
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
धन्यवाद, the feeling is
धन्यवाद, the feeling is mutual!
>>> हाथों में जुंबिश आहे अजून
आणि तशीच राहो!
.. आणि तशीच राहो!
.. आणि तशीच राहो!
इंशा गोविंदा 🙏
मनीमोहोर,
मनीमोहोर,
जरूर करा आणि आम्हां सर्वांना तुमच्या आनंदात सामिल करून घ्या इथे फोटो डकवून. 👍
धन्यवाद, ममो.
धन्यवाद, ममो.
फोटो द्या आणि कुकरांब्याची रेसिपीही द्या तुमची.
कुकरांबा
कुकरांबा 😂
अनयांनी त्यांच्या शेतातल्या “गजमोती” कैऱ्या अनेकांशी शेयरल्या इति. झकासराव.
त्या सर्व कैरी लाभार्थींनी त्यांचे पुढे काय केले हे जाणून घेणोत्सुक आहोत. खुद्द भूस्वामिनी अनया त्यांचं काय करतात हे ही माहित व्हावे ही मनीषा.
त्या कैऱ्यांचे प्राक्तन शेयरून आम्हांवरी कृपावंत व्हावे ही अभ्यर्थना. 🙏
मँगो लश्श्या बघून करायचा मोह
मँगो लश्श्या बघून करायचा मोह होतोय. भारी दिसतायत एकेक.
^^त्या सर्व कैरी लाभार्थींनी
^^त्या सर्व कैरी लाभार्थींनी त्यांचे पुढे काय केले हे जाणून घेणोत्सुक आहोत. ^^
ती कैरी इतकी सुंदर आहे की ती तशीच बघत रहावेसे वाटते, तिला चिरणे, उकडणे इ. करूच नये असे वाटतेय.
लश्श्या
लश्श्या 😂
आमचा एक मित्र सर्व काही असे द्विपदरी अनेकवचनी बोलतो:
लश्श्या-बिश्श्या पिऊ
गाड्या-बिड्या उभारल्यात
नद्या- बिद्या वाहतात
कराच मँगो लस्सी आणि आणा धाग्यावर नैवेद्य दाखवायला 👍
अनिंद्य, मी होता होईल तेवढ्या
अनिंद्य, मी होता होईल तेवढ्या कैर्या विकते. कारण हे दिवस आवळे, भूईमूग, कैर्या, आंबे असे गडबडीचे असतात. थोड्या कैर्यांचं ताजं लोणचं, आंबाडाळ, पन्हं, मेथांबा एवढेतरी प्रकार होतातच.
सगळे नवे फोटो भारी आहेत.
सगळे नवे फोटो भारी आहेत.
लश्श्या>>>> खरच करून पाहावी असे वाटतंय
छुंदा करण्यात आला आहे.
.. कैर्यांचं ताजं लोणचं,
.. कैर्यांचं ताजं लोणचं, आंबाडाळ, पन्हं, मेथांबा एवढेतरी प्रकार होतातच.…
हाऊ नाईस.
… छुंदा करण्यात आला आहे….
… छुंदा करण्यात आला आहे….
पुरावा ? सबूत मांगती है ये दुनिया.
... रुको जरा... सब्र करो
... रुको जरा... सब्र करो

टाकतो फोटो
वर एका प्रतिसादात युवी-अमोल
वर एका प्रतिसादात युवी-अमोल यांनी रसाळी जेवण/ त्यांच्या शेतातल्या आम्रभोजनाबद्दल लिहिले आहे. किंवा शेतातून आणलेल्या आंब्याचा आमरस हा मुख्य पदार्थ असलेली जंगी पार्टी.
नुकतेच एका चर्चेत एक याबद्दलची मजेशीर प्रथा समजली. रसाळीसाठी मोठ्या प्रमाणात रस करतांना त्यात एक कोय मुद्दाम राहू देतात. वाढतांना ज्याच्या वाटीत ती येईल त्याला सर्व उपस्थितांना पुढची आमरस पार्टी द्यावी लागते. Fun -ladden twist. Such Delight, Such Joy !
>>>>>वाढतांना ज्याच्या वाटीत
>>>>>वाढतांना ज्याच्या वाटीत ती येईल त्याला सर्व उपस्थितांना पुढची आमरस पार्टी द्यावी लागते. Fun -ladden twist. Such Delight, Such Joy !
खरे आहे. हे काहीही माहीत नव्हते. खरे तर रसाळी जेवणच नवी संकल्पना कळली
सामो, चिनूक्स यांनी बडोदेकर
सामो, चिनूक्स यांनी बडोदेकर गायकवाडांच्या महालातील तर युवी यांनी त्यांच्या गावकी-भावकीतल्या अनुक्रमे आम्रभोजन आणि रसाळी जेवणाबद्दल लिहिलेय की मागच्या पानांवर.
