
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
मस्त फोटो... कोरीवकाम खूप छान
मस्त फोटो... कोरीवकाम खूप छान
(No subject)
माहेरचे आंबे, नवसाचे एकच कलम आहे, भाऊ गेलेला, थोडे आंबे आणले, त्यातले मला दिले. हा रत्नागिरी हापूस.
ह्या निमित्याने सासर ते माहेर आंबे वर्तुळ पूर्ण झालं .
फोटो मी माझ्या फोनने काढलेला यावेळी बेटर आलाय म्हणून तो पोस्ट केला.
अंजू मस्त आलाय फोटो. छान
अंजू मस्त आलाय फोटो. छान दिसतायत आंबे.
कोरीवकाम
सासर माहेर वर्तुळ ... आवडलं हे अंजू.
थँक्स. ओट्यावर डिश ठेवली
थँक्स. ओट्यावर डिश ठेवली त्यावर लाईट आहे, हल्लीच तीन महिन्यांपूर्वी नवीन ओटा केला, करणाऱ्यानेच वर लाईट लावला, फोकस पडतो. तिथे ठेऊन काढ फोटो नवऱ्याची आयडिया, प्रकाश जास्त येतोय. आधी दुसरीकडे काढलेला प्रकाश कमी असलेला आहे.
अनिंद्य मस्त माहिती.
सुनील कोरीव काम हाहाहा, तोतापुरी छान आहेत.
अंजू, पूर्ण तयार झालेला,
अंजू, पूर्ण तयार झालेला, तुकतुकीत हापूस आंबा गोंडस दिसतोय अगदी. त्यातून माहेरचा. म्हणजे अधिकच गोड लागेल.
अगदी खरं आहे अनया.
अगदी खरं आहे अनया.
वाह आंबे काय सुरेख आहेत अन्जू
वाह आंबे काय सुरेख आहेत अन्जू. बाप रे हापूस आहे तो. मग गोडच असणार.
हो माहेरी एकच हापूस कलम आहे,
हो माहेरी एकच हापूस कलम आहे, बाकी रायवळ. आमच्या बालपणी एकही नव्हतं. मी फोटो पोस्ट केलाय, फार डेरेदार झालंय, अंगणात आहे. बहुतेक मी आठवी नववीत असेन, तेव्हा धाकट्या आतेने लावलेले.
सर्वांना धन्यवाद. माझी आते 89 वर्षाची आहे, स्वमेहनतीची फळं चाखायला, ही समाधानाची बाब.
एका मित्राच्या आमराईतील हा
एका मित्राच्या आमराईतील हा आंबा (मागच्या वर्षीचा फोटो आहे).
पाकृ साठी तयार कैऱ्या, ओळख पाहू काय बेत आहे?
मेथांबा मोरंबा म्हणावा तर
मेथांबा मोरंबा म्हणावा तर गुळ /साखर नाही.
लोणच. म्हणाव तर सालं काढली आहेत.
तिखट मीठ लावून नुसत्याच खायचा बेत आहे का ?
तक्कू?
तक्कू?
@ अन्जू, तुमच्या माहेरचे
@ अन्जू,
नवसाचे हापुस (प्लेटसह) = 👌
…माहेरचा. म्हणजे अधिकच गोड लागेल… + १
@ सुनील.
कोरिवकाम = आम पर बुलबुल का बोसा 🙂
(बोसा = चुंबन)
तोतापुरी ला तोता / पोपटाने टोचा मारल्या पाहिजेत खरे तर 🙂
@ वामन देशमुख,
@ वामन देशमुख,
पहिला फोटो समजला.
तो दुसरा फोटो काढेपर्यंत धीर कसा धरवला? देखणा फोटो - ग्रीन ऑन ग्रीन !
सुडौल कैरी कापून फस्त केली असती मीठ-मिरची लाऊन. फार तर झटपट ज्यूलियन्स salad केले असते मी.
तुम्ही काय केले त्याची उत्सुकता आहे.
बोसा शब्द फार दिवसांनी आठवला.
बोसा शब्द फार दिवसांनी आठवला. माझा एक लेख होता मिपा की ऐसी वर सापडला की देते.नाही लिहीलेला नाही.अवांतर- एक शेर -
बोसा देते नहीं और दिल पे है हर लहज़ा निगाह.
जी में कहते हैं कि मुफ़्त आए तो माल अच्छा है
(No subject)
पावसाच्या चार सरी पडल्या अन् “अहो आईं”चे pickle clock ऑन झाले! 😀
लगीनघाई सुरु.
मनपसंत कैरी शोधून तयारी सुरु.
