
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
@ वारा (वामन राव) लोणच्याचा
@ वारा (वामन राव) लोणच्याचा रंग कातील आहे. अमीया पे ये किसने लाल रंग डाला, मार डाला !
अनिंद्य आंबोशी सालं काढून
अनिंद्य, आंबोशी सालं काढून उन्हात सुकवतात (वाळवतात) भरपूर प्रमाणात वाळवतात, त्यातला काही भाग आंबोशी म्हणून ठेवतात, काही भागाची पूड करून ठेवतात .
वामन राव फोटो सॉलिड मस्त.
https://lh3.googleusercontent
बघणोत्सुकांसाठी हे कैरी फोडण्याचे यंत्र
लहानपणी घरोघरी बघितलेले कैरी फोडणारी सुरी / विळी/ यंत्र भर मुंबई उपनगरातील कैरीविक्यांकडे दिसेल अशी अजिबात अपेक्षा केली नव्हती. But here it was !
विशिष्ट संख्येत कैऱ्या विकत घेतल्यास कैऱ्यांना बिसलेरी स्नान + स्वच्छ कपड्यांनी टॉवेलिंग आणि या यंत्रावर कैऱ्या हव्या तश्या विनामूल्य कापून देण्याचे package deal अहो आईंनी निगोशियेट केलेले बघून थक्क झालो !
...package deal अहो आईंनी
...package deal अहो आईंनी निगोशियेट केलेले बघून थक्क झालो !
@अनिंद्य, अहो आईंना या मायपाखराचा नमस्कार सांगा.
- (चिमणं मायपाखरु) वामन राव
---
मायपाखरु / मायपाखरे : मायबोलीच्या वृक्षावर बागडणारी, मुक्तपणे संवाद साधणारी पाखरे
package deal अहो आईंनी
package deal अहो आईंनी निगोशियेट केलेले बघून थक्क झालो !.... +१.
मायपाखरं....
वाह अनिंद्य, अहो आईंची कमाल.
वाह अनिंद्य, अहो आईंची कमाल.
बाकी ह्या टाईपची विळी मी लहानपणापासून डोंबिवलीत कैरी विकणाऱ्या विक्रेत्यांकडे बघते. थोडे पैसे वर घेऊन कैरी चिरून देतात. बाठयासह मोठ्या मोठ्या फोडी करतात म्हणून मातोश्रीना पसंत नसायचे. कैरी चिरायचे काम अस्मादीकाना घरच्या विळीवर करायला लागायचं . हा वरच्या फोटोतला नीट चिरून देतोय.
>>>>>>>अहो आईंनी निगोशियेट
>>>>>>>अहो आईंनी निगोशियेट केलेले बघून थक्क झालो !
छानच त्या गरीबाचेही पोट भरणार आणि आपलाही फायदा.
ह्या दिवसात पुण्यातल्या मंडईत
ह्या दिवसात पुण्यातल्या मंडईत कैऱ्या फोडायचं काम जोरात चालू असतं. त्या भागात गेलं की खट्क खट्क आवाज येतो. बायका आधी ओल्या टॉवेलने कैऱ्या पुसतात. कोरड्या करून मग फोडून घेतात. घरच्या कैऱ्या येत असल्याने मी घरीच धुवून कोरड्या करून नेते. मंडईत माझी बऱ्याच विक्रेत्यांशी मैत्री आहे. त्यामुळे 'अरे ताईंना चहा द्या. ताईंना बसायला खुर्ची आण. कैऱ्या घरच्या आहेत का?' वगैरे पाहुणचारही होतो.
मज्जा आहे अनया.
मज्जा आहे अनया.
मायपाखरू
मायपाखरू
सर्वांचे कौतुक कळवतो अहो आईंना.
योग्य सोर्सिंग, स्वच्छता, टापटिप आणि exacting standards याबद्दल त्या आग्रही असतात.
अन्जू, अनया
कैरी कापणी सर्विस फार काही दुर्मिळ नाही तर.
So good !
(No subject)
हा चित्तूर तोतापुरी. कालच आणला आणि उदरस्थ केला. तोतापुरीचीच एक शाखा, आंबा पिकल्यावर साल लालसर होणारी जात.
आंबट-गोड असा वैशिष्ट्यपूर्ण स्वाद, चांगले शेल्फ लाइफ आणि भरघोस उताऱ्यामुळे तोतापुरी आंबा स्वस्त असतो, common man’s delight.
आंब्यापेक्षाही कैरी म्हणून हा जास्त खपतो. कैरीची साल निब्बर नसते म्हणून ताजे लोणचे, गोड मोरंबा, पाकातले लोणचे वगैरेसाठी प्रचंड लोकप्रियता लाभलेला हीरो.
