Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेल डन इंडिया!
वेल डन इंडिया!
भारताने कण्हत - कुंथत का
भारताने कण्हत - कुंथत का होईना पण अखेर अॅडलेड टेस्ट जिंकली.
पर्थच्या टेस्टचा विचार करता संघात बदल झालाच तर फक्त राहुल किंवा विजयच्या जागी पृथ्वी शॉ येईल आणि रोहित शर्मा फिट नसेल तर विहारी. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या ४ विकेट्सनी तब्बल १२०+ रन्स जोडल्या. आपण त्यांचं शेपूट गुंडाळण्यात कमी पडलो हे मान्य करावच लागेल. अर्थात यात ड्रॉप इन पीच तिसर्या - चौथ्या दिवसांपासून बॅटींगला जास्तीत जास्तं अनुकूल होत गेले हा फॅक्टर असला तरीही बॉलिंगचा विचार करता हे अपयश आहे. विजयाच्या नादात याकडे दुर्लक्ष करणे भारताला महागात पडू शकते. पर्थच्या नव्या स्टेडीयमची विकेटही ड्रॉप इन पीच असल्याने फास्ट आणि बाऊन्सी असेल असा अंदाज आहे, पण तरीही अश्विनच्या जागी उमेश यादव किंवा भुवनेश्वर कुमारला संधी मिळण्याची शक्यता फार कमी वाटते. काहीही झाले तरी आपण एकतरी स्पिनर खेळवणारच हे निश्चित आणि अश्विनची बॅटींग ही त्याची जमेची बाजू आहे. पहिल्या इनिंग्जमध्ये पुजाराबरोबर सर्वात मोठी पार्टनरशीप करणारा अश्विनच होता.
टेस्ट विजय हा टेस्ट विजयच
टेस्ट विजय हा टेस्ट विजयच असतो. प्रतिस्पर्धी संघानं जबरदस्त प्रतिकार केला, हे दिलदारपणे मान्य करण्यात काही कमीपणा नाही. मुळात सहजासहजी हार न मानणं हा ऑस्ट्रेलिया चा खेळातला बाणा आहे.
भारतीय संघात त्रुटी आहेत हे देखील मान्य आहे. पाचव्या दिवशी अश्विन दमला होता आणी अजून एखादा स्पिनर असता तर जास्त आक्रमक बॉलिंग झाली असती हे सुद्धा खरंय. रोहित शर्मा कडे टेस्ट साठी आवश्यक असणारं टेंपरामेंट नाहीये. त्याच्या जागी हनुमा विहारी ला खेळवलं, तर एक स्पिन बॉलिंग चा ऑप्शन मिळत असल्यामुळे, त्याचा विचार व्हावा. विजय आणी राहूल दोन्ही डावात एकाच पद्धतीनं आऊट झाले जे अनअॅक्सेप्टेबल आहे. रिषभ पंत ने बॅटींग मधे अधिक परिपक्वतेकडे वाटचाल करायला हवी. शामी बॅटींग करू शकतो. त्याने स्लॉगर व्हायची गरज नाहीये (झहीर खान ने करियर च्या शेवटी हे खूप जास्त केलं होतं.). इशांत ने नो-बॉल च्या प्रॉब्लेम चा नक्कीच विचार करायला हवा. एखादी मॅच फिरू शकते नोबॉलवर.
हे सगळं मान्य करूनही, भारतीय संघ ही टेस्ट जिंकला हे कौतुकास्पद आहे. त्या विजयाचं श्रेय कमी होत नाही.
फेरफटका यांच्याशी सहमत.
फेरफटका यांच्याशी सहमत.
घरच्या मैदानावर तळाच्या फलंदाजांनी ताणून धरणे हे खूप कॉमन आहे. त्यातही दिवसाचा खेळ सुरू होताना ५-६ आउट झालेले असतील तर लौकर उडणे शक्य असते. दुपारपर्यंत स्विंग वगैरेचा परिणाम कमी झालेला असतो. नवीन बॉल घेतल्यावरही टिकले हे क्रेडिटेबल आहे. अशा वेळेस आक्रमक फील्ड प्लेसमेण्ट मुळे अनेकदा रन्सही पटापट मिळतात, कारण जवळच्या फिल्डर्स च्या वरून्/मधून एकदा शॉट गेला की सहसा फोर मिळते, त्यातही अॅडलेड सारख्या ओव्हल शेप्ड ग्राउण्ड्स वर साइड बाउन्डरीज लहान असल्याने जास्त.
