
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
@ आंबा कोयी
@ आंबा कोयी
आंबा कोयी भाजून खाणारे बरेच जण होते आमच्या आसपास. स्वत: मात्र एकदाच चव घेण्यापुरती खाऊन बघितली, फार कडू वाटली.
आमच्या घनिष्ठ परिचयातल्या एका प्राध्यापिकेचे माहेर कच्छमधले धोराजी शहर. त्यांच्या माहेरून त्या कैरी+ कैरीच्या कोयीतला सुकवलेला गर + लसूण यांच्या जूलियन्सचे एक अद्भुत लोणचे आणत दरवर्षी. आंबट, तुरट, तिखट, शार्प चवी एकत्र. लच्छे का अचार. (छल्ला प्लीज़ नोट, तुमच्या pickle experimentations साठी) आमच्यासाठी शुभ्र दादरा बांधलेली एक वेगळी बरणी येई.
आधी त्यांची आई, नंतर वहिनी गेली आणि ती रेसिपी त्यांच्यासोबतच गेली. चव मात्र माझ्या जिभेवर अजून तशीच आहे.
साऊंडस गुड अनिंद्य.
साऊंडस गुड अनिंद्य.
आई बाठे वाळवून सुपारी करायची
आई बाठे वाळवून सुपारी करायची म्हणजे आतमधले मुखवास म्हणून खायला पण त्यापेक्षा मला कोवळ्या कोयी असताना तिखटमीठ लाऊन नुसतं खायला आवडतं किंवा छोट्या कैऱ्या मिठाच्या पाण्यात टाकून मुरल्यावर आतल्या कोयीसकट खायला आवडतं. थोडा तुरटपणा खूप आवडतो, अति नाही आवडत.
तोतापुरी आंब्याचे (कैरीचे) लोणचं एवढं चांगलं नाही लागत, आंबटपणा नसतो पण मुरांबा, गुळामबा चांगला होतो, साखर गुळ कमी लागतो म्हणून आई करायची, अर्थात मला फार गोड आवडत नाही, कुठलाही करा म्हणून मी खायचे नाही.
अनिंद्य, :-), एकदम नवीन
अनिंद्य,
एकदम नवीन प्रकाराचे लोणचे.
करून पाहीन . थोडे प्रमाण आणि रेसिपी मिळाले असते तर बरे झाले असते. पण आता अंदाजे करेन.
लसूण कमी टाकायला हवा. पंजंट नको लागायला.
आतील गर कसा सुकवायचा असा प्रश्न आहे.
मी तुमचे कैरी+ चणे लोणचे केले होते. मस्त झालेले.

बाठे वाळवून सुपारी
बाठे वाळवून सुपारी 👍
तोतापुरी कैरीत जास्त आंबटपणा नसतो हे बरोबर. आणि फार लवकर पिकायला येतात. नुसत्या कापून खायला, आमटी, सलाद, छुंदा यासाठी बेस्ट.
@ छल्ला I was sure you will notice that novel Pickle immediately
कैरी-चना लोणचे करुन बघितले, तुम्हाला ते आवडले हे वाचून आनंद झाला.
गर उन्हात सुकवता येईल ना ?
@ शुभदा,
@ शुभदा,
होय, लवकर सरले हापूस यंदा. रायवळ जूनपर्यंत असतील. ते एन्जॉय करा.
BTW “रायवळ” हा शब्द गावठी, specific / विशेष नाव नसलेल्या आंब्यासाठी नेहेमी वापरतात. खास करून कोकणात.
महाराष्ट्रात अन्यत्र रायवळ हा शब्द जंगली लाकडासाठी वापरात आहे. घरबांधणी, फर्नीचर करायला अयोग्य कनिष्ट दर्ज्याच्या लाकूडफाट्याला “रायवळ” म्हणतात. (दुसरा शब्द इंजायली)
कोकणात मात्र मुद्दाम लागवड न केलेला, आपोआप उगवलेला आंबा तो रायवळ.
याउलट मुद्दाम बागेत - आमराईत लावलेल्यास इरसाल आंबा (आता फारसा वापरात नाही इरसाल हा शब्द) व चांगल्या जातीचे कलम केलेल्यास कलमी आंबा.
अमेरिकेत आता आयातीत भारतीय
अमेरिकेत आता आयातीत भारतीय आंबे प्राप्य आहेत असे वर अनेकांनी सांगितले. आज त्यासंबंधी हे वाचले:
अमेरिकेनी नष्ट केले भारतातून आयात केलेले आंबे :
https://www.lokmat.com/business/news/why-did-america-destroy-indian-mang...
कालच्या gtg मध्ये अनयाने
कालच्या gtg मध्ये अनयाने दिलेल्या हातभर मोठ्या कैरीचा फोटो इकडे आणला पाहिजे
… हातभर मोठ्या कैरीचा फोटो
… हातभर मोठ्या कैरीचा फोटो इकडे आणला पाहिजे…
अवश्य आणा.
मग मी परवा लाडक्या पुतणीसाठी केलेल्या मँगो शेक चे फोटो आणतो.
या धाग्याला कैरी-आंबा हवाच असतोय.
(No subject)
(No subject)
शेतावरच्या रसरशीत, तेजस्वी
शेतावरच्या रसरशीत, तेजस्वी कैर्या.
अहाहा ! करकरीत हिरव्याकंच
अहाहा ! करकरीत हिरव्याकंच कैऱ्या 😍
Thanks for sharing !
As promised, लाडक्या
As promised, लाडक्या पुतणीसाठी केलेल्या मँगो शेक चे फोटो :
हा mango on mango - मँगो आइसक्रीम + mango chunks युक्त मँगो शेक
आणि हा ड्राइफ्रूट्स युक्त
आणि हा ड्राइफ्रूट्स युक्त
अनया
अनया
इथे दिलास फोटो ते बेस्ट
फक्त size कळत नाहीये
तसा फोटो आहे का बघूया
अनया, काय हिरव्याकंच कैर्या
अनया, काय हिरव्याकंच कैर्या आहेत! डोळे निवले बघून!
>>> हा mango on mango - मँगो आइसक्रीम + mango chunks युक्त मँगो शेक
म्हणजे मॅन्गो मस्तानी झाली की ही!
>>> हा ड्राइफ्रूट्स युक्त
नॉट लिसनिंग हाँ!
शेतावरच्या रसरशीत, तेजस्वी
शेतावरच्या रसरशीत, तेजस्वी कैर्या......अगदी अगदी!
अनया खरोखर तजेलदार कैरी आहे.
अनया खरोखर तजेलदार कैरी आहे. शायनिंग हा.
अनिंद्य सहीच एकदम.
(No subject)
आमची हम्बल मॅन्गो लस्सी.