तोतापुरी हा ओरिजिनल “तेलुगु बिड्डा”. याचा जन्म आंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यातला. १८००-१८१० सालापासून याची भरघोस लागवड आधी कृष्णा-गोदावरी नद्यांकाठी आणि मग पूर्ण संपूर्ण दक्षिण भारतात करण्यात आली. १९०० च्या सुरवातीला अमेरिकेत फ्लोरिडा भागातही हे वाण लावण्यात आले आणि रुजले. तिथे ही लाल सालीची तोतापुरी जात जास्त प्रमाणात आहे, काही स्थानिक वाणांशी कलम-क्रॉस करून नवीन जातीही तयार करण्यात आल्या आहेत.
भारतात बाजारात जो तयार packed mango pulp विकतात त्यात तोतापुरीचाच लगदा-रस जास्त प्रमाणात असतो.
यावर्षी या आंब्याचे उत्पादन मागच्या वर्षापेक्षा जास्त आहे, एकट्या आंध्रात ३३% जास्त. चित्तूर जिल्हा आणि आजूबाजूच्या भागात mango pulp बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. नाशवंत असल्याने अधिकचा आंबा तिकडेच जातोय.
अखेरचा हा तुला दंडवत
अखेरचा हा तुला दंडवत
या सिझनचे शेवटचे पन्हे
तेलुगु बिड्डा >>> असं आहे होय
तेलुगु बिड्डा >>> असं आहे होय! मला तोतापुरी गुजराथचा वाटायचा.
पन्हे इतक्या सुंदर sturdy
पन्हे इतक्या सुंदर sturdy बियर ग्लास मधे. क्या बात !
साखरेचे असणार.
पन्ह्याचा हाच रंग सर्वात आवडता आहे. मातकट किंवा ब्राउन रंग रसभंग करतो - ते जास्त हेल्दी वर्जन असले तरी 🙂
पनहं आहे का अननस ज्युस?
पनहं आहे का अननस ज्युस? खतरनाक सुंदर दिसतय.
तोतापुरी ... छान माहिती आणि
तोतापुरी ... छान माहिती आणि फोटो!
साखरेचे असणार >>> हो साखरेचेच
साखरेचे असणार >>> हो साखरेचेच होते. गुळाचे फारसे आवडत नाही मला. तरी गुळाचे पन्हे बरे म्हणायचे. एका उत्तर भारतात राहिलेल्या नातेवाईकांकडे पन्ह्यात पुदिना, आले, सैंधव असले विविध मसाले घातलेले पाहिले आहे. ते बरं लागलं होतं पण ते पन्हं नाही वाटलं.
कैरीच्या गरात साखर, मीठ, केशर, वेलची या पलीकडे काही असल्यास त्याला पन्हे म्हणू नये.
>>>>>पन्ह्यात पुदिना, आले,
>>>>>पन्ह्यात पुदिना, आले, सैंधव असले विविध मसाले घातलेले पाहिले आहे.
छान आयडिया आहे. मला वाटतं मला आवडेल.
पन्हं आणि तोतापुरी दोन्ही
पन्हं आणि तोतापुरी दोन्ही खूप आवडतात. दोन्ही फोटो खतरनाक आलेत.
कैरीच्या गरात साखर, मीठ, केशर
कैरीच्या गरात साखर, मीठ, केशर, वेलची
+ १
पन्हे म्हणून जे करतो त्यात हेच घटक असतात माझ्याकडेही. क्वचित यात चिली फ्लेक्स टाकतो. पन्हे क्वचित कधी Margarita glasses मधे सर्व केले तर मीठमिरचीची रिम 😋
कैरी+ मिंट मोइतो केले तर मग घटक बदलतात. ते मी मागे दिलेल्या फोटोत दिसतेच.
मला तुमची ही पन्हे असे robust beer glasses मधे सर्व करण्याची आयडिया बेहद्द आवडली आहे. ढापणार आहे.
अनिंद्य तोतापुरीची माहिती
अनिंद्य तोतापुरीची माहिती मस्तच.
माधव पन्हे मस्तच दिसतंय.
आमच्याकडे सेंद्रिय गुळाचं लोकप्रिय आहे त्यामुळे साखरेचे केलं जात नाही.
नाही नाही नाही, पन्हं हे
नाही नाही नाही, पन्हं हे गुळाचंच! फार्फार्तर ब्राऊन शुगर चालवून घेईन मी!