बिन्डोक बॅटिंग दिसली ती ओपनर्स आणि जनरल टॉप ऑर्डर ची. २०-२० मधून अजून बाहेरच आलेले नाहीत. पहिल्या डावात ५६/४ आणि त्यात ३ का ४ सिक्सेस, आणि रोहित तसाच शॉट मारताना आउट. याउल्ट आश्विन ची पहिल्या डावातील विकेट पाहा. मिडल स्टंप लाइन वर बॉल पिच होउन जरा स्विंग की कट होउन आश्विन च्या बॅटची कड घेउन ऑफ ने गेला - तसे आउट झाले तर समजू शकतो. पण हे हीरो लोक फूट फूट बाहेरचे बॉल्स मारायला निघाले होते ३-४ स्लिप्स असताना.
लॉयन, कमिन्स, स्टार्क नि
लॉयन, कमिन्स, स्टार्क नि हेझलवूड हे आधीही बर्यापैकी बॅटींग करू शकतात. त्यामूळे थकलेल्या अश्विनि पुढे नि स्लो झालेल्या पिचवर त्यांनी बॅटींग केली ह्यत मला तरी काही नवल वाटले नाही.
विजय च्या जागी शॉ येईल असे वाटतेय. खर तर दोन्ही डावांमधे बेजबाबदार शॉर्ट बद्दल राहुलला हलवायला हवे पण त्याची स्लिप कॅचिंग चांगली आहे जो पर्थ मधे मह्त्वाचा भाग ठरू शकतो. रोहित ऐवजी विहारी हि अपेक्षाच जास्त आहे. आहे तो किंवा जास्तीत जास्त विजयच्या जागी शॉ एव्हढाच बदल होईल. अश्विन पन्नास ओव्हर्स टाकून दमला असेल तर कुलदीपला खेळवा रे. बाऊन्स असलेल्या पिचवर व्रिस्ट स्पिनर धमाल उडवू शकेल.
लॉयन, कमिन्स, स्टार्क नि
लॉयन, कमिन्स, स्टार्क नि हेझलवूड हे आधीही बर्यापैकी बॅटींग करू शकतात. >>> यावेळेस भारताला "फक्त पाचव्या दिवसापुरता मॅग्राथ हवा होता" असे वाटले असेल
कुलदीपची बोलिंग पाहिलेली नाही फारशी.
परवा ईशांत शर्माने काढलेली ट्रॅविस हेड ची विकेट खतरनाक होती. यू ट्यूब वर रिप्ले पाहा आणि कॉमेण्टरी मधे सांगितले त्यावरून आधी बराच वेळ बाउन्सर न टाकता एकदम सरप्राइज दिला आणि असेल नसेल तितकी ताकद लावली आहे त्या बॉल मधे.
"अश्विन पन्नास ओव्हर्स टाकून
"अश्विन पन्नास ओव्हर्स टाकून दमला असेल तर कुलदीपला खेळवा रे." - अश्विन ची अनुभव आणी बॅटींग त्याचे प्लस पॉईंट्स आहेत.
"रोहित ऐवजी विहारी हि अपेक्षाच जास्त आहे." - अवास्तव असेल कदाचित, पण अवाजवी नाहीये
परवा ईशांत शर्माने काढलेली
परवा ईशांत शर्माने काढलेली ट्रॅविस हेड ची विकेट खतरनाक होती. यू ट्यूब वर रिप्ले पाहा आणि कॉमेण्टरी मधे सांगितले त्यावरून आधी बराच वेळ बाउन्सर न टाकता एकदम सरप्राइज दिला आणि असेल नसेल तितकी ताकद लावली आहे त्या बॉल मधे.
