क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीच्या धाग्यावरचे प्रतिसाद -

नाईट वॉचमन म्हणून कोणाला पाठवायचे असे तुम्हाला वाटते? >> पंत ला Lol खुश आता का बर्ग Happy >> नावॉ सारखे जाबबदारीचे काम पंत ला? अरेरे ईशांत परवडला त्यापेक्षा.

पंतबद्दल आता मला बोलणे अयोग्य वाटते कारण तो संघात आहे. >> Lol ह्या न्यायाने संघातल्या बाकीच्या दहा जणांबद्दल पण बोलणे अयोग्य होईल ना. Proud अगदी शास्त्री बद्दल सुद्धा. Wink

ह्या क्षणी तरी इंग्लंडमधे कार्‍थिक ऐवजी तो जास्त चांगली किपिंग करतोय. बॅटीम्ग दोघेही गंडलेले आहेत पण माझ्या मते किपिंग साठी किपिंग हा पहिला criteria हवा. (साहाला पाठीम्बा देण्याचे कारण तेच). भरथ चांगला पर्याय होउ शकेल का हे माहित नाही. पुढे कळेल. > अरे पण बॅटिंग साठीच पंत ला आत घ्या म्हणत होतास ना तू एवढे दिवस? आता म्हणतो किपिंग बघा... एवढे बाईज देऊन सुद्धा.. Uhoh पंत ने खराब बॅटिंग आणि कीपिंग केली ह्याचे ऊत्तर कार्तिक ने पण केली हे कसे काय?
भरथ चांगला पर्याय होउ शकेल का हे माहित नाही. >> धन्य!

हणुमा विहारीचा record impressive आहे. टेस्ट मधे यायला जे काहीकरायला हवे असे इथे सगळॅ म्हणत आले आहेत ते सगळे बॉक्सेस तो टीक करतोय. >> मग हनुमा विहारीबद्दल का बोलतो आहेस... पंत बद्दल न बोलण्याचे लॉजिक त्याला लागू नाही का? की फक्त तू रिकमेंड केल्यांपैकी जो चांगला खेळेल फक्त त्याच्याबद्दलच बोलायचे Proud खेळला तो बाब्या खपला तो कार्टा... ये ना चॉलबे Proud
Submitted by हायझेनबर्ग on 11 September, 2018 - 04:46

आज मीचे भेटलो का बाबा तुला ? मी कधी पंत ला फक्त बॅटींग साठी घ्या म्हटले ? मी नेहमी हेच म्हटलय कि किपर आधी किपर म्हणून हवा (साहा च हवा असा कंठशोष मी नि फे फे इथे करत होतो धोनी झगडत असताना). बॅटींग बोनस येते. "पंतबद्दल आता मला बोलणे अयोग्य वाटते कारण तो संघात आहे." ह्याचे एव्हढे साधे स्पष्टीकरण आहे पण तुला ते कळून घ्यायचे नसेल तर सॉरी माझा पास बाबा.

भरथ चांगला पर्यात होउ शकतो का हे मला माहित नाही कारण मी त्याला कधी आधी follow केले नाही फक्त त्याच्याबद्दल (फे फे ने वर त्याचे नाव लिहिले ते बघितल्यावर) वाचले आहे हे मी नमूद करतो. तुला त्यातून काय अर्थ काढायचा असेल ते तू बघ.

