं.
अन्जू इतर पुरुष देवांचं वाचताना एक रुक्षपणा येतो पण देवीचे वाचताना, इतकं छान वाटतं ना. म्हणजे प्रेम कळतं.

तसं नाही होत माझ्याबाबत, सर्व आवडतं.

मला देव, देवी, संतपुरुष जास्त करून गुरुदेवदत्त अवतार, काहीही वाचताना दरवेळी नव्याने अर्थ उमगतात, मागचयावेळी हाही अर्थ निघतो हे कसं लक्षात आलं नाही आपल्याला असं वाटतं. अर्थात मी एखादी गोष्ट वाचायला घेतली की हळूहळू वाचते, पूर्ण अध्याय वाचत नाही, मनाला येईल तशा पाच, दहा, पंचवीस ओळी.

विश्वास ठेवणे न ठेवणे बाजूला ठेवून -- आपल्या देवतांच्या पौराणिक कथा धडकी भरवणाऱ्या असतात. म्हणजे जरा काही चुकलं की " आता मेलास, अद्दल घडणार, शाप, शिक्षा इत्यादी. " मग मनोभावे प्रसाद ग्रहण ( हे फार आवडतं) की सर्व आलबेल.
सुदाम्याने कनैयाचे पोहे सर्व खाऊन टाकलेले आणि कनैया उपाशीच राहिला होता. मग बरेच वर्षांनी बायकोच्या सांगण्यावरून सुदामा कनैया -राजाला भेटायला जातो आणि पोहेच परवडतात म्हणून पोहेच नेतो ( नशीब दुसरे काही सत्तू वगैरे नेत नाही) तेव्हा रिटन मिळते. तर काय कुणाची वस्तु फुकट घेतली आणि त्याने मागे " मी याला हे दिले "अशी सतत आठवण काढली की आपल्या पुण्ण्याच्या गठडीला भोके पाडली जातात आणि ती गठडी रिकामीच होत राहाते. तातपर्य कुणाकडूनही वस्तु विकतच घ्यावी. व्यवहार संपतो. अगदी प्रसाद ही विकत घेऊनच खावा.

माहेरच्या आणि सासरच्या कुलदेवतेचे. मला आवडतं मनापासून. >> अगदी माझ्या मनात होतं, काय होतं की कुलदेवता म्हटलं की आधी माझ्या माहेरची देवीच डोळ्यांसमोर येते, इतकी वर्ष आजी आई काकू यांनी तिची केलेली उपासना पूजा त्यामुळे मनात अगदी खोलपर्यंत तिची श्रद्धा आहे, त्यामुळे सासर माहेर, दोन्ही देवींच चित्र मनात येतं.

हो मलाही माहेरची कुलदेवी जास्त जवळची वाटते, पहीलं तिचं नाव येतं तोंडात. माहेरच्या देवीला काही वर्षापुर्वी गेलो, मला तिचा एक फोटो देव्हाऱ्यात ठेवायचाच होता, तीव्र इच्छा होती. तिथून आणला मी लहानसा फोटो आणि ठेवला, मस्त वाटलं मला ही इच्छा पूर्ण झाल्यावर, एकदम प्रसन्न.

@अंजु बऱ्याच दिवसांपासून लिहिणार होते की आपल्या आवडी अगदी सारख्या आहेत हे वेगवेगळ्या धाग्यांवरच्या प्रतिसादात पण लक्षात येते. तुमचा कुठला प्रतिसाद आला की मला फक्त मम म्हणायचं बाकी राहतं.
छान वाटतं जेव्हा कोणाशी तरी आपले विचार इतके तंतोतंत जुळतात हे पाहून, तुम्हाला कधीतरी प्रत्यक्ष नक्की भेटायला आवडेल.

असं म्हटलं जातं की, जे काही द्यायचे असेल ते कुलदैवताच देऊ शकते. कुलदेवता अनुकल असेल तरच, बाकीचे देव पण देऊ शकतात.

सगळे देव आपल्यातच असतात अगदी कुलदैवता सुध्दा. पण आपल्याला ते जाणता येत नाही. यासाठीच आपल्यासारख्या सामान्य माणसाला मूर्तीची आवश्यकता असते. जेणे करून आपण त्या देवतेची सेवा करू शकू.

यास्तव आपण आपल्या कुलदैवतेची अथवा देवाची पूजा करत असताना ती आपल्याच शरीरात असलेल्या त्या देव देवतेच्या ठिकाणी पोहोचत आहे असा भाव धरला जातो. मग मात्र तीच पूजा तेच उपचार जास्त प्रभावी बनतात. पूजेत तल्लीन होऊन जाणे जमायला लागते. देव देवतेशी असलेली आत्मियता वाढत जाते. मग मात्र आपण कोठेही व कोणत्याही अवस्थेत मानसपूजा करू शकतो. मानसपूजेत सोवळे ओवळे वगैरेसारखे नियमांचा अडथळा रहात नाही की पैशाची किंवा इतर कशाची कमतरता भासत नाही. काही वर्षांनी “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती“ ही अवस्था येऊ शकते.

मात्र ज्या देवतेची आपण पूजा अर्चा करत आहोत ते दैवत आपल्यातच आहे व माझी पूजा तेथे पोहोचत आहे असा भाव धरता आला पाहिजे. मूर्तीपूजेचे हेच खरे इंगीत आहे.

मानसपूजेत देवतेची शरीरात मस्तक किंवा हृदयात स्थापना/कल्पना करून पूजा करणे उत्तममार्ग असला तरी शरीरशुद्धी आणि इतर बऱ्याच गोष्टींचं पावित्र्य जपता आलं पाहिजे. (सोवळ्या-ओवळ्यात नाही पडत). यात आधी देवतेचे आवाहन करून जी काय पूजा असेल ती संपवल्यानन्तर त्या देवतेचे विसर्जन करणे हा शेवटचा भाग महत्वाचा आहे. यात अंगन्यास, करन्यास, विविध मुद्रा ह्या गोष्टीही असतात पण त्याची चांगल्या साधकाकडून माहिती करून घेतल्याशिवाय यात पडू नये. नृसिंह, दुर्गा, काली, भैरव आणि हनुमंत या उग्रदेवतांच्या बाबतीत तर ह्या गोष्टी फार काळजीपूर्वक जपाव्यात नाहीतर माणूस सदासर्वदा कोपीष्टमोड मध्ये राहतो आणि बाकी कटू अनुभव येतील ते वेगळे (अनुभवाचे बोल). देवतेची आपण भक्ती करतो म्हणजे तिला गृहीत धरून चालू नये. काही साधक उग्रदेवता असेल तर सौम्यरूपात राहून मित्रत्वाची भावनेने सदासर्वदा बरोबर राहण्यास प्रार्थना करतात, हे ऐकून आहे. कालभैरवाच्या ऐवजी बटुकरूपात भैरव उपासना याच कारणाने सर्वसामान्य लोकांत जास्त रूढ आहे
सोपा मार्ग म्हणजे डोळ्यांपुढे ती देवता कल्पून तिची साग्रसंगीत मानसपूजा करावी. हे सर्व मी माझे वैयक्तिक मत(अनुभव) सांगतोय . बाकी कोणाचा वेगळा अनुभव असू शकतो.

Pages