
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
Pickle- tickle चे कौतुक योग्य
Pickle- tickle चे कौतुक योग्य कानांपर्यंत पोहचवतो मंडळी.
आभार.
आंब्याचा “टाहाळा”
आंब्याचा “टाहाळा”
आंब्याचा “टाहाळा” म्हणजे आंब्याची लहानशी फांदी. घराच्या मुख्य दाराला शुभप्रसंगी टाहाळा बांधतात हे आपण बघितले असेल.
या टाहाळ्याला डाहळा किंवा ढाळा असेही म्हणतात.
टाहाळ्याचे अन्य अर्थ:
- लग्न समारंभांत दोन्ही पक्षांकडून कॉमन माणूस.
- सुखदुःखाच्या प्रसंगी दुसर्याच्या घरी सारखेपणाने वागणारा माणूस
(संदर्भ: मराठी विश्वकोश)
चांगली माहिती.
चांगली माहिती.
आंब्याचा टहाळा, डहाळी (डहाळा) हे आमच्याकडचे प्रचलित शब्द.
कसला कातिल रंग आलाय लोणच्याला
कसला कातिल रंग आलाय लोणच्याला....... लोणचेप्रेमी नसूनही कृती विचाराविशी वाटतेय.
या टाहाळ्याला डाहळा किंवा
या टाहाळ्याला डाहळा किंवा ढाळा असेही म्हणतात.>> आमच्याकडे टाळा किवा डहाळी म्हणतात.
(No subject)
देखुनी तुझे रूप वेडावले भूप
# हापूस, the King of Mangoes
# Seasonal Delights
# My Random Clicks
>>>>देखुनी तुझे रूप वेडावले
>>>>देखुनी तुझे रूप वेडावले भूप
तो स्वतःच फळांचा भूप आहे
किती देखणा दिसतोय आंबा. खरच फळांचा राजा. मी केळ्याशी तुलना केलेली आहे पण केळं म्हणजे अगदीच बिचारं 'हे' असतं
........ अति परिचित फळ हाहाहा
.... काहींना जेलसी वगैरे वाटलेली. पण सौंदर्याच्याही नानाविध छटा असतात.
दॅट रिमाईंडस मी - मी एकदा म्हटलेले होते की 'ललिता पवार', 'जिस देश मे..' मधे तरुण आहे आणि ती मधुबालाहून सुंदर दिसते
बरेच लोक हसून हसून कोसळलेले आठवतात.
ललिता पवार = Banana
ललिता पवार = Banana
मधुबाला = Mango
याआधी कधीही न ऐकलेल्या उपमा 😂
पण मनाशीच कल्पना केली.
अद्भुत !!
ध मा ल !!
हाहाहा तुम्ही अगदी स्पेल आऊट
हाहाहा
तुम्ही अगदी स्पेल आऊट केलेत. पण बरोबर हाच गाभा आहे वरील पोस्टचा 
अहाहा!! तुम्ही खजिना दाखविलात
अहाहा!! तुम्ही खजिना दाखविलात तो कोणता निर्देश'म्हणजे चंद्र दाखवायचा असेल तर फांदीकडे बोट करायचे मग आपोअप व्यक्तीस चंद्र दिसतो' तो निर्देश.
राजस दशरथबाळ । सीते याला घाली माळ ॥ध्रु०॥
कमळदलांपरि नयन विशाळ । मृगमदचर्चित भाळ ॥१॥
मदनमनोहर रूप जयाचें । म्हणवी परम दयाळ ॥२॥
कनकधनुर्धर कनकधनुर्धर दीनजनोद्धर । दानवकुळीचा काळ ॥३॥
काळा डोंगर अंतरीं वोंगळ । रावण तो फटकाळ ॥४॥
देखुनी तुझें रूप वेडावले भूप । अंतरीं घोटिती लाळ ॥५॥
येवढें त्रिंबकधनु कैसा उचलील नेणु । वेडा जनक नृपाळ ॥६॥
मध्वमुनीश्वर सगुण दयानिधि । करील तुझा प्रतिपाळ ॥७॥
सॅल्लामघ्यें “शाखार्चट्वन्याय
शस्त्रामध्ये 'शाखाचंद्रन्याय' म्हणून एक म्हणुन आहे,
त्याचा अर्थे असळा कीं, शुद्ध प्रतिपदा किंवा द्वितीया ह्या २ तीथींना -
चंद्राचीं कोर फार बारीक असल्या मुळे लोकांना लवकर दिसत नाही,
तेव्हां असा वेळीं झाड च्या जच्याफांदीमागे चंद्र आहे ती फांदी दाखवून चंद्र दाखवून देतात- म्हणजे,
हा चंद्र पहा म्हणून फांदी दाखवतात.
