हिंदू धर्म आणि विश्वाची कालगणना

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 3 December, 2019 - 22:24

आपल्या पुरातन कालगणनेचे गणित, विश्वाच्या आधुनिक कालमापनाशी किती जुळते ? सर्वसाधारणत: पंचागात या कालमापनेचे गणित दिलेले असते. अनेकांना हे गणित माहीत आहे, पण या लेखात आवश्यक वाटले म्हणून इथे त्याची पुनरावृत्ती करत आहे.
(इथे एकम, दशम, शत, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकु, मध्य, अंत्य, जलधि, परार्ध ही अंकगणना विचारात घेतली आहे.)

ब्रह्मदेवाचे आयुष्य १०० वर्षे.
ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवसात (दिन) १४ मन्वंतरे होतात. प्रत्येक मन्वंतराचा मनु, म्हणजे आद्यपुरुष वेगळा. प्रत्येक दिवसाइतकीच ब्रह्मदेवाची रात्र असते.
प्रत्येक मन्वंतरानंतर प्रलय होतो आणि काही अपवाद वगळता जीवसृष्टी नष्ट होते. जीवसृष्टीचा नव्याने आरंभ होतो. हा प्रलयकाळ कृतयुगाएवढा असतो. थोडक्यात चौदा मन्वंतरासोबत, कृतयुगाएवढे चौदा संधिकाल असतात.
या व्यतिरिक्त चौदाव्या मन्वंतरानंतर आणखी एक कृतयुगाइतकाच संधिकाल असतो.

प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे होतात.
प्रत्येक महायुगात चार युगे असतात. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग. ही युगे याच क्रमाने प्रत्येक महायुगात येतात (या संदर्भात मतभिन्नता आहे)
यातील प्रत्येक युगाच्या आरंभी त्या युगाच्या वर्षांच्या एक दशांश इतका संधिकाल असतो. युगाच्या आधी येणार्‍या संधिकालास उपसंधि व नंतर येणार्‍या संधिकालास प्रतिसंधि म्हणतात.

कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग यांची वर्षे अनुक्रमे ४०००, ३०००, २००० व १०००. पण ही दिव्यवर्षे आहेत (याबाबत मतभिन्नता आहे) . एक दिव्यवर्ष (देवांचे वर्ष) म्हणजे मानवी ३६० वर्षे.

त्यामुळे एका महायुगाचे गणित पुढीलप्रमाणे :

कृतउपसंधि : ४,०००/१० = ४०० दिव्यवर्षे = १,४४,००० मानवी वर्षे
कृतयुग : ४००० दिव्यवर्षे = १४,४०,००० मानवी वर्षे
कृतप्रतिसंधि : ४,०००/१० = ४०० दिव्यवर्षे = १,४४,००० मानवी वर्षे
त्रेताउपसंधि : ३०००/१० = ३०० दिव्यवर्षे = १,०८,००० मानवी वर्षे
त्रेतायुग : ३००० दिव्यवर्षे = १०,८०,००० मानवी वर्षे
त्रेताप्रतिसंधि : ३,०००/१० = ३०० दिव्यवर्षे = १,०८,००० मानवी वर्षे
द्वापारउपसंधि : २०००/१० = २०० दिव्यवर्षे = ७२,००० मानवी वर्षे
द्वापारयुग : २००० दिव्यवर्षे = ७,२०,००० मानवी वर्षे
द्वापारप्रतिसंधि : २,०००/१० = २०० दिव्यवर्षे = ७२,००० मानवी वर्षे
कलिउपसंधि : १०००/१० = १०० दिव्यवर्षे = ३६,००० मानवी वर्षे
कलियुग : १००० दिव्यवर्षे = ३,६०,००० मानवी वर्षे
कलिप्रतिसंधि : १,०००/१० = १०० दिव्यवर्षे = ३६,००० मानवी वर्षे

वरील गणित लक्षात घेतल्यावर :
कृतयुगाची एकूण वर्षे = ४,८०० दिव्यवर्षे = १७,२८,००० मानवी वर्षे
त्रेतायुगाची एकूण वर्षे = ३,६०० दिव्यवर्षे = १२,९६,००० मानवी वर्षे
द्वापारयुगाची एकूण वर्षे = २,४०० दिव्यवर्षे = ८,६४,००० मानवी वर्षे
कलियुगाची एकूण वर्षे = १,२०० दिव्यवर्षे = ४,३२,००० मानवी वर्षे

या सर्वांची बेरीज केल्यावर एका महायुगाची वर्षे = १२,००० दिव्यवर्षे = ४३,२०,००० मानवी वर्षे
एका मन्वंतरात ७१ महायुगे म्हणजे एका मन्वंतरात ७१ x ४३,२०,००० मानवी वर्षे = ३०,६७,२०,००० मानवी वर्षे. अर्थात तीस कोटी, सदुसष्ट लक्ष, वीस हजार मानवी वर्षे.
प्रत्येक मन्वंतरानंतर कृतयुगाइतका प्रलयकाल अर्थात १७,२८,००० मानवी वर्षांचा प्रलयकाल.

म्हणजेच प्रत्येक मन्वंतर + मन्वंतरसंधिकाल मिळून ३०,८४,४८,००० मानवी वर्षे होतात. अर्थात तीस कोटी, चौर्‍याऐंशी लक्ष, अठ्ठेचाळीस हजार मानवी वर्षे.
अशी १४ मन्वंतरे म्हणजे ३०,८४,४८,००० x १४ = ४,३१,८२,७२,००० मानवी वर्षे. अर्थात चार अब्ज, एकतीस कोटी, ब्याऐंशी लक्ष, बहात्तर हजार मानवी वर्षे.
या व्यतिरिक्त जो पंधरावा कृतयुगाइतका संधिकाल असतो त्याचे मान १७,२८,००० मानवी वर्षे

या दोघांची बेरीज करता ब्रह्मदेवाच्या एका दिवसात (दिन) ४,३२,००,००,००० मानवी वर्षे होतात. (१००० महायुगांइतका काळ). अर्थात चार अब्ज बत्तीस कोटी मानवी वर्षे. याला ब्रह्मकल्प किंवा कल्प अशी संज्ञा आहे.
या इतकीच ब्रह्मदेवाची रात्र असते. या रात्रीत महाप्रलय होतो आणि सर्व विश्व शून्यवत होते. ब्रह्मदेव दुसर्‍या दिवशी उठून पुन्हा सृष्टीनिर्माणाला सुरुवात करतो.
त्यामुळे ब्रह्मदेवाच्या एका दिवसरात्रीत ८,६४,००,००,००० मानवी वर्षे होतात. आठ अब्ज चौसष्ट कोटी मानवी वर्षे. (Carl Sagan ने उल्लेख केलेले हेच ते मापन. )

ब्रह्मदेवाच्या एका वर्षात ३६० दिवस असतात. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या एका वर्षात
३६० x ८,६४,००,००,००० = ३,१,१,०,४०,००,००,००० मानवी वर्षे होतात. अर्थात ३ महापद्म, १ निखर्व, १ खर्व, ४० कोटी मानवी वर्षे. अर्थात 3.1104 ट्रिलियन मानवी वर्षे.
त्यामुळे ब्रह्मदेवाच्या १०० वर्षांच्या आयुष्यात ३,१,१,०,४,०,००,००,००,००० मानवी वर्षे होतात. अर्थात ३ अंत्य, १ शंकू, १ महापद्म, ० निखर्व, ४ खर्व मानवी वर्षे. अर्थात 311.04 ट्रिलियन मानवी वर्षे किंवा ३१,१०४ खर्व मानवी वर्षे.

--
ब्रह्मदेवाचे आयुष्य संपल्यानंतर, दुसरा ब्रह्मदेव निर्माण होण्यापूर्वी आणखी १०० ब्रह्मवर्षे (अर्थात ३,१,१,०,४,०,००,००,००,००,००० मानवी वर्षे अर्थात 31104 ट्रिलियन मानवी वर्षे किंवा ३१,१०४ महापद्म मानवी वर्षे. ) इतका काळ ब्रह्मदेवाविना जातो. !
--

वैज्ञानिक गणितानुसार सध्याच्या अंतिम अनुमानानुसार विश्वाचे वय १३.७९९±०.०२१ अब्ज वर्षे इतके आहे.

आपले विश्व Big Bang (महास्फोटा) नंतर तयार झाले या आधुनिक सिद्धांताला लक्षात घेऊन, Big Bang म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म मानायचा की ब्रह्मदेवाने सृष्टीनिर्मितीस केलेला आरंभ मानायचा ?

ब्रह्मदेवाच्या जन्माच्या ज्या दोन कथा आहेत त्यातील एकात, ब्रह्मन व माया यांच्या संयोगातून जन्मलेले ब्रह्मांड व त्यातून जन्मलेल्या ब्रह्मदेवाचे वर्णन आहे. तर दुसर्‍या एका कथेत, विष्णुनाभीतून उत्पन्न झालेल्या कमळावर ब्रह्मदेव अवतीर्ण झाले असे वर्णन आहे.

पहिली कथा प्रथमदर्शनी काही अंशी, Big Bang शी मिळतीजुळती वाटते.

दुसर्‍या कथेतील विष्णुनाभीचा संदर्भ, आकाशगंगेच्या मध्यात असलेल्या, विशालकाय कृष्णविवराशी जोडून, काहीजणांनी आणखी एक मांडणी देखील केली आहे. दुसर्‍या कथेप्रमाणे विष्णुनाभीचा संबंध कृष्णविवराशी जोडल्यास, ब्रह्मदेवाचे आसनस्थान कृष्णविवराच्या जवळपास येते आणि याचाच दुसरा अर्थ, एका परीने असा होतो की प्रत्येक आकाशगंगेला स्वतंत्र 'विष्णु' आणि स्वतंत्र 'ब्रह्मदेव' आहे. ही मांडणी अर्थातच सहज पचनी पडणारी नाही. कारण इथे विश्व हा शब्द आकाशगंगेपुरता मर्यादित होतो.

ब्रह्मदेवाच्या वयाची ५० वर्षे उलटून गेली आहेत, ५१ व्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या, (पंचांगानुसार), अर्थात ब्रह्मदेवाचे सध्याचे वय किमान, १५,५५२ खर्व मानवी वर्षे अर्थात (किंवा 155.52 ट्रिलियन मानवी वर्षे) असले पाहिजे. हे विश्वाच्या अनुमानित १४ अब्ज वर्षांपेक्षा (अर्थात १.४ खर्व वर्षांपेक्षा) प्रचंड अधिक आहे. स्वाभाविकच Big Bang या नावाने संबोधली जाणारी घटना ब्रह्मदेवाच्या जन्माशी निगडीत नाही, असे म्हणता येईल.
मग Big Bang ही ब्रह्मदेवाच्या दिवसाची सुरुवात आहे का ? ब्रह्मदेवाच्या सध्याच्या दिवसात, ६ मन्वंतरे होऊन गेली आहेत. सातव्या वैवस्वत मन्वंतरातील २७ महायुगे उलटून, २८ व्या महायुगातील कलियुगाची ५११८ वर्षे संपली. हे गणित केल्यास :

उलटून गेलेली मन्वंतरे + संधि => ३०,८४,४८,००० x ६ = १,८५,०६,८८,००० मानवी वर्षे
उलटून गेलेली महायुगे => ४३,२०,००० x २७ = ११,६६,४०,००० मानवी वर्षे
२८ व्या महायुगात => १७,२८,००० + १२,९६,००० + ८,६४,००० + ५,११८ मानवी वर्षे = ३८,९३,११८ मानवी वर्षे

या तिन्हींची बेरीज केल्यानंतर उत्तर येते १,९७,१२,२१,११८ मानवी वर्षे . अर्थात ब्रह्मदेवाचा दिवस आरंभ होऊन, १ अब्ज ९७ कोटी १२ लक्ष २१ हजार ११८ मानवी वर्षे झाली आहेत. हा कालावधी विश्वाच्या आधुनिक गणितानुसार असलेल्या अनुमानित वयाशी जुळत नाही.