माधव ह्यांना अनुमोदन पन्हं
माधव ह्यांना अनुमोदन पन्हं म्हणजे कैरीचा उकडलेला गर, साखर, मीठ, वेलची, केशर .. पन्हं गाळलेलं आवडतं आणि खूप दाट आवडत नाही, सरबताची कन्सिटंन्सि ...
पन्हं हा प्रकार फारसा आवडत
पन्हं हा प्रकार फारसा आवडत नसल्याने घरी केले जात नाही.
मात्र ऑफिसमधल्या एक बाई आंबा डाळ आणि पन्हं सर्वांसाठी आणायच्या.ते पन्हं आवडायचे.पण थोडेसेच घ्यायचे.4-5 वर्षे त्या आणायच्या. दोनही चीजांची सेम टेस्ट.
@माधव, पन्ह्याचं कौतुक करावं
@माधव, पन्ह्याचं कौतुक करावं की ते पन्हं त्या ग्लासात असण्याचं हा प्रश्न पडलाय; दोन्हींत सौन्दर्याची स्पर्धा लागलीय!
@अनिंद्य,
>>> तोतापुरी हा ओरिजिनल “तेलुगु बिड्डा”...
हे माहित नव्हतं! लाल-पिवळा तोतापुरी आमच्या घरी कापून खायला आवडतो!
पन्ह्याची चर्चा छान.
पन्ह्याची चर्चा छान.
निरोपाचे विडे द्यायची इच्छा तर नाही पण सीझन संपत आला आता पन्ह्याचा. ते साठवणीचा गर वापरून पन्हे वगैरे नाय जमायचे, फ्रेशनेस मार खातो. सीझन का मजा सीझनमेंच रैता.🙂
.. कैरीचा उकडलेला गर, साखर, मीठ, वेलची, केशर .. पन्हं गाळलेलं आवडतं आणि खूप दाट आवडत नाही…
+ १
याबाबतीत मी मनीमोहोर आणि माधव यांच्या पक्षात.
@ तोतापुरी
@ तोतापुरी
Unsung Hero वाटतो मला. अतिपरिचयात अवज्ञा टाइप्स. हा गुज्जूभाई नव्हे, हा तेलुगु बिड्डाच. 😀
आंबट-गोड स्वादामुळे आणि कापलेल्या फोडी डौलदार दिसत असल्याने आवडतो कापून खायला. आमचे एक शेजारी हा तोतापुरी आंबा सालीसकट खातात.
आता कोकणी हापुसचा सीझन संपलाय तर उर्वरित भारतातले इतर प्रसिद्ध आंबे एक-एक करून इथे सर्वांच्या भेटीला आणीन म्हणतो. हापुसच्या झळाळत्या glamour मुळे ते सर्व जास्त चर्चेत येत नाहीत, जिभेवरही कमीच येत असावेत.
Meanwhile इथल्या आपल्या कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी सुरुच ठेऊ. काय म्हणता ?
>>>>>आता कोकणी हापुसचा सीझन
>>>>>आता कोकणी हापुसचा सीझन संपलाय तर उर्वरित भारतातले इतर प्रसिद्ध आंबे एक-एक करून इथे सर्वांच्या भेटीला आणीन म्हणतो. हापुसच्या झळाळत्या glamour मुळे ते सर्व जास्त चर्चेत येत नाहीत, जिभेवरही कमीच येत असावेत.
नेकी और पुछ पुछ!
माहेरचेही आंबे संपले.
सामोला मम.
माहेरचेही आंबे संपले. वटपौर्णिमेला शेजारच्यांनी एक आंबा दिलाय, पूर्ण पिकलेला नसल्याने उद्या कापेन, संकष्टी आहेना. घरातलं आंबेपुराण संपलं नाहीये अजून, हाहाहा.
दशहरा मिळतील आता. गंगा दशहरा काहीतरी व्रत असतं ना, त्या दरम्यान येतात, ते झालं. एक वर्ष आम्ही केलेलं (आता फार काही आठवत नाही, रोज मंत्रजप करत होतो दहा दिवस) आणि गंगादशहरा दिवशी समापन करताना आंबे दानधर्म करायचा असतो, दशहरा दहा आंबे आणि दहाच्या पटीत दक्षिणा द्यायची असते, आमच्या मदतनीस ताई नेमक्या नव्हत्या तेव्हा, गावाला गेलेल्या. त्यामुळे जवळच्या देवळात पुजारी होते त्यांना आणि आमच्या त्यावेळेच्या वॉचमन काकांना आम्ही दिलेले, तेव्हा घरीही खाल्लेले.
वाह अन्जू किती मस्त ग.
वाह अन्जू किती मस्त ग.
Pages