पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

असं वर हेडरमधे लिहिलंय.

स्विट कॉर्न बॉल कसे करतात माहीत आहे का सृष्टी ?

प्राची धिरडेही करायला हरकत नाही पण त्यात काही मिक्स करावे लागेल का? बघते मी आरतीची लिंक. धन्स.

स्वीटकॉर्नची भुर्जी मस्त होते जागू. शिवाय कॉर्न+कॅप्सिकम भाजी, कॉर्न सलाद, भाजलेल्या कॉर्नचे सलाद / चाट इत्यादी अनेक प्रकार आहेत. पिझ्झा केलास तर त्यावर टॉपिंग म्हणून...

उपमा करून बघ जागू. भरड वाटलेला मका + भिजवून भरड वाटलेली चनाडाळ याचा उपमा मस्त होतो. Happy

महाबळेश्वर प्रसिद्ध कॉर्न पॅ टिस करा ताई. एक स्पिनॅच कॉर्न बेक पण आहे. फार पूर्वी मे केला होता. कृती शोधून देते,. मस्त लागतो.

जागु ता ई .. मागे अगो ने केले होते माझ्या विपुत तिने असे लिहिले आहे.

( कॉर्न-चीज आप्पेच केले मी पार्टीसाठी पण मैदा घालून आप्पेपात्रात जमले नाहीत. चिकटत होते. मग रवा-पोहे आणि थोडे तांदळाचे पीठ, भरपूर कोथिंबीर, भरडलेले कॉर्न, किसलेले चीज, मीठ-मिरपूड-आलंलसूण पेस्ट, चिमूटभर इनो घालून आप्पे केले. मस्त झाले ते. सगळ्यांना आवडले. )

मि केले ते मका पीठ , कोथिंबीर, भरडलेले कॉर्न, किसलेले चीज, मीठ-मिरपूड-आलंलसूणपेस्ट , मिठ - मी गोळे करुन डीप फ्राय केले . ( youtube वर बघायला मिळेल cheese corn balls recipe by sanjeev kapoor )

@जागू, अगं भाजलेले स्वीट कॉर्नचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, बा. चि. टोमॅटो, बा. चि. हिरव्या मिरच्या / ठेचा, पुदिना, कोथिंबीर, लिंबाचा रस, सैंधव - शेंदेलोण-पादेलोण इत्यादी एकत्र मिसळायचे.
त्यात ऑ ऑ, थोडा चिरलेला लसूण घातला तर आणखी वेगळी चव येते.

माधवी., या पानावर उजव्या या धाग्याच्या ग्रूपाचं नाव आहे - 'आहारशास्त्र आणि पाककृती', त्यावर क्लिक करा. नंतर विषयवार यादीवर क्लिक करा.

हा प्रश्न कुठे विचारावा हे न कळल्याने इथे विचारते आहे, माफ करा.
माझ्या कडे एलजी चा कन्वेक्शन मावे आहे आणि माला त्यात ब्रेड करून बघायचा आहे तर त्यात आईस्क्रीम चा डब्बा (अल्युमिंनियमचा) जो आडवा असतो तो वापरला तर चालेल का.
धन्यवाद

Pinky 80 please do not put any metal stuff in the microwave oven. It will spark and burn. only put microwave safe proven dishes inside the microwave.

इथे http://kitchen.manualsonline.com/manuals/mfg/lg/lws3081st.html
किंवा त्यांच्या साईटवर आहे का पहा. असल्या उपकरणांची मॅन्युअल्स, वॉरन्टी कार्ड इ. गोष्टी हाताशी ठेवाव्यात. वापरायला सुरुवात करायच्या आधी वाचाव्यात.
धन्यवाद.

पिच पाय, पिच जाम, पिच स्मुदी, पिच ओव्हन मधे अर्धवट बेक करुन व्हॅनिला आईस्क्रिम बरोबर खाणे,..असे बरेच प्रकार.
पिच पिकप फार्म ला जाऊन आलेली दिसतेस.

कन्वेक्षन मोड मध्ये चालतही असेल. मॅन्युअल मध्ये वाचून त्याप्रमाणे करा पिंकी८०. रविवारी तुम्ही उत्साहात काही करायला जाऊन तुम्हाला इजा होऊ नये म्हणून गडबडीत लिहीले. ब्रेड छान झाला कि लिव्हा इथे कृती.

मी काल कटाची आमटी बिघडवली. अर्धे इन्ग्रेडिअंटस नव्हते. आता सर्व खरेदी करून मगच ट्राय करणार. मातोश्रींच्या हातच्या आमटीची फार आठ्वण आली. त्यांची जणू रेशमी भरजरी साडी तर आमचा हातरुमाल झालेला. यू टूब वर रेशीपी आहे.

अकु, अश्विनी मामी धन्स. हे पण करुन बघेन.

सृष्टी धन्स आप्प्यांची आयडीया आवडली. आज संध्याकाळी करेन.

Pages