
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
नाही नाही नाही, पन्हं हे
नाही नाही नाही, पन्हं हे गुळाचंच >>> गुळ खूप आवडत असला तरी समहाऊ दोन गोष्टीत गुळ नाही आवडत - एक पन्हं आणि दुसरा खरवस.
उर्वरित भारतातले इतर प्रसिद्ध आंबे एक-एक करून इथे सर्वांच्या भेटीला आणीन म्हणतो >>> त्याची वाट बघतो आहेच.
पण हो, आंबा जरी खूप आवडत असला तरी हापूस आणि पायरी (आमरस आवडत असलेल्या माणसालाच पायरीचे महत्व समजू शकते) याला तोड नाही. एका तेलुगु कलिगने बैंगणपल्लीचे खूप कौतुक केले होते. तो लागतो छान पण हापूस तो हापूसच. घरात नुसती हापुसची आढी घातली असेल तरी जो घमघमाट येतो तसे दुसर्या कुठल्या आंब्याचे होत नसावे. चवीला गोड असतात इतर प्रकार पण स्वादात कमी पडतात. आणखी एक म्हणजे त्यांची घनता - ना ते धड रसाळ असतात ना त्यांच्या व्यवस्थीत फोडी कापता येत (बदामी सारखे प्रकार अपवाद असतील).
ज्येष्ठ महिन्यात असतं का हे ?
ज्येष्ठ महिन्यात असतं का हे ? माझ्याकडून दरवर्षी एक ताई असे द्यायला आंबे घेतात.
एक पन्हं आणि दुसरा खरवस. >>>
एक पन्हं आणि दुसरा खरवस. >>> ओहह, नेमका यात गुळच हवा आम्हाला.
ज्येष्ठ महिन्यात असतं का हे ? माझ्याकडून दरवर्षी एक ताई असे द्यायला आंबे घेतात. >>>हो. जेष्ठ प्रतिपदा ते दशमी. कालनिर्णयमध्ये बघ, लिहिलेलं असतं, पाच तारखेला गंगादशहरा समापन झालं. २७ मे ते ५ जून होतं यावेळी. मनात होतं व्रत नाही केलं तरी त्यादिवशी दानधर्म करावा पण नाही जमलं, actually विसरलो. व्रत नाही जमत करणं. पाच वर्षांपूर्वी वगैरे (किंवा त्याही आधी असेल, नेमकं आठवत नाहीये) मी एकदाच केलेलं. नवऱ्याने दोनदा पण तोही नाही करत आता.
गंगा दशहरा जेष्ठ महिन्याच्या
गंगा दशहरा जेष्ठ महिन्याच्या शुक्लपक्षाच्या दशमीला असतो हे माहित होते, निर्जला एकादशीच्या आदला दिवस.पण त्याचा आणि दशहरा किंवा अन्य कुठल्याच आंब्याचा संबंध कधी सामोरा आला नाही. उप्र-उत्तराखण्ड भागात खास गंगा दशहराच्या दिवसात मुक्काम असूनही असे आंबा कनेक्शन कधी दिसले नाही मला. तिथले आमचे परिचित पूजा अर्चना आणि गंगास्नान करतात त्या दिवशी. महाराष्ट्रात तर गंगा दशहरा अपवादानेच माहिती असेल लोकांना.
In fact, जेष्ठात उत्तरेतले आंबे जेमतेम तयार व्हायला सुरुवात असते, महाग आणि कच्चेच असतात मोस्टली. मग ते व्रतकैवल्यात एकमेकांना भेट देणे odd आहे. May be I am missing something.
हो, शुक्लपक्ष लिहायला विसरले.
हो, शुक्लपक्ष लिहायला विसरले.
इथे आम्हाला चांगले तयार दशहरा मिळालेले. या दिवसात सर्रास दिसतात डोंबिवलीत.
आम्हालाही हे व्रत माहिती नव्हतं, एकांनी सांगितलं.
... पण हापूस तो हापूसच....
... पण हापूस तो हापूसच....
मला हापूस खूप आवडतात आणि ते उत्तमच असतात या डिसक्लेमरसह पुढे लिहितोय :
आपल्याकडे बहुतेकांना हापूस आवडतो आणि त्याचे प्रचंड कौतुक होते हे लंगडा,चौसा किंवा सफेदा आंबा खाणाऱ्यांना ऑड वाटू शकते, वाटते. दुसऱ्या प्रदेशातल्या पाहुण्यांना हौसेनी हापूस दिला तर 'ठीक ही है, लेकिन लंगडा बेहतर है' असा अभिप्राय मला नवा नाही. आमचाच आंबा बेस्ट आणि तो तुम्हाला खास आवडला नाही तर 'गाढवाला गुळाची चव काय' किंवा 'बंदर क्या जाने अद्रक का स्वाद' वगैरेचे आदानप्रदान माझ्या मित्रमंडळात होतेच होते. But it is just a friendly banter 😁
आता सर्व प्रसिद्ध आंबे बहुतेक मोठ्या शहरात मिळतात आणि लोकं प्रत्यक्ष खाऊन तुलना करून बघतात. मोस्टली आपण लहानपणापासून जे काही खातो पितो ते आपल्या जिभेला सवयीचे आणि प्रिय असते हे ओघाने आले. म्हणून मग कोणाचीच मते बदलत नाहीत आणि आमच्या तुंबळ शाब्दिक खडाजंगीला fuel ची कमतरता भासत नाही. भांडतांना समोर आंबे मात्र हवेत. 😁
मी आयुष्याच्या पहिल्या पंचेवीस वर्षात हापूस बघितलासुद्धा नव्हता, पण त्यामुळे तेंव्हा चाखलेले अन्य आंबे टुकार किंवा तुलनेने inferior होते असे आजही वाटत नाही. I enjoy them all from time to time. हर किसी की रंगत निराली ❤
समहाऊ दोन गोष्टीत गुळ नाही
समहाऊ दोन गोष्टीत गुळ नाही आवडत - एक पन्हं आणि दुसरा खरवस....... पन्हं राहू दे,पण खरवस मात्र साखरेचाच हवा.