मग असे म्हणायचे का की मन्वंतरात होणारा बदल, केवळ प्रलयाशी, नव्या मनुशी (व कदाचित केवळ पृथ्वीशी) निगडीत आहे ? परंतु साधारण २अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानव अस्तित्वात असल्याचा, कोणताही पुरावा वैज्ञानिकांना अजूनपर्यंत सापडलेला नाही. सध्याच्या मान्यतेनुसार केवळ ६.६ कोटी वर्षांपूर्वी Impact Event मुळे डायनोसॉर नष्ट झाले आणि त्यानंतर साधारण ३० लक्ष वर्षांनी मर्कटसदृश प्राणी अस्तित्वात आला. पण हा कालावधी देखील सध्याच्या मन्वंतराच्या गणनेशी जुळत नाही. सध्याचे मन्वंतर सुरू होऊन १२,०५,३३,११८ अर्थात १२ कोटी ५ लक्ष ३३ हजार ११८ वर्षे उलटून गेली आहेत . म्हणजे जर या मन्वंतरापूर्वी प्रलय (संधिकाळात) झाला होता असे मानायचे असेल तर, या गणितानुसार हा प्रलय किमान १२ कोटी वर्षांपूर्वी झाला असला पाहिजे. आधुनिक (भूस्तर) विज्ञानाच्या गणितानुसार या काळात 'प्रलय' झालेला नाही.

--

ब्रह्मदेवाचा दिवस (केवळ दिवस, रात्र नव्हे) अर्थात कल्प याचे मान आहे ४.३२ अब्ज मानवी वर्षे. या संख्येशी साधारण जुळणारी मात्र एक गोष्ट आहे, ती आहे पृथ्वीचे अनुमानित वय. सध्याच्या मान्यतेनुसार पृथ्वीचे वय ४.५४±०.५ अब्ज वर्षे इतके आहे. सूर्यमालेचे अधिकतम अनुमानित वय देखील ४.५६७ अब्ज वर्षे इतके आहे. पण यातून काही विशेष साध्य होते आहे का ? ४.३२ अब्ज मानवी वर्षे जर ब्रह्मदेवाच्या दिवसाशी सुसंगत धरली तर, ब्रह्मदेवाची रात्र आता सुरू होणार (किंवा झाली) असे मानावे लागेल. याचाच दुसरा अर्थ सूर्यमालेचा/पृथ्वीचा विनाश खूप जवळ आला आहे असा होतो. ज्याची ठोस चिन्हे नाहीतच पण युगाच्या कालगणनेशी देखील ते जुळत नाही.

आपल्या कालगणनेतील, एका आकड्याच्या अंशत: जवळपास जाणारी दुसरी एक गोष्टही आहे. आपला सूर्य (त्याच्या ग्रहमालेसह) आकाशगंगेच्या केंद्राभोवती (Galactic Center) प्रदक्षिणा घालतो. आकाशगंगेचे हे केंद्र ,मूळ नक्षत्राजवळ आहे असे म्हटले जाते. (तसे असल्यास मूळ नक्षत्राचे नाव खूप अर्थवाही आहे असे म्हणावे लागेल.) सूर्याचे या केंद्रापासूनचे अंतर अंदाजे २५,००० ते २८,००० प्रकाशवर्षे इतके आहे. या केंद्राभोवती प्रदक्षिणा करण्यास २२.५ ते २५ कोटी वर्षे लागतात असे सध्याचे अनुमान आहे. हा आकडा एका मन्वंतराच्या मानाशी काहीसा जवळ आहे (१ मन्वंतर = तीस कोटी, सदुसष्ट लक्ष, वीस हजार मानवी वर्षे. ) , आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरताना सूर्य एकाच प्रतलात भ्रमण करत नाही. तो त्याच्या कक्षेत वरखाली करत, लंबवर्तुळाकार प्रदक्षिणा करतो. (जणू एखादा चेंडू जमिनीवर आपटून, पुन्हा वर उसळी मारत पुढे जात आहे आणि छताला आपटून पुन्हा जमिनीच्या दिशेने प्रवास करत आहे किंवा दुसर्‍या प्रकारे विचार करायचा तर Sine Wave आठवा) . केंद्राभोवतीच्या भ्रमण करताना, १० भ्रमणांमध्ये, सुमारे २७ वेळा तो वरखाली होतो,म्हणजेच एका प्रदक्षिणेत अंदाजे २.७ वेळा. या परिभ्रमणादरम्यान अथवा उभ्या आंदोलनादरम्यान काही वेळा तो अशा अवकाशीय वस्तूंजवळून जात असावा ज्यांच्यामुळे सूर्यमालेत हल्लकल्लोळ माजतो, पृथ्वीवर प्रलय येतो असा प्राथमिक अंदाज आहे. हे गणित जर मन्वंतराच्या कालावधीशी ताडून बघितले तर, साधारण १०.५ ते १३ कोटी वर्षांनंतर आणखी एक प्रलय होईल असे म्हणता येईल. सध्याच्या जैवशास्त्रीय अनुमानानुसार, इतका काळ पृथ्वीवर, सध्याच्या प्रजातींपैकी कोणतीही प्रजाती टिकणार नाही. सध्याच्या मानवजातेचे पृथ्वीवरचे अस्तित्व या आधीच संपलेले असेल. काही वैज्ञानिकांच्या मान्यतेनुसार ही सहावी Extinction Event असेल (त्यांच्या अभ्यासानुसार आधीच्या पाच Extinction Event ४४ कोटी वर्षात होऊन गेल्या आहेत, अर्थात त्या ही आपल्या गणनेशी जुळत नाहीत.)

पृथ्वीवर अस्तित्वात असणार्‍या बहुतांश जुन्या संस्कृतींमध्ये, प्रलय ही संकल्पना कमीअधिक प्रमाणात आढळते. पण ही संकल्पना मूळातून नाकारणार्‍या काही वैज्ञानिकांकडून, एक प्रतिवाद असा केला जातो की पूर्ण पृथ्वीवर प्रलय आणण्याइतके पाणी पृथ्वीवर आहे का ? सध्याच्या गणनेनुसार पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी तब्बल ९८% पाणी समुद्रांमध्ये आहे, साधारण १.६% हिम स्वरूपात, ध्रुवांवर व काही पर्वतांवर, साधारण ०.३६% जमिनीच्या खाली आणि केवळ ०.०३६% नद्या व इतर जलाशयात आणि इतर बाष्पाच्या स्वरूपात. या माहितीच्या आधारे, काही वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की पृथ्वीवरची २९% जमीन, प्रचंड मोठ्या प्रलयाने व्यापण्यासाठी उपलब्ध पाणीसाठाच मूळात पुरेसा नाही. पण इथे हे लक्षात घेतले पाहिजे की प्रलयपूर्व काळात ओढवलेल्या एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे, अशी एखादी जागतिक स्वरूपाची अशी रासायनिक प्रक्रिया घडू शकते, ज्यायोगे पृथ्वीवरच्या एकंदर पाणीसाठ्यात विलक्षण वाढ होईल. त्यानंतर संततवृष्टी वा अन्य काही कारणामुळे, विध्वंसक ठरेल अशा पद्धतीने, पृथ्वीवरची सर्व जमीन दीर्घ काळासाठी पाण्याखाली जाऊ शकते. दुसरी गोष्ट अशी की पुराणातील प्रलय हा जलप्रलय असल्यामुळे, आपण असे गृहीत धरून चाललो आहोत की पुढचा प्रलय हा देखील जलप्रलय असेल. पण पंचमहाभूतांपैकी एक वा अनेक 'भुते' कोपू शकतात ही शक्यता आहेच की. 'अग्निप्रलय' वा 'वायुप्रलय' हा देखील जलप्रलयाइतकाच विध्वंसकारक ठरू शकतो. Extinction Event घडू शकण्याची विविध कारणे आहेत.

--
ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीच्या संकल्पनेची पृथ्वीच्या दिवसरात्रीच्या संकल्पनेशी सांगड घालता येते का ? या प्रश्नाचे उत्तर उपलब्ध असल्यास माझ्या वाचण्यात आलेले नाही. पण त्याच्या दिवस आणि रात्र या प्रत्येक विभागास कल्प असे म्हणतात आणि त्याचे मान ४ अब्ज ३२ कोटी मानवी वर्षे इतके आहे हे विष्णुपुराणात दिले आहे. याचे संपूर्ण गणित लेखांक २ मध्ये दिले आहे.

पृथ्वीच्या दिवसरात्रीचे कारण तिचे परिवलन आहे,तोच निकष लावायचा म्हटला तर 'ब्रह्मलोक' स्वत:भोवती फिरतो का ? आणि दिवस रात्र होण्यासाठी त्याला कुणाकडून 'प्रकाश' मिळतो असे प्रश्न उभे राहतात. या प्रश्नांची ठोस उत्तरे माहीत नाहीत, परंतु चंद्र पृथ्वीभोवती फिरतो (चंद्रमंडल), पृथ्वी सूर्याभोवती फिरते (सूर्यमंडल), सूर्य आकाशगंगेच्या केंद्राभोवती प्रदक्षिणा करतो (परमेष्ठी मंडल), आणि आपली आकाशगंगा स्वायंभू मंडलात परिभ्रमण करते असा संदर्भ उपलब्ध आहे (मूळ श्लोक सापडले नाहीत) .

वर म्हटल्याप्रमाणे प्रलय संकल्पनेची उपलब्ध वैज्ञानिक ज्ञानाशी पुरेशी सांगड जमत नाही. मात्र प्रलयाचे तीन महत्त्वाचे प्रकार मानले जातात;

१) प्रलय हा प्रत्येक मन्वंतरानंतर होतो पण त्यात समस्त जीवसृष्टी नष्ट होत नाही, इथे नव्या मनुच्या हातून मर्यादित जीवसृष्टी वाचते (sampling) आणि त्या मनुच्या नावाने नवीन मन्वंतरास सुरुवात होते.
२) महाप्रलय हा प्रत्येक कल्पांतानंतर होतो (ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या शेवटी) ज्यात सर्व जीवसृष्टी (पृथ्वी व इतर सर्व ग्रह) नष्ट होते, महाप्रलयानंतर ब्रह्मदेव नव्याने सृष्टीनिर्माणास सुरुवात करतो.
३) प्राकृत किंवा आत्यंतिक प्रलय हा ब्रह्मदेवाचे आयुष्य संपल्यानंतर होतो आणि त्याचा कालावधी हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याइतकाच मानला गेला आहे. ज्यानंतर 'नवीन' ब्रह्मदेव सृष्टीनिर्माणाची सूत्रे हातात घेतो. यात सर्व सृष्टीचा लोप कल्पिला आहे (Big Crunch ?)

प्रलय या संकल्पनेची व्याप्ती स्पष्ट होण्यासाठी ब्रह्मदेवाचे स्थान फार महत्त्वाचे ठरावे. जर आपण आकाशगंगेचे कृष्णविवर (म्हणजे त्याच्या निकट) ब्रह्मदेवाचे स्थान (परमेष्ठी मंडल) मानले तर, महाप्रलय म्हणजे आपल्या आकाशगंगेतील समस्त जीवसृष्टीचा नाश आणि प्राकृत प्रलय म्हणजे आकाशगंगेचा विनाश असा अर्थ होतो. पण जर ब्रह्मदेवाचे स्थान स्वायंभू मंडल मानले, तर प्रलयाची व्याप्ती आपली आकाशगंगा ज्या कुठल्या केंद्राभोवती परिभ्रमण करत आहे, त्या केंद्रांशी संबंधित सर्व अवकाशीय वस्तूंशी निगडीत होते.

ब्रह्मदेवाच्या कालगणनेप्रमाणेच विष्णूची, शिवाची (रुद्राची ?) आणि आदिमायेची कालगणना चढत्या स्वरूपात उपलब्ध आहे !
--

--

मूळ विषयापासून थोडेसे अवांतर :

मन्वंतर बदलते तेंव्हा जसा मनु बदलतो तसाच इंद्र आणि सप्तर्षी देखील बदलतात असा उल्लेख आहे. सध्या आपण ज्या तार्‍यांना सप्तर्षी (Big Dipper) म्हणून ओळखतो हे 'Ursa Major' या तारकासमूहातील ठळक तारे आहेत. एका समूहात आहेत असे वाटणारे हे तारे प्रत्यक्षात विविध अंतरावर आहेत आणि त्यांच्या भ्रमणाच्या गतीही वेगवेगळ्या दिशांना आहेत. विविध संस्कृत ग्रंथात सप्तर्षींच्या नावाची वेगवेगळी यादी आहेत. पहिल्या मन्वंतरात प्रचलित असलेली नावे अशी होती क्रतु, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वसिष्ठ आणि मरिचि आणि सध्याच्या मन्वंतरातील सप्तर्षि आहेत अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नि, भारद्वाज, वसिष्ठ, विश्वामित्र.

