इंडिया पोस्ट ने पार्सल अमेरिकेत येण्यास किति दिवस लागतात?

Submitted by sneha1 on 5 January, 2021 - 13:26

नमस्कार,
मला थोडी माहिती हवी आहे. मी अक्षरधारा.कॉम वरून मराठी पुस्तके मागवली आहेत. मी २१ डिसेंबर ला ऑर्डर दिली. त्यांनी पुण्याहून पुस्तके २८ ला इंडिया पोस्ट ने पाठवली . मी ट्रॅक करते आहे. ३१ तारखेला item bagged , Mumbai foreign post office हे अपडेट होते. त्याच्यानंतर काहीही अपडेट नाही.
कुणाला अंदाज आहे का, किती दिवस लागतात ते?
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नेहा मी कधी या साईटवरून मागवले नाहीये. पण १५ दिवसात यायला पाहिजे.
अवांतरः तुला शिपिंग चार्जेस किती लागले? युएसडी मधे पेमेंट करता आले का?

Not sure about books but our partners sent something right after they opened in pandemic and it reached almost 4 days after. It has some books as well. So good luck Happy 2021 चं काय कोण जाणे Wink

अंजली, मी पण पहिल्यांदाच इथून मागवले. हवी असलेली काही पुस्तके, आयवा मारू, पूर्णामायची लेकरे वगैरे इथेच होती, बुकगंगावर नव्हती.
आणि अंदाजे २५०० च्या पुस्तकांसाठी त्यांनी ४५०० शिपिंग चार्जेस लावले, आणि त्यांना खरे शिपिंगचे पडले २५०० च्या आसपास. मला ट्रॅकिंग करताना कळले ते. आणि मी icici च्या अकाउंट मधून पे केले पण डॉलर्स मधे पण करता येतात.
वेका, शिपिंग चार्जेस बघून मला वाटले की चितळ्यांसारखे फेडेक्स ने पाठवतील, पण तसे काही झाले नाही. काय करायचे, दुसरा पर्याय नाही Happy

इंडीअन पोस्टने मेल/ पार्सल साधारण ३ आठवड्यात नेहेमी आलेलं आहे. सध्या पँडॅमिक आणि युएसपीएसचा सावळागोंधळ बघता मार्जिन वाढेल कदाचित.
युएसपीएसने कॅनडात रेग्युलर डिलिव्हरी जी ४ -५ दिवसांत व्हायची ती सध्या ५ आठवडे घेते आहे. वेळ लागतो पण येतं.

माझं एक पार्सल पुण्याहून २२ नोव्हेंबर ला निघालयं. शिकागोत अडकलयं महिन्यापासून...
तक्रार केली. USPS ने येतचं आहे , येतंच आहे......
God bless our parcels ! Happy

अंदाजे २५०० च्या पुस्तकांसाठी त्यांनी ४५०० शिपिंग चार्जेस लावले. >>>>>>>>>>>>>>> ओके. तुझी सही सलामत आली पुस्तकं तर सांग. बघेन मी पण. फेडेक्स किंवा डीएचएल ने तरी पाठवायचे त्यांनी.

फराळ DHL ने आईने पाठविलेला. मोठा बॉक्स होता. बहुदा १५ किलो. १२५०० खर्च आलेला. पाचव्या दिवशी पोहोचला. कोल्हापुरहून पार्सल पाठविलेले.
आता बहिणीच्या सासुबाईनी DHL ने बॉक्स पाठविलेला. कपडे वगैरे. पुण्याहून . तेही एका आठवड्यात पोहोचल पार्सल.

माझी आई पण दरवर्षी दिवाळी ला पार्सल पाठवते by DHL .. ६ ते ७ दिवसात येते .. या वर्षी Atlantic ने पाठवले तेही वेळेत पोहचले .

माझ्याकडे आपल्या देशाची इतिहासाची व राजकारणावरती अनेक पुस्तके आहेत तसेच अनेक मराठी कादंबर्‍याव कथासंग्रह पण आहेत. ती मला पुणे सातारा येथील उत्तम कॉलेजला भेट म्हणून द्यायची आहेत. पुस्तकांचा उपयोग संशोधनासाठी होऊ शकेल. नाव व लायब्ररीच्या ग्रन्थपालान्चे नाव व ईमेल फोन कळवावा. पाठवण्याचा खर्च मी करेन. धन्यवाद.

