रोबाटिक व्हॅक्युम क्लीनर
रोबाटिक व्हॅक्युम क्लीनरबद्दल चर्चा करण्यासाठी धागा. प्रश्न विचारा. तुमचे अनुभव कथन करा. रोबाट आणि तुमची कोतबो सिचुएशन असेल तर थोडक्यात पण मेक-मॉडेलसहीत इथेच लिहा म्हणजे इतरांना कल्पना येइल.
रोबाटिक व्हॅक्युम क्लीनरबद्दल चर्चा करण्यासाठी धागा. प्रश्न विचारा. तुमचे अनुभव कथन करा. रोबाट आणि तुमची कोतबो सिचुएशन असेल तर थोडक्यात पण मेक-मॉडेलसहीत इथेच लिहा म्हणजे इतरांना कल्पना येइल.
नमस्कार माबोकर,
मला घरीच ऑडिओ रेकॉर्डिंग साठी हेड्फोन विथ माईक घ्यायचा आहे.
बजेट साधारण २०००/- आहे.
नॉईझ रिडक्शन हवेच. ऑन्लाईन घेवू का?
कुठला चांगला आहे? कान दुखायला नकोत. लाईटवेट हवा.
जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद __/\__
लॅपटॉप घेताना अनेक जण गोधळतातयात अनेकांना फार साधी कामे करायची असतात.
आणि तरीही गरज नसतील तर उद्या लागेल म्हणून प्रचंड ताकदीचा लॅपटॉप घेतला जातो - वस्तूत: हि ताकद कधीही वापरली जात नाही - किंवा फार क्वचित वापरली जाते .
अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो , वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो .
मित्रहो!
मी इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने क्षेत्रात नॉनटेक्निकल विभागात आहे.बरे चालले आहे. शिक्षण इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी.पण हे बहुतांश भारतीयांचं जसं होतं तसं झालेलं.कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून घेतला प्रवेश नि टाकलं उरकून. 
पण हा इतिहास झाला.झालं ते झालं.
मी गेल्या ५ वर्षा पासून सीमेन्स डिशवॉशर वापरत आहे पण कधीच महिनाभर ही न बिघडता मशीन चालली नाही, आत्ताच ९००० खर्च करून परत ७००० चा पार्ट लागेल असे सांगितले. डिशवॉशर वापरत असल्यामुळे आता बाईच्या हातचे घासलेले भांडे नको वाटतात. इथे कोणी डिशवॉशर वापरत आहे का? वापरत असाल तर कोणता ब्रँड? तुमचा aftersales अनुभव कसा आहे? LG व Bosch कोणता ब्रँड घ्यावा? भारतातले अनुभव हवेत कारण बाहेर देशात टेकनॉलॉजि इथल्यापेक्षा चांगली आहे.
अँड्रॉईड फोन वापरून खूपच कंटाळा आलाय. आता मला एक आयफोन घ्यायचा आहे. बजेट पंचवीस हजाराच्या आत आहे. आयफोन घेतल्यास त्याचे काय फायदे होतात तसेच अँड्रॉईडपेक्ष्या तो कुठल्या बाबतीत सरस आहे हे ही सांगा. तुम्ही आयफोन वापरत असाल तर का वापरता ते ही सांगा.
नमस्कार,
माझ्या DSLR कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये फंगस ग्रोथ झाली आहे. नव्या लेन्सचा बजेट नाहीये सध्या. कोरावरील श्रीमंत फोटोग्राफर्स म्हणतात लेन्स बदलण्याशिवाय पर्याय नाही. काय करावे? सध्या तरी कॅमेरातून जवळचे फोटो नीट येत आहेत पण पूर्वी चंद्राचा फोटो काढला तर त्यावरचे डागदेखील स्पष्ट दिसत होते, आता फक्त प्रकाशाचा गोळा दिसतोय. काय करू?
कॅमेरा: निकॉन D५१००,
लेन्स: टॅमरॉन १८-२००
कमाल व्यय मर्यादा (बजेट): ५०००-७०००
ऐन लॉकडाऊनच्या काळात सर्व भिस्त फोन आणि इंटरनेटवर असल्याने फोन बंद पडणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. माझ्या भावाचा फोन असाच बंद पडला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मागच्या काही वर्षात वेळोवेळी साठवला गेलेला अतिशय महत्वाचा डेटा त्यात होता. थोडाथोडका नव्हे तर जवळजवळ ६४ गिगाबाईट!