फक्त तू रिकमेंड केल्यांपैकी जो चांगला खेळेल फक्त त्याच्याबद्दलच बोलायचे >> मी तुला कधी बंदी केली बोलण्याबद्दल ? तू बोलू शकतोस पण मी बोलायलाच हवे ही जबरदस्ती का बाबा ते नाही कळले ? माझ्या अल्पमती प्रमाणे टेस्ट साठी साहा available असेल तर नेहमीच पहिली choice असली पाहिजे. तो नसेल तर पंत कारण तो तरूण आहे, त्याचे किपींग बाकीच्या उपलब्ध पर्यांयांपेक्षा चांगले आहे. (कमीत कमी त्यांच्यापेक्षा वाईट नाही). तो लेफ्टि आहे. बॅटीग क्लिक झाली तर बोनस मिळू शकतो. (हे मी नाही Gilchrist म्हणालाय, तुला शंका असल्यास त्याला विचारु शकतोस). होतकरू आहे. हे सगळे बघता त्याला ग्रूम करने सयुक्तिक वाटते. (ह्यात मी भरथ ला धरत नाही कारण मला डीटेल्स माहित नाही). ग्रूम Domestic cricket मधे करणे झाले असते तर आवडले असते पण सध्या आपण त्याला फारशी value देत नाही नि on the job training हा मंत्र दिसतोय. If I have to punt some keeper beyond Saha then I would prefer Pant हा साधा विचार आहे. २-३ सामने बॅटींग केली नाही म्हणून कीपरला त्या न्यायाने बसवणे पटत नाही. दिलेल्या byes धरूनही (वर हिम्या ने त्याचेही सयुक्तिक कारण दिले आहे) कार्थिक पेक्षा उजवे (no pun intended) यष्टीरक्षण केले आहे त्यामूळे 'फक्त मी त्याचे नाव सुचवले होते' ह्या अजब न्यायाने त्याच्याबद्दल बोलणे माझ्या डोक्यावरून जातेय रे.
Submitted by असामी on 11 September, 2018 - 06:03

उद्या कुकला आदरांजली म्हणून कोणी तरी उद्या त्याच्यासारखा उभा राहील अशी आशा धरूया.
Submitted by असामी on 11 September, 2018 - 06:14

उद्या कुकला आदरांजली म्हणून कोणी तरी उद्या त्याच्यासारखा उभा राहील अशी आशा धरूया. >>> Lol ते शेफ चा ड्रेस घातलेले त्याचे फॅन्स मस्त होते.
Submitted by फारएण्ड on 11 September, 2018 - 10:08

खरे म्हणजे या १४७ धावांच्या जोरावर कूकने आणखी १०- १५ टेस्ट्स खेळायला हवे होते . अजून त्याच्यात खूप क्रिकेट शिल्लक आहे या नावाखाली. (अजून उसाच्या पाचटात खूप रस आहे !) निदान आपल्याकडे तरी झाले अस्ते बोवा तसे. पण इतर देशात क्रिकेटम्ध्य फार पैसा नसल्याने लोकांना रिटायर व्हायला फार विचार करावा लागत नसावा.....
Submitted by बाबा कामदेव on 11 September, 2018 - 13:14

मुरली विजय साहेबांना IPL नाही तर वाढतं वय नडतं आहे. आता तो पस्तिशीचा आहे. गेल्या दीड वर्षांत (१ फेब्रुवारी २०१७ ते आत्तापर्यंत) तो १२ टेस्ट्स खेळला. (एकूण संख्येच्या १/५) त्यात त्याची सरासरी करीअर सरासरीपेक्षा ४ ने खाली आहे. (३९ --> ३५) ह्या कालावधीत त्याची चार शतकं हैदराबाद (बांग्लादेश), नागपूर (श्रीलंका), दिल्ली (श्रीलंका), बंगलुरु (अफगाणिस्तान) ही आहेत. ह्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात ८२ वगळता मोठी धावसंख्या नाही. दुसर्‍या डावात (जेव्हा आपण दुसरा डाव खेळलो) तर त्याच्या धावसंख्या - ७, २, ८, ९, १३, ९, २५, ६, ० - अश्या आहेत. एका चांगल्या खेळाडूबरोबर एज हॅज कॉट अप. मन बळकट करून गेममध्ये वयानुसार गरजेपुरते बदल करून चांगला खेळणार असेल तर अजून २-३ वर्षे खेळेल ३७-३८ पर्यंत. (तशी क्षमता आहे त्याच्यात.) अन्यथा बाय म्हणायला फार वेळ लागणार नाही.
Submitted by भास्कराचार्य on 11 September, 2018 - 15:51

अख्ख्या सिरिज भर ऋन्मेषची एकही कमेंट नाही हे बघून जरा कसनुसं होतं आहे....

