क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून तर सुरुवात आहे. आताशा कुठे महिला क्रिकेटला लोकांनी सिरीअसली घ्यायला सुरुवात केली आहे
>>> राजकारण सगळीकडेच आहे...

रमेश पोवारला स्वत:ला निट करीअर करता आली नाही आणि तो म्हणे यांचा कोच...
>> जनरल मॅनेजर: साबा करीम, सिलेक्शन कमिटी हेड: एम एस के प्रसाद...
सगळीच गम्मत आहे...

हे लोक सस्त्यात मिळाले म्हणून घेतले? की दुसरे कुणी मिळाले नाही म्हणून घेतले???

"रमेश पोवारला स्वत:ला निट करीअर करता आली नाही आणि तो म्हणे यांचा कोच" - काही सन्माननीय अपवाद (द्रविड, जॉन राईट, गॅरी कर्स्टन) वगळता, साधारण खेळाडू चांगले कोच होतात असा माझा कयास आहे. उदा. जॉन बुकॅनन, लालचंद रजपूत, डंकन फ्लेचर. तसे काही खेळाडू आणी कोच ह्या दोन्ही भुमिका सामान्य (अतिसामान्य?) दर्जाच्या लोकांनी सुद्धा निभावल्या आहेत (निभावत आहेत). Wink

आपल्या बेस्ट वगैरे बॉलर्सना अस्मान दाखवलं की ऑसी बच्च्यांनी. ५४४! आणि पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीबाहेर.

विजय चा पहिल्या कसोटीत खेळण्याचा मार्ग शॉ च्या इंज्युरीतून निघायला नको होता. पण पठ्ठ्यानं दुसर्या डावात झकास सेंच्युरी टाकून पुनरागमन सेलिब्रेट केलंय.

' सलामीचा फलंदाज ' हा नुसता फलंदाजीचा क्रमांक आहे असं मानणारे काहीही म्हणोत, विजय त्या जागी चपखल बसतो असं मला वाटतं.

"विजय त्या जागी चपखल बसतो असं मला वाटतं." - सहमत आहे. विजय ला अपयशी होऊन बाहेर जावं लागलं हे बघणं क्लेशदायक होतं.

Form is temporary but class is permanent and Kane Williamson is a class act. What an innings, deserved a hundred but not to be Sad

Vijay is extremely lucky this time with Shaw injured and Rahul not in form.
Considering lack of movement on pitches down under, won't be surprised if he scores and settles in again in the opening slot.

"विजय त्या जागी चपखल बसतो असं मला वाटतं. >> तो बसत नाही असे कोण म्हणत होतं पण मुळात ?

शॉ च्या दुखापतीचा फायदा राहुलला झालाय. सराव सामन्यामधल्या पहिल्या डावानंतर राहुल वर टीक करणारे बंगर चे वक्तव्य वाचून विजय नि शॉ हे जवळजवळ निश्चित झाले होते असे मला वाटलेले. शॉ बाहेर गेल्यामूळे राहुलला संधी मिळणार हे उघड आहे. खर बघता धवन गेल्या पाच सहा इनिंग एव्हढा झकास खेळलाय कि त्याचा आत्मविश्वास बघता नि एकंदर ऑसी पिचेस चा त्यालाच्या खेळण्याच्या शैलीला धार्जीणा कल बघता त्याला ठेवायला हवे होते कि काय अशी शंका ही चाटून गेली.

*Vijay is extremely lucky this time with Shaw injured and Rahul not in form.* Vijay has been unlucky all along his lengthy career . Lady Luck's smile was overdue for him ! भगवान के घर देर है , अंधेर नहीं ! Wink

"गौतम गंभीर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त" - वाचलं. बर्यापैकी obvious होतं आणी त्यानं योग्य निर्णय घेतला. टेस्ट मधे त्याचं तंत्र मला नेहमी थोडं डळमळीत वाटलं, पण एक बिग मॅच प्लेयर होता तो, गांगुली नंतर. टेंपरामेंटल होता. कॅप्टन म्हणून कल्पक आणी बोल्ड होता. पहिल्यांदा त्याचं नाव वाचलं होतं ते त्यानं कुठल्यातरी परदेशी टीम विरुद्ध अध्यक्षीय संघाकडून भारतात खेळताना, मोठं शतक ठोकून (द्विशतक?) द्रविड बरोबर मोठी भागीदारी केली होती तेव्हा. If my memory serves me well, हैद्राबाद मधे मॅच होती.

गौतम गंभीर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त. त्याला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा!
>>
अरं परवाच कोल्हापुरात आल्ता की

टेस्ट मधे त्याचं तंत्र मला नेहमी थोडं डळमळीत वाटलं, पण एक बिग मॅच प्लेयर होता तो, गांगुली नंतर.
>>>>>>

I beg to differ.