Thank you for contacting the United States Postal Service® and taking the time to share your concerns with us. The Postal Service is experiencing unprecedented volume increases and limited employee availability due to the impacts of COVID-19.

हे उत्तर मला आले. आता आशा वाटतेयं की येईल कधीतरी , हॉलिडेज पण संपलेत. पण इथून पुढे DHL वापरेन. यांच्या नादी लागणार नाही.

डीएचल -४ ते ५ दिवस भारतातून कुठून सुद्धा( इंदोर, पुणे)
फेडेक्स- ५-६ दिवस( पुणे)
इतर कॅरीयर्स ८-१० ( इंदोर, कोल्कत्त मधून)
मी आताच , अमेरीकीतील लोकांना फराळ पाठवला. व काही नातेवाईकांनी, त्यांच्या अमेरीकेतील नातेवाईकांना.

अंजली, मी पण पहिल्यांदाच इथून मागवले. हवी असलेली काही पुस्तके, आयवा मारू, पूर्णामायची लेकरे वगैरे इथेच होती, बुकगंगावर नव्हती.
आणि अंदाजे २५०० च्या पुस्तकांसाठी त्यांनी ४५०० शिपिंग चार्जेस लावले, आणि त्यांना खरे शिपिंगचे पडले २५०० च्या आसपास. मला ट्रॅकिंग करताना कळले ते. आणि मी icici च्या अकाउंट मधून पे केले पण डॉलर्स मधे पण करता येतात.
वेका, शिपिंग चार्जेस बघून मला वाटले की चितळ्यांसारखे फेडेक्स ने पाठवतील, पण तसे काही झाले नाही. काय करायचे, दुसरा पर्याय नाही >>> Sneha Chitale US la ship kartat ka? kasa aahe anubhav?

चितळे अमेरिकेला शिप करतात. आमचा अनुभव चांगला आहे. ऑनलाईन ऑर्डर केल्यापासून ४-५ दिवसात पार्सल आलं होतं. पॅकिंगही चांगलं होतं.

>>चितळे अमेरिकेला शिप करतात
आम्हाला नाही सांगितलं. आमचा विभाग त्यांच्या अखत्यारीत येत नसावा किंवा आम्ही सिझनल ऑर्डर ट्राय करत नव्हतो म्हणूनही असेल. (कुणी सांगा की त्यांना "आम्ही पण आहोत इथे Wink ") Happy

बरं विषय सुरु आहे म्हणून आणखी एक निरीक्षण, मागच्या वर्षात बाबांना भारतात पाठवलेले एकही पत्र पोहोचले नाही. पँडेमिकच्या साधारण महिनाभर आधी तर गम्मत म्हणजे दोन पत्रे एकाच वेळी एकाच गावात (फक्त मुंबईच्या भाषेत एक इस्ट आणि दुसरं वेस्ट) पाठवलं तर इस्टचं इष्ट जागी पोहोचलं. वेस्टचं म्हणजे जौद्या.. टोटेल वेस्ट Lol असो. आता बाबांना म्हटलं आपण टाइपिंग टाइपिंग खेळूया. असो. हा विषय इथेच सुफल संपूर्णम. __________/\_____ Happy

इकडून तिकडे पाठवण्याच्या (पोस्टानं) बाबतीत माझाही अनुभव हिट अँड मिस आहे. इथून मुंबईपर्यंत पार्सल पोहोचल्याचं ट्रॅकिंग होतं. नंतर एक मोठं ब्लॅक होल.

युएसपीएसबद्दल इतक ऐकायला येतंय पण माझा अनुभव उलटा आहे. इथून (न्यूजर्सी) २६ डिसें ला पाठवलेले पार्सल ३०च्या आतच दिल्लीला पोचलेही. आता इंडीया पोस्टच्या हातात गेलंय पण तेव्हापासून ते दिल्लीतच आहे. Delhi FPO मधे ३-४ दिवसांचा बॅकलॉग आहे म्हणे. पण एक आहे, इंडीया पोस्ट ट्विट्सना लगेच उत्तरे देते. आता foreignpostdelhi@indiapost.gov.in ला मेल करा असे उत्तर आले आहे. बघूया मेल करके देखेंगे.