आमच्या इथल्या।लोकल मार्केट
आमच्या इथल्या।लोकल मार्केट वरून खालील नोंदी.
1) गुजरात केसर सिजन एंडला आलाय , मार्केट मधून गायब झालाय आणि रेट 120 रु किलो वरून 180 ते 220 रु किलो
2) बलसाड हापूस ( हा ही गुजराती ) देखील आहे रेट आता थोडे चढलेत , हा ही सिजन संपत आलाय
3) दशहरी , लंगडा , बदामी, तोतापुरी मात्र भरपूर आहेत.
झकासराव,
झकासराव,
लंगडा काय रेट आहे तुमच्या शहरात ? भोचक चौकश्या 😀
आज मलाही केसर महाग दिले पण आहेत राजबिंडे. उद्या त्यांचा जीव घेणार, सुरी तयार आहे 😀
(No subject)
आजचा सोनेरी क्षण ..
जयु, क्या बात है !
जयु, क्या बात है !
रंग- सुगंध एकत्रच 👌
हो अनिंद्य , रंग ,सुगंध आणि
हो अनिंद्य , रंग ,सुगंध आणि चवही -- त्रिवेणी संगमच .
हा हापूसच्या आकाराचा, चवही जवळ्पास पण थोडे केसर धागे होते . कोणता आंबा बरं?
चवीबद्दल काही सांगता यायचे
चवीबद्दल काही सांगता यायचे नाही
हा रत्ना तर नाही ?
ट्विटरवर रतौल आंब्यांचा फोटो
ट्विटरवर रतौल आंब्यांचा फोटो दिसला. त्याबद्दलची माहिती इंटरेस्टिंग आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Rataul_Mango
https://en.wikipedia.org/wiki/Anwar_Ratol
रतौल हरियाणाचा बहुतेक
रतौल - कसा होता स्वाद ? हा नाही चाखला कधी.
दिसायला तर प्रेक्षणीय दिसत नाही आहे फारसा
जयु आहाहा. सोनचाफा म्हणजे
जयु आहाहा. सोनचाफा म्हणजे सोने पे सुहागा झालं.
अनिंद्य लंगडा 120 रु होता
अनिंद्य लंगडा 120 रु होता बहुतेक
तोतापुरी 70 रु किलो रेट पाहिलेला आठवतोय
बलसाड हापूस 160 रु किलो
@ झकासराव, थँक्यू
@ झकासराव,
थँक्यू
@ जयु,
गुपित फोडणार का आता ? द नेशन वॉंट्स टू नो 😀
काल तोतापुरी आंबा आणू का
काल तोतापुरी आंबा आणू का विचार करत होते, नाही आणला, रेटही नाही विचारला. शेजाऱ्यांनी दिलेला रायवळ खाल्ला.
तो रायवळ आंबा कसा होता अन्जू?
तो रायवळ आंबा कसा होता अन्जू?
छान होता, रायवळ चांगले असतात,
छान होता, रायवळ चांगले असतात, पण समाधान मला हापूस खाऊन मिळतं. यंदा शेजारी कृपेने वेगवेगळे रायवळही खायला मिळाले, नवरा खुश असतो रायवळवर. आमच्या लहानपणी आम्हाला मिळत होत्या त्या वेगवेगळ्या रायवळ जाती त्याला आता दाखवता येत नाहीयेत, आमची झाडं डोंगरावर आहेत, हल्ली मदतनीस मिळत नाहीत काढायला त्यामुळे माहेरूनही एकुलत्या एक कलमाचे हापूसच मिळाले.
गुपित फोडणार का आता ? >>
गुपित फोडणार का आता ? >> गुपित नाही ओ अनिंद्य , खरंच माहित नाही. नवऱ्याच्या कलिगने त्याच्या तिरुपती जवळच्या शेतातले हापूस म्हणून दिले होते २ . फळ लालसर हिरवे होते . २ -३ दिवसांनी पिवळसर झाल्यावर कापले. आवडला आंबा .