मॅन्गो मस्तानी … राइटो.
मॅन्गो मस्तानी …
राइटो. पुण्यात हेच nomenclature होईल 👍
Mango lassi stirred or shaken
Mango lassi stirred or shaken ?
त्यातला देखणा stirrer बघून आगावू विचारणा 😀
बाकी हंबल-बंबल झूट है
शेतावरच्या रसरशीत कैऱ्या...
शेतावरच्या रसरशीत कैऱ्या... मस्त जून झालेल्या, हिरव्याकंच , एक ही डाग नसणाऱ्या तरी ही ऑरगॅनिक.. फारच मस्त वाटलं कैऱ्या बघून अनया.
अनिंद्य दोन्ही फोटो खूप छान आलेत. मला मँगो शेक फार आवडत नाही . त्या मानाने मँगो आइस्क्रीम आवडतं.
तोतापुरी ची वाट बघतेय आता, त्याचा मोरंबा एक नंबर होतो डायरेक्ट कुकरात झटपट आणि नो रिस्क. केला तर फोटो दाखवीन इथे.
ह्या झाडाच्या अशा देखण्या
ह्या झाडाच्या अशा देखण्या कैर्या असतात.
>>> Mango lassi stirred or
>>> Mango lassi stirred or shaken ?



त्या फोडी फारच camera shyहोत्या - पटकन बुडत होत्या, म्हणून cocktail pickमध्ये खोचल्या.
Hennessyच्या ग्लासात लस्सी बघून लाजल्या असतील.
Hennessyच्या ग्लासात लस्सी
Hennessyच्या ग्लासात मँगो लस्सी बघून मला मात्र गुदगुल्या झाल्या हाँ 😄
रहने दो अभी साग़र-ओ-मीना मिरे
रहने दो अभी साग़र-ओ-मीना मिरे आगे!
अनया, तुम्ही खऱ्या श्रीमंत.
अनया, तुम्ही खऱ्या श्रीमंत. स्वत:च्या शेतात, स्वत:ची झाडं, त्यात सेंद्रीय कैरीची अशी भरघोस availability.
हेवा वाटला.
चश्म-ए-बद-दूर !
स्वाती मँगो लस्सी बहारदार
स्वाती मँगो लस्सी बहारदार दिसतेय...
@ स्वाती,
@ स्वाती,
बाजीचा-ए- अतफ़ाल पर्यंत सूट होत आहे, पुढे नाही… कारण हाथों में जुंबिश आहे अजून 😀
This is one overdue compliment :
तुमच्या प्रत्युत्पन्नमतीचा, flawless repartee चा चाहता आहे मी. Always a pleasure to interact with you.
Pages