>>>>>
मी पाचव्या दिवसाचा संपूर्ण खेळ लाईव्ह पाहिला फारेंडा. सुरवातीच्या चार ओव्हर्समध्ये इशांत शर्मा आणि शमीने हेडला बंपर तर सोडाच एकही शॉर्टपीच बॉलही टाकला नाही, त्याला सतत फ्रंट्फूटवरच खेळवत राहिले आणि पर्फेक्टली ट्रॅप सेटअप करुन मग सरप्राईज बंपरवर अचूक उडवला.
शेवटच्या दिवसातला सर्वात धमाल प्रकार म्हणजे इनिंग्जच्या ७६ व्या ओव्हरमध्ये अश्विनच्या बॉलिंगवर पॅट कमिन्स बॅटींग करताना पंतच्या तोंडाची जी काही टकळी सुरु होती ती अफलातून होती. त्या संपूर्ण ओव्हरमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेल्या माईक हसी, कॅरी ओक्कीफ आणि माईक हॉवर्ड यांनीही एक शब्द न उच्चारता पंतची कॉमेंट्री एन्जॉय केली.
पंतच्या बड्बडीने मार्क बाऊचरने झिंबाब्वेच्या टटेंडा तैबूला केलेलं स्लेजिंग आणि त्यापेक्षाही कुमार संगकाराने शॉन पोलॉकला मारलेल्या शाब्दिक फटकार्यांची आठवण झाली.
पंत - कमिन्स - https://www.firstpost.com/firstcricket/sports-news/watch-indias-rishabh-...
संगकारा - पोलॉक - https://www.youtube.com/watch?v=PlFF98dM8sA
बाऊचर - तैबू - https://www.youtube.com/watch?v=TFbf3g0ehmQ
सही, रिव्हर्स स्वीप
सही, रिव्हर्स स्वीप
पंतच्या बडबडीबददल गावसकरचे
पंतच्या बडबडीबददल गावसकरचे दोन काॅमेंट -
1) त्याने आपल्या गोलंदाजाशी मोठयाने बोलणं ठीक आहे पण फलंदाजाना उद्देशून बोलणं , जें तो करतो, तें अयोग्य;
2 ) इंगलड मधे पंत अश्विनला " अश्विन सर " म्हणत काॅमेंट करायचा . आतां, " कम ऑन , अॅश " म्हणतो!!!
वॉर्न आणि गिलख्रिस्ट
वॉर्न आणि गिलख्रिस्ट यांच्याकडून पंतचं जाहीर कौतुक.
https://wwos.nine.com.au/cricket/australia-v-india-rishabh-pant-sledge-p...
मी कितीतरी वर्षांनी सलग तीन
मी कितीतरी वर्षांनी सलग तीन दिवस जवळ जवळ संपूर्ण दिवसाचा खेळ पाहिला. मस्त मजा आली.
शेवटी शेवटी जाम टेन्शन आलं पण ! जिंकल्यावर सही वाटलं पण. भारतीय संघाचे अभिनंदन. पंतची टकळी ऐकायला मजा आली.
जरा साईड ट्रॅक : परवा ऑफिसमध्ये एकाशी गांगूली वि धोनी डिबेट झालं. मला धोनीचा संयम ओढून, ताणून मुद्दाम आणलेला वाटतो, त्यापेक्षा गांगूली, कोहलीचा उत्स्फूर्त वावर आवडतो. फक्त कोहलीच्या आक्रमकतेचा उन्माद होऊ नये असं वाटतं. ह्या सगळ्यात कर्णधार म्हणून शर्मा कुठल्या गटात बसेल असा विचार करता तो कुंबळे, द्रविड टाईपचा कॅप्टन असेल कदाचित.
