ऑडीटोरीयम:
"आपण उत्पादने नाही, अनुभूती विकणार आहोत ग्राहकाला.यापुढे मनाशी निश्चय करा.सुंदर ताज महाल आपले प्रतीस्पर्धी विकतात. आपण गिर्हाईकाला ताज महाल नाही विकायचा, त्याला 'मी ताज महाल, लिबर्टीबाईचा पुतळा, माचू पिचू, पिरॅमिड,बुर्ज खलिफा बनवू शकतो' हा आत्मविश्वास, ही अनुभूती विकायची आहे.गिर्हाईकाचा खिसा कोणीही टॉम डिक हॅरी जिंकतो. आपल्याला त्या खिश्याच्या खालचे त्याचे हृदय जिंकायचे आहे."
खेल खेल मे
खेल खेल के
खेल खेल ये आ जायेगा.
बुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.
तीचा संसार
त्याच्या विना तीची हौस
फिटता फिटणार नाही
त्याच्या सहकार्याविना
तीचा संसार थाटणार नाही
आता या गोष्टीचीही
येऊ लागलीय साक्ष
ती आहे केबल टि.व्ही.
तो आहे सेट-टॉप-बॉक्स
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
WD ची पोर्टेबल हार्डडिस्क मी २ ते ३ वर्षांपूर्वी खरेदी केली.. माझी चिंता सुरु झाली ती येत्या दोन तीन आठवड्यापासुन.. झालं असं कि मी नेहमीप्रमाणे हार्ड डिस्क लावून मुव्ही सुरु केला आणि अर्ध्यात तो एक अचानक अटकला. वेगवेगळ्या प्लेअर मधे सुरु करुनही तीच गत.. कंटाळून दुसरा मुव्ही सुरु केला तरी तेच. शेवटी लॅपटॉप मधे कॉपी करुन मग पहावा अस ठरवलं तर तो कॉपी व्हायला तयार नाही.. त्यानंतर तर आता ती हार्डडिस्क लोकेट होणचं बंद झालयं
..
"निल्या हल्ली फेसबुकावर नाही का? त्याला परवा टॅग करायचा होता तर सापडलाच नाही."
"अरे जाम घोळ झाला रे. निल्या त्याच्या जर्मन साहेबाच्या बायकोच्या बरियलला गेला होता त्याचे रिकामटेकडे रुममेट घेऊन.त्याला ग्रुप टिकेट काढून पैसे वाचवायचे होते.तर म्हणाला तुम्हीपण चला. त्यांना तिथे काही उद्योग नव्हता त्यांनी त्या रम्य दफनभूमीत पंचवीसेक फोटो काढले आणि त्यात टॅग केला ना निल्याला 'फिलींग हॅप्पी अॅट रोझेनहाईम ग्रेव्हयार्ड' म्हणून. त्याला २५० लाईक मिळाले आणि निल्याचा साहेबच होता फ्रेंडस लिस्ट मध्ये. निल्याने आता कानाला खडा लावून फेसबुक संन्यास घेतलाय काही दिवस."
वॉल माउंटेड टीव्ही च्या केबल्स कंसिल्ड वायरिंग नसताना कश्या लपवायच्या? कोणाकडे काही आयडिया असल्यास सुचवता येतील का?
दुकानात अनेक एल ई डी टीव्ही बघितल्यावर गांगरून जायला झाले आहे. काय्च्या काय किमती....जाणकारहो, प्लीज जरा मदत कराल का?
साधारण अपेक्षा -
३२ ते ४० इन्ची स्क्रीन (१२*१५ एवढीच लांबी रुंदी आहे हॉलची )
कमीत कमी ३ वर्षाची वॉरन्टी अपेक्षीत ( हे टीव्ही जास्त टिकत नाहीत म्हणे)
सर्व्हीस सेंटर्सची उपलब्धता
किंमत २५ हजार पर्यंत
फिलिप्स किंवा व्हीडीओकॉन बद्दल काय मत अस्ते? बर्यापैकी स्वस्त वाटले
बाकी फिचर्स बद्दल फारशी माहीती नाहीये पण वाय फाय, स्मार्ट डिव्हाईस, ३ डी, फोर डी वगैरेची आत्ता तरी गरज वाटत नाहीये.
आजकाल घरोघरी मोबाईल असतात. ते जुने होऊन नवीन घेतले जातात. कधी ते बंद पडतात तर नवीन घ्यावेच लागतात. कधी नवीन मॉडेल्स येतात. हीच गत नवीन नवीन येणार्या प्रत्येक ईलेक्ट्रोनिक्स वस्तूंची आहे. पुर्वी ब्लॅक व्हाईट टीवी असायचा मग रंगीत टीव्ही आलेत आणि आता LED TV आलेत. घरात पुर्वी रेडीयो होते, ते जाऊन टेपरेकॉर्डर आलेत. मग MP3 प्लेअर आलेत, मोठमोठ्या सिस्ट्म दणाणून आवाज करायला लागल्यात. मग ईअर फोन आलेत. पीसी जाऊन लॅपटॉप आलेत. जुने रोल असलेले कॅमेरे जाऊन डिजिटल आलेत. आयपॅड आलेत. घरात अजून एका कचर्याची भर पडली आणि ती म्हणजे ई-कचर्याची!!!!
मिसाइल मॅन
महासत्ताक भारतासाठी
ध्येयवादी झंझावात होता
स्वत: स्वप्न पाहता-पाहता
इतरांचे स्वप्न रंगवत होता
विद्यार्थ्यांचा प्रेरणास्रोत
अडचणींचा सामना होता
प्रत्येक-प्रत्येक ध्येयासाठी
हर्षभरित कामना होता
कित्तेक ह्रदयांची आशा होऊन
कित्तेक ह्रदयांत झिरपला आहे
कित्तेक ह्रदयांना चुरका लाऊन
आज मिसाइल मॅन हरपला आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३