आपण आज लंच पर्यंत तरी टिकणार का? लावा बेट....
Submitted by हिम्सकूल on 11 September, 2018 - 17:48

आपण आज लंच पर्यंत तरी टिकणार का? लावा बेट....>>>

हिम्स, जेवणाचा आस्वाद घेऊन खेळतील बघ.. चहापाना पर्यंत कसाबसा नेऊ शकतील. चहापानानंतरची रिस्क नाही घेत! Wink
ह्या सामन्यात टी टाईम नंतर धपाधप आऊट झालेले दोन्ही संघातले..
Submitted by कृष्णा on 11 September, 2018 - 18:36

राहुल १००

ऑस्ट्रेलियाला जाणार ( आणि ) परत विकेट फेकणार

जर नायरला ३०० करूनही बसवलं होतं तर याला पण बसवायला हवं
Submitted by अँकी नं.१ on 11 September, 2018 - 20:55

सगळे ऑड्स भारताविरूद्ध आहेत. पण तरिही राहूल, रहाणे आणी आता पंत ह्या तिघांनी चांगली फाईट दिलीये. हेच बघण्यासाठी टेस्ट क्रिकेट बघायला आवडतं. ह्या सगळ्या पार्श्वभुमीवर धवन चा अ‍ॅटीट्यूड, टेक्निक, टेंपरामेंट फारच उघडं पडलं ह्या सिरीज मधे.
Submitted by फेरफटका on 11 September, 2018 - 21:22

"Highest 6th wkt stand for India in the 4th inns, going past 136 b/w Tendulkar & Mongia v Pak, Chennai, 1999", says Bharath Seervi.

अजून १८६ धावा बाकी. ३७ ओव्हर्स बाकी.
Submitted by भास्कराचार्य on 11 September, 2018 - 22:19

भा, मुरली विजय ची सुरूवातीची त्याची टेस्ट प्लेअर इमेज अजूनही डोक्यात आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदा तेंडुलकर बरोबर ३०० ची भागीदारी, स्वतःचे शतक वगैरे. आत्ता स्टॅट्स पाहिले तर घरच्या मैदानावर अजूनही बराच भक्कम दिसतोय तो. गेल्या दहा टेस्ट मधे/साधारण मागच्या दोन वर्षांत पाच शतके आणि एकदा ८२. प्रॉब्लेम बाहेर च्या मैदानांवरचा आहे. अर्थात तुलना करायला इतरांचे स्टॅट्स बघितले नाहीत.

पण आयपीएल हा मुख्य प्रॉब्लेम नाही हे खरे असावे. माझ्या डोक्यात तो मधली काही वर्षे आयपीएल मधेच दिसला आणि त्यामुळे त्याचा खेळ बिघडला असे वाटले.
Submitted by फारएण्ड on 11 September, 2018 - 22:22

आत्ता स्टॅट्स पाहिले तर घरच्या मैदानावर अजूनही बराच भक्कम दिसतोय तो. गेल्या दहा टेस्ट मधे/साधारण मागच्या दोन वर्षांत पाच शतके >>> ती कोणासमोर आहेत ते मी लिहिले आहे. प्रॉब्लेम किंचित हळू झालेल्या शरीराचा आणि त्यामुळे झालेल्या टेंटेटिव्ह मनाचा आहे, जे बाहेरच्या पिचवर जास्त ब्रुटली एक्सपोझ होते. नाहीतर तसा तो माँक आहेच. पण दुसर्‍या इनिंगमध्ये हाइयेस्ट एकदाही २५च्या वर नाही, घरीही नाही.

मुरली विजय ची सुरूवातीची त्याची टेस्ट प्लेअर इमेज अजूनही डोक्यात आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदा तेंडुलकर बरोबर ३०० ची भागीदारी, स्वतःचे शतक वगैरे. >>> ते तर आहेच. तो चांगला खेळाडू होताच आणि आहेही. त्याचा डेब्यु २००८मध्ये होता तेव्हा तो २५चा होता, पण त्याला अ‍ॅक्चुअल लाँग रन लगेच मिळाली नाही, त्यामुळे २७च्या आसपास असलेली बॅट्समनची पीक इयर्स त्याला तितकी मिल्क करायला मिळाली नाहीत.
Submitted by भास्कराचार्य on 11 September, 2018 - 22:35

पंतचे पहिलेवहिले शतक! अभिनंदन!
Submitted by भास्कराचार्य on 11 September, 2018 - 22:35

पंत फुल स्विंग मधे धुतोय.. शतक झाले.. आता टी-२० करा शेवटच्या सत्रात आणि मॅच जिंका..

