विंडोज ११ laptop

Submitted by इवाना on 10 January, 2022 - 00:03

Windows 11 preinstalled laptop बाजारात आता आताच आले आहेत. Hp ,15inch, 45 हजाराला सुरू आहे. ओफिससूट लाईफटाइम आहे, काही android apps आहेत असं दुकानदारकाका बोलले.
तर विंडोज ११ स्टेडी झाली का, घ्यावा की थांबावे? घरच्यासाठी पहिलाच laptop घेत आहे. ओफीसमध्ये तिथले वापरायची सवय आहे पण ते त्यांच्या कामासाठी लॉक्ट असतात. गेमिंगसाठी नकोय.
कुणाला काही अनुभव, सूचना आहेत का?

धन्यवाद.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलीकडेच मी माझा लॅपटॉप Windows 11 वर अपग्रेड केला आहे.
गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर वारंवार क्रॅश होत आहेत ही समस्या फक्त आढळली

विंडोज ११ बद्दल माहिती/अनुभव नाही, इतर लोक सांगतीलच.

त्यातून जर सध्या १० वर रहाणे ठीक असे ठरले तर:
विकत घेताना OS windows 11 लायसन्स असणारा लॅपटॉप Windows 10 ला डाऊनग्रेड करून घेऊन विकत घ्यायचा. दुकानात माहीत नाही पण ऑथराईज्ड डीलर्स करून देतात फ्री. पुढे 11 स्टेबल आहे चालेल असे वाटले की लायसन्स 11 चे असल्याने केव्हाही 11 इन्स्टॉल करता येईल. (11 OS installation पॅकेज व ड्रायव्हर्स पॅकेज HP site वरून डाउनलोड करुन ठेवावे.)
Windows 10 लायसन्स असणारा लॅपटॉप घेण्यापेक्षा हे चांगले. भविष्यात 10 to 11 फ्री अपग्रेड केव्हा बंद होईल सांगता येत नाही (वर्षभरात?) आणि मग 10 वरच रहा किंवा 11 OS विकत घ्या असे करावे लागेल.

११ च्या स्थैर्याबाबत अजुन काही समजलेले नाही.ं मायक्रोसोफ्ट्च्या इतर उत्पादनाप्रमाणे ह्यतही सुरुवातीला काही 'बग्ज' असतीलच. किमान ३ महिने थांबुन नंतर घ्या असे सुचवेन

विंडोज १० असलेला लॅप्टॉप जर ११ ला अपग्रेड केला असेल तरच तो डाउनग्रेड करता येत असावा

डाऊनग्रेड करणे म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस (रोल बॅक/ डाऊनग्रेड अशी कमांड देऊन वगैरे) नव्हे तर वरचे लायसन्स असणाऱ्या संगणकात खालील OS इन्स्टॉल करून घेणे. (मग ती पद्धत कुठलिही असो.)

डाऊनग्रेड करणे म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस (रोल बॅक/ डाऊनग्रेड अशी कमांड देऊन वगैरे) नव्हे तर वरचे लायसन्स असणाऱ्या संगणकात खालील OS इन्स्टॉल करून घेणे. >> त्यामधे तुम्हाला डाऊनग्रेड वर्जनचे लयसेन्स मिळ्त नाही. जर volume license असेल (जे कंपन्याना घेणे बंधनकारक असते) तरच डाऊनग्रेड वर्जनचे लायसन्स असते

फायरफॉक्स ब्राउझर वापरण्यास सुरुवात केली. सुदैवाने ते क्रॅश होत नाही, परंतु त्याची सवय नाही.

मी YouTube वर सापडलेल्या क्रोम आणि एज ब्राउझरसाठी दोन उपाय वापरून पाहिले, परंतु ते कार्य करत नाही

मी १ महिन्यापूर्वी लॅपटॉप विंडोजचे, १० ते ११ आवृत्ती, असे उर्ध्वश्रेणीकरण केले . अजून काही त्रास नाही. क्रोम आणि एज दोन्ही व्यवस्थीत चालत आहे. लॅपटॉप २ वर्षे जुना आहे.

सध्या मुलगा ऑनलाईन लर्निंगला जे मशीन वापरतो त्यात विंडोज ११ आलं (किंवा त्याने केलं असेल). तो वापरतो ते गेम्स, क्रोम इ. कुठेही काही समस्या आली नसावी. अजुन तरी ब्रोकन करुन भोंगे वाजलेले नाहीत.
घरगुतीवापरासाठी काही समस्या असू नये. सध्याच्या हार्डवेअर वर अपग्रेड म्हणून ११ टाकत असाल तर समस्या समजू शकतो, पण नव्या मशीनला तात्पुरत्या समस्या कदाचित असतील. पण त्या फार मोठ्या नसाव्या.