क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

310'- 6 ! अरे , त्या विहारीला देवून तर बघ ना एक- दोन षटकं ! तो शामी हताश होवून उगीचच बाऊन्सर टाकून चेंडूवर राग काढतोय.

लायन लवकर काढायला हवा.. तो डोके दुखी होऊ शकतो..

इशांत ने लागोपाठ स्टार्क आणि हेजलवूड परतवले..

३२६ सर्व बाद!

चला, 326वर रोखल ऑसीजना ! नाॅट बॅड !!

*भाऊ तुम्हाला भारतीय संघाने संघ निवडी बद्दल विचारले जावे. * '

शिरा केलाय तो खाऊन घ्या. मग जा शिव्या खायला
निवडसमितीवर !!habits.jpg

भाऊ,
मस्तच! Happy
तोंड गोड करा!
पण आत फलंदाजांची खरी परिक्षा!

अरे असं कसं ? नियमाप्रमाने राहुल ने ने बाद व्हायला पाहिजे होतं विजय कसा बाद झाला ? चुकीचा कॉल दिला होता का? अपेक्शा करतो की राहुलनेहमीप्रन्माणे लवकर बाद होइल.

अपेक्शा करतो की राहुलनेहमीप्रन्माणे लवकर बाद होइल.>>

गेला राहुल देखिल नो वरी!!
२-८

फॉलो ऑन टाळायला १२७ धावा हव्या ना! Wink

विजयने माझा त्रिफळा उडवला आहे ! मी ज्याला आपला एकमेव नियमित सलामीचा फलंदाज ( शाॅ वगळून) म्हणत होतो ,तोच असा बाद होणं नामुष्कीच .

विजय फारच चांगल्या चेंडूवर आऊट झाला. त्याच्या टेक्निक मधे काही चूक नव्हती. पण राहूल ची विकेट embarrassing होती. पाय आणी बॉल ची लाईन ह्याचा अर्थाअर्थी काही संबंध नव्हता. एका टेस्ट ओपनरकडून हे अजिबात अपेक्षित नाहीये.

कोहली, पुजारा, रहाणे च्या बरोबरीनं, विहारी आणी पंत ला चांगलं खेळावं लागणार आहे.

चौथ्या डावात फलंदाजी करावी लागणार असल्याने ह्या डावात जास्ती जास्त धावा जमविणे किंबहुना ऑसीजवर लीड घेणे गरजेचे..

चमत्कार वगळता, बेस्ट केस सिनारिओ म्हणजे ३२६ च्या जास्तीत जास्त जवळ जाणे, नंतर ऑस्ट्रेलिया ला तिसर्या डावात लवकरात लवकर गुंडाळून, चौथ्या.डावात टारगेट चेस करणे.

मस्त खेळले पुजारा - कोहली ह्या सेशन मधे. कॉमेंट्री मधे सातत्यानं द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण चा उल्लेख ऐकून गंमत वाटली.

छान खेळले!
असाच पुढचा सेशन दोघांनी खेळून काढावा...

हे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या प्राण्यांना शेपूटच नसते!
शेवटच्या चौघांनी ७५ धावा! तेहि सक्काळी सक्काळी, सगळे ताजेतवाने असताना!
काहीतरी मार्ग काढा. निदान आपल्या शेपटाला फलंदाजी शिकवा!

मला वाटतं हें नवीन पीच पुढील तीन दिवस कसा टिकाव धरतं किंवा कसे रंग पालटतं , याचा सामन्याच्या निकालावर बराच प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. जर पीच फार खराब झालं नाहीं तर सामना अटीतटीचा व नाही तर भारताची खरी कसोटी पहाणारा होईल अशीच शक्यता दिसते.

सलामीचे फलंदाज पटकन बाद होऊनही अजून तरी भारताने ऑसीजना वरचढ होवूं दिलेलं नाहीं .

*.निदान आपल्या शेपटाला फलंदाजी शिकवा!* - त्याच बरोबर ऑसीजचं शेपूट गुंडाळायला कल्पक व आक्रमक प्रयोगही योजले पाहिजेत . फिरकीचा वापर हाही उपाय धाडस दाखवून करून पहावा.

कॉमेंट्री मधे सातत्यानं द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण चा उल्लेख ऐकून गंमत वाटली. >> हो कंटाळा आला. नवीन आयडेंटिटि आहे नविन संघाची राव.

खरं ? भर मिटींगमधे बाॅसने आज तुला असं म्हटलं ,
" हा आमचा सलामीचा फलंदाज " ! sale.jpg

भाऊ, मस्त! Proud

मला वाटते पुजारा आणि शॉ ला ओपनिंग करावे. नाहीतरी त्या पुजाराला २-३ षटकात यावेच लागते बॅटिंगला. राहणे ३ नंबरवर. Wink

भाऊ Lol जबरी.

टॉप क्लास बॅटिंग कोहली आणि रहाणे ची आज. ओपनर्स पैकी राहुल ची बिनडोक बॅटिंग पुन्हा एकदा. विजय चा निदान आत येणारा बॉल कळला नाही त्याला. लेफ्ट आर्म बोलर्स ना अशी विकेट हमखास मिळते. इरफान पठाण च्या त्या हॅटट्रिक मधले बॉल त्याच अँगलचे होते.

कॉमेंट्री मधे सातत्यानं द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण चा उल्लेख ऐकून गंमत वाटली. >>> सिरीयसली? बास आता म्हणावं. आता कोहली, पुजारा, रहाणे बद्दल बोला.

ऑसी चॅनेल वर एक महिला कॉमेण्टेटर कोण आहे? ती पहिल्या डावाच्या स्कोअरलाच "२७७ चा लीड" आहे म्हंण्टली Happy

“ऑसी चॅनेल वर एक महिला कॉमेण्टेटर कोण आहे? ती पहिल्या डावाच्या स्कोअरलाच "२७७ चा लीड" आहे म्हंण्टली” - इशा गुहा आहे बहुतेक. हल्ली गावसकर, गांगुली ला घेत नाहीत का पाठवत नाहीत?

Pages