राहुल पण धोपटू शकतो.. आता फक्त नवीन बॉल घेतल्यावर काही कोलॅप्स व्हायला नको...
Submitted by हिम्सकूल on 11 September, 2018 - 22:36

मॅच चा निकाल काहीही लागो. पंत नी कार्थिक - पटेल जोडीचा निकाल लावला हे खरंही आहे आणी बरंही आहे. किती वर्षं, त्याच जुन्या खोडांना कवटाळून बसणार होतो आपण? ते सुद्धा, त्यांच्या जबरदस्त परफॉर्मन्स पेक्षा, दुसरा काही उपाय नसल्यामुळे. way to go Pant!
Submitted by फेरफटका on 11 September, 2018 - 22:43

३३ षटके १६६ धावा.. की ५ बळी की अनिर्णित???
आपापले अंदाज येऊ द्या..

ओव्हलवरच गावस्कर २२१ करून ४३८ चे लक्ष आटोक्यात आणलेले तेंव्हा 9 धावा कमी पडल्या व अनिर्णित राहिला सामना अनिवार्य षटके संपलेली..
Submitted by कृष्णा on 11 September, 2018 - 22:55

प्रत्येक सामन्याचं भाकीत मागच्या आंकडेवारीवरून न करतां त्या सामन्यात मागच्या आंकडेवारीला हुलकावणी देण्याची कुवत आहे असं समजून सामना पहायला बसणं अधिकच आनंदायक असतं. या सामन्याने तसा आनंद देण्याचं ठरवलंय !
Well played ! Keep up.
Submitted by भाऊ नमसकर on 11 September, 2018 - 23:00

I am glad to accept that I did not see it coming.
राहूल आणि पंत.. अतिशय कौतुकास्पद प्रयत्न.
निकाल काहीही लागो... पण पाचव्या टेस्टच्या पाचव्या दिवशी पाच विकेट्स स्वस्तात पडलेल्या असतांना आणि कोणालाही अपेक्षा नसतांना डोंगराएवढे लक्ष पार करून जिंकण्याची आशा निर्माण करणे हीच खूप मोठी अचिवमेंट आहे.
नक्कीच काही काळ लक्षात राहिल ही खेळी.
Submitted by हायझेनबर्ग on 11 September, 2018 - 23:10

राहुल गॉन! रशिद बोलिंग अ रिपर. छान खेळी. १४९.
Submitted by भास्कराचार्य on 11 September, 2018 - 23:27

राहुल कसल्या डेंजर प्रकारे बाद झाला. फूट भर वळाला बॉल.
Submitted by हिम्सकूल on 11 September, 2018 - 23:27

पंत आणि जाडेजाने शांतपणे खेळून काढायला पाहिजे आता.. जिंकण्याची शक्यता नाहीच, निदान ड्रॉ तरी फिक्स करा
Submitted by हिम्सकूल on 11 September, 2018 - 23:30

आता तर ड्रॉ चीही शक्यता नाही. जडेजा आणि इशन्त....
Submitted by बाबा कामदेव on 12 September, 2018 - 00:08

Well played ! Keep up. >> +१
Submitted by असामी on 12 September, 2018 - 00:10

पोस्ट टी सेशन आपला लौकिक ह्या सामन्यात कायम.. सर्व ५ दिवस..

५-३२५ ते १०-३४५. २० धावात संपला शेपटाचा प्रतिकार..

राहुल, पंत आणि काहीसा रहाणे ह्यांनी रंगत आणली शेवटच्या दिवशी.

३७ धावसंख्या करून कितीजण बाद झाले ही पाहायला हवे..
Submitted by कृष्णा on 12 September, 2018 - 00:45

अपने पाक मकसदसे इस तरह हट गये...
फाडना था दुष्मनको , खुद ही फट गये...

# भारत - इंग्लंड टेस्ट सिरीज
Submitted by बाबा कामदेव on 12 September, 2018 - 01:55

दोन महिन्यापूर्वीची माझीच एक प्रतिक्रिया--

रच्याकने, या इंग्लंड दौर्‍याची स्पोर्टस चॅनल्स वर दिसणारी जाहिरात इंग्रजांच्या दृष्टीने केल्यासारखी वाटली का कोणाला ?!!! आपल्या टीमला शालजोडीत मारल्यासारखी.. जाहिरात संपते ती सुद्धा या नोट वर की पाहूया या वेळेस शर्ट काढला जातो की पॅन्ट निघते !! सगळ्या जाहिरातीचा सूर हा आपली टीम ओव्हरहाइप्ड असून मार खाउन येते बघा असा वाटला !
कणेकरांच्या फटकेबाजीची आठवण आली.. .. लॉर्डच्या मातीत डोंगर डोंगर खेळले असतील ! Happy

