Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सालीची परतून कोरडी चटणी...
सालीची परतून कोरडी चटणी... अहाहा!
यात आई खोबर्याचा किस पन
यात आई खोबर्याचा किस पन घालायची <<
अरे हो.. पण कोरडं खोबरं ना.
ते विसरलेच...
हो कोरडच.. पण थोडं लांब लांब
हो कोरडच.. पण थोडं लांब लांब किसायचं... ते भाजलेल खोबरं, तीळ यांची जी काय चव असते ती म्हणजे...... शब्दात साम्गणे कठिण
त्या साली आधी मी सोलाण्यानेच
त्या साली आधी मी सोलाण्यानेच काढत होते, आता डायरेक्ट किसणीवर किसुन घेते, चांगल्या बारीक निघतात्.:स्मित:
साली व मिरच्या मिक्सरवर
साली व मिरच्या मिक्सरवर फिरवून बारिक होतात.फोडणीत कुरकुरीत परतल्या कि मस्त होते चटणी!
साबामेथड : दोडक्याच्या साली
साबामेथड : दोडक्याच्या साली सोलाण्याने काढून गॅसवर मंद भाजून कुरकुरीत करायच्या. मग त्याच भांड्यात साली काढल्यावर सुके खोबरे, तीळ भाजून घ्यायचे. मग प्रकरण मिक्सरातून काढून त्यात तिखट मीठ साखर हवी तर घालायचे. दा कु पण. आणि तवा वगैरे असतोच तोवर वापरून झालेला, पुन्हा शेकवायचं.
आता कधीकधी साली आधीच मिक्सरातून काढतात त्या. मग सगळं बाकीचं भाजून त्यात घातलं की अखंड हलवून, जिन्नस करपू न देता चटणी कुरकुरीत करतात.
इथे लिहायचे राहूनच गेले.
इथे लिहायचे राहूनच गेले. मंजूडी, शॅलो फ्राय रेसिपीज विपुत देशील का ? पुढच्या वेळी उपयोगी पडतील

ह्या वेळी योगेश कुलकर्णींनी सुचवल्याप्रमाणे कॉर्न अॅंड चीज आप्पे आधी थोड्या प्रमाणावर करुन बघितले ( माझ्या विपुत सृष्टी ह्यांनी कॉर्न-चीज बॉल्सची रेसिपी सांगितली होती ती सुद्धा बघितली आणि दोन्ही रेसिपी मिक्स केल्या. ) पण मैद्याचे आप्पे काही जमले नाहीत. चिकटत होते फार. मग प्रत्यक्ष पार्टीला रवा-पोहे आणि थोडे तांदळाचे पीठ, भरपूर कोथिंबीर, भरडलेले कॉर्न, किसलेले चीज, मीठ-मिरपूड-आलंलसूण पेस्ट, चिमूटभर इनो घालून आप्पे केले. मस्त झाले ते. सगळ्यांना आवडले.
सगळ्या सुचवण्यांबद्दल धन्यवाद
कोल्हापूरला मसाल्याची दुकाने
कोल्हापूरला मसाल्याची दुकाने कुठे आहेत सांगू शकेल का? स्पेशल विभाग आहे असे ऐकले आहे .
सेलरी नेहमी कच्ची एखाद्या
सेलरी नेहमी कच्ची एखाद्या डीपबरोबर खाल्ली जाते.
वेगळे काय करता येइल?
सेलरीच्या पानांची भाजी कुणी केली आहे का?
कशी लागते? पिठ पेरुन केली तर चालेल का?
अन्यथा सेलरीच्या पानांचे अजुन काय करता येइल?
वत्सला, सेलरीच्या दांड्याचे
वत्सला,
सेलरीच्या दांड्याचे सूप करतात. ओ द ग्रांते सारखाही प्रकार करतात. पण शिजल्यावर त्याचा क्रंचीनेस जातो.
आणि चवही गोडसर होते.
पाने सुपमधे घालतात. मी एकदा पेस्टो केले होते पण खास आवडले नाही.
धन्यवाद दिनेशदा. भाजी पण काही
धन्यवाद दिनेशदा.
भाजी पण काही खास लागेल असे वाटत नाहीये! पण उद्या कांद्याची पात आणि सेलरीची पाने अशी एकत्र पिथ पेरुन भाजी करण्याचा विचार आहे. केल्यास इथे सांगीनच.
मी ब्लडी मेरी करताना टो ज्यू
मी ब्लडी मेरी करताना टो ज्यू मधे सेलरीपण ब्लेंड करून टाकली होती. चव एकदम मस्त.
