Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी सहा बॅट्समन खेळणार ह्यावरच
मी सहा बॅट्समन खेळणार ह्यावरच खूश आहे. >> गरज लागलीच त्यांची आज.
शास्त्री आणि आदरणीय विराटजी
शास्त्री आणि आदरणीय विराटजी आता 'पोझीटिव्ह इंटेन्ट' नामक महाखतरनाक आजाराची महती गातील.
विजयचं आजचं बाद होणं पाहून
विजयचं आजचं बाद होणं पाहून माझा गेल्या धाग्यावरचा प्रतिसाद पुन्हा लिहावासा वाटतो -
<< मुरली विजय साहेबांना IPL नाही तर वाढतं वय नडतं आहे. आता तो पस्तिशीचा आहे. गेल्या दीड वर्षांत (१ फेब्रुवारी २०१७ ते आत्तापर्यंत) तो १२ टेस्ट्स खेळला. (एकूण संख्येच्या १/५) त्यात त्याची सरासरी करीअर सरासरीपेक्षा ४ ने खाली आहे. (३९ --> ३५) ह्या कालावधीत त्याची चार शतकं हैदराबाद (बांग्लादेश), नागपूर (श्रीलंका), दिल्ली (श्रीलंका), बंगलुरु (अफगाणिस्तान) ही आहेत. ह्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात ८२ वगळता मोठी धावसंख्या नाही. दुसर्या डावात (जेव्हा आपण दुसरा डाव खेळलो) तर त्याच्या धावसंख्या - ७, २, ८, ९, १३, ९, २५, ६, ० - अश्या आहेत. एका चांगल्या खेळाडूबरोबर एज हॅज कॉट अप. मन बळकट करून गेममध्ये वयानुसार गरजेपुरते बदल करून चांगला खेळणार असेल तर अजून २-३ वर्षे खेळेल ३७-३८ पर्यंत. (तशी क्षमता आहे त्याच्यात.) अन्यथा बाय म्हणायला फार वेळ लागणार नाही. >>
शारिरीक मर्यादेला मानसिक बळाच्या जोरावर ओलांडून जाता येण्याइतकी क्षमता त्याच्यात नक्कीच आहे, पण जर असा चुकीच्या फटक्यांवर बाद होत राहिला, तर कसोटीमध्ये त्याला टिकाव धरता येणार नाही आता.
बाकी पॉझिटिव्ह इंटेंट वगैरे पुंगी किती वेळा मोडून झाली तरी खातच असतात लोक. तिथे ४० अंश तापमानात त्यांचे गोलंदाज थकायची वाट बघायची होती, ती फक्त 'स्लो रनरेट'वाला पुजारा बघतोय. पण त्यानेही धावफलक हलता ठेवला नाही, तर रोहितवर जबाबदारीचे ओझे खूप होईल.
रहाणे आणि पुजाराने लायनला
रहाणे आणि पुजाराने लायनला पायांचा वापर करून निष्प्रभ करायचं ठरवलं आहे की काय.
रोहित गेला! आधी स्लॉग स्वीपवर वाचला, आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा तसाच उतावीळपणा करून बाद! ८६/५.
कोहलीसह सर्वच अत्यंत बेजबादार
कोहलीसह सर्वच अत्यंत बेजबादार फटके मारून बाद झाले!
कॅप्टन - व्हाइस कॅप्टनचे ३ -
कॅप्टन - व्हाइस कॅप्टनचे ३ - १३ वाजले..
अखेर पितळ उघडं पडलं कमकुवत
अखेर पितळ उघडं पडलं कमकुवत संघापुढे....
पंत गेला. मस्त ऑफस्पिन! १२७/६
पंत गेला. मस्त ऑफस्पिन! १२७/६.
१०० पार केले हेच खूप झाले आज.
१०० पार केले हेच खूप झाले आज... पंत पण आउट
वा वा रविचन्द्रन अश्विन
वा वा रविचन्द्रन अश्विन बॅटिंग ला आला का ? लास्ट सामुराइ.. दीडशे होतील का?
Pant देखिल गेला!
Pant देखिल गेला!
बिच्चारा पुजारा एक सुद्धा उभा रहायला तयार नाही समोर जोडीला!
रोहितने आधी चांगला प्रयत्न केला नंतर तो घसरला!
ऑसी टूरच्या पहिल्या टेस्टची
ऑसी टूरच्या पहिल्या टेस्टची सकाळ जशी असायची तशीच उगवली (२१/३).
टेस्ट मॅचेस कशा खेळायच्या असतात हेच विसरलेला आपला संघ वाटतो. कुणाच्यातच काडीचाही पेशन्स नाही (एक पुजारा सोडला तर).
देशातले सामने पाटा विकेट्सवर देमार बॅटिंग करून समोरच्यांना फिरकीत गुंडाळून अडीच तीन दिवसात संपवायचे. अन परदेशी गेलो की विकेट्स फेकून. (उरलेले दिवस बूड वर करून पडायचं किंवा बोंबलत फिरायचं).