Submitted by मित on 14 July, 2018 - 08:31

सोनीच्या भारत - इंग्लंड सिरीजच्या ऍडमधे होतं ना :
इस बार शर्ट उतरेगी या पँट

वनडे अन टेस्ट सीरीज लक्षात घेतली तर पँट उतरली यात काहीही संशय नाही

आशिया कप आता सब- काँटिनेन्टच्या पाटा विकेट्स वर असणार
म्हणजे आपले शेर औलरेडी सव्वाशेर
( निदान ) आता तरी कोहली नसल्यानी फार फरक पडू नये
केदार जाधवला चान्स मिळेल का?
टिपिकल ११ : शर्मा, धवन, राहुल, कार्तिक/पांडे, रायुडू, धोणी, पांडया, कुलदीप, चहाल, बुमरा, भुवी

पंतचा परफॉर्मन्स बघून आता वाटतंय की धोनीने आता निवृत्तीकडे बघायला हवं. #WC19

:पॉपकॉर्न घेऊन येणारा बाहुला: Proud

भाचा सगळीकडेच पॉपकॉर्न घेऊन बसणार का आता.. असाही धोनी वर्षभरात नक्की रिटायर होत नाही तेव्हा हे पॉपकॉर्न न फुटताच संपू शकतात

पंतचा परफॉर्मन्स बघून आता वाटतंय >> पर्फॉरमन्स ???
तुम्ही हे असे एका दिवसाच्या खेळावरून अर्ध्याकच्च्या मडक्यांना डोक्यावर घेता आणि जरा जास्त पाणी भरून गळायला लागले की नावं ठेवता नाही तर नावं टाकता. Proud
जरा दाखवू दे की सातत्य टेस्ट मध्ये, बिनमहत्वाच्या वनडे मध्ये. मडके थोडे पक्के झाले की घेऊच की डोक्यावर.. पण तोवर पक्केच मडके बरे...नाहीतरी आपल्याला डोक्यावर एखादे मडके हवेच असते कायम.. ऐन वेळी फोडायला बरे पडते.... एक गेले की दुसरे Proud
वर्ल्ड कप मध्ये खेळणे म्हणजे आयुष्याचे फलित थोडेच आहे विचारा पियुश चावला ला Lol

असाही धोनी वर्षभरात नक्की रिटायर होत नाही >>> हो पण त्याने व्हावं की नाही, हा प्रश्न इथे व्हॅलिड आहेच. Happy तसंही धोनी काय उद्या रिटायरमेंट डिक्लेअर करेल असंही होईल. त्याचं काही सांगता येत नाही. टेस्ट सिरीज अर्ध्यावर सोडून गेला होता तो.

बिनमहत्वाच्या वनडे मध्ये >> अश्या नसतातच, असं मला मागच्या धाग्यावर ठणकावून सांगण्यात आलं आहे. Proud

पक्क्या मडक्यांची माती भुसभुशीत होऊन पाणी गळायला लागलं आता. त्यापेक्षा कच्च्या मडक्यांना भाजा व्यवस्थित आगीत. Proud सॅम करनने काय वेगळं केलं? तसाही पंत अ‍ॅक्चुअल फिनिशरच आहे. लिमिटेड ओव्हर्समध्ये आणि आता टेस्टमध्येही फीअरलेसली खेळला आहे. धोनी क्रुशिअल नॉकऔट मॅचमध्ये स्ट्राँग अपोझिशनसमोर फिनिश करणार नाही, अशा धास्तीत राहण्यापेक्षा आणा की नव्या फिनिशरला. धोनीचा चार्म आता संपला आहे.

पक्क्या मडक्यांची माती भुसभुशीत होऊन पाणी गळायला लागलं आता. >> पक्के मडके भुसभुशीत नाही होत हो त्यांना तडे जातात. कच्चे मडके होतात भुसभुशीत आणि प्रेशरखाली गळायला लागतात Proud
पेक्षा कच्च्या मडक्यांना भाजा व्यवस्थित आगीत. Proud >> हो हो.. आणि पक्क्या मडक्यांच्या मागे रचून ठेवा.
पंत फिनिशर आहे, फीअरलेस आहे वगैरे सगळे मान्य पण अजून 'टेस्टेड ओके' चा शिक्का लागायचा आहे. तो लागल्याशिवाय पुढे पाठवणे नको.

