क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मांजर्‍या होता की. मॅच सुरू व्हायच्या आधी नेहमीप्रमाणे मला वाटत नाही भारताला काही चान्स आहे वगैरे बरळलाही होता.

सामना सुरू होण्यापूर्वी होता मांजरेकर. मी रात्रभर जागाच असल्याने एस्क्ट्रा इनिण्गमध्ये पावणेपाच ते पाच त्याला सहनही केला. गिलचा फर्स्ट क्लास क्रिकेटचा चौथ्या डावातील रेकॉर्ड दाखवलेला. १०-१२ सामने, ६०+ सरासरी, ९०+ स्ट्राईकरेट असा काहीतरी भारी होता. मांजरेकर म्हणाला की याला काही अर्थ नाही. त्या सामन्यांना काही दर्जा नाही. ऑस्ट्रेलियात अवघड आहे.
बस्स मला तेव्हाच समजले की आज गिल खेळणार Happy

शेवटच्या २४ रन्स ना मांजर्‍याच होता... (टेन एचडी इंग्लिश वर)
तरीपण जिंकलो...

मला राहून राहून वाईट या गोष्टीचं वाटतंय की आता या अकरा लोकांच्या टीमला परत एकत्र खेळायची संधी मि़ळण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे... यांच्यापैकी कुणाचाही जयंत यादव होऊ नये...
(जयंत यादव तोच, ज्यानी करूण नायरच्या ३०० होताना समोरून १०० केल्या होत्या. ४ टेस्ट्स मधे १ शतक अन १ अर्धशतकासह ४५ च्या सरासरीनी २२०+ धावा अन ११ विकेट्स अशी बर्‍यापैकी कामगिरी असतानाही, केवळ दुसर्‍या - तिसर्‍या फळीतला खेळाडू असल्यानी रीप्लेसमेंट अपॉर्च्युनिटी (गरज) संपल्यावर कुठे भिरकावला गेला कुणाच्या खिजगणतीतही नाही.)

आत्ता सुद्धा जडेजा च्या अनुपस्थितीत सुंदर अन शार्दुलनी चांगली कामगिरी केलेली असताना इंग्लंड दौर्‍यामधे जडेजाच्या जागेसाठी पर्यायी म्हणून हार्दिक पांड्या अन अक्षर पटेलला घेताना सुंदर अन शार्दुलला परत विसरले नाहीत म्हणजे झालं...

भारताने खेळाडू सतत rotate करायला हवेत, इंजुरी नसली तरी म्हणजे कोण चांगले आहे ते पण कळेल.

*पाकिस्तानी टीव्हीवरचं कालच्या टीम इंडिया विजयाबद्दल अभिनंदन..* - खरं क्रिकेटप्रेम ( व खेळ) हाडवैरही विसरून जावून भरभरून कौतुक करायला उद्युक्त करतात, याचंच बोलकं उदाहरण! आपणही यातून शिकण्यासारखं .
'टेस्ट क्रिकेटचा हा नवा brand आहे', हें आत्यंतिक महत्वाचं व रहाणेचे शिलेदार त्याचे पहिले brand ambassadors आहेत, हेंही !!
धन्यवाद, शेअरींग केल्याबद्दल.

ह्या मालिका विजयामुळे आकडेवारी आली समोर १९९६ पासून गावस्कर- बॉर्डर मालिका सुरु झाली भारत -ऑस्ट्रेलिया दरम्यान. १५ मालिका झाल्या. त्यात ९ वेळा भारत जिंकलाय तर ५ वेळा ऑस्ट्रेलिया. १ वेळा बरोबरीत सुटली. म्हणजे गेल्या जवळपास २५ वर्षात भारतच कसोटीत वर्चस्व गाजवतोय. तसे गेल्या ३ मालिका भारताने सलग जिंकल्यात आणि गेल्या दोनही मालिका ऑस्ट्रेलिया यजमान होता हे विशेष. कांगारुं ट्वीटरवर आणि मैदानावर टीवटीव करुन जिंकायचा प्रयत्न करतात.

मला राहून राहून वाईट या गोष्टीचं वाटतंय की आता या अकरा लोकांच्या टीमला परत एकत्र खेळायची संधी मि़ळण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे
>>> अगदी !!

