
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
मेथांबा करता येईल, नारळाचं
मेथांबा करता येईल, नारळाचं दूध घालून कढी/सार करता येईल, सासव करता येईल.
< img src= https://lh3
“एक लहान भोपळयाएवढा आंबा” खाल्ला असे वर अन्जू यांनी लिहिले होते. त्याच आकाराचा बदामी आंबा घरी आला आणि दोघांनी फस्त केला. सुमारे २० वर्ष हा जिभेवर चढला नव्हता, म्हणून जरा नॉस्टेल्जिया + नाविन्य.
बदामीचा गर खूप घट्ट असतो हे माधव यांनी लिहिले होतेच, त्यांचीही आठवण केली.
अन्जू, माधव - उचक्या लागल्यास क्षमस्व
भारीच की.
भारीच की.
मी बाठा ठेवलाय त्याचा, आधी कुंडीत पेरणी करेन, रोप आलं तर खाली लावायचा विचार करेन.
कुंडीत पेरणी करेन
कुंडीत पेरणी करेन … 👍
जय हो.
मला हा मेगा साइज (प्लेट १० इंच आहे त्यावरून) आंबा नीट कापून वर प्लेट हातात असा प्राप्त झाला.
म्हणून कोय पेरण्याचे लक्षात नाही आले.
… त्या रसाचे काय करावे? ..
… त्या रसाचे काय करावे? ..
अरेरे. रस आधीच केलाय आणि रसात आधीच साखर आहे.
मँगो साल्सा, Sweet and sour mango drink/ cold soup वगैरे ट्राय करून बघा.
आम चटणी / खट्टी-मीठी दाल मधे कितीसा खपेल हे आहेच.
“नालेसाठी घोडा” वाटल्यास इग्नोरा हे 😀
वामन "आम पापड" अस यु ट्युबवर
वामन "आम पापड" अस यु ट्युबवर सर्च द्या...
बिस्तिच्या पण चान्गल्या असतात रेसिपी..ही तिची आमपापड ची रेसिपी.
https://www.youtube.com/watch?v=OzF3RKqANII
सुमारे २० वर्ष हा जिभेवर चढला
सुमारे २० वर्ष हा जिभेवर चढला नव्हता, म्हणून जरा नॉस्टेल्जिया + नाविन्य >>> भारीच की.
कुणीतरी एका ठिकाणी भारतातल्या विविध प्रकारचे आंबे खाण्याकरता उपलब्ध करून दिले तर किती मस्त होईल ! मायबोलीवरच्या कुणी उद्योजकाने मनावर घ्याच.
… भारतातल्या विविध प्रकारचे
… भारतातल्या विविध प्रकारचे आंबे खाण्याकरता…
माझी एक मैत्रिण असा आंबा महोत्सव कोलकात्यात भरवते गेली ३ वर्ष. तुडुंब प्रतिसाद. नंतर एक सेपरेट पोस्ट लिहितो तिथल्या आंब्यांबद्दल.
दुसरा बंगलुरुकर एक ग्रुपसुद्धा असेच करतोय. सर्व तरुण इंजिनियर गाईज.
पुढच्या सीझनला आपणच करायचा का मुंबईत जंगी मँगो महोत्सव?
@ प्राजक्ता, Brilliant idea
@ प्राजक्ता,
Brilliant idea 👍
पुढच्या सीझनला आपणच करायचा का
पुढच्या सीझनला आपणच करायचा का मुंबईत जंगी मँगो महोत्सव?>>>>> तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही आहोतच...
आज हा धागा "आंबा सप्तशती"
आज हा धागा "आंबा सप्तशती" झाला - ७०० प्रतिसाद पार केले. सगळ्या आंबा-प्रेमींचे अभिनंदन!
तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही आहोतच >>> +१
नंतर एक सेपरेट पोस्ट लिहितो तिथल्या आंब्यांबद्दल. >>>@अनिंद्य, याची वाट बघतोय. मध्यंतरी इन्स्टावर एक रील बघितले - ज्यात विविध राज्यांतल्या आंब्यांची नावे होती पण माझ्याकडून ते सेव्हायचे राहून गेले. खायला नाही मिळाले तरी बघून मनाचे समाधान करता आले असते.
@प्राजक्ता, भारी कल्पना आहे. तुम्ही करून बघितली आहे का ती रेसिपी? ५-६ महिने फ्रीझमध्ये राह्ते का?
थॅन्क्स अनिद्य.
थॅन्क्स अनिद्य.
@माधव मी पण अजुन केली नाहिये त्यामुळे सान्गता येणार नाही राहिल का नाही ते..इकडे अजुनही थोड थन्डच वातावरण आहे तितकेसे रसाचे आम्बे अजुन आलेले नाहीत.
…. धागा "आंबा सप्तशती" झाला -
…. धागा "आंबा सप्तशती" झाला - ७०० प्रतिसाद पार केले. सगळ्या आंबा-प्रेमींचे अभिनंदन!…
+ १११११ 👏
इथली Mango Therapy खूप आवडते आहे. कितीतरी गोष्टी, आठवणी, अनुभव, नवनवीन आंबे आणि पाककृती (श्रीकृती म्हणा हवं तर) आणि कैरी-आंब्याचे फोटोज् !!