धोनीचा चार्म आता संपला आहे. >> कोणता वाला? विकेट कीपर धोनी? बॅट्समन धोनी? फिनिशर धोनी? लीडर धोनी? थिंकर धोनी? की एक्सपिरिअन्स्ड धोनी? सगळे? मग नुसती फिनिशर धोनीची रिप्लेसमेंट आणून कशी चालेल? Lol

हे माझे धोनी प्रेम नाही तर त्याच्या मॅचिंग रिप्लेसमेंटवरचा अविश्वास बोलतो आहे. Proud

तसंही धोनी काय उद्या रिटायरमेंट डिक्लेअर करेल असंही होईल. त्याचं काही सांगता येत नाही. टेस्ट सिरीज अर्ध्यावर सोडून गेला होता तो. > हो हे मात्र खरे.

कोणता वाला? विकेट कीपर धोनी? बॅट्समन धोनी? फिनिशर धोनी? लीडर धोनी? थिंकर धोनी? की एक्सपिरिअन्स्ड धोनी? सगळे? मग नुसती फिनिशर धोनीची रिप्लेसमेंट आणून कशी चालेल? >>> लीडर? तो तर कोहली आहे. थिंकिंग एक्सपिरीअन्स वगैरे अब सब कोहली के हाथ में. बॅट्समन/फिनिशर धोनी केव्हाच बोंबललाय. ह्या बाबतीत पंत आहेच त्याची रिप्लेसमेंट. तुम्ही तर ह्या लॉजिकने धोनीला १०० वर्षांचा होईपर्यंत खेळवाल. तरी बरं टेस्टमधून कोहलीने वेळीच त्याची गच्छन्ती केली.

हे माझे धोनी प्रेम नाही तर त्याच्या मॅचिंग रिप्लेसमेंटवरचा अविश्वास बोलतो आहे. Proud >>> असू दे हो धोनीप्रेम. Proud काय बिघडत नाही प्रेम असेल तर. त्याला तरी प्रेम कुठून मिळणार नाहीतर?

शर्ट उतरेगी या पॅण्ट - गांगुलीच्या २००२ च्या शर्ट फिरवण्याशी संबंधित आहे ना? बहुधा शर्ट काढने म्हणजे तेव्हासारखे जिंकणे आणि पॅण्ट काढली जाणे म्हणजे पराभव असे काहीतरी दिसते.

पॅण्ट तर निघालीच. ओडिआय आणि टेस्ट दोघांमध्येही. असामी म्हणेल "फार विरोध करून निघाली", पण कशीही निघण्यापेक्षा न निघालेलीच जास्त बरी, असे माझे मत्त आहे. Proud

लीडर? तो तर कोहली आहे. >> हो हो...कोहली आहे... म्हणे. Proud
तुम्ही तर ह्या लॉजिकने धोनीला १०० वर्षांचा होईपर्यंत खेळवाल. >> कसचं काय हो! #WC19 मिशन पार पडले झाले.

जोक्स अपार्ट भा..
नुसता हातात बॅट असलेला फिनिशर एवढा एकच रोल पुरेसा असतो का? वरचढ फिनिशर समोरच्यांकडेही असतात.. रसेल, ब्रावो, फॉकनर, बटलर, टेलर वगैरे लोकही आहेत. दरवेळी फिनिशरची बॅट पुरी पडेलच असे नाही. फिनिशर म्हणून फेल झाल्यावर वरच्या एक ना अनेक रोल्स मध्ये वेळेवेळी जाऊनही धोनीने सक्सेसफुली मॅच काढून दिलेल्या आहेत. ती रिप्लेसमेंट ना कोहली करू शकतो ना पंत.
आणि तुमचा पंड्या का नाही म्हणे फिनिशर?

भा - एक कीपर म्हणून काय मत? पंतांना एक कॅच सोडताना पाहिले पण एका अ‍ॅनेक्टोटल पुराव्यावरून लगेच जजमेण्ट गाठत नाही. तरीही किमान एक कीपर म्हणून धोनी वि पंत मधे कोण सरस आहे सध्या?