हा पार्ट १
(पार्ट २ फ़ोटो देतो थोड्यावेळाने)
>>>मेथांबा मोरंबा म्हणावा तर
>>>मेथांबा मोरंबा म्हणावा तर गुळ /साखर नाही.
लोणच. म्हणाव तर सालं काढली आहेत.
close call!
>>>तिखट मीठ लावून नुसत्याच खायचा बेत आहे का ?
>>>तक्कू?
>>>तुम्ही काय केले त्याची उत्सुकता आहे.
हा हा हा !
मेथांबा करायचा होता, पण कैऱ्या काही आंबट नव्हत्या असे दिसले. मग काय? तोतापुरी आंब्याच्या करतात तश्या पण सालीविरहित फोडी करून तिखट मीठ लावून खाऊन टाकल्या, झालं!
>>>>मेथांबा करायचा होता, पण
>>>>मेथांबा करायचा होता, पण कैऱ्या काही आंबट नव्हत्या
होय जरा आंबटपणा लागतो मेथ्यांबा ला. नाहीतर अगदीच खोबरी व गोड होते.
फोडी करून तिखट मीठ लावून खाऊन
फोडी करून तिखट मीठ लावून खाऊन टाकल्या, …
हा हा
BTW, अशी सर्व तयारी झाली (किंवा मेथांबा करून झाला) आणि कैऱ्या पुरेश्या आंबट नाहीत असे लक्षात आले की तातडीचा उपाय म्हणून त्यात थोडी आमचूर पावडर टाकून करतात आमच्याकडचे एक्सपर्ट्स. चवीत फारसा फरक पडत नाही.
पण मला तुमचा उपाय जास्त आवडला
सगळे फोटो मस्त मस्त.
सगळे फोटो मस्त मस्त.
आमचूर पूड बेस्ट पर्याय, एकदा मी कढीला वापरलेली आंबटपणासाठी
ताक अजिबात आंबट नव्हतं आणि मला कढी आंबटसर हवी असते.
< img src= https://lh3
हा पार्ट २
झटपट सर्जिकल स्ट्राइक !
सासू मॉं का प्यार ; तीखा आम अचार
Kairi + kharik + Dry Lal mirch + a dash of organic Jaggery (for archiving that deeper shed of colour)
@ छल्ला, सांगितले नाही असे म्हणू नका नंतर. 😀
यावर्षी बरेच केंट आंबे खाल्ले
यावर्षी बरेच केंट आंबे खाल्ले/खातोय. फार गोड होते/आहेत.
सामो, मेक्सिकन आहे ना केंट ?
सामो, मेक्सिकन आहे ना केंट ?
धाग्यावर दर्शन घडवा
वाह कसलं दिसतंय, कातिल एकदम,
वाह लोणचं कसलं दिसतंय आनिंद्य, कातिल एकदम, असं उचलून खावंस वाटतंय.
आपकी सासूमाकी जय हो.
लोणचं कातिल दिसतंय.
लोणचं कातिल दिसतंय.
मुरलेलं लोणचं फारसं आवडत नाही पण ते तेल आणि मिठ घालून कालवलेला पांढरा भात म्हणजे स्वर्ग असतो. तेलाचा गिल्ट जास्तच वाढला तर भातात थोडे दही घालायचे.
… ते तेल आणि मीठ घालून
… ते तेल आणि मीठ घालून कालवलेला पांढरा भात ….
अरे देवा ! कहीं हम पिछले जनम में भाई तो नहीं थे ? 😀
पिछले जनम में भाई >>> मला
पिछले जनम में भाई >>> मला वाटलेले अशी अतरंगी सवय फक्त मलाच आहे.
लोणच्याच्या तेलाबद्दल बोलताय
लोणच्याच्या तेलाबद्दल बोलताय का, मलाही फार आवडते भातात घालून खायला.
अरे भाईओ, मैं भी हू आप जैसा
अरे भाईओ, मैं भी हू आप जैसा
अनिंद्य होय मेक्सिकन असावेत.
अनिंद्य होय मेक्सिकन असावेत. पैकी बारीकसे होते ते फार गोड होते आता ढब्ब्यातले २ उरलेत. ढब्बे ठोकच गोड होते. मग टाकते फोटो.
------
तुमच्या 'अहो आई' यांनी केलेल्या लोणच्याला काय रंग आलाय वा!!
अनिंद्य,
अनिंद्य,
कसला कातिल रंग आलाय लोणच्याला !
फारच सुरेख
खारकेचे तुकडे टाकतात हे माहिती नव्हते.
Pages