एक चौकोन आणि त्याचे शेपूट असा सात तार्‍यांचा आकार आपण सप्तर्षी म्हणून ओळखतो. हे सात तारे आहेत :

Dubhe; Alpha of Ursae Majoris :: १२४ प्रकाशवर्षे, प्रत : १.८१),
Merak; Beta Ursae Mejoris :: ७९ प्रकाशवर्षे, प्रत : २.३४)
Phad, Gamma Ursae Majoris :: ८४ प्रकाशवर्षे, प्रत : २.४१),
Megrez, Delta Ursae Majoris :: ८१ प्रकाशवर्षे, प्रत : ३.३२),
Alioth, Epsilon of Ursa Major :: ८१ प्रकाशवर्षे, प्रत : १.७६),
Mizar; Zeta Ursae Majoris :: ७८ प्रकाशवर्षे, प्रत : २.२३) आणि
Alkaid; Eta Ursae Majori :: १०१ प्रकाशवर्षे, प्रत : १.८५)

अनेक ठिकाणी वर उल्लेख केलेल्या सात तार्‍यांना अनुक्रमे क्रतु, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वसिष्ठ आणि मरिचि अशी नावे दिली आहेत आणि त्यासाठी वापरलेला संदर्भ विष्णुपुराणाचा आहे. पण विष्णुपुराण जर या मन्वंतरात लिहिले गेले आहे Happy असे स्वीकाराले, तर हे तारे पहिल्या मन्वंतरातील सप्तर्षींचे निदर्शक मानावेत की सध्याच्या मन्वंतरातील सप्तर्षींचे ? मूळात सप्तर्षीचे तारे कोणते हे ठरविण्याचा काही निकष आहे का ? इथे ठळक तारे हा निकष बहुदा नसावा. कारण पहिल्या व सातव्या अशा दोन्ही मन्वंतरात, अत्रींचा सप्तर्षींमध्ये समावेश आहे. पण त्यापेक्षा अधिक ठळक दिसणारे तारे या तारकासमूहात आहेत. उदा.

Psi of Ursae Majoris :: १४७ प्रकाशवर्षे , प्रत : ३
Mu of Ursae Majoris :: २४९ प्रकाशवर्षे , प्रत : ३.०६
Iota of Ursae Majoris :: ४८ प्रकाशवर्षे , प्रत : ३.१२
Theta of Ursae Majoris :: ४४ प्रकाशवर्षे , प्रत : ३.१७

----

दिव्यवर्षे या कल्पनेला मूळातून नाकारणारी आणि महायुगांच्या परंपरागत मांडणी छेद देणारी एक वेगळी मांडणी श्री युक्तेश्वर यांनी केली आहे. त्यांच्या 'The Holy Science' या पुस्तकात ती मांडणी आहे. (हे पुस्तक इंटरनेटवर उपलब्ध आहे.) त्यानुसार सूर्य, आकाशगंगेच्या केंद्राभोवती भ्रमण करत नसून, त्याच्या एका जोडीदाराभोवती भ्रमण करतो आणि या भ्रमणादरम्यान तो जेंव्हा आकाशगंगेच्या केंद्राजवळ जातो, तेंव्हा कृतयुग येते व आकाशगंगेच्या केंद्रापासून दूर जातो तेंव्हा कलियुग. इथे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशी १२००० वर्षांची उतरती आणि पुन्हा १२००० वर्षांची चढती युगरचना करून, तिचा संबंध जोडीदाराभोवतीच्या परिभ्रमण काळाशी व अंतिमत: पृथ्वीच्या Axial Precession (विषुचलनाशी) जोडला आहे. व्यक्तिश: मला ही मांडणी कधीच पटली नाही. तिच्यात अनेक त्रुटी आहेत.
----

मग विश्वाच्या वयासंबंधी आपली परंपरागत धारणा, ही केवळ कविकल्पना मानायची का ? किंवा आधुनिक विज्ञानाने मोजलेले विश्वाचे वय तरी कितपत योग्य, अचूक आहे ?

आपली परंपरागत धारणा केवळ कविकल्पना नसावी असे मानण्यासारख्या काही गोष्टी त्या गणितात आहेत. त्यातील सर्वप्रथम आहे ती कालगणनेतील फरक. पृथ्वीवरील, देवलोकातील आणि ब्रह्मलोकातील काळाची गती वेगवेगळी दाखविली आहे. 'देवांचे' एक वर्ष म्हणजे मानवाची ३६० वर्षे हे सूत्र आपल्याला असे सांगते की (देवलोक म्हणजे देवांचा ग्रह असे मानल्यास) हा बहुदा एक प्रकारचा गुरुत्वीय कालविस्तार (Gravitational Time Dilation) आहे. हा 'लोक' अशा ठिकाणी आहे जिथल्या गुरुत्वीय बलाने, तिथल्या काळास आपल्यापेक्षा ३६० पटीने संथ ठेवले आहे. काळ इतक्या मोठ्या प्रमाणात संथ असणे, केवळ प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या एखाद्या अवकाशीय वस्तूच्या परिसरातच शक्य आहे. दुसरी गोष्ट अशी की, कालगणना सांगणार्‍या या श्लोकांमध्ये ब्रह्मदेवाचे आयुष्य प्रचंड दीर्घ दाखवले असले तरी ते अमर्यादित नाही वा ब्रह्मदेव 'अमर' दाखविलेला नाही. त्याची कालगणना प्रचंड संथ आहे इतकेच. प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय वा हे ज्ञान अन्य कुणाकडून मिळाल्याशिवाय Time Dilation ची ही कल्पना कागदावर उतरणे जरा अवघड वाटते. कालमापनातील हा फरक ही कविकल्पना नाही असे मानून विचार केल्यास पुढीलप्रमाणे गणित करता येऊ शकते. (परिभ्रमणाच्या वेगामुळे पडणारा फरक तात्पुरता दुर्लक्षित करून)

पृथ्वीवर ठराविक काळ लोटलेला असताना, प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या एखाद्या परिसरात, एखाद्या (स्थिर) अवकाशीय वस्तूवर जे Gravitational Time Dilation अनुभवास येईल ते पुढील सूत्राने काढता येते.

T-earth = T-object / (SQRT(1 - (2*G*M / (R * C^2) ) ) )
इथे G हा Gravitational Constant आहे.
T-earth पृथ्वीवर लोटलेला काळ (Fast-Ticking)
पृथ्वीवर T-earth इतका काळ लोटलेला असताना, प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या परिसरात एखाद्या अवकाशीय वस्तूवर लोटलेला काळ T-object (Slow-Ticking)
M हे त्या प्रचंड गुरुत्वाकर्षणास कारणीभूत ठरणार्‍या अवकाशीय वस्तूचे वस्तूमान
R गुरुत्वाकर्षण अनुभवणार्‍या व्यक्तीचे गुरुत्वाकर्षण निर्माण करणार्‍या अवकाशीय वस्तूच्या केंद्रापासूनचे अंतर
C म्हणजे प्रकाशवेग

--
देवलोक म्हणजे अशा प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या अवकाशीय वस्तूच्या परिसरातील एखादा ग्रह वा तारा आहे असे मानल्यास :
--

T(earth) = T(devlok) / (SQRT(1 - (2*G*M / (R * C^2)) ) )

∴ (SQRT(1 - (2*G*M / (R * C^2)) ) ) = T(devlok) / T(earth)

दोन्ही बाजूचा वर्ग करून
∴ 1 - (2*G*M / (R * C^2)) = (T(devlok) / T(earth)) ^ 2
∴ (2*G*M / (R * C^2)) = 1 - ((T(devlok) / T(earth)) ^ 2 )

प्रकाशाचा वेग = 29,97,92,458 मीटर प्रति सेकंद घेऊन

∴ (2 * 6.67 * 10^(-11) * M / (R * (29,97,92,458)^2)) = 1 - (1 / 360)^2
∴ (2 * 6.67 * 10^(-11) * M / (R * (29,97,92,458)^2)) = 1 - (1 / 129600)
∴ (2 * 6.67 * 10^(-11) * M / (R * (29,97,92,458)^2)) = 1 - 0.00000771605 = 0.99999228395
∴ 13.34 * 10^(-11) * M / (R * 89,87,55,17,87,36,81,764) = 0.99999228395
∴ M / R = (0.99999228395 * 89,87,55,17,87,36,81,764) / (13.34 * 10^(-11))
∴ M / R = (0.99999228395 * 89,87,55,17,87,36,81,764 * 10^11) / 13.34
∴ M / R = 6,7,3,7,2,4,3,2,0,7,6,2,3,0,9,4,0,6,13,06,21,348 (अर्थात अंदाजे ६,७३,७२,४३,२०७.६ परार्ध = ६.७३ अब्ज परार्ध )
∴ M / R = 6.73729 * 10^26

वस्तुमान व त्रिज्या यांचे इतके प्रचंड गुणोत्तर असे सांगते, की प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या परिसरात देवलोक आहे हे सुरूवातीचे अनुमान योग्य आहे.
एखाद्या सर्वसाधारण ग्रहाच्या बाबतीत असे घडण्याची सुतराम शक्यता नाही. कदाचित ही गोष्ट एखाद्या न्यूट्रॉन तार्‍याच्या बाबतीतही घडू शकते. पण तार्‍यावरती जीवसृष्टी असू शकते ही शक्यता अत्यंत विरळ आहे. (केवळ Black Dwarf वर मर्यादित काळ असे घडू शकेल अशी शक्यता काही जणांनी वर्तविली आहे) . कोणत्याही तार्‍यावर जीवसृष्टी शक्य नाही असे मानल्यास, उरणारी संभाव्य शक्यता हीच आहे की एखाद्या कृष्णविवराजवळ पण Event Horizon च्या बाहेर असणार्‍या, एखाद्या तार्‍याभोवती फिरणार्‍या ग्रहावर 'देवलोक' आहे !

==

दुसर्‍या बाजूने विचार केल्यास :

गेल्या लेखांकात हे स्पष्ट झाले आहे की आपल्या कालगणनेचे आकडे, आधुनिक विज्ञानाच्या कालगणनेशी जुळत नाहीत. त्यामुळे कोणत्याही विज्ञानवादी व्यक्तीस असे वाटले, की स्मृती-पुराणातील ही कालगणना म्हणजे कल्पनेचा खेळ आहे, तर तसे वाटणे हे पूर्णत: चूक नव्हे. कारण ही कालगणना कशी ठरविली याचा उल्लेख बहुदा उपलब्ध नाही आणि त्यामुळे हे ज्ञान 'देवांकडून' मिळाले असावे असाच अर्थ निघतो. पण जर या न्यायाने आपली, कालगणना कल्पनेचा खेळ असेल असे समजायचे असेल तर, आधुनिक पद्धतीने केलेली विश्वाची कालगणना ही सुद्धा काही गृहीतकांच्या पायावरचा डोलारा आहे हे देखील लक्षात घ्यायला हवे. आज विज्ञानाने 'सिद्ध' केलेली जी कालगणना आपण मान्य करतो त्यामागची आधुनिक विज्ञानाने मानलेली काही गृहीतके, काही मापनेच चुकीची असतील तर ? किंवा ही गृहीतके, मापने विश्वाच्या केवळ एका भागातच सत्य ठरत असली तर ?

पहिल्या लेखांकात विश्वाचे वय काढण्याची पद्धत दिली आहे ती पद्धत मूळातच काही गृहीतकांवर अवलंबून आहे. त्यातील काही पुढीलप्रमाणे :

१)
आधुनिक विज्ञानात अढळ सत्यासारखे मानले जाणारे एक गृहीतक असे आहे की प्रकाशाचा वेग हा सर्वत्र आणि सर्व काळात समान आहे आणि प्रकाशवेगापेक्षा अधिक वेगाने काहीही जाऊ शकत नाही. पण खरेच असे आहे का ?

