क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळीच 5वी विकेट गेली, हेड आऊट.
मार्श आणि पेन चांगले खेळत आहेत.
काल फिंच ला जबरी ढापला. बॉल बॅटच्या जवळपास सुद्धा नव्हता

बुमराह आणि शामी भारी बॉलिंग करतायत सकाळपासून.
कोहली स्वतः किंवा रोहीत का बॉलिंग करत नाहीयेत? मधे १/२ ओव्हर टाकून बघायला हव्यात दोघांनीही.

रोहित शर्मा पाठ दुखते आहे म्हणून बाहेर गेलाय , पुढच्या मॅच मध्ये कोणाला काढायचे हा प्रश्न निकालात निघेल बहुतेक ह्याच्यामुळे

हा सामना आतां अधिकाधीक चुरशीचा होतोय. कोहलीची खरी कसोटी. मुरलीला एखादी ओव्हर द्यावी ?

धडधड चालूय... हपिसात बसून गूगलवर स्कोर बघतोय , ते ही ऑसी क्लायंटच्याच Wink
पण फिरभी दिल है हिंदुस्तानी Lol जिंका लवकर Proud

हुश्श..... जिंकलो एकदाचे Happy

६ बाद १५६ नंतर ९ बाद २७४ अश्या धावा आहेत ऑसीजच्या आत्ता!
आपण ६ बाद ३०३ नंतर सर्वबाद ३०७ केल्या त्या धावा देखिल स्वैर चेंडू मुळे अवांतर मिळालेल्या!

लॉयनला मॅन ऑफ द मॅच मिळवायचेच दिसतेय अजिबात दाद देत नाही कुणालाच!

आज लॉयनला मॅन ऑफ द मॅच मिळालेच तर भारतीय गोलंदाजांची खैर नाही! फक्त ३३ धावांची गरज ऑसीज ना!

अभिनंदन.
ऑसीजच्या पारंपारिक झुंजार वृत्तीला सलाम ! आपल्या शेपटाने त्यांच्याकडून खूप शिकणयासारख !!

एकंदरीत सामना जिंकलयाचं श्रेय बहुतांशी गोलंदाजी व यष्टीरक्षण यांकडेच.

आपल्या संघात अश्विनच्या जोडीला एक फिरकी गोलंदाज/ऑलराऊंडर आवश्यक. शेवटी अश्विनी दमछाक झालेलीच.

कोहलीने मैदानात प्रत्येक चेंडूवर चेहर्यावर प्रतिक्रिया दाखवणं त्याच्या करतां व संघाकरतां हितावह नसावं. खूप सुधारणा आवश्यक.

हुश्श!!
जिंकले एकदाचे !!!!

एकंदरीत सामना जिंकलयाचं श्रेय बहुतांशी गोलंदाजी व यष्टीरक्षण यांकडेच.>>

पुजाराचे दोन डाव आणि रहाणेचा एक डाव हे पण तेवढेच महत्वाचे!!!

*पुजाराचे दोन डाव आणि रहाणेचा एक डाव हे पण तेवढेच महत्वाचे!!!* - व्यक्तिगत नव्हे, युनिट म्हणून फलंदाजीकडे कमी श्रेय जातं .

फारच ताणून धरलं ऑसीजनी.
आपल्या तळाच्या फलंदाजांनी फारच बेजबाबदारपणे विकेट्स फेकल्या.
शामीला तर पहिल्या चेंडूपासून हाणामारीचा मूड असतो (चेंडू कुणीही टाकूदे, कसाही टाकूदे, मला किमान चौव्वा हवाच)

पुजाराला सलाम. रहाणे पुढे सिरीजभर बरा खेळो (एक इनिंग झाली, आता कायपण चालतंय असं नको)
पाचवा बोलर हवाच (किमान विहारी इतक्या केपेबिलिटीचा) मुरली विजय सातवा बोलर म्हणून ठीक आहे.
कोहलीनी स्वतः बोलिंग केली (अंडर १९ ला बर्‍यापैकी रेग्युलरली करायचा. जर केदार जाधव आयुष्यात कधी बोलिंग न करताही डायरेक्ट इंटरनॅशनल लेव्हलला बोलिंग करतो, तर कोहलीला करायला काहीच हरकत नाही) तरी विजयपेक्षा बेटर ठरेल.

<<आपल्या संघात अश्विनच्या जोडीला एक फिरकी गोलंदाज/ऑलराऊंडर आवश्यक. >>
पण काढणार कुणाला? नि कोण आहेत असे ऑल राऊंडर?

भाऊ, तुमचं अभिनंदन. ह्या विजयाचा तुमचा विश्वास दांडगा होता. Happy

जबरदस्त ग्रिपिंग टेस्ट मॅच झाली. मजा आली. ऑसीज सहजासहजी हार मानत नाहीत हे त्यांच्या डीएनए मधेच आहे. मस्त फाईट दिली. भारतीय संघाचं अभिनंदन! एंजॉय!

विजयाच्या आनंदात दुर्लक्ष न करता येणासारख्या बाबी म्हणजे, दोन्ही इनिंग्ज मधे ओपनर्स ने विकेट्स फेकणं, तिसर्या दिवशी बॅटींग ची झालेली पडझड, इशांत शर्मा चे नो बॉल्स आणी टीम सिलेक्शन. आणखीन एक बॉलर असणं - अगदी पार्ट टायमर म्हणून सुद्धा - गरजेचं आहे. ऑस्ट्रेलिया सहज हार मानणार नाही हे गृहीत धरून, अशाच जर सगळ्या मॅचेस झाल्या तर हळू हळू बॉलर्स दमत जातील. शर्मा च्या जागी विहारी हा बदल, एक बॅट्समन म्हणून आणी एक पार्ट टाईम स्पिनर म्हणून योग्य वाटतो. दोन्ही ओपनर्स, रहाणे आणी पंत ह्यांनी आप-आपल्या आऊट होण्याच्या पद्धतीकडे लक्ष देऊन सुधारणा करायला हवी. इतकी वर्ष खेळल्यावर सुद्धा सातत्यानं नो-बॉल्स टाकणं किंवा पॉपिंग क्रीझ च्या पुढच्या लाईन शी इतकी जवळीक साधणं हे इशांत शर्मा ने टाळायला हवं. एखादा नोबॉल मॅच टर्निंग ठरू शकतो.

जबरी! काल बर्‍याच दिवसांनी बाजूला ब्राउजर सेशन चालू ठेवून स्कोअर बघत होतो संध्याकाळभर. मजा आली.

ही मॅच लाइव्ह पाहिलेली नाही पण यू ट्यूब वर अतिशय सुंदर हायलाइट्स आहेत एचडी मधे. टेस्ट क्रिकेट ची पूर्ण ग्लोरी त्यात आहे.

* भाऊ, तुमचं अभिनंदन. ह्या विजयाचा तुमचा विश्वास दांडगा होता. * - आपल्या संघाबद्दलची माझी अंधश्रद्धा फार जुनी व परिचितांमधे एक चेष्टेचा विषय आहे. कोहलीच्या संघाने यावेळी मात्र मला टपल्या खाणयापासून वाचवलं.

Pages