ऑस्ट्रेलिया अभेद्य होती ते मॅग्राथ आणि वॉर्न जेव्हा एकत्र खेळत तेव्हा. मॅग्राथ खेळलेल्या टेस्ट्स पैकी ऑस्ट्रेलिया फक्त २० सामने हरली. त्यातही बरीचशी "डेड रबर्स" होती - सिरीज ऑलरेडी जिंकल्यावर उरलेली एखादी मॅच. त्यातही जेव्हा त्याच्याबरोबर वॉर्न होता तेव्हा ते क्वचितच हरले.

अपवाद - फक्त दोन. खरे म्हणजे फक्त एक - भारत वि ऑस्ट्रेलिया २००१ ची फेमस सिरीज!
त्याखेरीज-
- १९९९ च्या लंका सिरीज मधे पहिली मॅच ते हरले. पण त्याच मॅच मधे स्टीव्ह वॉ व गिलेस्पी एकमेकांना धडकले व जखमी झाल्याने पुढे खेळू शकले नाहीत. त्या नंतरच्या दोन टेस्ट पावसाने जेमतेम अर्ध्याच खेळल्या गेल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पूर्ण संधी मिळाली नाही.
- २००५ च्या प्रचंड गाजावाजा झालेल्या, व इंग्लंड ने जिंकलेल्या अ‍ॅशेस मधे ज्या मॅचेस ऑस्ट्रेलिया हरले, त्यात मॅग्राथ नव्हता. वास्तविक पहिल्या लॉर्ड्स टेस्ट मधे पहिल्या डावात इंग्लंडच्या पहिल्या पाच विकेट्स घेउन त्याने त्यांची अवस्था २१/५ अशी केली होती व ती मॅच ऑस्ट्रेलिया जिंकले होते. पण पुढच्याच मॅचच्या सरावाच्या वेळेस तो बॉलवर पाय पडल्याने अनफिट झाला व ती मॅच खेळू शकला नाही व ऑस्ट्रेलिया हरली. नंतरच्या एका मॅच मधे तो नव्हता - व ती ही हरली.
- २००४ मधली भारतातली सिरीज ऑस्ट्रेलियाने २-१ जिंकली. पण ती कदाचित बरोबरीत सुटली असती. चेन्नई ला भारताला चांगली संधी असताना शेवटच्या दिवशी पूर्ण पाउस पडला. या सिरीज मधे दोघेही होते.
- १९९६ च्या भारताविरूद्धच्या एका मॅच च्या सिरीज मधे वॉर्न नव्हता, १९९८ च्या सिरीज मधे मॅग्राथ नव्हता व २००३-०४ च्या सिरीज मधे दोघेही नव्हते. अर्थात भारताकडूनही २००१ मधे कुंबळे नसताना भारत जिंकला आहे.

एकूण ऑस्ट्रेलियाला इतर संघांपेक्षा भारताने जास्त लढत दिली आहे हे खरे आहे.

McGrath is just loveable, as a bowler, cricketer, .expert commentator and as a person ! त्याला ऑसी म्हणायला बरं नाहीं वाटत !

- २००४ मधली भारतातली सिरीज ऑस्ट्रेलियाने २-१ जिंकली. पण ती कदाचित बरोबरीत सुटली असती. चेन्नई ला भारताला चांगली संधी असताना शेवटच्या दिवशी पूर्ण पाउस पडला. या सिरीज मधे दोघेही होते. >> त्याच सिरीज मधे बीसीसीआय च्या होंचोज नी आपापले खुन्नस काढण्यासाठी नागपूरमधे सिमिंग पिच देऊन आपला सुपडा साफ केला होता . मूर्खपणा होता नुसता. शेवटच्या मुंबई टेस्ट मधे पिचची पार वाट लागली होती. मुरली कार्तिक नि क्लार्क ने धुमाकूळ घातला होता.

बीसीसीआय च्या होंचोज नी आपापले खुन्नस काढण्यासाठी नागपूरमधे सिमिंग पिच देऊन आपला सुपडा साफ केला होता >>> Happy हो

मॅग्राथची मधे एकदा मुंबईत बाहेर फिरताना घेतलेली मुलाखत बघितली होती. मस्त बोलला होता.

Pages