- उपनिषत्संग्रह_बृह्दाररण्यकोपनिषत्_अध्याय_६_वा
अरे दैवा.
अरे दैवा.
“शाखाचंद्र” ऐवजी “काकतालिय” न्याय qualify होतोय इथे ! 😀
हा पूर्ण छंद तर मला नव्हता माहित, फक्त ही एकच ओळ वाचलेली आठवत होती, म्हणून तसे caption दिले. योगायोग !
बाकी Crooked बॉसला “ललिता
बाकी Crooked बॉसला “ललिता पवार” हा अनेकांचा कोडवर्ड होता एकेकाळी
आणि आवडतीचा / क्रश चा कोडवर्ड मधुबाला.
>>>>>>>हा पूर्ण छंद तर मला
>>>>>>>हा पूर्ण छंद तर मला नव्हता माहित

काकतालिय न्याय - किसी ताड़ के पेड़ के नीचे कोई पथिक लेटा था और ऊपर एक कौवा बैठा था। कौवा किसी ओरको उडा़ और उसके उड़ने के साथ ही ताड़ का एक पका हुआ फल नीचे गिरा। यद्यपि फल पककर आपसे आप गिरा था तथापि पथिक ने दोनों बातों को साथ होते देख यही समझा कि कौवे के उड़ने से ही तालफल गिरा। जहाँ दो बातें संयोग से इस प्रकार एक साथ हो जाती हैं वहाँ उनमें परस्पर कोई संबंध न होते दुए भी लोग संबंध समझ लेते हैं। ऐसा संयोग होने पर यह कहावत कही जाती है।
>>>>आवडतीचा / क्रश चा कोडवर्ड मधुबाला.
अरे वा!!
हाहाहा क्रुकेड बॉस
हैदराबाद मधील हा माल्गोवा
हैदराबाद मधील हा माल्गोवा आंब्याच्या चटपटीत फोडी मांडून ठेवलेला ठेला


तिथल्याच एका गाड्यावर दिसलेले हिमायत आणि पेढा रसाळ
या धाग्यासाठी खास......
(No subject)
या आमरस, कोकणी वडे खायला. पीठ थोडं तेवलं होतं म्हणून एकदम गोल आकार नाही आला.
शनिवारी आंब्याच्या फोडी घालून शिरा केलेला, फोटो खास नाही आले ते.
ऋतुराज फोटो मस्तच.
ऋतुराज फोटो मस्तच.
अन्जू छान दिसतय ताट.
अन्जू छान दिसतय ताट.
>>>>>>>>पीठ थोडं तेवलं होतं
तेवलं म्हणजे काय गं? पहील्यांदा ऐकला हा शब्द.
अंजू मस्त दिसतय तर.
अंजू मस्त दिसतय तर.
तेवणे म्हणजे पीठ हवं त्यापेक्षा थोडं सैल/पातळ होणे.
आह ओके ओके. धन्यवाद ममो.
आह ओके ओके. धन्यवाद ममो.
हेमाताई बरोबर. मी एरवी गरम
हेमाताई बरोबर. मी एरवी गरम पाण्यात भिजवून थोड्यावेळाने, अर्ध्या तासाने लगेच करायला घेते, यावेळी जरा जास्त वेळ लागला मला त्यामुळे तेवले असावं.
भारी फोटो, ऋतुराज आणि अंजूताई
भारी फोटो, ऋतुराज आणि अंजूताई.
कोकणी वडे म्हणजे काय? भाजणीचे का?
>>>>>>>>शनिवारी आंब्याच्या
>>>>>>>>शनिवारी आंब्याच्या फोडी घालून शिरा केलेला, फोटो खास नाही आले ते.
साबा आमरस घालून शिरा करत.
वाह! आंब्याच्या फोडी घालून शिरा
कोकणी वडे भाजणी च्या वड्या
कोकणी वडे भाजणी च्या वड्या हून वेगळे असतात. भाजणीचे वडे खाल्ले की खूप तहान तहान होते, कोकणी वडे खाल्ले की होत नाही.
ओह ओके, धन्यवाद.
ओह ओके, धन्यवाद.
तांदूळ आणि उडीद डाळ (आणि आता गहू) म्हटलंय तुम्ही, आणि दोन्ही तळतातच. भाजणीतल्या कुठल्या पदार्थामुळे तहान लागत असेल असा विचार करते आहे. माझी आई करते थालिपिठाची भाजणी त्यात उडदाच्या जोडीला चणाडाळ, ज्वारी, बाजरी आणि थोडेसे पोहे घालते.