इथे 'सर्वत्र' हा शब्द खरंतर निर्वात पोकळीला लागू आहे आणि विश्वात सगळीकडे, दोन अवकाशीय वस्तूंच्या दरम्यान अशी निर्वात पोकळी आहे असे मानले आहे. या निर्वात पोकळीचे गृहीतक चुकीचे असेल तर हे गणित बदलू शकते. आजचे विज्ञान असे मानते की विश्वात सर्वत्र Dark Matter आणि Dark Energy भरून राहिली आहे. (इथे Dark Matter हे देखील एका प्रकारचे गृहीतकच आहे) या संदर्भात सध्या असे मानले जाते की प्रकाशावर Dark Matter मुळे कोणताही विद्युतचुंबकीय परिणाम होत नाही. जर काही परिणाम होत असेल, तर तो केवळ गृरुत्वीय बलामुळे होतो. गृरुत्वीय बलामुळे होणारा परिणाम आपण अनुभवला आहे. Gravitational Lensing मुळे एखाद्या अवकाशीय वस्तूच्या थेट मागे असणारी दुसरी अवकाशीय वस्तू दिसते हे आपण स्वीकारले आहे. याचाच दुसरा अर्थ असा की एखाद्या वस्तूपासून निघालेला प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करूनच आपल्यापर्यंत पोहोचला असेल असे ठामपणे सांगता येणार नाही. कोणत्याही कारणामुळे आलेल्या अवकाशाच्या वक्रतेमुळे, त्याने प्रत्यक्षात पार केलेले अंतर कितीतरी अधिक असू शकते. थोडक्यात प्रकाश एका सरळ रेषेत प्रवास करतो या पूर्वीच्या गृहीतकाला धक्का लागलेला आहे. भविष्यात Dark Matter, Dark Energy या गृहीतकांबाबत अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर, असाच धक्का प्रकाशवेगाच्या संदर्भातील आपल्या आजच्या कल्पनांना बसणार नाही, असे ठामपणे आपण म्हणू शकणार नाही.

आईनस्टाईनच्या व्यापक सापेक्षता सिद्धांतासंबंधी (General Theory of Relativity) एका पेपरमध्ये शेवटच्या पानावर (मूळ पेपर जर्मन मध्ये आहे) ,

त्याने लिहिलेले हे वाक्य बोलके आहे.

"The space-time problem seems to me to lie as follows. If we restrict ourselves to a work of constant gravitational potential, the laws of nature are of an extraordinarily simple and invariant form. when they are referred to a space-time system of the manifold connected by the Lorentz transformations with constant c. If we do not restrict ourselves to areas of constant c, the multiplicity of the transformations permitting natural laws will become a coarser, but the laws will become more complex."

इथे तो एकाप्रकारे अशी शक्यता व्यक्त करतो आहे की, प्रकाशाचा वेग स्थिर नसणारे काही विभाग अवकाशात असू शकतील आणि अशा ठिकाणचे भौतिकी, गणिती नियम, आपल्यासाठी विलक्षण गुंतागुंतीचे असू शकतात.

प्रकाशवेग स्थिर असेलच असे नाही या विचाराला पुष्टी देणारी ही एक बातमी. अर्थात इथे त्याचे कारण गुरुत्वाकर्षण नसून वेगळे काही आहे.

कालमापनाचे परिमाण (सेकंद) आणि अंतराचे परिमाण (मीटर) ही दोन्ही प्रकाशवेग स्थिर आहे या गृहीतकावर आधारलेली आहेत. अवकाशात प्रकाशवेग समान असतोच असे नाही असे जर भविष्यात सिद्ध झाले तर अवकाशातील अंतरांमध्ये, विविध कालावधींमध्ये त्यानुसार फरक पडेल आणि विश्वाच्या वयाचे गणित देखील बदलेल.

----
त्यात या व्याख्या बघा. Happy
Second : The SI definition of second is "the duration of 9,19,26,31,770 periods of the radiation corresponding to the transition between the two hyperfine levels of the ground state of the caesium 133 atom."
Speed of Light : The speed of light in vacuum, commonly denoted c, is a universal physical constant & its exact value is 29,97,92,458 metres per second; it is exact, because the unit of length, the metre, is defined from this constant and the international standard for time.
Metre (Or Meter) : The metre is defined as the length of the path travelled by light in a vacuum in 1/29,97,92,458 seconds.

एक गोल फेरी मारल्यासारखे वाटते का ? Happy
Caesium 133 अणूची मोजमापे पृथ्वीनिष्ठ आहेत.
----

२)
पहिल्या लेखांकात नमूद केल्यानुसार, विश्वाच्या वयाचे गणित हबल स्थिरांकाच्या मूल्यावर आधारित आहे. हबल स्थिरांक हा विश्वाच्या प्रसरणाचा वेग आहे आणि खरंतर तो स्थिरांक नव्हे. हा स्थिरांक मोजण्यासाठी जे घटक वापरले जातात त्यातही प्रचंड गृहीतके आहेत. विश्वाचा प्रसरणवेग मोजण्यासाठी दूरदर्शकाच्या माध्यमातून, अधिकाधिक आकाशगंगांचे सातत्याने निरीक्षण करून, त्यांचे आपल्यापासूनचे अंतर मोजले जाते. यासाठी त्या आकाशगंगांकडुन प्राप्त होणार्‍या प्रारणांची redshift (तरंगलांबीमध्ये झालेले मूल्यवर्धन) मोजली जाते. (इथेही प्रकाशवेग हा स्थिर आहे हे गृहीतक आहेच !) वेगवेगळ्या कालावधीत त्यांच्या अंतराचा मागोवा घेतल्यावर, या आकाशगंगांचा आपल्यापासून दूर जाण्याचा वेग समजतो. पहिल्या लेखांकात उल्लेख केल्याप्रमाणे ,एकाच वेधशाळेने वेगवेगळ्या कालावधीत मोजलेल्या हबल स्थिरांकाचे मूल्य वेगवेगळे येते, त्याचे प्रमुख कारण आहे निरीक्षणाखाली आलेल्या आकाशगंगांची वाढती संख्या. विविध आकाशगंगांच्या दूर जाण्याच्या वेगाचे एकत्रीकरण करून विश्वाच्या प्रसरणाचा वेग निश्चित केला जातो. याचाच दुसरा अर्थ असा की जसजशी निरीक्षणाखाली येणार्‍या आकाशगंगांची संख्या वाढेल (उदा. २०१८ नंतर James Webb Space Telescope पूर्ण क्षमतेने काम करू लागल्यावर) , तसतसे हबल स्थिरांकाचे मूल्याही बदलत जाईल, आणि पर्यायाने विश्वाचे अनुमानित वय देखील बदलेल. थोडक्यात सांगायचे तर कोणत्याही दूरदर्शकाच्या वा अन्य संभाव्य माध्यमातून निरीक्षणाखाली आलेल्या विश्वाच्या पसार्‍यावर, आधुनिक विज्ञानाने मोजलेले विश्वाचे वय अवलंबून आहे ! जसजसे विश्वाच्या निश्चित स्वरूपाबाबत, विस्ताराबाबत आपले ज्ञान वृद्धिंगत होत जाईल, परिपक्व होत जाईल, तसतसे विज्ञानाला उमगणारे विश्वाचे अनुमानित वय देखील बदलत जाणार आहे.

शिवाय असाही विचार करायला हवा की विश्वाचे वय ठरविण्यासाठी प्रकाशाचा वा प्रारणांचा उपयोग करणे हे अचूक साधन आहे का ? मूळात ही शक्यता का विचारात घेऊ नये की आपण वैज्ञानिक निरीक्षणे घेण्यास सुरुवात केली, त्याच्या कितीतरी आधी विश्वाचे प्रसरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाले होते की तिथला प्रकाश / प्रारणे आपल्यापर्यंत कधीही पोहोचू शकलेली नाहीत वा शकणार नाहीत ? किंवा आपण निरीक्षणे सुरुवात करण्यापूर्वी तिथला प्रकाश / प्रारणे आपल्यापर्यंत पोहोचत होती पण आता प्रचंड मोठ्या अंतरामुळे ती प्रारणे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत ?

३)
Big Bang ही सर्वाधिक स्वीकारली गेलेली तरीही, केवळ विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीची एक धारणा आहे, आणि खर्‍या अर्थाने 'विश्वाचे वय' ठरविण्यासाठी ती परिपूर्ण नाही. आधुनिक पद्धतीने विज्ञानाने ठरविलेले विश्वाचे वय (जर अचूक आहे असे मानले तर) , तर हे वय केवळ, Big Bang पासून लोटलेला कालावधी सांगते.

बरेचसे वैज्ञानिक म्हणतात की हे विश्व सतत प्रसरण पावत आहे आणि एवढेच नव्हे तर त्या प्रसरण वेगाला त्वरण आहे. आपल्यापासून एक मेगापार्सेक अंतरावर असलेल्या आकाशगंगा ज्या वेगाने आपल्यापासून दूर जात आहेत, त्याच्या दुप्पट वेगाने आपल्यापासून दोन मेगापार्सेक अंतरावर असलेल्या आकाशगंगा दूर जात आहेत. विश्वाला एखाद्या फुगणार्‍या फुग्याची उपमा देणे कदाचित योग्य ठरणार नाही, पण केवळ तुलनेसाठी तसा विचार केला तर कोणताही फुगा, बुडबुडा सतत फुगत राहिला तर एक वेळ अशी येते जेंव्हा तो फुटतो. मग विश्व हे अमर्याद प्रसरण पावत राहणार आहे असे आपण मानू शकू का ?

अमर्याद प्रसरणशील विश्व ही संकल्पना शक्य नाही हे जर स्वीकारले तर त्यानंतर स्वाभाविकपणे तीनच शक्यता उरतात.
एक) एक वेळ अशी येईल जेंव्हा प्रसरण थांबून विश्व ज्या स्थितीला पोहोचले आहे त्या स्थितीला स्थिर राहील कारण एक वेळ अशी येईल की विश्वातील सर्व ऊर्जा लोप पावेल. (Big Freeze)
दोन) फुगणारा फुगा सतत हवा भरत राहिल्यास फुटतो व छिन्नविछिन्न होतो, त्याचप्रमाणे विश्वाची अवस्था होईल (Big Rip)
तीन) प्रसरण पावणारे विश्व एका ठराविक मर्यादेपर्यंत प्रसरण पावत राहील आणि त्यानंतर त्याच्या आकुंचनाचा (Big Crunch) आरंभ होऊन ते पुनश्च मूळ स्थितीला (Big Bang पूर्वीची) येईल

विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीची आपली पारंपारिक धारणा ही चक्रनेमिक्रमाची (Cycle) आहे. तिच्याशी साधर्म्य असणारी आणि काही वैज्ञानिकांना भावणारी, वरची तिसरी शक्यता Big Bounce या नावाने ओळखली जाते, ज्यानुसार Big Bang आणि Big Crunch आळीपाळीने होत राहतात. पण आपण अजूनही Big Bang या अवस्थेतच आहोत ही धारणाच चुकीची असेल तर ? किंवा Big Crunch ला आरंभ झाला आहे, पण त्याची निरीक्षणे करण्याएवढे आपले विज्ञान सक्षम होऊ शकलेले नाही असे असेल तर ?

या क्षणाला विश्व प्रसरण पावत आहे हे ठामपणे म्हणता येणार नाही असे मानणारे देखील काही वैज्ञानिक आहेत आणि त्यांच्या मान्यतेचा आधार काही निरीक्षणेच आहेत. त्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अतिदूर अंतरावर युक्लिडियन भूमितीचे सर्वसाधारण नियम लागू पडत नाहीत. (मूळात गणित हा मानवाचा त्याने स्वत:च्या आकलनासाठी लावलेला शोध आणि त्याच्या आकलनाचे केवळ एका साधन आहे की मानवाव्यतिरिक्त गणिताचे स्वतंत्र अस्तित्व आहे हा मूलभूत प्रश्न आहे. Happy ) Big Bang मुळे विश्वाचा आरंभ झाला असे म्हटल्यावर डोळ्यासमोर एका अवाढव्य फुग्याच्या आत जशी अवस्था असेल तसा काहीसा (गोल वा लंबगोल) आकार डोळ्यासमोर येतो, पण तसे असेलच असे नाही. विश्वाचा आकार अनियमितही असू शकतो. विश्वाचा आकार एखाद्या तारामाशासारखा (Star Fish) आणि आपण त्या तारामाशाच्या एका भुजेत असू, तर आपल्याला अदृश्य असणारे विश्व हे प्रचंड विशाल असेल. सोयीसाठी विश्वाचा आकार अंडाकृती जरी मानला तरीही आपल्याला विश्व 'जसे दिसते' तसे ते प्रत्यक्षात असेलच असे नाही. अॅटलासमधील भू-नकाशा पाहून जर आपण अशी समजूत करून घेतली की ऑस्ट्रेलिया पासून अमेरिकेकडे जायला 'सरळ रेषेत' एकमेव मार्ग आहे तर ते चुकीचे ठरेल. कारण अॅटलासमधील पृथ्वीचा नकाशा हा प्रत्यक्षातील त्रिमित जगाचे द्विमित रूप आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पृथ्वीवरून किंवा सूर्यमालेतून दिसणारे विश्वाचे रूप फसवे असू शकते. Big Bang चा विचार करताना सायकलच्या चाकाच्या मधल्या भागाकडून, चाकाचे आरे जसे सर्व दिशांना जातात तशी कल्पना करून (अर्थात हे उदाहरण द्विमित झाले, त्याजागी त्रिमित विचार केला तरीही), महास्फोटानंतर विश्वाची वाढ सर्व दिशांना सारख्या प्रमाणात झाली असावी ही संकल्पनाच चुकीची असू शकते. एखाद्या त्रिमित अमीबाप्रमाणे विश्वाचा आकार अनियमित देखील असू शकतो.

