क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही वेळाने draw ची शक्यता ही नष्ट होईल...>>

पाऊस उद्या पुर्ण दिवस आला मदतीला धावून तर भारतीय संघ ड्रॉ करून दाखवतील ३ फलंदाजांच्या बळावर!

त्यांचे मेन बॅट्स्मेन आता यायला सुरुवात झालीय, कमिन्स, लायन, स्टार्क किती रन्स काढतात ते बघायचे फक्त!!!
ख्वाजा आऊट!!!

आणखी एक गेला !
...वाळू रगडीतां तेलही गळे ! शामी सतत चेंडू आपटत राहिला आंणि ......... !!!!!
ख्वाजाच्या खेळावर उपखंडाची छाप उठून दिसते... सहजता , लवचिकता , नजाकत ! Well played , Khvaja !!

ख्वाजाच्या खेळावर उपखंडाची छाप उठून दिसते... सहजता , लवचिकता , नजाकत !>>>

तीच आपल्या किमान आघाडीच्या दोघांमध्ये दिसून येऊ द्या!!

आपल्या क्षेत्ररक्षणाचा , विशेषत: झेल पकडण्याचा, खूप महत्वाचा सहभाग आहे आपल्या सध्याच्या कामगिरीत.

WTF man.

ड्र्रिन्क्स नंतर बळच शर्मा आणि यादवला बॉलिंग दिली तेव्हाच शामी आणि बुमराह चालु ठेवले असते तरी चाललं असतं..

Does he even care for what he has been asked to play in the team 'India'? Does he deserve it Sad

पुजारा गेला. १३/२.

शास्त्रीच्या मूह में आता काय आलं असेल? Wink

२-१३ झाले!
आत कुणी बाद झाले तर ३-१३ वाजलेच म्हणून समजा!

राहुलच्या २०१८ मधील कसोटी २१ मध्ये डावागणिक केलेल्या धावा!

१०, ४, ०, १६, ५४, ४, १३, १८, १० ,२३, ३६, १९, ०, ३७, १४९, ०, ४, ३३*, २, ४४, २, ०.

२१ डावात १ शतक, १ अर्धशतक, ३ शुन्य, ६ वेळा १०च्या आत बाद झाला आहे!

भाऊ वर म्हणाले आहेत अविस्मरणीय होणार!
त्या प्रमाणे नक्की स्मरणात राहील!
हिरवी खेळपट्टी पाहून भारताने स्पीनर नाही खेळविला आणि ऑसी स्पीनरने आपल्याला दोन्ही डावात धूळ चारली असे स्मरणात राहील कायम!!
आणि जो कामचलावू खेळविला त्याला पहिल्या डावात बळी मिळवूनही म्हणावी इतकी गोलंदाजी नाही दिली!!!

उद्या सकाळपर्यंत चालणार का खेळ?>>>

ह्या सामन्याला उद्याचा सुर्य पाहू देणार नाही बहुतेक ऑसी गोलंदाज!!
अजून १७ षटके आजची म्हणजे १०२ चेंडू आणि केवळ ६ चेंडू हवेत सामना जिंकायला!

<<"I know he's your captain, but you can't seriously like him as a bloke," Paine says to Vijay about Kohli >> (http://www.espncricinfo.com)
या भावनेशी सहमत आहे. कोहलीचा खेळ आणि कोहली या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. Happy
खेळाडू म्हणून कोहली एका वेगळ्या उंचीवर पोचला आहे याबाबत दुमत नाही.

Pages