)
(उगाच आपला डोक्याला भुंगा.
मला भाजणीचे वडे जास्त आवडतात,
मला भाजणीचे वडे जास्त आवडतात, नवऱ्याला कोकणी वडे. माहेरी मला हे वडे माहितीच नव्हते, बरेच जण आजूबाजूला रहाणारे कोंबडी वडे म्हणायचे त्यामुळे, काहीतरी नॉनव्हेज असेल असं वाटायचं. कोकणात माहेरी करत नाहीत हे.
सासरी दोन्ही प्रकारचे वडे करतात, त्यामुळे हे वडे शाकाहारीच असतात ही ज्ञानप्राप्ती झाली. सासरी हे वडे नारळाचा रस, आमरस, खीर वगैरे बरोबर खातात. सोबत उसळ, रस्सा भाजी करतात.
सासूबाई कधी आल्या की दळून आणायचो. तांदूळ, उडीद डाळ, मेथीदाणे किंचित असं आठवतंय. हल्ली खूप वर्ष रेडिमेड पीठ आणलं जातं.
@ऋतुराज, दुकानातील आंब्याचे
@ऋतुराज, दुकानातील आंब्याचे फोटो मस्त दिसत आहेत; शनिवारी काढलेत का? नामपल्ली रस्त्यावर का?
@अन्जू आंब्याच्या रसासोबत वडे हे पहिल्यांदाच पाहत आहे, आम्ही आपलं आमरस पोळी खातो. आमरस पुरी फारशी आवडत नाही. पण सीजन संपण्याआधी वडे एकदा नक्की ट्राय करीन.
मी ही नाही खात, केलं म्हणून
मी ही नाही खात, केलं म्हणून एक खाल्ला आमरसाबरोबर, मला उसळ केलेली. मी नेहेमी पुऱ्या करते. नवरा खातो म्हणून हे कॉम्बो केलं.
सर्व नवीन प्रतिसादांचे स्वागत
सर्व नवीन प्रतिसादांचे स्वागत. सचित्र प्रतिसादांचे विशेषच.
My Mango Musings/ माझे काही अपडेटस् :
♠ रत्ना हापुसचे फ़ोटो इथे दाखवले पण मलाच खायला नाही मिळाले. लाभार्थींना फार आवडला तो आंबा. चव almost हापुसचीच आणि गर हापुसपेक्षा जास्त होता असा अभिप्राय प्राप्त झाला असे.
♠ Raw Mango + Mint Leaves Mojito पुन्हा एकदा झाले घरातील पार्टीसाठी. अपेक्षेप्रमाणे हिट झाले. दुसऱ्या दिवशी च्या GTG ला कैरी पन्ह्याला पाण्याऐवजी chilled soda टाकून सादर केले; वर split हिरवी मिर्ची. सुपरहिट प्रकार. पन्हे मात्र गाळून घेतले होते.
♠ मी मलगोबा / मल्गोवा बद्दल असे लिहिले होते :
ह्याचा गर firm bodied/ dense असतो. कोय लहान, पांढरी.
ऋतुराज यांनी टाकलेल्या फोटोत ती स्पष्ट दिसते आहे. 👍
फोटोज् साठी आभार. 🙏
मल्गोबाच्या चटपटीत फोडी कलाकुसरीने कापल्यात. जुहूनाक्याला / इस्कॉनसमोर एक तमिळ कुटुंब अशाच कलाकारीने कातरलेल्या तोतापुरी कैरीच्या फोडी विकते ते आठवले.
♠ ऋतुराज, हिमायत बरोबर. Commoner’s delight. स्वस्त आणि मस्त. पण तो दुसरा आंबा “पेढा” नसून “पेद्दा रसाल” (तेलुगु मधे पेद्दा= मोठा, दीर्घाकारी)
♠ अन्जू, आमरसासोबत भात, पुरी, चपाती, शेवया झाले आता हे वडे सुद्धा ! नवीन माहिती. तसेच “पीठ तेवणे” हे ही नवीन समजले. 👍
विजयवाडा महामार्गावरून येताना
विजयवाडा महामार्गावरून येताना, चांगले दिसले, मासला गोड लागला म्हणून आंबे घेतले. घरी येऊन आंब्याचा रस केला पण तो खूप म्हणजे खूप आंबट झालाय. साखर घातली तरीही कुणी खात नाहीय.
त्या रसाचे काय करावे? (?_?)
Pages