पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद प्राडी.
कुकरमधे मी वरण-भात दोन्ही लावते मग नेहमीपेक्षा जास्त वेळ ठेवला तर वरण गिच्च होईल ना?

कूकरला लावला तर भातासारखा मऊ नाही होत....काहितरी वेगळे धान्य शिजवल्यासारखा लागतो. म्हणजे तसा कच्चट लागतो.

मी आधी भिजवून करत होते...भिजवल्यावर कूकरला नाही लावायचा, वेगळा शिजवायचा ...पण मला तो कच्चटच लागतो. Chipotle मध्ये मिळतो तसा मऊ नाही लागत. ब्रँड बदलून बघा.

ट्रेडर जोज मधे एक क्विक कुकिंग ब्राउन बासमती मिळतो तो रोजच्या वरणाबरोबर कुकर मधे होतो तेवढ्या वेळात. आधी भिजवत नाही.

राईस कुकर मधे शिजवला तर छान मोकळे दाणे होतात. पाणचट नाही आणी कच्चट पण नाही. चायनीज राईस साठी परफेक्ट.तांदळाच्या प्रत्येक बॅच किंवा ब्रँड प्रमाणे पाण्याचं प्रमाण ठरवायला लागतं. ट्रायल अँड एरर असतं दरवेळी नवीन पिशवी उघडली की. पण जनरली अडीच ते तीन वाट्या पाणी लागतं. मी रोज नाही करत भात. त्यामुळे करते तेव्हा फक्त भातच लावते कुकरला. वरण , आमटीचे फॅन नाहीये पब्लीक. बरेचदा एखाद्या पातळ भाजी बरोबर खाल्ला जातो भात.

गट्टे की सब्जी हा प्रकार मला दह्याऐवजी टोमॅटो ग्रेव्हीतला हवा आहे. गट्टे बनलेले आहेत. ग्रेव्हीची कृती कोणी सुचवू शकेल का? कोफ्त्यासारखीच करावी असा विचार केला आहे नाहीतर.

आमची गोळ्याची आमटी असते तशी केली तर? तेलावर हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा परतऊन मग त्यात टॉमेटो टाकून परतावे. हळद, तिखट, मीठ घालावे. त्यावर वाटण ( सुके भाजलेले खोबरे, लसूण, जिरे ) टाकून परतावे, पाणी टाकून उकळावे, गट्टे टाकून एक दणकून वाफ आणावी. वरतून कोथिंबीर.

आमच्या राजस्थानी कामवालीकडे बिना दह्याचीपण ग्रेव्ही बनवतात गट्ट्यांची. एका प्रकारामध्ये गट्टे उकळलेलं पाणी बाजूला काढायचं. फोडणीमध्ये आलं-लसूण, जीरे, तिखट आणि मसाला घालायचा. त्यातच गट्टे घालून परतायचे आणि मग त्यात गट्ट्यांचं उकळलेलं पाणी घालून ते पाणी छान आळून येईपर्यंत उकळू द्यायचं.
दुसर्‍या प्रकारात फोडणीमध्ये आलं-लसणाबरोबरच कांदा परतायचा आणि नंतर थोडासा टॉमॅटो घालून नेहेमीप्रमाणे परतून घ्यायचं. मग बाकी मसाले आणि गट्ट्यांचं पाणी घालून उकळायचं.

(पण कामवालीच्या मते सगळ्यात छान दहीवाली ग्रेव्ही, त्यानंतर बिना-कांदा-टॉमॅटो-दहीवाली आणि शेवटच्या स्टेजला कांदा-टॉमॅटोवाली. तिच्या मते कांदा-टॉमॅटो घातल्याने ग्रेव्ही गोडसर होते थोडीशी.)

ओके. मलाही दह्यातलीच आवडते पण येणार्‍या पाहुण्यांपैकी एकीने अचानक सकाळी फोन करुन कळवले की तिला दुग्धजन्य पदार्थांची अ‍ॅलर्जी आहे.