आजही आपल्याला विश्वाच्या स्वरूपाचे पूर्ण ज्ञान झालेले नाही. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य आकाशगंगेच्या (Milky Way) भोवती प्रदक्षिणा घालतो, इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. पण मग आपली आकाशगंगा कुणाभोवती फिरते ? याचे उत्तर आपल्याला नीटसे माहीत नाही आपली आकाशगंगा ज्या लोकल ग्रुप मध्ये आहे, त्यात असंख्य आकाशगंगा आहेत, या लोकल ग्रुप मध्ये Center of Mass असावे आणि त्याभोवती आपली व अन्य आकाशगंगा फिरत असाव्यात हा केवळ तर्क आहे. आपला लोकल ग्रुप आणि असे असंख्य दुसरे ग्रुप हे 'Virgo Super Cluster' चा भाग आहेत आणि हा Virgo Super Cluster त्याहूनही प्रचंड मोठ्या अशा Shapley Supercluster च्या दिशेने प्रवास करत आहे. इथे भ्रमणाच्या कक्षा वा इतर घटक निश्चित करण्याइतकी आज आपली प्रगती झालेली नाही. पण आपल्या आसपासच्या सर्व आकाशगंगा Shapley Supercluster या एकाच दिशेने का प्रवास करत आहेत हा कुतुहलाचा आणि संशोधनाचा विषय तर आहेच, पण कुठेतरी अलगदपणे तो Big Crunch च्या दिशेने बोट तर दाखवत नाही ना ही शंका मनात उत्पन्न करणारा आहे.
--

विज्ञानातील गृहीतके या 'विज्ञाननिष्ठ कविकल्पना' आहेत असे म्हटले तर ते थोडे अतिरेकी होईल; कारण काही गृहीतकांवर आधारित प्रमेयांची सिद्धता आपण कागदावर मांडू शकतो. पण त्यासोबत हे देखील लक्षात ठेवले पाहिजे, ही गृहीतके सार्वत्रिक आणि सार्वकालीन सत्ये आहेत असे मानून चालणे, तितकेच अतिरेकी ठरेल. ठामपणे मांडले गेलेले सिद्धांत, त्यामागील गृहीतकांना धक्का लागताच कोसळतात, नवनवीन ज्ञान, विज्ञान उदयास येते आणि जुने कालबाह्य होते वा ठराविक परिस्थितीपुरते सीमित होते असे अनुभव आजवर वारंवार आले आहेत. पण तरीही आधुनिक विज्ञानाने काही गोष्टी सिद्ध झाल्या, म्हणजे ज्यांची पूर्वपीठिका माहीत नाही, ज्यामागचा कार्यकारण भाव ज्ञात नाही, अशी प्राचीन इतिहासातील माहिती वा अशा नोंदी लगेच निकालात काढण्याकडे, त्याज्य ठरविण्याकडे काही जणांचा कल असतो, तो मात्र तितकासा योग्य नाही. विज्ञान ज्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ / देऊ शकत नाही, ज्या गोष्टी आधुनिक विज्ञानासाठी अजूनही कागदावर, सैद्धांतिक स्तरावर, केवळ गणिती स्तरावर आहेत, त्या प्रमाण मानायच्या, परंतु त्याच वेळी परंपरेने उपलब्ध झालेले असे ज्ञान, जे ज्ञात विज्ञानाच्या चौकटीबाहेर आहे आणि ज्याचा उगम माहीत नाही, पण तरीही जे चूक आहे म्हणून सिद्ध होऊ शकलेले नाही, ते अतार्किक म्हणून नाकारायचे हा निव्वळ दुटप्पीपणा आहे. कोण जाणे, कदाचित भविष्याच्या उदरात, प्राचीन ज्ञानाला सत्य ठरविणारे काही दडलेले असू शकते.

====

संपादित
साभार : विकास दत्तात्रेय बापट

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बाब्बो !!!!! एवढी प्रचंड आकडेमोड पाहुन च ऊर दडपला माझा Happy
पण रोचक आहे ही संपुर्ण माहिती हे नक्कि

बरेच पटले नाही, पण एक उदाहरणार्थ दाखवतो -

"कारण ही कालगणना कशी ठरविली याचा उल्लेख बहुदा उपलब्ध नाही आणि त्यामुळे हे ज्ञान 'देवांकडून' मिळाले असावे असाच अर्थ निघतो." >> असाच अर्थ का बरे निघतो? काहिहि! उलट असाही अर्थ निघू शकतो की ह्या कालगणनेला काहीही आधार नाही, किंवा हा केवळ एक कल्पनाविलास आहे. आणखीही काही निघतील. सद्य स्थितीत यापैकी कुठलीही शक्यता नाकारता येत नाही. (अगदी तुम्ही मांडलेली देवांकडून मिळाल्याची शक्यताही नाकारता येत नाही). पण 'असाच' अर्थ निघतो - ह्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही सोयीस्कर आर्थ काढता आहात.

Galaxies Are Apparently Missing Dark Matter. No One Knows Why.
By Rafi Letzter - Staff Writer 2019-12-03T20:55:04Z​Space
Nineteen newly discovered dwarf galaxies seem to be missing their dark matter, and physicists aren't sure why.
डार्क मॅटर विषयी जे गृहितक आहे ते चुकीचं ठरण्याची शक्यता आहे.
उद्या गुरुत्व आकर्षण विषयी आपल्या मताला तडा जावू शकतो

लेख किचकट आहे
लगेच समजून येत नाही.
एका एका para चा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे.त्या नंतरच
त्या लेखाशी सहमत किंवा असहमत असे व्यक्त होता येईल पूर्व ग्रहदुशित पने उतावीळ विचार मांडणार नाही

कालचक्रावर मी आधी लेख लिहिला आहे - https://www.maayboli.com/node/70708

कालगणना करताना दिव्य वर्षे घेणे चुकीचे आहे. मनुस्मृतीमध्ये कालगणना करताना मानवाचा १ वर्ष म्हणजे देवांचा १ दिवस घ्यावा असे कुठेही वर्णन नाही. त्यामुळे या लेखातले कॅल्युलेशन्स बरोबर नाहीत. मी श्लोकांच्या अर्थासकट ते माझ्या धाग्यात नमूद केले आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे परमहंस योगानंद यांचे गुरु स्वामी युक्तेश्वर यांनी त्यांच्या 'कैवल्य दर्शन' (The Holy Science) या पुस्तकात कालचक खूप सविस्तरपणे उलगडून सांगितले आहे आणि सध्या खरेतर ऊर्ध्व द्वापर युग सुरु आहे कलियुग नाही तेही त्यांनी ग्रहगोलांच्या गणितावरून आणि लागलेल्या विविध शोधांवरून उदाहरणासकट सांगितले आहे. ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी पुस्तक जरूर वाचावे.

ह्या लेखाच्या तळात नमूद केल्याप्रमाणे हा लेखांक माझा असून पूर्ण लेख पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.

https://vidnyansrushti.blogspot.com/search/label/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B5%E0%A4%AF

----

कोहंसोहं१० लिहितात <<कालगणना करताना दिव्य वर्षे घेणे चुकीचे आहे. मनुस्मृतीमध्ये कालगणना करताना मानवाचा १ वर्ष म्हणजे देवांचा १ दिवस घ्यावा असे कुठेही वर्णन नाही.>>

दिव्यवर्षाचा उल्लेख मनुस्मृतीमध्ये उपलब्ध आहे असे मी म्हटलेले नाही. तिथे तो असल्यास मला माहीत नाही. पण तो उल्लेख इथे आहे.

http://satsangdhara.net/bhp/bhp03-11.htm

तयोः समुच्चयो मासः पितॄणां तदहर्निशम् ।
द्वौ तावृतुः षडयनं दक्षिणं चोत्तरं दिवि ॥ ११ ॥
अयने चाहनी प्राहुः वत्सरो द्वादश स्मृतः ।
संवत्सरशतं नॄणां परमायुर्निरूपितम् ॥ १२ ॥

हा उल्लेख इथेही आहे
http://satsangdhara.net/bhp/bhp12-02.htm
यदा देवर्षयः सप्त मघासु विचरन्ति हि ।
दा प्रवृत्तस्तु कलिः द्वादशाब्द शतात्मकः ॥ ३१ ॥

युक्तेश्वरांच्या मांडणीचा उल्लेख आणि तिच्या प्रतिवादाची लिंक वर दिलेल्या vidnyansrushti ह्या माझ्या ब्लॉगवर आहे.

----

हरचंद पालव लिहितात <<असाच अर्थ का बरे निघतो? काहिहि! उलट असाही अर्थ निघू शकतो की ह्या कालगणनेला काहीही आधार नाही, किंवा हा केवळ एक कल्पनाविलास आहे. >> एका अर्थाने तुमचे म्हणणे योग्य आहे की ते ज्ञान देवांकडून मिळाले असावे हे माझे अनुमान आहे. पण ते अनुमान भागवतपुराणातील काही संवादमय श्लोकांवर अवलंबून असल्याने मी ते सत्य मानतो. अर्थात तुम्हाला प्रतीत होणारा अर्थ / निष्कर्ष वेगळा असू शकतो हे मला मान्य आहे.

====

विकासजी, तुम्ही दिलेल्या श्लोक ११ आणि १२ मध्ये दैववर्षांचा उल्लेख आहे परंतु त्यात पितरांच्या दिवसांचासुद्धा उल्लेख आहे. हे दोन श्लोक माहितीपर आहेत परंतु त्यांचा कालगणनेशी संबंध वाटत नाही. कालगणनेशी संबंधित माहिती किंवा आकडेमोड पुढे श्लोक १९ आणि २० मध्ये आढळते.
चत्वारि त्रीणि द्वे चैकं कृतादिषु यथाक्रमम् ।
सङ्ख्यातानि सहस्राणि द्विगुणानि शतानि च ॥ १९ ॥
(या सत्यादी चार युगांची क्रमाने चार, तीन, दोन आणि एक हजार वर्षे असतात आणि प्रत्येकाची जितकी सहस्त्र वर्षे असतात, त्याच्या दुप्पट शंभर वर्षे त्यांची संध्या आणि संध्यांशात असतात)

संध्यांशयोरन्तरेण यः कालः शतसङ्ख्ययोः ।
तमेवाहुर्युगं तज्ज्ञा यत्र धर्मो विधीयते ॥ २० ॥ (श्रीमद् भागवत पुराण, तृतीयः स्कंधः एकादशोऽध्यायः)
(युगांच्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्यांश असतो. यांची वर्षगणना शेकडयांच्या संख्येने सांगितली गेली आहे. यांच्या मधल्या काळाला कालवेत्ते ‘युग’ म्हणतात. प्रत्येक युगामध्ये एकेका विशेष धर्माचे विधान आहे)

आता वरील श्लोकात कालगणनेची आकडेमोड करताना दैवी वर्षे घ्यावीत असे श्लोकात तरी नमूद केलेले नाही त्यामुळे calculation मध्ये दैवी वर्षे घेणे मलातरी बरोबर वाटत नाही. तसेच भागवतातील वरील श्लोक १९-२० आणि मनुस्मृतीमध्ये दिलेले श्लोक हे बरेचसे मिळतेजुळते आहेत ज्यात दैवी वर्षांचा उल्लेख नाही.
चत्वार्याहुः सहस्राणि वर्षाणां तत् कृतं युगम् । तस्य तावत्शती सन्ध्या सन्ध्यांशश्च तथाविधः ॥ ६९ ॥ इतरेषु ससन्ध्येषु ससन्ध्यांशेषु च त्रिषु । एकापायेन वर्तन्ते सहस्राणि शतानि च ॥ ७० ॥ (मनुस्मृती)

आता तर्काने पाहिल्यास गेल्या २०० वर्षात माणसाची जेवढी प्रगती झाली आहे तेवढी त्यामागे २००० वर्षात सुद्धा झाली नव्हती. साधारण अशी प्रगती केवळ युगप्रवर्तनाच्या वेळीच होते. तुम्ही युक्तेश्वरांचे The Holy Science वाचले असेल तर १२००० वर्षांच्या चक्रात कलीयुग साधारण इ सन १७०० ला संपले आहे आणि त्यानंतर ascending द्वापरयुग सुरु झाले आहे.
आपल्या हिंदू मान्यतेनुसार रामायण हे त्रेतायुगात आणि महाभारत हे द्वापर युगात झाले आहे असे मानले जाते. आता दैवयुगाच्या कालगणनेनुसार गेल्यास रामायण हे कमीतकमी ५००० (मान्यतेप्रमाणे कलियुगाची संपलेली वर्षे)+ ८,६४,००० (द्वापरयुगाची वर्षे) म्हणजे साधारण ८,७०,००० ते १३,००,००० (त्रेतायुगाची वर्षे धरून) यामध्ये कधीतरी झालेले असावे. आता एवढ्या वर्षांपूर्वी मानवजात तेवढी प्रगत असेल जेवढे वर्णन रामायणात आहे असे वाटत नाही. विज्ञानानुसार पाहिल्यास होमोसेपियन (आत्ताचा माणूस) साधारण ३ ते ५ लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झाला आहे.

रामायणातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रामसेतूची निर्मिती. कार्बन डेटिंग च्या द्वारे हा रामसेतू साधारण १८४०० वर्षांपूर्वीचा आहे असे संशोधनात आढळले आहे.
https://www.deccanchronicle.com/nation/current-affairs/310118/ram-setu-1...

युक्तेश्वरांनी The Holy Science मध्ये नमूद केल्याप्रमाणे काळ हे चक्राप्रमाणे चालते म्हणजे युग हे सत्य-त्रेता-द्वापर-कली; कली-द्वापर-त्रेता-सत्य या चढत्या उतरत्या क्रमाने चक्राकार फिरत असतात. तर्काने पाहिल्यास ते सयुक्तिक पण वाटते कारण कलियुग संपल्यावर लगेच माणसाचा एकदमच विकास होऊन सत्ययुग सुरु होईल हे तर्काधिष्टित नाही. तो क्रमाक्रमाने होणार.
वरील माहितीप्रमाणे आता साधारण १८४०० वर्षांपूर्वी कोणते युग होते ते पाहिल्यास
३०० वर्षे (सध्याचे द्वापरयुग हे १७०० साली सुरु झाले - संदर्भ: The Holy Science ) + १२०० (कलियुग चढत्या क्रमानुसार) +१२०० (कलियुग- उतरत्या चक्रानुसार) +२४०० (द्वापरयुग)+३६०० (त्रेतायुग)+४८०० (उतरते सत्ययुग) +४८०० (चढते सत्ययुग) = १८,३०० वर्षे.
म्हणजे १८३०० ते २१९०० वर्षांमध्ये चढते त्रेतायुग होते. आता कार्बन डेटिंग प्रमाणे आलेला रामसेतूचा कालखंड (१८४०० वर्षे) इथे बरोबर लागू होतो कारण त्यावेळी त्रेतायुगाचा शेवट होत होता (तसेही राम आणि कृष्ण यांचे अवतार युगाच्या शेवटीच झाले आहेत असे मानण्यात येते)

यावरून १२००० वर्षांची युगाची कालगणना (दैवी वर्षे न घेता) जास्त अचूक आहे असे मला वाटते. अर्थात यामध्ये अनेक मतप्रवाह आहेत त्यामुळे आपल्या मतांचा आदर आहेच.

दैववर्षाचा उल्लेख इथे आहे असे मला वाटते.

http://satsangdhara.net/bhp/bhp03-11.htm
मैत्रेय उवाच -
कृतं त्रेता द्वापरं च कलिश्चेति चतुर्युगम् ।
दिव्यैर्द्वादशभिर्वर्षैः सावधानं निरूपितम् ॥ १८ ॥

मनुस्मृतीतील उल्लेख दैववर्षाचे नसून मनुष्यवर्षाचे आहेत असा स्पष्ट उल्लेख असल्यास शोधतो आणि मग अधिक लिहितो.

----

युक्तेश्वरांचे पुस्तक पूर्वी वाचले होते , (मी माझ्या लेखात त्या मांडणीचा वा त्या मांडणीच्या प्रतिवादाचा (ओक) संदर्भ दिला आहे. प्रतिवाद वाचला नसल्यास तो अवश्य वाचावा. त्यात काही चांगले मुद्दे आहेत ) त्यात युगांच्या क्रमाचा संबंध सूर्याच्या जोडीदाराभोवतीच्या भ्रमणाशी जोडल्यामुळे, २४,००० वर्षात जोडीदाराभोवती एक प्रदक्षिणा होते असे प्रतीत होते. असे प्रत्यक्षात होत असल्यास आजही ही माहिती विज्ञानास ज्ञात नाही.

एक तारा दुसर्‍या तार्‍याभोवती फिरत असल्यास (द्वैती तारे) आणि त्यांच्या वस्तुमानात फार फरक नसल्यास, सर्वसाधारणपणे ते दोघेही एका सामायिक बिंदूभोवती फिरतात (Barycenter) आणि हा सामायिक बिंदू दोन्ही तार्‍यांच्या बाहेर असतो . पण समजा त्यातील एका तार्‍याचे वस्तुमान दुसर्‍या तार्‍याच्या तुलनेत खूप जास्त असेल तर युक्तेश्वर म्हणतात तशी स्थिती असू शकते. ह्याचा अर्थ युक्तेश्वरांच्या मांडणीनुसार सूर्याचा जोडीदार त्याच्यापेक्षा प्रचंड अधिक वस्तुमानाचा असायला हवा. आणि असा जोडीदार असून तो अजूनही सापडलेला नाही हे विशेष वाटते.

आता प्रत्येक युगाची वर्षसंख्या समान नसल्यामुळे आपण असे म्हणू शकतो की ह्या जोडीदाराभोवतीच्या भ्रमणकक्षेत काही वेळा सूर्य अतिवेगाने भ्रमण करतो आणि काही वेळा बर्‍याच कमी वेगाने. हे तेंव्हाच शक्य होते जेंव्हा भ्रमणकक्षा लंबवर्तुळाकार असते. त्यामुळे जोडीदाराभोवतीची सूर्याची भ्रमणकक्षा लंबवर्तुळाकार असायला हवी. युक्तेश्वर म्हणतात त्या प्रमाणे जोडीदाराभोवती भ्रमण करताना जेंव्हा सूर्य विष्णुनाभीजवळ असेल तेंव्हा कृतयुग (सत्ययुग) असते. अर्थात सूर्याच्या जोडीदाराभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत कृतयुगाच्या वेळी सूर्य जोडीदारापासून जवळ असायला हवा आणि कलियुगाच्या वेळी जोडीदारापासून दूर. द्वैती तार्‍यांच्या भ्रमणाबाबत एक गोष्ट निश्चित आहे की जर भ्रमण करणार्‍या तार्‍याची कक्षा लंबवर्तुळाकार असेल तर तो तारा जेंव्हा जोडीदाराच्या जवळ असेल तेंव्हा त्याचा भ्रमणवेग सर्वाधिक असतो. पण कृतयुगाची वर्षे अधिक आहेत आणि कलियुगाची कमी. हे गणित अशा प्रकारच्या लंबवर्तुळाकार कक्षेत कसे बसावे ?

<<आता तर्काने पाहिल्यास गेल्या २०० वर्षात माणसाची जेवढी प्रगती झाली आहे तेवढी त्यामागे २००० वर्षात सुद्धा झाली नव्हती.>>
अंशत: सहमत. पण त्यावेळी जी कौशल्य, तंत्र होते ते आज आहे का ? (उदा वेरूळचे कैलास मंदिर, दक्षिण भारतातील काही मंदिरे) . थोडे मागे जात ५००० वर्षांपूर्वी काय स्थिती होती असा विचार केल्यास काही वेगळे आढळते का ? तंत्रज्ञानाचा उगम, विकास, वापर व लोप ही वारंवार घडणारी प्रक्रिया आहे ही गोष्ट पुरातन स्थापत्याच्या (पिरॅमिड व इतरही अनेक) ज्या खुणा आज उरल्या आहेत त्यातून स्पष्ट होते असे का म्हणू नये ?

<<३०० वर्षे (सध्याचे द्वापरयुग हे १७०० साली सुरु झाले - संदर्भ: The Holy Science ) + १२०० (कलियुग चढत्या क्रमानुसार) +१२०० (कलियुग- उतरत्या चक्रानुसार) +२४०० (द्वापरयुग)+३६०० (त्रेतायुग)+४८०० (उतरते सत्ययुग) +४८०० (चढते सत्ययुग) = १८,३०० वर्षे.>>

श्रीकृष्णाने अवतार संपवला आणि मग कलियुग आरंभ झाले अशी मान्यता आहे. वरील गणितानुसार श्रीकृष्णाचा काळ साधारण ७०० BCE असा येतो. हे गणित योग्य वाटते का ?

<<रामायणातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रामसेतूची निर्मिती. कार्बन डेटिंग च्या द्वारे हा रामसेतू साधारण १८४०० वर्षांपूर्वीचा आहे असे संशोधनात आढळले आहे.>>

रामायणकाळातील सेतू हा दगड (शिळा), गवत आणि वृक्ष ह्यांच्या सहाय्याने बांधला होता ह्याचे सविस्तर वर्णन वाल्मिकी रामायणात उपलब्ध आहे. (ह्यात शिळा वाहून नेण्यासाठी यंत्र वापरल्याचा देखील उल्लेख आहे)

http://satsangdhara.net/vara/k6s022.htm

त्यामुळे तो सेतू आजही पूर्णपणे टिकून राहिला आहे असे स्वीकारणे जरा अवघड वाटते. हे शक्य आहे की रामसेतू जिथे बांधला तिथला सागर तुलनेने उथळ असल्याने, समुद्रसपाटीपासून जो शिळांचा एक उंचवटा मूळातूनच होता त्यावरच पुढील बांधकाम केले गेले असावे.

----

शिवाय रामसेतूच्या कालखंडाबाबत मतमतांतरे आहेत.

https://en.wikipedia.org/wiki/Adam%27s_Bridge

<<विज्ञानानुसार पाहिल्यास होमोसेपियन (आत्ताचा माणूस) साधारण ३ ते ५ लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झाला आहे.>>

हे कालावधी केवळ सापडलेल्या जीवाश्मांवर ठरविले जातात आणि त्या बाबतीत किती प्रचंड मतमतांतरे आहेत ते पुढील लिंक मध्ये स्पष्ट होते.

https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens#Age_and_speciation_process

दैववर्षांची कालगणना मानण्यातला सर्वात मोठा आक्षेप श्रीरामकथा वा तत्पूर्वीच्या अनेक कथा लाखो वर्षे कशा काय टिकून राहिल्या हा आहे आणि तो आक्षेप मला मान्य आहे. त्याचे सयुक्तिक स्पष्टीकरण देता येत नाही हे मात्र खरे.

<< तर्काने पाहिल्यास ते सयुक्तिक पण वाटते कारण कलियुग संपल्यावर लगेच माणसाचा एकदमच विकास होऊन सत्ययुग सुरु होईल हे तर्काधिष्टित नाही. तो क्रमाक्रमाने होणार.>>
तुमच्या प्रतिसादातील दैववर्षावरच्या ह्या आक्षेपाचे देखील योग्य स्पष्टीकरण देणे अवघड आहे. त्यामुळे हा आक्षेपही योग्य आहे.