दुसरे म्हणजे धवन च्या जागी पंत ओपनिंगला येउ शकेल का?

पंतांना एक कॅच सोडताना पाहिले पण एका अ‍ॅनेक्टोटल पुराव्यावरून लगेच जजमेण्ट गाठत नाही. >> तेच मीही सांगतो आहे... एका अ‍ॅनेक्डोटल ईनिंग वरून तो आजच्या आज धोनीला रिप्लेस करू शकतो हे जजमेंट गाठणे अयोग्य आहे.

दुसरे म्हणजे धवन च्या जागी पंत ओपनिंगला येउ शकेल का? >>धवनचा ईंग्लंड मधला पर्फॉर्मन्स बघता ही पॉसिबिलिटी जास्त प्लॉजिबल आहे.

फा, अ‍ॅज ऑफ नाउ इट लूक्स सर्टन की चहल आणि यादव दोन तरूण लेगस्पिनर्स आपण इंग्लंडला घेऊन जाणार आहोत, आणि त्यामुळे धोनीला विकेटकीपर म्हणून (स्पिन बोलिंग कॅप्टन म्हणून) सध्या पर्याय नाही. तसं तर एमेसके प्रसादने २०१७ मध्ये जाहीर केलं आहे की सिलेक्टर्स २०१९पर्यंत पंत/सॅमसन हे लोक धोनीच्या जवळ गेले तरी त्यांच्याकडे बघणारही नाहीत. त्यामुळे धोनीचा मार्ग त्याने स्वतः रिटायरमेंट घेतली / इंज्युरी हे सोडता कोणीही अडवू शकत नाही. त्यातून धोनी आसुसलेल्या कोहलीला रिव्ह्यू घे किंवा नको घेऊ हे सांगू शकतो तसं तरूण कोणी सांगू शकेलसं वाटत नाही.

पण मला स्वतःला पंत धोनीपेक्षा चांगला आहे की नाही हे तितपत ठामपणे सांगता येणार नाही, तरी चांगला वाटतो हे खरे. २००३ मध्ये तर द्रविड विकेटकीपर होता. त्यामुळे हे असं काही अ‍ॅब्सोल्युटली मला म्हणता येत नाही. त्यातून २०१९चा धोनी हा २०१७चाच धोनी असेल का, हे माहिती नाही.

मला स्वतःला असा सिनारियो ह्या केसमध्ये प्लॉजिबल असा वाटतो, की एक मॅच अशी असेल (इंग्लंड? ऑस्ट्रेलिया? क्वार्टर/सेमीफायनल?) की ज्यात हे दोन्ही स्पिनर 'फाऊंड आऊट' होऊन जबर धावा देतील, आणि ह्याच दोन्ही स्पिनर्समुळे शेपूट जास्त लांब होऊन मिडल ऑर्डरमध्ये जर कोणी खेळलं नाही, तर मॅच जाईल. धोनी परवा इंग्लंडमध्ये दुसर्‍या वन-डेमध्ये ५९ बॉल ३७ खेळला आणि तिसर्‍या मॅचमध्ये ६६ बॉल ४२. त्यातून नवीन नियमाप्रमाणे डीपमधला एक्स्ट्रॉ फिल्डर त्याच्या अगेन्स्ट जातो आहे.

धवनऐवजी पंत हे इंटरेस्टिंग आहे. पंत नवीन स्विंगिंग बॉलवर काय करतो कोणास ठाऊक. पण हे लोक असलं काही करणार नाहीत, हेही आहेच.

हाब, नीट काही कळलं नाही. <<वरचढ फिनिशर समोरच्यांकडेही असतात.. रसेल, ब्रावो, फॉकनर, बटलर, टेलर वगैरे लोकही आहेत. >> म्हणजे काय? क्रिकेटमध्ये दोन फिनिशर्स एकमेकांना कुस्तीसारखे भिडत नाहीत. त्यांचे फिनिशर्स आपल्या बोलर्सना धुणार. आपले फिनिशर्स त्यांच्या बोलर्सना.

फिनिशर म्हणून फेल झाल्यावर वरच्या एक ना अनेक रोल्स मध्ये वेळेवेळी जाऊनही धोनीने सक्सेसफुली मॅच काढून दिलेल्या आहेत. >>> ही आता जुनी आणि रेअर होत जाणारी आणि अ‍ॅनेक्डोटल गोष्ट आहे असं नाही का?