मी टोमॅटो कांदा, आलं, लसुण पाण्यात उकळून नंतर त्यांची प्युरी केली, तमालपत्र-दालचिनी तेलात परतून त्यात प्यूरेसोबत कांदा-लसूण मसाला, गरम मसाला, लाल काश्मिरी तिखट परतलं. ग्रेव्हीत थोडी काजू पेस्ट घातली, गट्टे सोडले. दिसतेय तरी खमंग. बघूया आवडते का.

सिद्धलाडू करतात म्हणजे उकडीत थोडं मीठ, जिरं वगैरे घालून त्याचे रोल करून उकडवणे.
ही सोपी पद्धत सांगितली. पारंपारिक इ. सुगॄहिणी सांगतीलच Happy

मी बर्‍याच वेळा वाफवलेली कणीक + मुगाचे वरण किंवा नुस्त्या वाफवलेल्या कणकेच्या चकल्या करून बघितल्या आहेत. दर वेळी एखाद- दुसरा घाणा साधतो आणि बाकी चकल्या फसतात.

घरातल्या आई, आजी, मामी, मावशी इ अनुभवी मंडळींना विचारले असता अत्यंत संदिग्ध सूचना मिळाल्या:
१)तेल चाआआंगलं कडकडीत तापवावं आणि नंतर आंच कमी करावी.
२)तेल आधी जास्त तापवावं, पण अगदी चकल्या करपतील एवढं नाही, नंतर कमी तापमानाला चकल्या आतपर्यंत तळल्या जातील असं बघावं.
३) चकल्या करपट आणि आतून कच्च्या राहत असतील तर तापमान कमी करावं आणि मोडत असतील तर वाढवावं.
इत्यादी....
इत्यादी....

हे सांगणार्‍या वरील सुगरणींच्या चकल्या वर्षानुवर्षे उत्तम होत आलेल्या आहेत. पण दुर्दैवाने त्यांच्या सूचनांमधील 'कमी' म्हणजे किती आणि 'जास्त' म्हणजे किती हे मला अजून उमगलेले नाही. इथे परदेशात मला समोर बसवून माझ्याकडून चकल्या करवून घेणारे कोणी मिळण्याची शक्यता नाही.

चकल्या तळताना तेलाचे तपमान किती सेंटीग्रेद / फॅरनहीट असयला पाहिजे ?

डॉ. वर्षा जोशी यांचे "स्वयंपाक घरातील विज्ञान " असे एक चांगले पुस्तक आहे. नेमके आता नाही माझ्याकडे,
त्यात हि माहिती आहे.

गुजराती पध्दतीची तूर डाळ व साखर यांचं पुरण घातलेली लहान पुरणपोळी कशी करतात? कोणाकडे चांगली रेसिपी असल्यास प्लीज सांगा. मी तरला दलालची रेसिपी ट्राय केली पण पोळ्या खास झाल्या नाहीत. (मी एका गुजराती हॉटेलात फार चांगल्या छोटया गुजराती पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या. तेव्हापासून रेसिपीच्या शोधात आहे.)

खोबरे किंवा कांदा खोबरे हे वाटण असते.त्यातवेगवेगळे पदार्थ/फोडण्या असतात.हे मी आधी पोस्टलं होतं पण दिसत
नव्हतं.असं का?

कालपरवा बघितलेली हांडवो ची रेसिपी सापडतच नाहिये. त्यात पालेभाज्या टाकून पण हांडवो करता येईल असे लिहिले होते. प्लीज कोणाला सापडली तर सांगा.

मला नाहिच सापडते नारळाच्या आमटीची रेसिपी. आई करायची त्यात नारळाच्या चवाबरोबर हिरवी मिरची वाटुन घालायची. त्यात कांदा, टोमॅटो, थोडेसे डाळीचे पिठ टाकायची. पण या सगळ्याचा क्रमच नाहि आठवते Sad

माझ्याकडे ज्वारीच्या लाह्यांचं पीठ आहे. त्यापासून कुठ्ल्या रेसिपीज करता येतील? धिरडी करता येतील का? कशी करायची?

Pages