इलेक्ट्रॉनिक्स

मोबाईल नंबर पोर्टिंग किंवा सर्किट चेंज- मुंबई ते पुणे

Submitted by mansmi18 on 20 June, 2012 - 13:10

नमस्कार,

माझा मोबाईल (वोडाफोन सर्विस) मुंबईत घेतला होता. नंतर मी पुण्याला शिफ्ट झालो. पण नंबर मुंबईचा असल्याने इथे रोमिंग मधे जात आहे आणि कॉल्स महाग पडत आहेत.

१. मी नंबर पोर्ट करुन घेतला तर तो मुंबई सर्किट मधुन पुणे सर्किट मधे जाईल का?
२. वोडाफोन स्वतः असा सर्किट चेंज करु देतात का?
३. (पुण्यातुन दुसरा सिम घेण्याचा पर्याय सोडुन) इतर काही पर्याय आहेत का? (मला नंबर बदलायचा नाही आहे शक्यतो).

धन्यवाद.

आयफोन : काचेखाली धुळीकण?

Submitted by गजानन on 11 December, 2011 - 08:59

माझ्या आयफोनाच्या काचेखाली धुळीचे कण जमा झालेत. (आवाज कमी-जास्त करायच्या बटनांजवळ जास्त प्रमाणात आहेत) खात्रीशीर ते साफ करून देणार्‍या व्यक्तीच्या शोधात आहे. मुंबईत कोणाला असा दुकानदार माहीत आहे का? http://www.youtube.com/watch?v=enGec18zF1w हा व्हिडिओ मी अनेकदा पाहिला आहे आणि त्याप्रमाणे स्वतःच प्रयत्न करायचा मोह होतोय. पण तुमच्यापैकी कुणाला याचा अनुभव आहे का? या धुळीकणांमुळे पडद्याला काही हानी होईल का? कृपया माहिती द्या.

अ‍ॅन्ड्रॉईड आणि त्यांचे काही उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स..!!

Submitted by उदयन.. on 8 October, 2011 - 06:54

अ‍ॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अ‍ॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :

शब्दखुणा: 

लॅपटॉपशी संबंधीत समस्या

Submitted by गजानन on 18 September, 2011 - 08:41

माझा लॅपटॉप मधल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत फारसा वापरात नव्हता. अधूनमधून वापरायचो तेव्हा नीट चालायचा.

पण हल्ली प्रत्येकवेळी सुरू होताना अखंड बीप-बीप असा आवाज करतो, पडद्यावर काहीच दिसत नाही. Esc key दाबल्यावर नेहमीसारखा चालू होतो. पासवर्ड टाकायच्या बॉक्समध्ये आधीच बर्‍याच फुल्या दिसतात. यावरून कोणती तरी कळ (key) दबलेली राहतेय असे वाटतेय. चालू झाल्यावर ० ते ९ या अंकापैकी २ आणि ८ या कळा चालत नाहीयत.

ऊर्जेचे अंतरंग-१५: फ्लेमिंग यांचे नियम

Submitted by नरेंद्र गोळे on 17 August, 2011 - 07:57

चुंबकीय क्षेत्र आणि विद्युतक्षेत्र यांत घनिष्ट संबंध असल्याचे खूपच पूर्वीपासून लक्षात आलेले आहे. एका क्षेत्रात कुठलेही बदल घडत असल्यास ते दुसर्‍या क्षेत्रास जन्म देतात असेही आढळून आले. या नव्या क्षेत्राच्या निर्मितीची दिशा निश्चित करणारा अभ्यास फ्लेमिंग यांनी केला होता.

विडीओ रेकॉर्डिंग मधला थोडा भाग सेव्ह करून पाठवता / अपलोड करता येतो का ?

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 11 March, 2011 - 01:38

माझ्या मुलीच्या शाळेच्या स्नेह संमेलनाची सीडी मिळाल्ये, नवरा परदेशात आहे, मी सीडी मधला फक्त तिच्या नाचाचा भाग कुठे अपलोड करून त्याला पाठवू शकते का ?

व्हिडिओ कॅमेरा बिघडला!

Submitted by चंपक on 20 February, 2011 - 06:40

माझा २ वर्षे जुना सोनी कॅमकॅडोर मध्ये आता बटन ऑन केले कि, "रिट्रायव्हिंग' असा संदेश येतो आणि काहीच होत नाही. शुट, फोटो काही करु शकत नाही. सतत रिट्रयव्हिंग चालु राहते....... उपाय काय करावा?

बॅटरी काढुन, पुन्हा टाकुन ट्राय केले. जमले नाही.

त्यातील डाटा सेफ असेल का? काढता येईल का? भारतात नेउन? बॅकप आहे, पण काही व्हिडीओ चे नाही केलेले. ते जरा कमी महत्वाचे होते. ...
धन्यवाद!

वॉशर/ ड्रायर बद्दल माहिती

Submitted by मिनी on 30 September, 2010 - 16:04

मला इथे (अमेरिकेत) वॉशर/ ड्रायर विकत घ्यायचं आहे. कुठल्या कंपनीचं घ्यावं. घेतानां नेमक्या काय गोष्टी विचारात घ्यायला हव्यात? मी ऑनलाईन बर्‍याच ठिकाणी पाहिलं, पण त्या माहितीवरुन अजुनच गोंधळ वाढला. मायबोलीकरांकडुन ह्याबाबतीत माहिती मिळाली तर मला वॉशर/ ड्रायर विकत घ्यायला सोप्पं पडेल.
अगाऊ धन्यवाद!

शब्दखुणा: 

मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

आयफोन अ‍ॅप्स

Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02

आयफोनवर वापरता येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्‍या अ‍ॅप्सबद्दल लवकरच लिहीन.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - इलेक्ट्रॉनिक्स