आणि तुमचा पंड्या का नाही म्हणे फिनिशर? >> पंड्याचा कन्सिस्टन्सी इशु आहेच. त्यामुळे धोनीचं फेल्युअर जास्त मॅग्निफाय होतंय हे खरंच. म्हणूनच लोअर मिडल ऑर्डर बळकट करायला हवी.

असामी म्हणेल "फार विरोध करून निघाली", पण कशीही निघण्यापेक्षा न निघालेलीच जास्त बरी, असे माझे मत्त आहे. <>> भा आणी बर्ग, मी तुम्हाला दोघांना एव्हढीच कळकळीची विनंती करेन तुम्हाला जे काही मत मांडायचे असेल ते स्वतःच्या शब्दांमधे मांडा. मला काय लिहायचे आहे किंवा मी काय म्हणतो आहे वगैरे ते तुम्ही ठरवून मांडू नका. माझ्या खांद्यावरच्या आपापल्या बंदूका उतरवा. आगाऊ धन्यवाद.

रीही किमान एक कीपर म्हणून धोनी वि पंत मधे कोण सरस आहे सध्या? >> माझ्या मते कीपर म्हणून धोनी. पंतला कीपर म्हणून बराच पल्ला गाठायचा आहे असे वाटते.

दुसरे म्हणजे धवन च्या जागी पंत ओपनिंगला येउ शकेल का? >> ह्याचा अर्थ धवनपासून मूव्ह ऑन होतोय असा होतोय. ग्रूम करायला नक्कीच हरकत नसावी. लेफ्टी आहे हा फायदा आहेच. राहूल नि कोहली ३ नि ४ वर असतील तर हरकत नसावी.

तुम्हाला जे काही मत मांडायचे असेल ते स्वतःच्या शब्दांमधे मांडा. >>> तुझ्या म्हणण्याबद्दलचं माझं मतच आहे ते. त्यामुळे तुला नक्की काय म्हणायचं आहे ते काही कळालं नाही.

भा शब्दांशी खेळण्याची माझी खरच इच्छा नाही. त्यासाठी इतर बाफ आहेत ते माझ्यासाठी पुरेसे आहेत. तुला कळले नसेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे असे धर नि सोडून दे.

तो तर नेहमी धरतोच. Proud पण तुझ्या खांद्यावर बंदूक माझी तरी कधी नव्हती, त्यामुळे ती उतरवायचा प्रश्न उपस्थित होत नाही, एवढेच.

असामी,
अरे मी कधी ठेवली तुझ्या खांद्यावर बंदूक? मुळात तुझी आणि माझी बंदूक, टार्गेट आणि फायरिंगची दिशाच कधी एक नसते (थोडक्यात आपली मत नेहमीच वेगळी/विरूद्ध असतात) तर मी कशी ठेवणार माझी बंदूक तुझ्या खांद्यावर? Proud
ऊदा. बघ..
राहूल नि कोहली ३ नि ४ वर असतील तर हरकत नसावी. >> राहूल नि कोहली निवर असतील तर हरकत नसावी.
कोहलीने ३ नंबर कदापी सोडू नये... स्वतःच्या क्लोनसाठी सुद्धा नाही.

जाऊ दे, तुम्हाला साध्या सरळ शब्दात सांगूनही तुम्ही दुर्लक्ष करायचेच ठरवले आहे तर असो. तुमचे सुरू असू दे.

क्रिक इंफो वाल्यांची पण कमाल आहे. ह्या लेखाची सुरूवात पहा.

http://www.espncricinfo.com/story/_/id/24660969/damning-scoreline-hides-...
India in England 2011: won 0, lost 4. India in England 2014: won 1, lost 3. India in England 2018: won 1, lost 4. Three tours, three resounding series defeats. Or so it appears. Upon closer examination, it is clear that the three series played out quite differently.

पंतला धवनच्या जागीं सलामीला ट्राय करणे महणजे एक चूक दुसर्या मोठया चूकीने दुरूस्त करायला पाहण्यासारखंच वाटतंय मला !

कसोटीसाठी पंतला धवनच्या जागीं सलामीला ट्राय करणे म्हणजे एक चूक दुसर्या मोठया चूकीने दुरूस्त करायला पाहण्यासारखंच वाटतंय मला !

Pages