बरे, मला एक सांगा, पालक सूप
बरे, मला एक सांगा, पालक सूप करताना उकळलेल्या पालकात दूध आणि इतर मालमसाला घालून ते एकत्र वाटलं आणि उकळून प्यायलं तर ते शरीरास हानीकारक असते किंवा उपायकारक नसते असे काही आहे का?
वत्सला, सेलेरी, लसूण ( पाहिजे
वत्सला, सेलेरी, लसूण ( पाहिजे असल्यास कोथिंबीर ) बारीक चिरुन, गाजर किसून, मीठ-मिरपूड असे क्रीम चीज किंवा चक्क्यामध्ये कालवून स्प्रेड तयार होते. बेगल्स किंवा कुठल्याही ब्रेडमध्ये चोपडून मस्त लागते.
ही रेसिपी भरपूर सेलेरी खाण्यासाठी मस्त आहे. आधी मिळाली असती तर नक्कीच केली असती.
मी सिल्कन तोफू आणलंय. खरेतर
मी सिल्कन तोफू आणलंय. खरेतर ते तोफू स्टर फ्राय बनवण्यासाठी आणले होते पण पॅक ओपन केल्यावर ते अगदी खरवसासारखे मऊ आहे म्ह्ट्ल्यावर स्टर फ्राय जमणार नाही. सो आता मी त्याचे काय करु शकते? तिखट पदार्थ सुचवा प्लीज. गोड आहे घरात .
तेलावर आलं-लसूण, पाहिजे ते
तेलावर आलं-लसूण, पाहिजे ते मसाले घालून टोफू पाणी जाईपर्यंत परतून घ्यायचं, त्याला शेवटी मिळून येण्यासाठी थोडंसं बेसन लावायचं किंवा उकडलेला बटाटा किसून घालायचा, पाहिजे असेल तर कोथिंबीर किंवा पालक बारीक चिरुन घालायचा आणि आलू-पराठ्यासारखे पराठे लाटायचे. मस्त होतात. टोफूची विशिष्ट चव पराठ्यात सर्वात जास्त मारली जाते.
भुर्जीही करता येते पण माझा चॉईस पराठे
मंजूडी
मंजूडी http://www.maayboli.com/node/19207 ही रेसिपी बघ. ह्यात तुला अगदी उतरवता उतरवता थोडं दूध घालता येईल. भाज्या तिथे दिल्यात त्या सगळ्या पाहिजेतच असं नाही. जी असेल घरात ती घाल. ह्याच धाग्यावर पालकात मूग डाळ वगैरे घालून वेरियेशन्स पण आहेत.
.
.
टोफूचे पाणी दाब देवून काढून
टोफूचे पाणी दाब देवून काढून mash करून त्या मध्ये लोणचे मसाला,कोथिबेर ,हिरवी मिरची बर्रिक चिरून,जीरा पोवडेर,तिखट,मीठ टाकणे नंतर मावेल तसे गवह्चे पीठ टाकून मळणे. पराठे लाटायचे. मस्त लागतात.
बेसीक बटर नान जमतात. चीज नान
बेसीक बटर नान जमतात. चीज नान कसे करतात? आत पराठ्यासारखे चीज भरुन का
हो वर्षा!
हो वर्षा!
धन्स ग.. पुढच्यावेळी करुन
धन्स ग.. पुढच्यावेळी करुन पाहिल. कालच उरलेले पीठ गारलीक-नान करुन संपवले
तुरीच्या दाण्यांची एखादी पाकृ
तुरीच्या दाण्यांची एखादी पाकृ माहित आहे का कोणाला? फ्रोजन मटारच्या ऐवजी चुकून तुरीचे दाणे आणले गेलेत. ते मटारला सब्स्टिट्युट म्हणून वापरता येतील पण तरीही एखादी विशेष पाकृ असेल करायला आवडेल.
लिलवा कचोरीची कॄती गूगल करा.
लिलवा कचोरीची कॄती गूगल करा. त्यात असतात तुरीचे दाणे.
तुरीच्या दाण्यांची आमटी छान
तुरीच्या दाण्यांची आमटी छान लागते. रेसिपी मला माहीत नाही नीट. पण इथे माबोवर आहे, शोधून पहा.
धन्यवाद प्रॅडी, नताशा. बघते.
धन्यवाद प्रॅडी, नताशा. बघते.
माधवी., इकडे पहा -
माधवी., इकडे पहा - http://www.maayboli.com/node/2548/by_subject/14?page=28
.
.
अनिश्का., या बाफवर अजून शंभर
अनिश्का., या बाफवर अजून शंभर प्रतिसाद आले की तुमची ही कृती कशी शोधायची?
ते नाही माहित....
ते नाही माहित....
Pages