मी फक्त आपल्याकडचे हापूस ,पायरी, केसर, निलम , तोतापूरी, रायवळ आणि इकडचे बदामी, रसपूरी, सिंदूरा आंबेच खाल्लेत .
>>>>>नवरा खुश असतो रायवळवर.
>>>>>नवरा खुश असतो रायवळवर.
मी खाल्लेत रायवळ बुट्टु बुट्टू ठेंगणे, गोल गरगरीत आणि फार गोड खाल्लेत.
हो माहेरी अनेक प्रकार होते.
हो माहेरी अनेक प्रकार होते.
… तिरुपती जवळच्या शेतातले
… तिरुपती जवळच्या शेतातले हापूस म्हणून दिले…
सो, याला “तिरुपती हापुस“ म्हणूया . Enjoy !
ठरल्याबरहुकुम काल रसदार
ठरल्याबरहुकुम काल रसदार रसरशीत केसर आंब्यांना हलाल करून उदरस्थ केले.
आंबा आणि खाणारे दोघांना तत्काळ मोक्षानुभूती! 😋
आता केसरबद्दल थोडे:
♠ जूनागढ. स्वातंत्र्यपूर्व भारतातील शेकडो संस्थानापैकी सौराष्ट्रातले एक. संस्थानाचे वजीर आणि नवाबाचे मेव्हणे “साले भाई” स्वत:च्या आमराईत उत्तमोत्तम कलमं आणून लावत असत. त्यांनी गिरनार पर्वत उताराच्या वनथली गावात आपल्या बागेत लावलेल्या कलमांना आंबे लगडले आणि शिरस्त्याप्रमाणे नवाब महाबत खान तिसरे यांना नज़र करण्यात आले. असे काही हंगाम गेले तरी आंब्याला नाव असे नव्हते, सालेभाईकडचा आंबा, वनथलीचा आंबा असे मोघम नाव. एकदा समोर ठेवलेल्या या आंब्याच्या गडद केशरी रंगाच्या फोडी बघून जूनागढ नवाबाने नामकरण केले - “केसर” हे वर्ष होते १९३४.
♠ भारतीय स्वातंत्र्यलढ्यानंतर पुढे हा नवाब महाबत खान जूनागढात झालेल्या भारतीय सैन्यकार्यवाहीला घाबरून देश सोडून कराचीला पळून गेला तरी तिकडे गीर केसरचे वाण न्यायला विसरला नाही. म्हणून केसर सिंधमधेही आहे आजवर
♠ सालेभाईंच्या केसरच्या मूळ सहा झाडांपासून १०१ कलमं तयार करून नीट जपण्यात आली आणि मग त्यापासूनच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड आधी जूनागढ़ संस्थानात आणि मग सौराष्ट्रात झाली.
♠ आज समस्त गुजरात राज्यात सर्वाधिक पसंतीचा आंबा = केसर आणि त्यातही “गीर केसरचा” मान मोठा.
♠ आंब्याच्या सीझनमधे गीर अभयारण्य बघायला गेलात तर तुमचा गाइड/ सारथी तुम्हाला तिथून जवळच असलेल्या “तलाला” गावाला भेट देण्याचा आग्रह करणारच. केसर आंब्याची पंढरी आणि “सबकुछ केसर आंबा” असलेली सर्वात मोठी बाजारपेठ.
पन्ह्यात पुदिना, आले, सैंधव
पन्ह्यात पुदिना, आले, सैंधव असले विविध मसाले घातलेले पाहिले आहे>> + मी त्यात वेळेवर पाण्याऐवजी सोडा घालून दिला पाहुण्यांना. प्रचंड हिट गेले.
…पाण्याऐवजी सोडा घालून दिला
…पाण्याऐवजी सोडा घालून दिला पाहुण्यांना. प्रचंड हिट …
ग्रेट. 👍
प्रतिसादांतले पान क्र. २ बघा - फोटूसकट
BTW, वर केसर पोस्टमधे हे
BTW, वर केसर पोस्टमधे हे लिहायचे राहिले:
गीर केसर हा भारतात सर्वप्रथम GI Tag - Geographical Indication मिळवणारा आंबा (२०११). त्यापेक्षा अधिक प्रसिद्ध असलेल्या देवगड- रत्नागिरी हापूस आंब्याला GI Tag साठी २०१८ सालापर्यंत वाट पहावी लागली.
कैरी सीजन आता जवळपास संपलाच.
कैरीचा सीजन आता जवळपास संपलाच. पण आमच्यासारख्या कैरीप्रेमी “आंबटशौकिनांचे” चोचले पुरवायला देव धावून येतो.
# चटपटीत
# कच्चे आम का चूरन
# aampak, आमियापाक, कैरीपाक, आमपाक
टीप: बाजारात याचे अनेक branded/ non-branded प्लेयर्स आहेत. हल्दीरामची जाहिरात करण्याचा उद्देश नाही. फक्त त्यांचे सोर्सिंग माहिती असल्याने आणि packing उत्तम असल्याने दर्ज्याबद्दल थोडा जास्त भरवसा वाटतो एवढेच.
Pages