कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान फोटो.

आज एक किलो तोतापुरी आंबे आणले, एक कापला, मला विशेष आवडत नाही. दशहरा जमलं आणि तुला हवा असेल तर एकदा आण हे काम नवऱ्याला सांगितलं.

@ अनया,

होय. फारसा वापर नाही पण it’s a good product. आकारामुळे कैरी-आंबा चर्चेत शेयर करण्यासारखा वाटला फोटो. तसेच “वैयक्तिक सुखस्मृती” हा पॉइंट आहेच.

@ सामो, अन्जू

आभार.

>>> स्वाती, त्याला कोयरीच म्हणतात ना? कोयीच्याच आकाराचा असे म्हणायला हवे.
सॉरी, परवा घाईत वाचलं पण नंतर उत्तर द्यावं म्हणत विसरून गेले. कोयरी/कुयरी त्या आकारालाच म्हणतात. आंब्याचीच नव्हे, लहान फणसाचीदेखील 'कुयरी मिळाली भाजीला आज' असं आईला म्हणताना ऐकलं आहे.
म्हणजे कोय नव्हे.

… आंब्याचीच नव्हे, फणसाचीदेखील 'कुयरी मिळाली…

ओ हो ! नवीन माहिती.

म्हणजे paisley आंबा इंस्पायर्ड असले तरी
exclusive आंब्यासाठी असलेले expression नाही तर.

रोचक.

किसीने एक नेता से पूछा, "साहब, आदमी या जनता से पहले आम शब्द क्यूँ लगाया जाता है? जैसे आम आदमी, आम जनता...'?" तो वह हंस पडे और बोले की ..' ताकी उसे चूसा जा सके और काम होने पार गुठली के जैसे फेंका जा सके '....!!!

मजाक है पर ये सच है...
Happy

अनिंद्य...
Happy
बापरे! एकदम आंबा आणि कोयी चोखून चोखून खाणारा माणूस डोळ्यांसमोर आला...

2 दिवसांपूर्वी माबोकर दीपांजली हिच्या कृतीने आंब्याचा शिरा केला होता.अतिशय सुरेख होतो.आता फ्रीजर एकदम रिकामी झाला.
श्रवू ,आंबे फ्रीजर मध्ये असे ठेवायची पद्धत माहीत नव्हती.अर्थात असे ठेवायला उरतच नव्हते ही गोष्ट वेगळी.
आमटीत पिकलेले आंबे घालतात he mahit navhate.

Pages