पंत चा एकांदर वावरच मस्त असतो
पंत चा एकांदर वावरच मस्त असतो. दुसर्या का तिसर्या दिवशी सुरूवातीला पंत चा व्यायाम नि हँड्स्टँड करणे दाकह्वत होते. तेंव्हाही पठ्ठ्या हसत काहीतरी कॉमेंट्स करत होता. त्याच्या पहिल्या इनिंग मधे एक दोन शॉट्स मिस केल्यावर स्वतःहच हसत होता नि कमिन्स शी काही तरि बोलला मस्करी केल्यासारखा. कमिन्स दोन वर्शापूर्वी पंत बरोबर DD साठी खेळला असल्यामूले बोलत असावा असे वाटले.
कोहली च्या वागण्याबद्दल वगैरे किती हि आक्षेप घेतला तरी त्याची मेथड काम करते आहे नि वर्क एथिक्स एकंदर आळशी असलेल्या भारतीय खेळाडूंची fitness level बदलत आहे हे उघडच दिसते आहे.
कोहलीची मैदानावरची वागणूक आणि
कोहलीची मैदानावरची वागणूक आणि खेळाडूंचा फिटनेस ह्याचा काय संबंध? फिटनेस वगैरे एकंदरीत BCCI च्या नियमांमुळे (yo yo test compulsory etc) वाढत असेल. ते नियम ठरवण्यात कोहलीचा वाटा असेलच पण मी फक्त त्याच्या मैदानावरच्या वागणूकीबद्दल बोलतो आहे. त्याच्या एकंदरीत कॅप्टन्सी बद्दलसुद्धा नाही. आणि आक्षेप न घेता उलट माझ्या आपेक्षा सांगतो आहे.
मी तुझ्या पोस्ट ला धरून फक्त
मी तुझ्या पोस्ट ला धरून फक्त पुढे बोलत होतो. माझ्या मते मैदानावरची वागणूक ते 'त्याची खेळासाठी करायला लागणारी तयारी करणे ' हे सगळा एक सामुदायिक रसायन आहे. एकापेक्षा दुसरे वेगळे काढता येणे अशक्य आहे. त्याची तयारी, त्याचा आत्मविश्वास, इतरांकडून असलेल्या अपेक्षा, जिंकण्यासाठी लागणारी ईर्षा हे सगळे त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. आक्षेप असो वा कौतुक असो, जे काही आहे ते work होते आहे (सध्या तरी).
फिटनेस वगैरे एकंदरीत BCCI च्या नियमांमुळे (yo yo test compulsory etc) वाढत असेल. >> कोहली जवळपास किती फिट नेस असायला हवा नि काय अपेक्षा आहेत हे ठरवतो आहे. त्याचे ट्वीटर फॉलो कर.
कोहली जवळपास किती फिट नेस
कोहली जवळपास किती फिट नेस असायला हवा नि काय अपेक्षा आहेत हे ठरवतो आहे. त्याचे ट्वीटर फॉलो कर. >>>> हां मी म्ह्टलं ना.. BCCI ची धोरणं / नियम ठरवण्यात त्याचा वाटा असणारच नक्की. ट्विटर बघेन.
समजला तुझा मुद्दा.
* कोहली च्या वागण्याबद्दल
* कोहली च्या वागण्याबद्दल वगैरे किती हि आक्षेप घेतला तरी त्याची मेथड काम करते आहे * - आपण खेळाकडे कस॔ पहातो, यावर हें अवलंबून असावं . पाॅटींग खेळाडू व कर्णधार म्हणून कोहलीच्या तोडीचाच होता पण तो अप्रिय कां होता ? खेळात गुणवत्ता, डांवपेंच समजण्याची व खेळण्याची चतुराई व जिंकण्याची जिद्द हवीच हवी. पण फक्त खुन्नस हाच जर त्याचा पाया असेल, तर खेळातील खरी गंमतच काढून घेतलयासारख आहे. प्रत्येक विकेट मिळाली कीं कोहलीची प्रतिक्रीया निखळ आनंदाची नव्हे तर सूड उगवलयासारखी आसूरी आनंदाची कां वाटते ? खरंच ही मेथड काम करते ? अॅलन बोर्डरपेक्षा पाॅटींग अधिक प्रेरणादायी होता ? कपिल , धोनीपेक्षा कोहलीच्या नेतृत्वात खेळाडूःची गुणवत्ता अधिकच खुलून येते ?