२००९ च्या न्यूझीलंड दौर्‍यातला त्याचा परफॉर्मन्स पाहता टेस्टमध्ये खेळतानाचं त्याचं टेक्निक डळमळीत होतं हे पटत नाही. या सिरीजमधल्या तीन टेस्ट्समध्ये तो तीन वेगळ्या प्रकारच्या इनिंग्ज खेळून गेला. खासकरुन नेपीयरच्या दुसर्‍या टेस्टमध्ये न्यूझीलंडने फॉलोऑन दिल्यावर तिसर्‍या दिवशी बॅटींगला आलेला गंभीर तब्बल साडेदहा तासांनी (६४३ मिनिटं) पाचव्या दिवशी लंचनंतर १३७ रन्स करुन आऊट झाला तेव्हा भारताने मॅच वाचवल्यात जमा होती. वेलिंग्टनच्या तिसर्‍या टेस्टच्या दुसर्‍या इनिंग्जमध्येही त्याने अफलातून १६७ रन्स ठोकून काढल्या होत्या, पण शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या केवळ दोन विकेट्स बाकी राहिल्या असताना ती मॅच ड्रॉ झाली. जानेवारी २०११ मध्ये केपटाऊनला ९३ आणि ६४ आणि जानेवारी २०१२ मध्ये सिडनीला ८३ रन्सच्या त्याच्या इनिंग्जही अप्रतिम होत्या, पण केपटाऊन टेस्ट ड्रॉ झाली आणि दोन्ही इनिंग्जमध्ये सेंच्युरी ठोकणारा कॅलीस भाव खाऊन गेला तर सिडनी टेस्ट भारताने इनिंग्जने गमावली.

वन डे मध्ये तो काहीसा उतावळा म्हणावा असा बॅट्समन होता. खासकरुन ५० आणि १०० चे माईलस्टोन्स समोर असताना तो आक्रमक शॉट्स मारुन लवकरात लवकर ते गाठण्याच्या नादात कित्येक वेळा आ़ऊट झाला आहे. सर्वात मोठं उदाहरण म्हणजे २०११ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ९७ वर असताना त्याने मारलेला शॉट ज्यामुळे तो बोल्ड झाला आणि वर्ल्डकप विजयाचं सगळं क्रेडीट धोणीला मिळालं. याच वर्ल्डकपच्या क्वार्टरफायनलमध्ये त्याची आणि युवराजसिंगची रन-आऊट होण्याची जणू स्पर्धा सुरु आहे असं चित्रं दिसलं होतं आणि त्याची परिणीती अखेर गंभीर रनआऊट होण्यात झाली.

६४३ मिनिटं वाली इनिंग जबरदस्तच होती. काय ते अफाट concentration राव. गम्मत म्हणजे २००७ नि २०११ दोन्ही च्या World Cup Finals मधे गंभीर मह्त्वाच्या क्लच इनिंग्स खेळलाय पण दोन्ही वेळा गाजावाजा इतरांचाच झालाय.

पहिल्या कसोटी साठी संघ ह्या बारा जणांमधून...

विराट कोहली , अजिंक्य रहाणे , केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), आर. अश्विन, मो. शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.

माझ्या मते रोहित किंवा हनुमा बाहेर बसण्याची शक्यता..

गौतम गंभीर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त. त्याला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा!
>>
अरं परवाच कोल्हापुरात आल्ता की

>>
परवा कोल्लापुरात आल्ता म्हणून आज त्याने निवृत्त होऊ नये काय? हे काय हंगेरियन लॉजिक आहे काय ?

के एल राहुल आहेच का? चला म्हणजे आपला दहाच जनांचा संघ आहे म्हणायचा !>>

मला वाटते रोहितला विजयसह ओपनिंगला खेळवून हनुमा विहारीला संधी द्यावी ते जास्त योग्य ठरेल.

विहारी खेळला तर एक बॉलिंग ऑप्शन मिळतो (आपण चारच बॉलर्स खेळवतोय आणी ऑस्ट्रेलिया मधे कडक उन्हाळा आहे). पण खेळणार रोहित असंच वाटतय.

गंभीर च्या गाजलेल्या टेस्ट इनिंग्ज माहीत आहेत. त्यातली ती न्यूझिलंड मधली इनिंग हा बहुदा त्याचा peak होता. पण ओव्हरऑल, त्याचं तंत्र डळमळीत वाटायचं. म्हणजे संपूर्ण सिरीज एकाच पद्धतीनं बाद होणं (२०११ ऑस्ट्रेलिया सिरीज मधे स्लिप मधे कॅच देऊन) वगैरे पहाता. अर्थात, त्यासकट तो मला आवडायचा, कारण तो बिग मॅच प्लेयर होता, गट्सी होता आणी कल्पक आणी आक्रमक कॅप्टन होता. धोनी च्या काळात एकदा एका वन-डे सिरीज ची कॅप्टन्सी त्याने केली होती तेव्हा २५-३० व्या ओव्हर ला सुद्धा, अश्विन ला २ स्लिप फिल्डर्स वगैरे देऊन त्याने विकेट्स मिळवल्या होत्या.

पहिल्या कसोटी साठी संघ ह्या बारा जणांमधून... >> मी सहा बॅट्समन खेळणार ह्यावरच खूश आहे. देर से आये पर दुरुस्त आये. ते तेव्हढे एक अश्विन च्या जागी कुलदीपला जमते का बघा जरा ...

भारतासाठी धोक्याचा कंदिल. मार्कस हॅरीस नावाचा नवीन ओपनर डेब्यू करतोय. सहसा, आपण अशा लोकांचे फार लाड करतो.

वॉर्नर स्मिथ अनुपस्थितीत फलंदाजी कमजोर आहे
पण...
हेझलवूड स्टार्क कमिन्स लायन .. हे लोकं आलटून पालटून नडत राहणार.
सिरीज १-३ ने हरू असे प्रथमदर्शनी वाटतेय.

येनीवेज, पृथ्वी शॉ नसल्याने मजाच गेलीय.
आता पंतने एक अडमतडम शतक मारले तर मजा येईल.

अपेक्षेप्रमाणे राहुल गेला ओसीजना त्रास न देता हजेरी लावून!!
दुसऱ्या ओपनरने पण कंगारूची निराशा केली नाही..

Pages