त्यातील एका तार्‍याचे वस्तुमान दुसर्‍या तार्‍याच्या तुलनेत खूप जास्त असेल तर युक्तेश्वर म्हणतात तशी स्थिती असू शकते. ह्याचा अर्थ युक्तेश्वरांच्या मांडणीनुसार सूर्याचा जोडीदार त्याच्यापेक्षा प्रचंड अधिक वस्तुमानाचा असायला हवा. आणि असा जोडीदार असून तो अजूनही सापडलेला नाही हे विशेष वाटते ----> विष्णुनाभी चे स्थान कुठे आहे हे नक्की माहित नाही त्यामुळे यावर थोडा रिसर्च व्हायला हवा. मला विष्णुनाभी हे स्थान फिसिकल ताऱ्याच्या स्वरूपापेक्षा आणि ऊर्जेच्या स्वरूपात आहे असे वाटते म्हणजे कदाचित डार्क एनर्जी किंवा डार्क मॅटर ज्याबद्दल अजूनही विज्ञानाला फार कमी माहिती आहे

जोडीदाराच्या जवळ असेल तेंव्हा त्याचा भ्रमणवेग सर्वाधिक असतो. पण कृतयुगाची वर्षे अधिक आहेत आणि कलियुगाची कमी. हे गणित अशा प्रकारच्या लंबवर्तुळाकार कक्षेत कसे बसावे ? >>>> तुम्ही युगांची वर्षे आणि भ्रमणवेग यांची सांगड घालत आहात परंतु रिलेशन हे भ्रमनवेगावर नसून जवळ आणि लांब होण्याच्या स्थानावर आणि परिणामी त्याच्या प्रभावावर आहे. सूर्य जेंव्हा विष्णूनाभीच्या जवळ असेल तेंव्हा कृतयुग आणि तो जसा लांब होत जाईल तसा प्रभाव कमी होऊन बाकीची युगे. कदाचित reverse engineering ने १२००० (अर्धभ्रमण) किंवा २४००० वर्षांचे पूर्ण भ्रमण गृहीत धरून अभ्यास केल्यास कदाचित कक्षेचा किंवा पर्यायाने विष्णूनाभीचा शोधही लागू शकेल.

तंत्रज्ञानाचा उगम, विकास, वापर व लोप ही वारंवार घडणारी प्रक्रिया आहे ही गोष्ट पुरातन स्थापत्याच्या (पिरॅमिड व इतरही अनेक) ज्या खुणा आज उरल्या आहेत त्यातून स्पष्ट होते असे का म्हणू नये ?-----> बरोबर. मलादेखील हेच वाटते. युक्तेश्वरांनी म्हणल्याप्रमाणे युगांप्रमाणे मानवाच्या बुद्धीचा विकास कमी जास्त होत असावा. परंतु ही प्रक्रिया/सायकल लाखो वर्षांची नसून काही हजार वर्षांची असावी हे जास्त सयुक्तिक वाटते.

श्रीकृष्णाने अवतार संपवला आणि मग कलियुग आरंभ झाले अशी मान्यता आहे. वरील गणितानुसार श्रीकृष्णाचा काळ साधारण ७०० BCE असा येतो. हे गणित योग्य वाटते का ?----> गणिताप्रमाणे बरोबर आहे. परंतु तंत्रज्ञानाच्या अभावाने म्हणा किंवा काळाच्या ओघात म्हणा, ख्रिस्तपूर्व माहिती सध्या फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. अगदी शंकराचार्यांच्या कालखंडाबाबत सुद्धा अनेक मते आहेत आणि मतांमध्येही अनेक शतकांचा काळ आहे त्यामुळे ठामपणे सांगणे सध्यातरी अवघड आहे. युक्तेश्वर म्हणतात त्याप्रमाणे काळाप्रमाणे योग्य शोध लागतील आणि योग्य वेळी हे गूढ उकलले जाईल.

रामायणकाळातील सेतू हा दगड (शिळा), गवत आणि वृक्ष ह्यांच्या सहाय्याने बांधला होता....त्यामुळे तो सेतू आजही पूर्णपणे टिकून राहिला आहे असे स्वीकारणे जरा अवघड वाटते. हे शक्य आहे की रामसेतू जिथे बांधला तिथला सागर तुलनेने उथळ असल्याने, समुद्रसपाटीपासून जो शिळांचा एक उंचवटा मूळातूनच होता त्यावरच पुढील बांधकाम केले गेले असावे ---------> सेतूमध्ये शिळा वापरल्या गेल्या असतील आणि लाखो वर्षांचा काळ लोटला नसेल किंवा काही हजार वर्षांचाच काळ लोटला असेल तर सेतू काही प्रमाणात टिकून राहू शकतो जसा आत्ता दिसत आहे. परंतु सेतूच्याच शिळा पूर्णपणे नष्ट आणि ज्या समुद्री शिळांवर तो बांधला त्या मात्र लाखो वर्षे राहिल्या आहेत हे तर्काला धरून वाटत नाही. पाश्चात्य जिऑलॉजिस्ट प्रमाणे या शिळा नॅच्युरल नाहीत तर कोठूनतरी आणून तेथे ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या अभ्यासाप्रमाणे शिळा ७००० वर्षे जुन्या आहेत. आता हा अभ्यास गृहीत धरला आणि आकडेमोड केली तर १२००० वर्षांच्या सायकल प्रमाणे हा काळ त्रेतायुगात मोडतो.
मला हा स्रोत, खास करून लिंकमधील विडिओ विकिपीडिया पेक्षा जास्त विश्वसनीय वाटतो
https://www.business-standard.com/article/current-affairs/discovery-s-sc...

विष्णुनाभी म्हणजे युक्तेश्वरांना काय अभिप्रेत आहे ह्याचा स्पष्ट उल्लेख युक्तेश्वरांच्या पुस्तकात नाही. ते म्हणतात:
"The sun also has another motion by which it revolvesround a grand center called Vishnunabhi, which is seat of creative power, Brahma,the universal magnetism."

सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार आकाशगंगेतील इतर कोट्यवधी तार्‍यांप्रमाणेच सूर्याचे आकाशगंगेतील भ्रमण हे आकाशगंगेच्या मध्यात असणार्‍या कृष्णविवराभोवतीच आहे.
त्यामुळे विष्णुनाभी म्हणजेच आकाशगंगेच्या मध्यावर असणारे कृष्णविवर असा निष्कर्ष काढला तर तो सध्याच्या ज्ञानानुसार योग्य आहे.
ते ऊर्जेच्या स्वरूपात आहे हा दावा देखील Sagittarius A* ला लागू आहे कारण तो रेडियोलहरींचा प्रचंड मोठा उगम आहे.
आणि समजा तिथे Dark Matter किंवा Dark Energy आहे हा विचार जरी केला, तरीही सूर्याचा आकाशगंगेतील भ्रमणमार्ग त्याच केंद्राभोवती आहे हे निश्चित आहे आणि तो २२ ते २५ कोटी वर्षांचा आहे.

<<तुम्ही युगांची वर्षे आणि भ्रमणवेग .......प्रभाव कमी होऊन बाकीची युगे. >>
Yukteshwar_Hypothesis_3.png
सोबत युक्तेश्वरांच्या मांडणीनुसार मी तयार केलेले एक चित्र देत आहे. त्यावरून मला काय म्हणायचे आहे ते थोडे अधिक स्पष्ट होईल. सूर्याच्या जोडीदाराचे वस्तुमान हे सूर्यापेक्षा बरेच अधिक असणे का आवश्यक आहे त्यासंदर्भात मी ह्या आधीच लिहिले आहे. चित्रात दाखविल्याप्रमाणे जेंव्हा लंबवर्तुळाकार कक्षा असते, तेंव्हा सूर्य जसजसा जोडीदाराच्या जवळ येत जाईल तसतसा त्याचा वेग प्रचंड वाढतो. आणि त्यामुळे कृतयुग म्हणून दाखविलेला भ्रमणमार्ग अत्यंत कमी वेळात पार होतो. ह्या उलट कलियुग म्हणून दाखविलेला मार्ग हा जोडीदारापासून बराच दूर असल्याने तो अत्यंत कमी वेगाने पार केला जातो.

युगांचे गणित विष्णुनाभीशी निकटतेवर अवलंबून असल्याने भ्रमणमार्गाचा किती भाग कृतयुग घेईल, किती भाग द्वापार घेईल ह्याला असलेल्या मर्यादा सोबतच्या चित्रात स्पष्ट होतात. त्यामुळे कक्षेचा प्रत्येकयुगाचा भाग व भ्रमणवेग हे एका अर्थाने परस्परांशी निगडीत होतात.
हे गणित प्रत्येक युगांच्या वर्षसंख्येशी जमत नाही. कारण कृतयुगाच्या वेळी भ्रमणवेग सर्वाधिक आहे आणि कलियुगाच्या वेळी सर्वात कमी.

<<कदाचित reverse engineering ने १२००० (अर्धभ्रमण) किंवा २४००० वर्षांचे पूर्ण भ्रमण गृहीत धरून अभ्यास केल्यास कदाचित कक्षेचा किंवा पर्यायाने विष्णूनाभीचा शोधही लागू शकेल.>>
जोडीदाराभोवतीच्या भ्रमणाचा कालावधी २४००० वर्षे धरताना आणि त्याला संपातचलनाशी, पर्यायाने पृथ्वीच्या परांचनगतीशी जोडताना युक्तेश्वरांनी काहीशी गफलत केली आहे असे माझे मत झाले आहे. संपातबिंदूंच्या एका प्रदक्षिणेचा कालावधी हा सध्याच्या गणिताप्रमाणे २५,७७२ वर्षे आहे, २४,००० नव्हे. घटकाभर असे मानले की एकेकाळी (जेंव्हा युगांचे गणित सर्वप्रथम मांडले गेले वा मानवास सांगितले गेले) तेंव्हा तो अचूक २४,००० वर्षे होता तरीही पृथ्वीच्या परांचनगतीचे मुख्य कारण, सूर्य व चंद्रामुळे पृथ्वी अचूक गोलाकार न राहता विषुववृत्ताजवळ थोडीशी स्थूल आहे हे आहे तर दुय्यम कारण इतर ग्रहांचा पृथ्वीकक्षेवर होणारा अत्यल्प परिणाम हे आहे. त्याचा सूर्याच्या संभाव्य जोडीदाराशी संबंध जोडणे हे कल्पनाशक्तीला अति ताणणे होय.

तसेच सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्राभोवती (जे सूर्यापासून अनुमानित एक लाख प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर आहे) भ्रमण करत असल्याने २४,००० वर्षांच्या गणनेवरून विष्णुनाभीचा शोध घेणे जरा अतिरंजित वाटते. शिवाय 'विष्णुनाभी' म्हणजे आकाशगंगेचे केंद्र नसून, सूर्य आणि त्याच्या जोडीदारापासून बर्‍याच जवळ असलेले 'काहीतरी' आहे असे मानणे म्हणजे 'विष्णुनाभीची' पर्यायाने ब्रह्माच्या स्थानाची पदावनती होय.

<<श्रीकृष्णाने अवतार संपवला आणि मग कलियुग आरंभ झाले अशी मान्यता आहे. वरील गणितानुसार श्रीकृष्णाचा काळ साधारण ७०० BCE असा येतो. हे गणित योग्य वाटते का ?----> गणिताप्रमाणे बरोबर आहे. परंतु तंत्रज्ञानाच्या अभावाने म्हणा किंवा काळाच्या ओघात म्हणा, ख्रिस्तपूर्व माहिती सध्या फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. >>
कृपया भगवान पार्श्वनाथांचा काळ बघा.
https://en.wikipedia.org/wiki/Parshvanatha

शिवाय कृष्णाचा काळ ७०० BCE धरला की सिंधुसंस्कृतीचा काळ (हडप्पा) कृष्णापूर्वीचा होतो. हे शक्य नाही.

