महत्त्वाचे कागदपत्र जतन करण्याची सुविधा/ डिजिटल लॉकर संबधी माहिती हवी आहे

Submitted by स्वान्तसुखाय on 30 November, 2023 - 22:24

आपणाला बऱ्याचदा प्रमाणपत्रे, ओळखपत्रे इत्यादी महत्वाचे दस्तऐवज ऑनलाइन अपलोड करावे लागतात. याकरता मोबाईल, लॅपटॉप अशा वेगवेगळ्या साधनावरून एकाच लॉगीन अकाऊंट वरून वापरता येईल असे सुरक्षित साधन/ ऍप सुचवा.

G drive, Gmail वरून नेटवर्क नसेल तर तिथे जतन केलेले दस्तऐवज सुलभतेने वापरता येत नाहीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद किल्ली.

डिजिलॉकर हा सरकारी ऍप प्लेस्टोअरवर पहिला होता पण त्याच्या रिव्ह्यूज मध्ये अनुभव चांगले नाहीत..कित्येकांनी केवळ 1 स्टार दिला आहे. हा इथे कुणी वापरला आहे का ?

Digilocker slow वाटले.
__________________
ड्राईव (गूगल) डाउनलोड होतात डॉक्यूमेंट्स पण जीमेल अकाऊंटला येतात परत ओफलाईन डाऊनलोड करावे लागतात.
------------
माझ्याकडे mediafire dot com account दहा वर्षे आहे साईट https आहे. फोटो, विडिओ,डॉक्यूमेंटस,ओडिओ सर्व मिडिया स्टोअर करता येतात. डाउनलोडसुद्धा फुल रेझलूशन होतात.
अकाउंटला १५ जीबी फ्री स्टोरेज आहे.
फाईल शेअरिंग लिंक पाठवता येते आणि घेणाऱ्याला ती फाईल अकाउंट न काढता डाउनलोड करता येते. म्हणजे एका डिवाईसमधून काम करून इतर डिवाईसला देता येते.
ही साईट उगाचच दुर्लक्षित आहे.
बाकी जाणकारांनी तपासावे. Paid account वगैरे सोयी.
----
https jumpshare dot com ही सुद्धा all media storage and share site आहे. फ्री अकाउंट मध्ये 2gb free storage आहे. हीसुद्धा दहा वर्षे वापरतो.
----------
Dropbox 2gb free देते आणि बरीच लोकप्रिय आहे. जाहिराती फार.
_____________
Outlook (Microsoft)account साठी onedrive 5gb free reliable storage आहे (पूर्वी१५जीबी होते) तरी डॉक्युमेंटस ठेवायला पुरेशी जागा आणि सुरक्षितता आहे. App हवेच असं नाही. साईट https://www.microsoft.com/en-in/microsoft-365/onedrive/online-cloud-storage वापरता येते कोणत्याही platform वर.

DigiLocker सरकारी App आहे. त्यातले डॉक्युमेंट्स पोलिसांना मान्य करावे लागतात. प्रिंट दिली तर कोणत्याही सरकारी कामात चालते फक्त डीजी App वर दाखवावे लागते.
सरकारने तूम्हाला इश्यू केलेले डॉक्युमेंट्स त्या त्या विभागाच्या पोर्टल वरून फेच करून तुमच्या लॉकर मधे येत.
हे काही फॅन्सी App नाही.

@ Srd बरीच नवीन माहिती मिळाली

(((सरकारने तूम्हाला इश्यू केलेले डॉक्युमेंट्स त्या त्या विभागाच्या पोर्टल वरून फेच करून तुमच्या लॉकर मधे येत.
हे काही फॅन्सी App नाही.)))

हे समजले नाही.

समजा मला बारावीचे गुणपत्रक अपलोड करायचं आहे तर ते कुठून फेच करायचे? आपल्या device/अकाउंट storage वरून की शिक्षण विभागाच्या सरकारी पोर्टल वरून

बारावीची मार्कलिस्ट येथून डाउनलोड करू शकता, डिजिलॉकर ला पण घेता येते. १९९० नंतर च्या मार्कलिस्ट मिळू शकतात १० वी आणि १२ वी च्या
https://www.boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/

सरकारी कार्यालयात जावून च माहीत घ्यावी लागेल.

कायदेशीर मान्य झाली पाहिजेत कागदपत्र.
हे सर्वात महत्वाचे आहे.

हल्ली सरकार च कागद पत्र डिजिटली स्टोअर करते .
ऑनलाईन कधी ही बघायला मिळतात ती

बँकेकडून किंवा कंपन्यांकडून अधुनमधून KYC update करायला सांगतात. तेव्हा आधार पॅन आणि फोटोकॉपीज दाखवायला/द्याव्या लागतात. जर ते काम घरूनच digilocker ची documents देता येत असतील तर बरं होईल.
Digilocker साईटवर अकाउंट करून तीन documents upload केली. पण पुढे काय??
सर्वच संस्था इतक्या डिजिटली प्रगत होतील तेव्हा काही उपयोग होईल.

आधार कार्ड,पॅन कार्ड, रेशन कार्ड, वाहन फिटनेस कागदपत्रं, दहावी बारावीची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, डिप्लोमा/ डिग्री प्रमाणपत्र , जन्माचा दाखला, कोविड प्रमाणपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, वेगवेगळे विमे ( हेल्थ, जनरल ).

खालील कागद पत्रे मिळू शकतात.
इन्कम सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट , युटीआय अकाउंट स्टेटमेंट, युटीआय टीडीएस,
याशिवाय राज्य सरकारांचे टॅब आहेत =. त्यावर क्लिक करून हव्या त्या सर्व्हिसेस मिळवू शकता. काही सर्विसेस उपलब्ध नाहीत.

अशी कागदपत्रं आहेत. मुलांची तर सगळीच मिळाली. मुलाचा अल्पवयीन पासपोर्ट काढताना पोलीस व्हेरिफिकेशन साठी उपयोग झाला.
पासपोर्ट ऑफीसला झेरॉक्स जोडाव्याच लागतात. सोबत डीजी लॉकर चालते. पण काही अधिकारी ओरिजिनल मागतात.

बाकीची कागदपत्रं अपलोड करायची सुविधा पण आहे.

जतन करण्यासाठी ऑन्लाईन कुठेही करू शकता पण ओरिजिनल सोबत नसेल तर फक्त डिजि लॉकर अ‍ॅप वरील कागदपत्रे ओरिजिनल म्हणून ग्राह्य धरण्यात येतात.
माझ्यामते तुम्ही १०-१२ वी ची मार्क्शीट देखील तिकडे घेऊ शकता. तसा ऑप्श्नन आहे पण मी तो वापरलेला नाहीय.