ओव्हर अॅग्रेसिव चमकोगिरीला अवास्तव महत्व दिल्याचे परिणाम
* अखेर पितळ उघडं पडलं कमकुवत
* अखेर पितळ उघडं पडलं कमकुवत संघापुढे....* अरे हो ! जरा सबूरीने !! कसोटी 5 दिवसांची असते, मालिका 4-5 कसोटीची. पहिल्या कसोटीच्या पहिल्या सत्रातच कशाला काट मारायचा !!!
अरे हो ! जरा सबूरीने !! कसोटी
अरे हो ! जरा सबूरीने !! कसोटी 5 दिवसांची असते, मालिका 4-5 कसोटीची. >>
भाऊ, तुम्ही म्हणता ते मान्य केले तरी!
इंग्लंडमध्ये होती तशी भेदक गोलंदाजी वाटत नव्हती. तरी ज्या पद्धती ने फलंदाज बाद झाले ते बघता मर्यादित षटकांच्या कोषातून आपले फलंदाज बाहेर येत नाहीत. बाबांनो ५ दिवस किमान ४५० षटकांचा खेळ आहे हा.. अश्या उपखंडा बाहेरच्या मालिकांना आपल्या फलंदाजांनी कधीही अनपेक्षित सुरुवात करुन दिलेली नाही. आज ज्या पद्धतीने बाद झाले त्याने पुजारा वगळता आपल्या फलंदाजांनी कधीही गोलंदाजाला कंटाळवल्याचे जाणवले नाही. अगदी थोडावेळ पुजारा-रोहितची भागीदारी वगळता जास्तीत जास्त षटके खेळून काढायची आहेत हे उद्दिष्ट दिसले नाही.
६० षटके झाली १५० धावा फलकावर!
स्वतःच्याच वाईट निर्णयांचे
स्वतःच्याच वाईट निर्णयांचे बळी आहेत आज. पंत सोडल्यास इतर कोणीही अतिशय सुंदर वगैरे चेंडूवर बाद झालेले नाही.
वासिम अक्रम सचिनच्या चित्रपटात म्हणाला होता, त्याची आठवण झाली. ' बेटा, यहाँ तुम्हे ड्राईव्ह नही मिलेगी, सिर्फ एक ड्राईव्ह मिलेगी वो पिच से पॅविलियन तक!'
कृष्णाजी, एकदम मान्य. पण
कृष्णाजी, एकदम मान्य. पण चुकीचं खेळणं आणि गुणवत्ताच नसणं यात खूप फरक आहे. ' पितळ उघडं पडणं' याने गुणवत्ताच नसल्याचं सूचित होतं व तें आतांच सिद्ध होत नाही , इतकंच.
गेला अश्विन किमान डावातली
गेला अश्विन किमान डावातली सर्वोत्तम भागीदारी तरी केली पुजारासोबात!
बहुतेक ऑस्ट्रेलियाच्या नव्या चेंडूचे पैसे वाचवणार दिसतोय भारतीय संघ!
पण पुजाराने ऑसीजला काढायलाच लावला दुसरा चेंडू!!
जियो पुजारा ! आजचा दिवस तो
जियो पुजारा ! आजचा दिवस तो आयुष्यभर विसरणार नाही !
वेल प्लेड पुजारा!!! १०० धावा
वेल प्लेड पुजारा!!! १०० धावा फलकावर!!!
दिवस अखेर २५० / ९ ..
दिवस अखेर २५० / ९ .. सुरुवातीच्या गळती नंतर बरा झाला स्कोर..
शामी आल्यावर पुजारा पेटला...
शामी आल्यावर पुजारा पेटला... २४ चेंडूत ३४ मारल्या...
(बहुतेक हा किती साथ देईल याची शाश्वती नाही, मारता येईल तितक्या मारून घेऊ असा विचार केला असावा)
पण जेम ऑफ अॅन इनिंग
पितळ उघडं पडणं' याने
पितळ उघडं पडणं' याने गुणवत्ताच नसल्याचं सूचित होतं
>>>
सगळ्यांच्या बाबत हे नाही म्हणाता येणार. पण
राहुल (अजून किती दिवस त्याचं ओझं वहायचंय्??)
विजय (रिफ्लेक्सेस वर तोडगा कधी निघणार??)
रहाणे (कॉन्फिडन्स काय केलं की येणार??)
शर्मा (टेस्ट मधे चान्स मिळालाय तर ते सीरिअसली कधी घेणार??)
पुजाराची अप्रतिम खेळी.
पुजाराची अप्रतिम खेळी. त्याच्या एकाग्रतेला सलाम. कमिन्सच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे तो धावबाद झाला, अन्यथा इतर प्रकारे आज त्याला बाद करणे ऑसीजच्या हातात नव्हते. आता उद्याच्या खेळाची उत्सुकता लागून राहिली आहे.
