
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
नाच रे मोरा - रेफरन्स येउन
नाच रे मोरा - रेफरन्स येउन गेला का? मला वाटतं नाही.
'तू तेव्हा तशी' कवितेत आरती
>>> गोड बातमी

'तू तेव्हा तशी' कवितेत आरती प्रभूंनी कैरी हा शब्द वापरला नाहीये, पण ही ओळ वाचताना काय आठवतं सांगा : 'तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची, तू खट्टीमिठ्ठी ओठांची'?
माझ्यासारख्या “आंबट”शौकिनांना
माझ्यासारख्या “आंबट”शौकिनांना कैरीच आठवणार, दुसरे काय ? 😀
रच्याकने समस्त
रच्याकने समस्त हिंदीचित्रपटसृ्टीत “कैरी खाणारी“ हिरविन म्हणजे “गोड बातमी” असे (उगाचच) समीकरण होते
कैरी खातांना पुरुष कधी दाखवतील तर शप्पत. मग तो किती का आंबटशौकीन असेना>>>>>>>

… नाच रे मोरा - रेफरन्स…
… नाच रे मोरा - रेफरन्स…
तो आंबा सीझन संपून नीट पाऊस पडू लागला की येईल ना ? सध्या आंब्याच्या बनात आपलाच दंगा सुरु आहे
होय
तू पोक्त सच्ची. >>> कैरीला
तू पोक्त सच्ची. >>> कैरीला पोक्त का म्हणावे? ती स्वतः पोक्त नसतेच आणि कुणालाही पोक्त वाटू देत नाही. झालच तर पोक्तांना मूल बनवते.
पोक्तांना मूल बनवते. + १
पोक्तांना मूल बनवते. + १
आणि जुन्या हिंदी सिनेमात कैरी खाणारीला लगेच मूल होतेही !! 😂
… विविध राज्यांतल्या
… विविध राज्यांतल्या आंब्यांची नावे..
माधव, हे तुमच्यासाठी. 👆
Not an elaborate or exhaustive list, पण जनरल आयडिया येते - येईल.
डीटेल्ड पोस्ट नंतर लिहितो.
आमरस पुरी, बटाट्याची भाजी.
आमरस पुरी, बटाट्याची भाजी.
अरे वा !
अरे वा !
आधी काय खाल्ले?आमरस पुरी की भाजी पुरी ?
आमरस पुरी!!
आमरस पुरी!!
जय हो
👍
जय हो 😀
और आन्दो - रेसिपीज्. मेन्यूज्, फोटोज्, सबकुछ.
केन्ट आंबा + स्मोअकड सालमन &
केन्ट आंबा + स्मोअकड सालमन & मेयो सँडविच - आजचा नाश्ता. आंबा काळसर दिसतो पण अतिव गोड आहे आणि तसाच काळसर रेषावाला आहे.