मजा येत आहे 👍
कालच कोणाशी तरी बोलताना 'आम
कालच कोणाशी तरी बोलताना 'आम के आम, गुठलियों के दाम' ही म्हण आठवली - आणि पाठोपाठ हा धागाच आठवला!
तसंच ‘नका तोडू पावणं जरा थांबा’ ही लावणी इथे नव्हती आली ना?
…'आम के आम, गुठलियों के दाम..
…'आम के आम, गुठलियों के दाम.. 👍
आंब्यावर फार म्हणी नाहीत समहाऊ.
हैदराबाद आणि भोपाल दोन्हीकडे प्रसिद्ध असलेली म्हण :
“आम की हवस इमली उपर” 😀
अर्थ : being/ staying satisfied with second best
ओह, हा ‘दुधाची तहान ताकावर’चा
ओह, हा ‘दुधाची तहान ताकावर’चा हिंदी चुलतभाऊ दिसतो आहे.
लावणी इथे नव्हती आली ना?
..लावणी इथे नव्हती आली ना?
नाही. पाडाला पिकलाय आंबा आली होती. ही नवीनाय
BTW, मराठीत आहेत का कैरी-आंबा थीमच्या म्हणी? पटकन आठवल्या तर नाहीत, माझ्या शब्ददुर्बलतेचा दोष.
आप आम क खाने से मतलब रखो,
आप आम खाने से मतलब रखो, गुठलियाँ मत गिनो.
भरत, बरोबर.
भरत, बरोबर.
हा अजून एक :
“दाँतां गिर गए आम चूसने से”
अगदीच Obvious खोटा बहाणा केला तर वापरतात 😀
>>> मराठीत आहेत का कैरी-आंबा
>>> मराठीत आहेत का कैरी-आंबा थीमच्या म्हणी?
आठवते आहे.
>>> गुठलियाँ मत गिनो
याचं ‘तुम्हे आम खाने से मतलब है, या पेड़ गिनने से?’ हे वेरिएशन ऐकलंय.
बिरबलाची गोष्ट आली होती का इथे? बादशहा साली (आंब्याच्या!
) आणि कोयी बेगमेसमोर सारतो ती?
>>> मराठीत आहेत का कैरी-आंबा
>>> मराठीत आहेत का कैरी-आंबा थीमच्या म्हणी?
पडला आंबा, सडली कैरी -
दोन्हीकडून नुकसान.
बादशहा साली = आंब्याच्या हे
साली = आंब्याच्या हे स्पेसिफाय केलं ते बेस्ट. नही तो बेगम के सामने साली की तारीफ ! तौबा तौबा 😂
आमके आम होंगे, गुठलियोंके दाम
आमके आम होंगे, गुठलियोंके दाम होंगे
म्हण/वाक्प्रचार नाही, पण ‘एक
अनिंद्य
म्हण/वाक्प्रचार नाही, पण ‘एक नासका आंबा सगळी अढी नासवतो’ हा दृष्टांत वाचला आहे.
भारी चर्चा..
भारी चर्चा..
फार आधी आम्रपाली नावाची मालिका दूरदर्शनवर लागायची ना..हेमा मालिनी?
पडला आंबा, सडली कैरी…
पडला आंबा, सडली कैरी…
नवीन आहे माझ्यासाठी.
.. नासका आंबा सगळी अढी नासवतो’… हे ऐकले आणि अनुभवले आहे.
पडला आंबा, सडली कैरी…
हेमामालिनीची सिरीयल नाही आठवत, पण वर “आंबा आणि गौतम बुद्ध” पोस्टमधे आम्रपालीबद्दल लिहिले आहे.
.. गुठलियों के दाम…. गाण्यातही ?
आंबा कोयींचा काही commercial वापर नक्कीच होत असावा. कारण त्या विकत घेणारे लोक बघितले आहेत. कमी असतात, पण असतात.
हेमा मालिनीची फक्त 'नुपूर'
हेमा मालिनीची फक्त 'नुपूर' सीरियल आठवते मला, आम्रपाली माहीत नाही.
पण ती 'आम के आम' म्हण मात्र मी तिच्याच तोंडून 'शोले'मध्ये प्रथम ऐकली होती.
किशोर कुमारच्या 'मुन्ना बडा
किशोर कुमारच्या 'मुन्ना बडा प्यारा, अम्मी का दुलारा' गाण्यात 'क्यूँ न रोटियों का पेड़ हम लगायें, आम तोडे, रोटी तोडे, रोटी-आम खायें? रोज रोज करती हैं क्यूँ ये झमेला?!' अशी मजेशीर कल्पना कवी शैलेंद्रने लिहिली आहे.
रोटी-आम खायें ❤
रोटी-आम खायें ❤
रच्याकने समस्त हिंदीचित्रपटसृ्टीत “कैरी खाणारी“ हिरविन म्हणजे “गोड बातमी” असे (उगाचच) समीकरण होते 😁
कैरी खातांना पुरुष कधी दाखवतील तर शप्पत. मग तो किती का आंबटशौकीन असेना
Pages