मोबाईल वर सतत गूगल अॅड येतात ..
अगदी लॉक स्क्रीन वर सुद्धा.. कोणाचा फोन आला की मुद्दाम अॅड डिस्प्ले होते ..
त्यामुळे कॉल घेताना आधी अॅड क्लिक होते.. कोणाचा फोन आला डिस्प्ले होतच नाही..
काहीही बघताना अधे मधे अॅड सुरु होतात.. माझा मोबाईल सॅमसंग..अॅन्ड्रॉइड ८.१.० ..
गूगल वर सर्च करुन पाहिलं काही फरक नाही पडला.. कोणाचा सेम प्रॉब्लेम असेल तर मदत करा
बऱ्याच दिवसांपासून या विषयावर लिहायचा विचार चालू होता पण लिहायला मुहूर्त लागत नव्हता.अश्याच काहि सेन्सेटिव्ह केसेसवर एक मित्र काम करतोय, त्याच्याशी बोलताना पुन्हा काहि धक्कादायक गोष्टी नव्याने समोर आल्या म्हणून आज लिहायला सुरुवात केली.
बकेट चॅलेंज किंवा आत्ता हल्लीचं किका का कुका काय चॅलेंज आलंय ते सर्वांना माहिती असेलच. यापूर्वी ही असे गेम येऊन गेले आहेत यातून घडलेल्या गंभीर घटना अनेकांनी वाचल्या/ऐकल्या ही असतील, सेम अश्याच प्रकारचे वेगवेगळ्या चॅलेंज देणाऱ्या साईट आहेत (काहि उघड तर काहि डार्क वेबची पयदायिश).
मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... 
मला हार्टरेट मॉनिटर घ्यायचा आहे. पण मला त्याबाबद्दल उलटसुलट माहिती मिळाली आहे. इथे कुणी असे हार्टरेट मोजणारे असतील तर त्यांचे अनुभव ऐकायला आवडतील.
चेस्ट स्ट्रॅप वाला मॉनिटर अधिक चांगला की रिस्ट बँडवाला?
पूर्वी माझ्याकडे चेस्ट स्ट्रॅप वाला (टायमेक्सचा) मॉनिटर होता. पण आता नवीन प्रकारचे बरेच रिस्टबँड्स बाजारात आलेत. हे कितपत रिलाएबल असतात?
शक्यतो भारतात मिळणारे (आणि अँड्रॉइड कम्पॅटिबल) ब्रँड्स सजेस्ट करावे ही नम्र विनंती.
बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS (iPad आणि iPhone) विषयी मला माहित असलेली माहिती देण्यासाठी एक सदर सुरु करावे म्हणत होतो. यात काही टिप्स असतील, ट्रबलशुटींग असेल किंवा मला आवडलेली काही ॲप असतील. किंवा ॲप्पलविषयीच्या नव्या बातम्याही असतील. सगळ्याच गोष्टी या कामासाठी ऊपयोगी असतिलच असे नाही. काही काही गोष्टी 'जरा गम्मत' म्हणूनही असतील. पण प्रश्न होता भाषेचा. ईंग्रजीत तर लिहायचे नाही आणि मराठीत लिहायचे तर ईंग्रजी शब्दांना पर्याय सापडत नाही. म्हणजे निदान मला माहित नाहीत. मग ठरवले जमेल तसे लिहावे, सुचतील ते शब्द वापरावे. हळूहळू सफाई येत जाईल लिखाणात. तोवर ॲडजस्ट करा.
युजर एक्सपीरिअन्स डिजाईन मधलं करिअर याविषयी माझी मुलाखत नुकतीच रेडिओवर प्रसारित झाली. मुलाखतीचं रेकॉर्डिंग पुढील दुव्यावर ऐकता येईल. हे रेकॉर्डिंग नंतर अनेक महाविद्यालयात ऐकल्या-चर्चिल्या गेलं ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब! या मुलाखतीद्वारे तरुणांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी हीच इच्छा.
https://youtu.be/ikqrnE7KrZM
खास तुमच्यासाठी फेसबुक रेडीमेड स्टेटस गणेशोत्सव धमाका ऑफर! स्टेटस प्रत्येकी २९९ रूपये
तुम्हाला स्टेटस करण्याचा कंटाळा आहे पण खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याची ईच्छा तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रेडीमेड स्टेटस जे तुम्हाला मिळवून देईल हजारो लाईक्स, कमेंट्स सोबत फेसबुकवर अफाट प्रसिद्धी. तुम्हाला फक्त एवढच करायच आहे की तुमचं यूजर नाव व पासवर्ड आम्हाला द्यायचा आहे त्याच्या दहा मिनीटांतच तुमचं स्टेटस पोस्ट झालेलं असेल.
"शेवटी तुमचा विश्वास हीच आमची कमाई."
त्वरा करा ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध.
संपर्क-http/rambharosefbstatus.com
आयफोनवर एखादा शब्द देऊन एखादे ईमेल एकदा शोधले व थोड्यावेळाने पुन्हा शोधायला पाहिले तर पहिल्या शोधात आलेली सर्व ईमेल गायब होतात व ती काही केल्या शोधता येत नाहीत. तसे होऊ नये याकरता काय करावे ? गुगलवर उत्तर मिळत नाहीये, बहुतेक शोधायची वाक्यरचना योग्य नसेल. धन्यवाद.
खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचं मनात होतं पण विचारांत सुसूत्रता नव्हती. शेवटी आज लिहायचंच असं ठरवलं. लिखाणातील विस्कळीतपणा माफ कराल अशी आशा आहे. नवीन भाग फार लहान होत असल्याने अश्विनी यांच्या सूचनेनुसार मी पुढचे भाग इथेच वाढवत आहे.
नवीन डेस्कटॉप पीसी घ्यायचा आहे. जीएसटीमुळे दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा घाई करतो आहे.
माझा जाणकारांना प्रश्न आहे की डेस्कटॉप असेम्बल करतांना काय काळजी घ्यावी, कसा करावा, कोणते कॉम्पोनंट्स कोणासोबत कसे मॅच होतात, ओवरक्लॉक काय असते, करणे योग्य असते का, असेल तर कसे करायचे वगैरे डिटेल नर्ड जीक प्रश्न आहेत.
तारुण्यात (म्हणजे अगदी कालपरवा हो) ह्या गोष्टी बर्याच केल्या आहेत, पण आताशा इतर अनेक उपद्व्यापामुळे (संसार हो, संसारच) टेक्नॉलॉजीची नाळ तुटली आहे. बाजारात आता नवीन काय व इतरांच्या तुलनेत कोणते कसे चांगले, कसे वाईट हे मला माहित नाही.