पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पीच भरपुर आहेत घरात . जवळ जवळ ३०/ ३५ .काय काय करता येइल ?

खायला सुरवात करा.. माझ्या घरात हे पीच असते तर मी एका दिवसातच फन्ना उडवला असता. सुंदर गोड फळांना साखरेत लडबडवुन त्यांची चव बिघडवायला मला अजिबात आवडत नाही.

रच्याकने, श्रीनगरला एक पिचसारखी बी असणारे, आकाराने, रंगाने आणि चविलाही साधारण पिचसारखेच लागणारे फळ पाहिले. मुंबईत पिच म्हणुन जी फळे मिळतात त्यांच्या अंगावर खुप लव असते, श्रीनगरच्या फळावर मात्र तेवढी लव नव्हती, थोडीफार होती पण न दिसणारी, जवळजवळ सफरचंदासारखे गुळगुळीत अंग. ही फळे खरेतर जिप्स्याला त्याच्या मित्राने भेट म्हणुन दिलेली, पण मीच अर्धी खाल्ली Happy त्याच्या मित्रालाही नाव माहित नव्हते फळाचे, इथे कोणाला माहित असेल का?

नाही गं. एप्रिकॉट उर्फ खुरबानी उर्फ जर्दाळू कारगीलपासुन पुढे भरपुर खाल्ले, अगदी मुद्दाम झाडे हलवुन, फळे पाडुन ती गोड फळे खाल्ली.

मी जे लिहिलेय ते नेक्टराइन आहे बहुतेक, पिच फॅमिलीतली फळे म्हणुन नेटवर आताच शोधले तेव्हा नेक्टराईनचा फोटो सेम त्या फळासारखा वाटला. श्रीनगरमध्ये फिरता आले नाही आणि नंतर पुढे ते फळ कुठेच दिसले नाही.

ok.

नाही.. आलु बुखारे मुंबईत मिळतात. मला तेही खुप आवडतात. पुर्ण पिकल्यावर काय लागतात........ आहा...

साधना, तुझ्या वर्णना वरून तरी नेक्टरिनच वाटतय.वरून गूळ्गूळित असत आणि पीच सारखच लागत.
हो सिंडरेला, आलु बुखार म्हणजेच प्लम

स्नेहा - साधारण सव्वा मापाने सत्यनारायणाचा प्रसाद करतात. सव्वा वाटी रवा, तेवढेच तूप अन तेवढेच दूध व साखर. तूपात रवा मंद आचेवर भाजून घ्या रवा भाजत आला की एका केळ्याचे काप टाकावे त्यात दूध (शिरा मऊ हवा असल्यास दुप्पट्/तिप्पट दूध टाकावे) झाकण ठेवून एक वाफ आणावी. मग त्यात सव्वा वाटी साखर हवे ते हवे तेवढे ड्रायफ्रुटस व वासाकरिता वेलची/जायफळ्/केशर टाकावे.
अविगा - साबुदाण्यात कदाचित पाणी जास्त होत असेल झाकण ठेवल्याने काहीवेळा चिकट होते.

साबुदाणा जास्त भिजलेला असणं, भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये पाणी असणं, वाफ येण्यासाठी जास्तवेळ झाकण ठेवणं, कमी दाण्याचं कुट आणि खराब साबुदाणा (हे महाराष्ट्राच्या बाहेर रहाणार्‍यांच्या बाबतित होतं बर्‍याचदा. साबुदाणा भिजतच नाही नीट) ही कारणं असतात साखि चा गिचका होण्यामागची.

दाण्याचे कुट साबुदाणा फोडणित घालण्याच्या अगोदर साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे की फोडणीत घातल्या नंतर?
कृपया मला नीट कृती सांगा.

सव्वा वाटी रवा, तेवढेच तूप अन तेवढेच दूध व साखर. >>> सव्वा वाटी रवा फक्त सव्वा वाटी दुधात शिजणार/ फुलणार कसा?
मला जवळजवळ दुप्पट, तिप्पट दूध+पाणी घालावे लागते.

अविगा, दाण्याचं कूट, मीठ, साखर सगळं भिजलेल्या साबुदाण्याबरोबर मिक्स करून घेऊन मगच फोडणीला टाकलेलं जास्त सोयीचं पडतं

फोडणीअगोदरच मिक्स करून घ्यायचा साबुदाणा आणि दाण्याचे कुट. काहीजण त्याच वेळी मीठ साखरही घालून मिसळून घेतात. मग फक्त तुप-जिर्‍याच्या फोडणीत घालायचे.

सव्वा वाटी रवा फक्त सव्वा वाटी दुधात शिजणार/ फुलणार कसा?>>> तूपपण सव्वावाटी असते ना मंजू? फुलतो छान रवा.

अविगा, सिंथेटिक व्हेनगर जास्त वापरणे योग्य नाही. विकत घेताना 'फ्रुट व्हिनेगर' बघून घ्यावे.
मी मध्यंतरी एका पुस्तकात वाचून ऊसाच्या रसाचे व्हिनेगरही तयार केले होते घरीच.

मलापण वाटते प्रसादाच्या शिऱ्यात दुध थोडे जास्त घालावे लागते, मी करते तेव्हा थोडे जास्त घालते पण पोथीत मंजू ह्यांनी सांगितलेलेच प्रमाण आहे, एकदा तसे करून बघेन.

Delivery नंतर देतात तो मुखवास कसा करतात? त्यात आज्जी बडिशोप, ओवा, बाळ्सोपा, मेथी , सुके खोबर टाकायची हे आठवतय? आई आजारी आहे त्यामुळे हे आईला विचारता आले नाहि. please प्रमाण आणि कॄती हवी आहे.

अन्जली ओवा, बाळशोपा, तीळ, थोडी बडीशेप, सुके खोबरे टाकायचे. ओवा जरा जास्त घ्यायचा. खोबरे आणि तिळ त्यापेक्षा जरा कमी टाकायचे.

मागे मला सुलेखानेही एक प्रकार सांगितला होता. त्यात तिने सगळे वाटून त्यात थोडे सैंधव टाकायला सांगितले होते. पण मला काही करायला जमले नाही.

धन्यवाद योगेश आणि जागुतै,
योगेश मिळेल का मला पा़कॄ. जागुतै - देणार का मला सुलेखानी दिलेला प्रकार.

Pages