.
आमरस पुरी भाजी छान दिसतेय
आमरस पुरी भाजी छान दिसतेय अनया.
सामो काळसर असून आंबा गोड आहे हे नवल वाटतंय.
हे तासाच लोणचं. लोणच्याला कैरीच्या फोडी केल्या की कोयीला थोडा तरी गर राहतोच. तो तासून घेऊन त्याच केलेलं नॉर्मल लोणच. एकदम भारी लागतं . मुरवावं लागत नाही. पण जास्त दिवस टिकत ही नाही.
पूर्वीच्या काळी कोकणात एवढे आंबे असून ही कोयींचा गर टाकून देण्याची ( खर तर काहीच टाकून देण्याची ) कोकणातल्या गरीब जनतेची मानसिकता नव्हती. त्यातून ह्या तासाच्या लोणच्याचा जन्म झाला असावा. त्या तासाच पन्हं, साखरआंबा वगैरे ही करतात. तासलेल्या कोयी ही डायरेक्ट कचऱ्यात न टाकता आमटीत वगैरे घालत असत. अशी कोकणी लोकांची लिमिटेड रिसोर्सेसचा पूर्ण उपयोग करण्याची डोकॅलिटी .
ममो त्याला काळसर बारीक रेषा
ममो त्याला काळसर बारीक रेषा आहेत. तो खराब नाही. बरेच तसेच निघाले पण गोड आहेत.
.
लोणचं काय मस्त दिसतय.
अच्छा...
अच्छा...
… काळसर असून आंबा गोड आहे हे
… काळसर असून आंबा गोड आहे हे नवल वाटतंय…
हेच म्हणतो.
.. तासाच लोणचं... नवीन माहिती 👍
मोठ्या प्रमाणात करायच्या लोणच्यासाठी फोड़ी करायला एक खास hand driven jugad machine असते ना ? त्यानी कोयीसकट कैरी फोडता येते. सापडला तर त्याचा फोटो देतो.
पण मग हे चटपटीत दिसणारे “तासाचे” लोणचे घालायचा स्कोप नाही रहाणार. That will be bad.
(No subject)
आता बरं वाटतयं तर जरा टवाळक्या सुचत आहेत. हे एक ढकलपत्र पाठवले एका मित्रानी.
मी मिरिंडाऐवजी “माझा” आणि “म्हंटले” ऐवजी “म्हटले” लिहिले असते.
लकीली असे कंजूस मित्र नाहीत मला. 😀
>>>>>>मिरिंडाऐवजी “माझा”
>>>>>>मिरिंडाऐवजी “माझा”
करेक्ट.
>>>>>लकीली असे कंजूस मित्र नाहीत मला.
हाहाहा
… विविध राज्यांतल्या
… विविध राज्यांतल्या आंब्यांची नावे >>> @अनिंद्य मस्तच. पण तुमच्या पोस्टचीही वाट बघतोय. यातल्या चौसाबद्दल बरेच ऐकले आहे पण अजून खाल्ला नाहीये. बाकीचे काही खाल्ले आहेत, काहींची नावे ऐकली पण नाहीत.
छान लिस्ट अनिन्द्य. ह्यात
छान लिस्ट अनिन्द्य. ह्यात गोव्याचा मानकुराद ऍड करायला पाहिजे. गो्यंकरांना हापूस पेक्षा हा प्रिय असतो.
बरं, इथे आमचूर ची चर्चा झाली
बरं, इथे आमचूरची चर्चा झाली आहे का?
कैऱ्यांच्या फोडी वाळवून त्याची पूड करतात तीच आमचूर पावडर. बरोबर ना?
पाणीपुरी चटपटीत करण्यासाठी ही हवीच!
@ गोव्याचा मानकुराद
@ गोव्याचा मानकुराद
होय, ह्याचे कौतुक ऐकले आहे पण अजून योग नाही आला चाखायचा.
भर उन्हाळ्यात गोवा भेटी घडूनही 'मानकुराद' समहाऊ इल्युजिवच राहिला आहे. स्तुती करणाऱ्या स्थानिकांनीसुद्धा कधी offer केला नाही 😉
@ चौसा
या आंब्याला फार मोठा+ रंजक + विवादास्पद इतिहास आहे. हा जुलैमध्ये येईल बाजारात. लिहितो त्याबद्दलही पोस्ट्स.
अहाहा !!! आमचूर उर्फ आंबोशी ;
अहाहा !!! आमचूर उर्फ आंबोशी ; भारतीय भोजनातले एक सुखनिधान !
कैऱ्यांच्या फोडी वाळवून त्याची पूड करतात तीच आमचूर पावडर. अगदी बरोबर 👍
सर्व 'चाट' प्रकारांची 'जान'च नाही तर 'जान-ए-जहान' ! 😋
नर्मदेच्या वर आणि खाली दोन्ही भागात वापर असला तरी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणात अमचूरचा वापर थोडा कमी. चिंच आणि आमसुलं भरपूर उपलब्ध असल्यामुळे असेल.
अस्सल अवधी-उत्तरप्रदेशी किंवा राजस्थानी भोजनात मात्र सढळ वापर. ज्या समृद्ध घरात आज्या-पणज्या किचनकडे लक्ष ठेऊन असतात तिथे आजही आंबटपणासाठी टोमॅटो वापरणे कमी प्रतीचे समजतात, आमचूर rules.
भरली भेंडी, मसाला अरवी, बटाट्याची रस्साभाजी, भरवा करेला उर्फ भरली कारली या भाज्यांची चव खुलवावी ती आमचूर पावडरनी. शिवाय पिंडी चना मसाला करतांना तो खास गडद रंग आणण्यासाठी आमचूर मस्ट. बंगाल्यांचे 'अमियार झोल' तर प्रसिद्धच आहे.
वर्षभर कैरीच्या स्वादाची चटणी करता येत नाही पण त्यातल्या त्यात जवळ जाणारी चव म्हणून आमचूर पावडर वापरून चटणी करतो आम्ही. Thats fun too 😋
ऋतुराज मी लिहिलं होतं आमचूर
ऋतुराज मी इथे लिहिलं होतं आमचूर पावडर आणि आंबोशी दोघांबद्दल.
आंबोशीला सा बा आंब्याची सोले म्हणायच्या, त्या कुळथाच्या पिठल्यात आमसूल म्हणजे कोकम ऐवजी आंबोशी घालायच्या, पण मी कोकमच घालते कारण कुळीथ पित्तकारक असतात आणि कोकम पित्तनाशक.
आंबोशी लोणचं मी करते, जानेवारी फेब्रुवारीत केलेलं, भावाने दिलेली आंबोशी, आम्ही कोकणात गेलेलो दिवाळीनंतर तेव्हा त्याने विकत घेतलेली. आमचूर पावडर घरची होती पण आम्हा सर्वांकडे आधीची असल्याने, आणली नव्हती.
अनिंद्य आंबोशी म्हणजे वाळलेल्या कैरीच्या फोडी, आमचूर बरोबर तुम्ही लिहिलं ते.
मी शक्यतो पित्तकारक गोष्टी असतील त्यात कोकम वापरते, उदा. तुरीची डाळ, कुळीथ.
ताक आंबट नसेल आणि कढी हवीच असेल तर आमचूर पावडर घालते आंबटपणासाठी
हाताशी असली की पटकन सुचेल त्यात वापर करता येतो.
आंबोशी = वाळलेल्या कैरीच्या
आंबोशी = वाळलेल्या कैरीच्या फोडी # आमचूर पावडर.
समजले.
आंबोशी लोणचं = इंटरेस्टिंग.
आंब्याच्या लोणच्याची तेलुगु
आंब्याच्या लोणच्याची तेलुगु पाकृ इथे लिहिलीय. भविष्यातील संदर्भासाठी दुवा देत आहे.
---
अवांतर: मराठवाडा पद्धतीच्या लोणच्याचे हे फोटो
अहाहा ! रंग तर झ का स आहे !
अहाहा !
रंग तर झ का स आहे !
@ अन्जू,
@ अन्जू,
आंबोशी / आंब्याची सोले करतांना कैरीचे तुकडे सालीसकट सुकवता की साल काढून मग उन्हात ?
आमचूर साल काढून मगच सुकवतात नाहीतर स्वाद बदलतो.
Pages