मला या सःघात वृत्ती सर्वात कुणाची आवडत असेल तर ती बुमराहची. तो हुषारीने , शिस्तीने व जिद्दीने गोलंदाजी करतो पण त्याच्या खेळण्यात कधीही चिडाचीड, खुन्नस जाणवत नाही. काल सामना अगदी निर्णायक अवस्थेत असताना त्याच्या गोलंदाजीवर पंतच्या हातून झेल सुटला. बुमराहचया चेहर्यावर फक्त तेंव्हा एक पुसटशी नाराजी दिसली. बाकी, त्याला कुणी चौकार ठोकला तरी पठठया हलकसं हंसतोच ! तात्पर्य: हसणयाने, स्थितप्रज्ञ राहिल्याने जिददीला बाधा येत नसावी! ती मेथड अधिकच प्रभावी असण्याची शक्यता जास्त!!
उद्याच्या WACA कसोटी साठी
उद्याच्या WACA कसोटी साठी भारतीय संघ..
विराट कोहली , मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.
ह्या तेरामधून..
अश्विन, रोहित दुखपतीमुळे बाहेर!
फिरकी गोलंदाज महणून फक्त
फिरकी गोलंदाज महणून फक्त जडेजा ?? जरा गोची वाटते !
भाऊ, आणि ४-५ डावखुरे फलंदाज
भाऊ, आणि ४-५ डावखुरे फलंदाज ऑसीजकडे असताना जडेजाला खेळविणे कितपत किफायतशीर असेल माहिती नाही!
माझ्या मते हनुमाविहारी आणि भुवनेश्वर खेळतील. पर्थची खेळपट्टी तशी जलद असते साधारपणे त्यामुळे ४ मध्यतेज गोलंदाज खेळविले जातील.
आणि हनुमा विहारी व भुवनेश्वर बर्यापैकी खेळपट्टीवर उभे देखिल राहू शकतात..
सामन्यांच्या शेवटच्या दोन
सामन्यांच्या शेवटच्या दोन दिवसांतील निर्णायक सत्रात व तळाच्या फलंदाजाना ( जे आपली डोकेदुखी ठरताहेत ) बाद करायला फिरकीला पर्याय नसावा . 100% 'पेस अटॅक' आपल्यासाठी घातक ठरण्याचीच शक्यता अधिक .( पारंपारिक वेगावरच भर देणारे देश आतां फिरकीला अधिकाधीक महत्व देत आहेत तर फिरकीचा खरा पुरस्कर्ता उलट्या दिशेने कां ?
)
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/krida-news/2nd-test-virat-kohli-is-happy-with-p...
बघा कप्तान कोहली काय म्हणतोय! ४ जलदगती गोलंदाज खेळवेन.
सांगतोय वॅका वाल्यांना गवत काढू नका खेळपट्टीवरचे. का मुद्दाम हूल देतोय त्यांनी गवत काढावे म्हणून?!
* 4 जलदगती गोलंदाज खेळवेन. *
* 4 जलदगती गोलंदाज खेळवेन. * गवत असो वा नसो, ऑसीज काढतील बाहेर लिऑनला ?
मला वाटतं, जडेजा खेळेल.
मला वाटतं, जडेजा खेळेल. भुवनेश सारखा खेळाडू टीम मधे येऊ शकत नाही ही कमाल आहे. पण त्यात काही अनफेअर वाटत नाहीये कारण बाकीचे फास्ट बॉलर्स सुद्धा जबरदस्त बॉलिंग करताहेत. (भुवनेश खेळला, तर मला आवडेलच.)
गेली काही वर्ष, फास्ट विकेट्स वर आपली टीम चांगली खेळतीये. झहीर, नेहरा च्या पदार्पणापासून - गांगुली ची कॅप्टन्सी, सेहवाग, तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण ची बॅटींग आणी झहीर, नेहरा, इरफान, आर. पी. सिंग, बालाजी ई. फास्ट बॉलर्स नी दिलेली साथ ह्यामुळे गेली काही वर्ष, फास्ट विकेट्स चा भारताला फायदाच झालाय. त्यामुळे ह्या वेळी सुद्धा, पर्थ वर आपण चांगले खेळू असं वाटतय.