शॉ आला की राहुल जाईल बहुधा.
शॉ आला की राहुल जाईल बहुधा. रोहित शर्मावरचं प्रेम आटून ते विहारी किंवा तत्सम कोणावर कधी उतू जाईल ते बघायचं. शॉ/विजय/धवन हुतूतू खेळतील काही काळ. रहाणेदादांचं काय ते काही कळत नाही.
शॉट्स खेळल्यानेच कॉन्फिडन्स
शॉट्स खेळल्यानेच कॉन्फिडन्स येतो आणि त्यासाठी पहिल्या चेंडूपासूनच ते खेळले पाहिजेत अशी काहीतरी समजूत करुन घेतली आहे असे वाटते. अरे हो ! जरा सबूरीने !! कसोटी 5 दिवसांची असते,>> हे आपल्या टॉप ऑर्डरलाही सांगायला हवे!
मस्त खेळला पुजारा! जबरदस्त
मस्त खेळला पुजारा! जबरदस्त खेळाडू आहे. हॅट्स ऑफ! बाकी राहूल, विजय, कोहली, रहाणे आणी रोहित अगदीच चुकीच्या शॉट सिलेक्शन मुळे आऊट झाले. हे आततायी क्रिकेट होतं. आता तर टी-२० चा अतिरेक वगैरे कारणं सुद्धा नाही पटत. टी-२० प्रकार बराच मुरलाय. त्यात आणी टेस्ट क्रिकेट मधे फरक करायला बराच वेळ मिळालाय.
कोहली ला एक वेळ माफ करू, कारण अशा परिस्थितीतून योग्य तो धडा घेऊन चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचं कसब त्यानं दाखवलय. पण राहूल, रहाणे आणी शर्मा च्या चुका अक्षम्य आहेत. शर्मा च्या इनिंग मधले शेवटचे २ बॉल्स (ती रिस्की सिक्स आणी पुढच्या बॉल ला कोललेला कॅच) त्याच्या टेस्ट करियर चा सारांश आहे. त्याच्याकडे टेस्ट चं अजिबात टेंपरामेंट नाहीये हे त्यानं अनेक वेळा सिद्ध केलय. राहूल तर टी-२० ला सुद्धा असाच अकारण आऊट झाला होता आणी काल ची त्याची विकेट अगदीच 'कारणे दाखवा नोटीस' च्या लायकीची होती.
साधारणतः प्रत्येक इंडिया-ऑस्ट्रेलिया सिरीज मधे कुणी ना कुणी रिटायर होतं (स्टीव्ह वॉ, गिलख्रिस्ट, कुंबळे, धोनी). यंदा हा मुहूर्त साधायची सुवर्णसंधी विजय आणी रहाणे ला आहे.
मान्य आहे, की पहिल्याच टेस्ट चा पहिलाच दिवस होता. पण हा अॅप्रोच (नो निगेटीव्ह बोन इन द बॉडी, अॅटॅक फ्रॉम गेट गो वगैरे शास्त्रीबुवांची वक्तृत्व स्पर्धा - उत्तेजनार्थ बक्षिस) बदलला नाही तर आक्खी सिरीज अशीच जाईल. कोहली आणी पुजारा संभाळून घेतील आणी कधीतरी रहाणे ची ती स्पेशल 'वन फॉर द सिरीज' इनिंग बघायला मिळेल अशी आशा आहे.
Wanted to impose असे म्हणाली
Wanted to impose असे म्हणाली कोहली बुवा. भयम्करच strategy होती.
स्टार्क ने तो स्नॉर्टर टाकला तेंव्हा मित्राला म्हणालो कि विजय आता पॅनिक होउन राहुलसारखा नाहि बाद झाला म्हणालो नि गेला लगेच. शॉ नि मयांक ह्यापेक्षा काय वाईट खेळतील राव. धवनसुद्धा चालेल.
एक weatherman पण हायर करा राव म्हणजे दिवसभर काय temp असेल नि त्याचे परीणाम काय असतील हे पण शास्त्रीबुवांना कळू शकेल
" हे पण शास्त्रीबुवांना कळू
" हे पण शास्त्रीबुवांना कळू शकेल" - शब्द मागे घे असाम्या. शास्त्री ला सग्गळ्यातलं सग्गळं कळतं.
"Wanted to impose" - impose or implode?
मयंक ला टेस्ट करण्याची संधी भारतानं गमावली.
दुसर्या सत्रात ऑसीज 64-3 !
दुसर्या सत्रात ऑसीज 64-3 ! खेळपट्टी चांगली असूनही. चेंडू वळत नसलयाने ' फ्लाइट 'चा सुंदर वापर करून अश्विनचे दोन बळी.
ख्वाजा गेला! आश्विनचा अप्रतिम
ख्वाजा गेला! आश्विनचा अप्रतिम चेंडू. त्याला खेळायला भाग पाडलं. आश्विनची दृष्ट काढा कोणीतरी.
Pages