सगळ्यांना प्रतिसादासाठी धन्यवाद!
माझे पार्सल ३१ डिसेंबर पासून Mumbai foreign post office मधे अडकले होते. ते आता ७ तारखेपासून शिकागो ला अडकलं आहे. बघू केव्हा मिळतं ते. आणि नेमके अक्षरधारा वर घेताना शिपिंग मधे काहीही चॉइस नाही. ते फेडेक्स चे पैसे लावतात आणि इंडिया पोस्ट ने पाठवतात. आणि पुस्तकं असल्यामुळे जास्त जीव अडकला आहे Sad

चितळ्यांचा मला अनुभव नाही, पण ओळखीच्या लोकांचा चांगला आहे.

सध्या अमेरीकन पोस्ट देखील हळूहळू चालतयं. गावातल्या गावात कार्ड मिळायला १ आठवडा लागला, बर्‍याच जणांना कार्ड मिळालेच नाही. वाट बघून त्यांनी चौकशीसाठी फोन केले म्हणून मग आयत्यावेळी इमेल्स पाठवल्या. Uhoh

चितळे अमेरिकेला शिप करतात. आमचा अनुभव चांगला आहे. ऑनलाईन ऑर्डर केल्यापासून ४-५ दिवसात पार्सल आलं होतं. पॅकिंगही चांगलं होतं. >> Online order karayala website war gele..Shipping address US cha takla tar payment option la jatach nahiye. 1000 wela Next war click karun zaala. Sad

पुण्यात नळस्टॉपजवळ इंडोफाईन कुरीयर आहे. त्यांच्याकडून मी माझ्या मुलाला व्हर्जिनियाला दोन-तीन वेळा पार्सल पाठवलं. प्रत्येक वेळी चार ते पाच दिवसांत व्यवस्थित पोचलं. बाकी सर्व्हिसही चांगली होती.

पुस्तकं पोचली १९ला, सॉरी इथे अपडेट करणे झालं नाही.
म्हणजे २१ डिसेंबर ला ऑर्डर केलेली पुस्तकं त्यांनी २८ ला शिप केली, आणि मला इथे १९ला मिळाली.
पॅकिंग सुमार होते. म्हणजे अ‍ॅमेझॉन चे प्लॅस्टिक पॅकेजिंग असते ना, तसे. पुस्तकं बबल रॅपने घट्ट गुंडाळून नंतर प्लॅस्टिक मधे पॅक केलेली, काही कार्ड्बोर्ड्चा खोका नाही. इथे सगळीकडे फिरून येईपर्यंत पार्सलचे कोपरे फाटायला लागलेले. दिवाळी अंकाचे कव्हर त्यामुळे थोडे खराब झालेले.
पुस्तकं सगळी आली हेच मोठे, त्यामुळे इच्छा असूनही त्यांना काही वाईट मेसेज पाठवला नाही Happy
कोणाला बुकगंगाचा अनुभव आहे का? कसे शिपिंग करतात?

"बुकगंगाचा अनुभव आहे का? कसे शिपिंग करतात?" - बूकगंगावरून मागे एकदा ~२० पुस्तकं मागवली होती. पॅकिंग आणी शिपिंग व्यवस्थित होतं.

गुड स्नेहा.. फायनली मिळाली तर Happy बुकगंगा मी भारतात गेले होते तेव्हा मागवले . सर्विस चांगली होती म्हणजे वेळेत मिळाली पण पुस्तकं अशीच बबल रॅप मधेच होती फक्त.

अंजली, इतक्या दूर पाठवताना तरी थोडे चांगले पॅकिंग असेल असे वाटले होते मला.

डीएचएल चांगलेच की फेरफटका. इथे मला शिपिंगचे ४५०० लावले त्यांनी, आणि त्यांना इंडिया पोस्ट्चे २५०० पडले.