भाऊ, तुम्ही वर बुमराह चं उदाहरण दिलत, त्यात मी बुमराह च्या बरोबरीनं, भुवनेश चं नाव पण घेईन. अत्यंत प्रभावी आणी भेदक गोलंदाजी करणार्या, वेळप्रसंगी बॅटींग मधेही जिद्दीनं उभं रहाणार्या ह्या खेळाडू ला सुद्धा कधी त्याचा आक्रमकपणा बाह्यरूपात व्यक्त करताना पाहिलेलं नाहीये. कोहली ची पद्धत वेगळी आहे. पण ती त्याच्या बाबतीत वर्क होते. Not my type, but nothing to condemn either. कधी कधी अती झालं आणी हसू आलं असं होतं त्याचं. धोनी चा शांतपणा मला नेहमीच फेक वाटत आलाय. असो. तो विषय आता नको.
भाऊ गम्मत म्हणजे मैदानाबाहेर
भाऊ गम्मत म्हणजे मैदानाबाहेर कोहली इतर देशांच्या खेळाडूंमधे popular आहे. कसलीही अपेक्षा नसताना तो ह्युजेस च्या फ्युनरल ला गेला तेंव्हाच तो मैदानावरचा खेळ नि त्याबाहेरचे वेगळे ठेवू शकतो हे त्याने सिद्ध केले. त्याचा दोन्ही कडचा पर्सोना वेगळा आहे त्यामूळे मैदानावरचे वागणे हे पर्स्नल नसून फक्त खेळाचा भाग आहेत हे त्यांनी accept केले आहे. रिझल्ट्स बघता मेथड काम करतेय का ? खेळाडू inspired आहेत का ह्याचे उत्तर काय असेल ? " पण फक्त खुन्नस हाच जर त्याचा पाया असेल" हे चुकीचे assumption असू शकेल असा कधी विचार करून कोहली चे सिरीज च्या आधीचे interviews पहाल तर हे लक्षात येईल. प्रत्येक खेळाडूने ठराविक साच्यात वागायला हवे असा आग्रह का ? बॉर्डर, धोनी, कपिल प्रत्येकामधे दोष होतेच/आहेतच कि.
त्यामुळे ह्या वेळी सुद्धा, पर्थ वर आपण चांगले खेळू असं वाटतय. >> +१. आफ्रिकेपासून इंग्लंडमधे जेंव्हा जेंव्हा फास्ट पिच मिळाले तेंव्हा आपण वरचढ ठरलो आहोत.
गवत असो वा नसो, ऑसीज काढतील बाहेर लिऑनला ? >> आपल्याकडे लिऑन असता तर ह्या argument ला अर्थ आहे ना पण ? जाडेजा किंवा कुलदीप ला घेण्यापेक्षा भुवीला घेणे अधिक लॉजिकल वाटतेय पिचचे स्वरुप पाहून. आफ्रिकेच्या वाँडरर्सला असे पिच असताना आपण चार बॉलर नि पांड्या घेऊन खेळलो नि जिंकलो होतो.
यावेळी वॅकाचं नेहमीचं पीच
यावेळी वॅकाचं नेहमीचं पीच नाहिये, नवीन स्टेडिअममध्ये होणार आहे मॅच... पीच कसं असेल आणि मॅच कशी होईल हे पाहण्यास उत्सुक...
"inaugural Test at Perth's new multi-purpose stadium"
Not my type, but nothing to
Not my type, but nothing to condemn either* - 100% सहमत .
ऑसीज टाॅस जिंकून पहिली फलंदाजी.
यादव आणि विहारी खेळणार.
यादव आणि विहारी खेळणार.
यादव ऐवजी भुवनेश्वर हवा होता
यादव ऐवजी भुवनेश्वर हवा होता का?
आज टीव्ही लावला मांजरेकर
आज टीव्ही लावला मांजरेकर दिसला...
Pages