कलियुगाचा आरंभ ठरविणारी विविध मते वाचली आहेत. त्यातील एका मतासाठी कृपया पुढील लिंक बघाव्यात.
https://en.wikipedia.org/wiki/Aihole_inscription

http://www.thevedicfoundation.org/bhartiya_history/chronology.htm

http://www.thevedicfoundation.org/bhartiya_history/mahabharat.htm

श्री अमर (बन्या) लिहितात
<<परत जर ही युगे येत असतील, तर घटना पण त्याच घडतात का? म्हणजे परत राम आणि कृष्ण येणार का?>>

उपलब्ध माहितीनुसार निदान एका मन्वंतरात तरी त्याच त्याच घटना पुन्हा घडत नसाव्यात, वेगवेगळ्या मन्वंतरात त्याच त्याच घटना पुन्हा घडतात की नाही हे माहीत नाही. मात्र वेगवेगळ्या कल्पात त्याच त्याच घटना पुन्हा (पण वेगळ्या प्रकारे) घडतात असा एक उल्लेख योगवासिष्ठातील काकभृशंडीच्या कथेत आहे (मात्र ती कथा शब्दश: घेऊ नये कारण ती केवळ दृष्टांत कथा आहे असेही एक मत आहे)

त्यामुळे विष्णुनाभी म्हणजेच आकाशगंगेच्या मध्यावर असणारे कृष्णविवर असा निष्कर्ष काढला तर तो सध्याच्या ज्ञानानुसार योग्य आहे.....तसेच सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्राभोवती (जे सूर्यापासून अनुमानित एक लाख प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर आहे) भ्रमण करत असल्याने २४,००० वर्षांच्या गणनेवरून विष्णुनाभीचा शोध घेणे जरा अतिरंजित वाटते >>>>> यात अतिरंजित काय ते समजले नाही. विष्णुनाभीच्या स्थानाचा स्पष्ट उल्लेख पुस्तकात नाही परंतु हे मात्र सांगितले आहे की सूर्य विष्णुनाभीभोवती २४००० वर्षाच्या काळात प्रदक्षिणा करतो. गणिताप्रमाणे सध्या चालू असलेले युग हे सर्व दिलेले आहे. सूर्याच्या परिभ्रमणाची कल्पना विज्ञानाला आहेच. यावरून विष्णूनाभीचे स्थान शोधणे विज्ञानाला फारसे अवघड नसावे. एकदा स्थान समजल्यास बाकी शक्यतांचा विचार होऊ शकतो जसे की त्या स्थानावर असणारे तारे, तेथील गुरुत्वीय बाळ किंवा जमल्यास डार्क मॅटर/डार्क एनर्जीचे अस्तित्व आणि त्यामुळे सूर्याच्या परिभ्रमणावर होणारा परिणाम etc. असे शोधण्याऐवजी केवळ अनुमानावरून विष्णुनाभी म्हणजेच आकाशगंगेच्या मध्यावर असणारे कृष्णविवर असा निष्कर्ष काढला हेच जरा अतिरंजित वाटते कारण या कृष्णविवराभोवती प्रदक्षिणा मारायला काही कोटी वर्षे लागतात त्यामुळे ते स्थान युक्तेश्वर यांना विष्णुनाभी म्हणून नक्कीच अभिप्रेत नसणार. त्यामुळे तुम्ही काढलेला निष्कर्ष/अनुमान बरोबर वाटत नाही. मी आधी म्हणल्याप्रमाणे reverse engineering करणे येथे जास्त सयुक्तिक ठरेल कारण बाकी दिलेल्या माहितीवरून तसे करणे शक्य आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे विष्णुनाभी हे स्थान अंतराळात एक फिसिकल स्पॉट असण्याचे चान्सेस मलातरी कमी वाटतात. आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे विष्णुनाभी ही डार्क मॅटर किंवा डार्क एनर्जी किंवा अशी शक्ती जिचा अजून विज्ञानाला शोध लागणे बाकी आहे, असू शकते. डार्क मॅटर/डार्क एनर्जी बद्दल सध्या आपल्याला फार कमी माहिती आहे कारण अंतराळात ती अस्तित्व दाखवते पण कोणत्याही स्थूल किंवा सूक्ष्म पदार्थाशी संयोग पावत नाही. वैज्ञानिकांनी हेही सांगितले आहे कि डार्क एनर्जी मुळेच आकाशगंगा अस्तित्वात आहेत कारण आकाशगंगेच्या मध्यावरच्या कृष्णविवरांची तेवढी क्षमता नाही की ज्यायोगे तेवढे ग्रह/तारे कृष्णविवभोवती फिरतील. वैज्ञानिक म्हणतात की डार्क मॅटर/डार्क एनर्जी च्या बाहेरील दबावामुळे आकाशगंगा टिकून आहेत नाहीतर आकाशगंगा अस्तित्वातच नसत्या. सांगायचं उद्देश एवढाच की विज्ञानाला सध्याच्या काळात माहित असणारे सर्वात शक्तिशाली पदार्थ/ऊर्जा हे दिसतही नाहीत आणि शोधायचे म्हणल्यास सापडतही नाहीत फक्त अस्तित्व दाखवतात. असेच विष्णुनाभीचे असू शकते. आपल्याला सूर्याचे आकाशातील स्थानाची, वेगाची कल्पना आहे यावरून २४००० वर्षाच्या काळातील परिभ्रमणाचा ग्राफ पाहून निदान स्थान शोधात येईल.

सूर्याच्या जोडीदाराचे वस्तुमान हे सूर्यापेक्षा बरेच अधिक असणे का आवश्यक आहे त्यासंदर्भात मी ह्या आधीच लिहिले आहे >>>>> इथेही विष्णुनाभी म्हणजे अतिशय विशाल, प्रचंड गुरुत्वीय बल असणारी स्थूल वस्तू असे गृहीत धरण्यात आलेलं आहे. विष्णुनाभी बद्दल आपल्याला फारशी माहिती पुस्तकातून मिळालेली नाही त्यामुळे असे गृहीतक धरून काढलेले अनुमान चुकीचे असू शकते. डार्क मॅटर/डार्क एनर्जी यांना वस्तुमान आणि गुरुत्वीय बल यांचे निकष लागू होत नाहीत त्यामुळे ही शक्यता पण गृहीत धरून विचार व्हावयास हवा.

बाकी भ्रमणमार्ग हा तुम्ही दाखवलेल्या चित्रांइतका सरळ सोपा नाही कारण अवकाशात सर्वच वस्तू फिरत आहेत. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे फिरणे हे लंबवर्तुळाकार आहे पण त्याचबरोबर सूर्य आणि पृथ्वी दोन्ही आकाशात फिरत असल्यामुळे तो मार्ग लम्बवर्तुळाकाराप्रमाणे हेलिकल (helix) पण आहे. (अधिक माहितीसाठी https://www.youtube.com/watch?v=IJhgZBn-LHg&t=949s) आता हेच सूर्य आणि विष्णुनाभीला सुद्धा लागू होऊ शकेल का? म्हणजे विष्णुनाभी आणि सूर्य दोन्ही फिरत असावेत आणि एकमेकांवर आपला प्रभाव टाकत असावेत. जोपर्यंत विष्णुनाभीचे स्वरूप स्पष्ट होत नाही तोपर्यंत जास्त भाग हा कलियुग कि सत्ययुग याबद्दल सांगता येणे कठीण आहे. म्हणूनच ज्या थोर अभ्यासकांनी ते सांगितले आहे त्यायोगे संशोधन करून विष्णुनाभीचा शोध घेतल्यास चित्र स्पष्ट होऊ शकेल असे मला वाटते. नाहीतर जसे गृहीत धरू तश्या अनेक शक्यता निर्माण होतात.

शिवाय कृष्णाचा काळ ७०० BCE धरला की सिंधुसंस्कृतीचा काळ (हडप्पा) कृष्णापूर्वीचा होतो. हे शक्य नाही. >>>>>> असे का हे नाही समजले. हडप्पा संस्कृतीचा आणि महाभारताचा संबंध आहे का?

कृपया भगवान पार्श्वनाथांचा काळ बघा. https://en.wikipedia.org/wiki/Parshvanatha >>>>>>>>>> मला पार्श्वनाथांविषयी फार माहित नाही पण तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये लिहिलंय "Mahavira is dated to c. 599 – c. 527 BC in the Jain tradition, and Parshvanatha is dated to c. 872 – c. 772 BC.[11][12][13] According to Dundas, historians outside the Jain tradition date Mahavira as contemporaneous with the Buddha in the 5th century BC and, based on the 250-year gap, date Parshvanatha to the 8th or 7th century BC"

आणि हा काळाचा घोळ सगळीकडे आहे. जुन्या काळातील महानुभावांच्या कालखंडाबाबत कोठेही एकमत नाही.

कलियुगाचा आरंभ ठरविणारी विविध मते वाचली आहेत. त्यातील एका मतासाठी कृपया पुढील लिंक बघाव्यात>>>>>>
तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये लिहिले आहे "According to the “Surya Siddhant” the astrologers have calculated that kaliyug started on the afternoon of 17th February, 3102 BC"
आणि अगदी यालाच युक्तेश्वरांनी त्यांच्या पुस्तकात आक्षेप घेतला आहे. युक्तेश्वरजी म्हणतात:
yuga.JPGyuga2.JPG

युक्तेश्वरांनी काळ, युग यांच्याबद्दलचा घोळ त्यांच्या पुस्तकातून खगोलशास्त्रीय घटना आणि उदाहरणासकट उलगडून सांगितला आहे म्हणून मला तो जास्त पटतो. बाकी we can always agree to disagree त्यामुळे इथे थांबतो Happy

<<यात अतिरंजित काय ते समजले नाही. विष्णुनाभीच्या स्थानाचा स्पष्ट उल्लेख पुस्तकात नाही परंतु हे मात्र सांगितले आहे की सूर्य विष्णुनाभीभोवती २४००० वर्षाच्या काळात प्रदक्षिणा करतो. >>
माझ्या माहितीप्रमाणे युक्तेश्वरांच्या पुस्तकात २४००० वर्षात सूर्य त्याच्या जोडीदाराभोवती प्रदक्षिणा करतो असे म्हटले आहे, विष्णुनाभीभोवती प्रदक्षिणेचा कालावधी दिलाच नाही आहे.
सोबतचे स्क्रीनशॉट बघावेत.

Yukteshwar_24000_Years_1.JPGYukteshwar_24000_Years_2.JPGYukteshwar_24000_Years_3.JPGYukteshwar_24000_Years_4.JPG

<<बाकी भ्रमणमार्ग हा तुम्ही दाखवलेल्या चित्रांइतका सरळ सोपा नाही कारण अवकाशात सर्वच वस्तू फिरत आहेत. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे फिरणे हे लंबवर्तुळाकार आहे पण त्याचबरोबर सूर्य आणि पृथ्वी दोन्ही आकाशात फिरत असल्यामुळे तो मार्ग लम्बवर्तुळाकाराप्रमाणे हेलिकल (helix) पण आहे>>

पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते हे सत्यच आहे. मात्र निरीक्षक कुठे आहे ह्यावर त्याला अवकाशीय वस्तूंचा मार्ग कसा दिसेल हे ठरते. निरीक्षक अशा स्थितीत असेल जिथे तो सूर्याचा भ्रमणमार्ग प्रत्यक्ष पाहू शकेल तिथे त्याला पृथ्वी हेलिकल मार्गाने भ्रमण करताना दिसेल, पण सूर्य नव्हे. सूर्य 'सरळ' (वस्तूत: वक्राकार) रेषेत जातानाच दिसेल.

सूर्य आकाशगंगेच्या केंद्राभोवती भ्रमण करतो हे आकाशगंगेत असताना दिसून येईल तसेच आकाशगंगेच्या मध्यापासून 'प्रचंड उंचावर' असताना दिसून येईल, पण आपली आकाशगंगा ज्या कुठल्या कक्षेत भ्रमण करते त्या कक्षेच्या बाहेर निरीक्षक असेल तर आणि त्याला इतका विशाल दृष्टिकोन ठेवणे शक्य असेल तर पूर्ण आकाशगंगा सूर्यासह वेगळ्या प्रकारे भ्रमण करताना दिसेल.

आणि त्या helix चित्रफीतीत त्रुटी आहेत आणि ती चित्रफीत निर्माण करणार्‍याने त्या मान्य देखील केल्या होत्या. मात्र आत्ता ती लिंक मला सापडत नाही आहे.

बापट साहेब आभार

हे वरचे सगळे पाहता असे वाटते की ही युगे,महायुगे आणि बाकी मुळात का सुरू आहेत, नाय म्हणजे या एकुणच सर्वाचा अर्थ काय? कशासाठी हा विश्वाचा पसारा चाल्लाय

<<हे वरचे सगळे पाहता असे वाटते की ही युगे,महायुगे आणि बाकी मुळात का सुरू आहेत,>> ह्याचे उत्तर द्यायचे तर हिमालयात जाऊन दीर्घ तपश्चर्या करावी लागेल. सध्या ते शक्य नाही. Happy

Pages