जे खास ते मित्र-आप्तांसोबत वाटून खाणे ही तर आपली परंपराच आहे.
(No subject)
“रत्ना हापूस” म्हणून एक आंबा घ्याच असा आग्रह आमच्या फळविक्रेत्याने धरला होता. तो हापुस+ नीलम असा cross आहे आणि खूप चांगला आहे असे त्याचे म्हणणे.
आणले, अजून खाऊन बघितले नाहीत.
रत्ना हापूस बद्दल इथे कुणाला काही माहित आहे का ?
कसा अनुभव?
रत्ना हापूस बद्दल इथे कुणाला
रत्ना हापूस बद्दल इथे कुणाला काही माहित आहे का ?....छान लागतो असं नुसतं ऐकलं आहे.कधीच खाल्ला नाही.
आंब्याचे उरलेले सासव.
सासव
@ सासव
आंबे उपकरी, मंबाला पुलीस्सेरी, पाळ मंगा… सगळे सासवाचे (सासवांचे नाही 😀) दक्षिणी भाऊबंद
एका शेजाऱ्यांनी मंडणगडचे आंबे
एका शेजाऱ्यांनी मंडणगडचे आंबे दिले, त्यामुळे रत्नागिरी हापूस ही मिळाला. बहिणीने केशर आंबा दिला, बिग बास्केट वरून मागवलेला, अजून एका शेजाऱ्यांनी रायवळ दिले, दोन लहान आहेत ,एक लहान भोपळयाएवढा आंबा. एकंदरीत विविध आंबे खायला मिळाले. यातले काही खायचेत अजून.
सासवाचा रंग विचित्र आणि घनता
सासवाचा रंग विचित्र आणि घनता पातळ दिसत असली तरी तो फोटोचा दोष आहे.प्रत्यक्षात छान दाट आणि लालकेशरी रंगाचे झाले होते.
सासवासाठी रायवळ न मिळल्याने लालबाग(आंब्याची जात) आंबे मागवले होते.
अंजू, कशी ग अशी तू?आंबे n खाणारी!
यावर्षी बरेच आंबे खाल्ले.बरेच म्हणजे संख्येने.हापूस ,पायरी ,केशर आणि सासवातील लालबाग.
Kadhi नव्हे to मला आता आंबे पुरे झाले असे वाटले.
खाते पण इतर कमी, हापूस जास्त.
खाते पण इतर कमी, हापूस जास्त.
सासव छान दिसतंय.
रत्ना हापूस पावसात येतो का म्हणजे मे अखेर,जून सुरुवातीला. गायक प्रथमेश लघाटेचा एक vlog बघितलेला, त्याचं गाव संगमेश्वर तालुक्यात आरवली, तिथूनच माझ्या माहेरच्या गावाला जायला फाटा फुटतो आणि त्याचं आजोळ देवगड तालुक्यात चाफे गाव (मला माहिती नाही पण माझं सासर देवगड तालुकाच) असं साम्य असल्याने त्याचे कोकणातले vlogs बघितले आहेत. त्याच्या आजोळी रत्ना आंबा आहे, तो त्याने दाखवलेला. सासरी नाहीये हा आंबा.
.. विविध आंबे खायला मिळाले…
.. विविध आंबे खायला मिळाले…
जय हो !
.. मला आता आंबे पुरे झाले असे वाटले.…
रियली? 😀
सासव सुरेख दिसतय ग.
सासव सुरेख दिसतय ग.
. मला आता आंबे पुरे झाले असे
. मला आता आंबे पुरे झाले असे वाटले.…>>> इथे अजुन सुरवात पण नाही झाली..
< img src= https://lh3
Raw Mango + Mint Leaves Mojito.
Summer Days are fun too !
अनया ने दिलेल्या हातभर मोठ्या
अनया ने दिलेल्या हातभर मोठ्या कैरी किसून त्याचा तक्कु केलाय घरी.
केल्या केल्या हा आनंद शेजारच्या 2 ते 4 घरात वाटण्यात आलाय बहुतेक.
काल चव घेतली.
छानच झालंय. कैरी गोडसर आहे चवीला.
मला आता आंबे पुरे झाले असे
मला आता आंबे पुरे झाले असे वाटले.…
रियली?...... हो ना! पण खाताना स्वर्गसुख वाटते. कदाचित चिराचिरीला कंटाळले असेन.
आता ही शेवटची पेटी बघताना वाईट वाटले.
यावेळी छुंदा करायचा राहून गेला.
मोहीतो भारी दिसते आहे. तुमची
मोहीतो भारी दिसते आहे. तुमची रेसिपी/प्रमाणं शेअर करा प्लीज. चिअर्स!
>>> मला आता आंबे पुरे झाले
>>> मला आता आंबे पुरे झाले असे वाटले.…
नका नका असं निगेटिव्ह लिहू!
Pages