पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक सुचतंय... कॉर्न चे दाणे मिक्सरवरून जाडसर काढावेत वा किसून घ्यावेत. त्यात थोडं बेसन वा मैदा घालून चिमूटभर सोडा घालावा, मीठ मिरची मसाला हवा तो घालावा. जरा पाणी घालून आप्याला जसं पीठ तयार करतो तसं करावं अन आप्पे करावेत... बहुधा जमतीलेत...

यात चीजही घालता येईल...

केया
१)मिर्च्यांचे मोठे तुकडे करून मधे चीर द्यायची.ओले खोबरे,कोथिंबीर, मीठ लिंबूरस एकत्र करून त्यात भरायचे. तव्यावर २ चमचे(लहान) तेल घालून झाकण लावून फ्राय करायचे.
२)हिंग ,मोहरी,३-४ मेथीदाणे १ यांची फोडणी करून मिर्च्यांचे मोठे तुकडे त्यात टाकायचे.वर आधण ठेवावे.५ मिनिटांनी त्यात मीठ,ओले खोबरे,कोथिंबीर क्रमाक्रमाने घालावे.गॅस बंद करून लिंबू पिळावे.

केया, बिर्यानी किंवा पोळीबरोबरही मिर्चीका सालान मस्त लागते. खालील उकडलेल्या मिरच्या-ही मैत्रिणीच्या आईची रेस्पी आहे. खिचडी किंवा रोजच्या जेवणाबरोबर तोंडीलावणे मस्त होते.
वाटीभर मिरच्या मध्ये स्लीट करून घ्या. त्या एका भांड्यात अर्ध्या वाटीपेक्षा कमी पाणी घालून उकळवा. मिरच्यांचा रंग बदलेल व पाणी आटायला येइल. पूर्ण पाणी आटायच्या आत थोडी शेंगदाण्याची चटणी व मीठ घालून मिरच्यांना लागेलसे सारखे करणे. एखाद मिनिटाने गॅस बंद करणे. वरणभाताबरोबर मस्त लागतात या मिर्च्या. फार झणझणीत नसतात.
एक कन्नड मैत्रिणीची मम्मी गुळ, भाजलेल्या हिरव्या मिरच्या, जीरे, मीठ घालून मस्त चटणी करत. तुला हवी असल्यास रेस्पी मिळवते.

मूगवडे आणि सा.दाणा वडे दोन्ही पाककृती मस्त आहेत एकदम. नक्की करुन बघणार ! पण चिकनबरोबर डाळ नको आणि उपासाचा आयटम तर त्याहून नको. त्यामुळे ह्यावेळी न केलेलेच बरे.
योगेश कुलकर्णी, कॉर्न फ्रिटर्सची आयडिया आवडली. उद्या सकाळी थोड्या प्रमाणात करुन बघते मैद्याचा बेस वापरुन.

अगो, कॉर्न फ्रिटर्स या पद्धतीने छान होतील असं वाटतंय. झुकिनी कोफ्त्यांची आप्पम पात्रातील रेसिपी आहे इथे. त्याच्या जवळपासच्या पद्धतीने केले तर छान होतील बहुतेक! बेसन, कांदा, झुकिनी, तिखट, मीठ, धणे-जिरेपूड आणि हळद घालून बनवलेत कोफ्ते. (ओगले आज्जींची आहे वाटतं मूळ रेसिपी!)

तळण करणे अशक्य आहे पण पावसाळी हवेत फ्रिटर्स / भजी प्रकारातलेच काहीतरी चटपटीत हवे आहे.>>> शॅलो फ्राय प्रकार चालणार आहे का?

गिट्स चे हांडवो चे तयार पिठ आणुन त्यात मटार, कॉर्न, गाजराचे बारीक तुकडे वगैरे घालुन अप्पे पात्रात 'हांडवोडे' / 'हांडवोप्पे' करता येतिल... छान लागतात Happy

येळेकर,चिन्नु धन्यवाद्..चिन्नु चटणीची रेसिपी मिळाली तर नक्की शेअर कर.

कच्च्या पपईची भाजी
१. किसून, हव्या त्या फोडणीवर परतून. हवं तर डाळीचे सांडगे तळून घेऊन उतरवायच्या आधी २-३ मि. चुरून घालायचे
२. बटाटे आणि पपई यांच्या चौकोनी फोडी करून वाफवून घेऊन त्यावर जिरेफोडणी, हिरवी मिरची, मीठ, किंचित साखर घालून हळद न घालता पांढरी रस्साभाजी (रस्साभाजी ची वेगवेगळी व्हेरिएशन्स करता येतील)
३. कच्ची केळी आणि बटाटे आणि कच्ची पपई यांचे कोफ्ते
४. व्हेज्/नॉनव्हेज स्ट्यू मधे

साली काढताना किसून काढायच्या. उन्हात वाळवायच्या.
आणि मग तीळ, हिरवी मिरची, दाणे वगैरे घालून फोडणी करायची आणि त्यात खरपूस परतायच्या...
अजिबात ओलसरपणा राह्यला नाही पाह्यजे.

वरच्या पद्धतीने सुकी चटणी होते का?
ओली चटणी करायला मी सोलण्याने काढलेल्या साली थोड्या तेलात चांगल्या परतुन घेते. साली + एक मिरची + मिठ + किंचित पाणी मिक्सरला लावते. मग मिरची, तीळ घालुन फोडणी करुन ती चटणीवर ओतते.

सावली हो ही सुकी चटणी आहे. कोरड्या हवेला फ्रीजबाहेरही मस्त टिकते. बहुतेक ८-१० दिवस किमान पण आमच्याकडे आई करायची तेव्हा ४ दिवसातच फन्ना उडायचा. Happy
ही चटणी दह्यात कालवून जे काय होतं ते म हा न असतं.

सालींच्या ओल्या चटण्या मी दुधी, पडवळाच्या बियांची करते. तेलावर दाणे, लसूण, हिरव्या मिरच्या, तीळ, जिरे घालून परतून मिक्सरमधून काढायची.

सावली ही सुकीच चटणी असते. आईकडेही परतूनच करतात वर नीरजाने सांगीतलीय तशी. मी कधी केली नव्हती. अंदाजाने माहीत होते पण साली मोठ्या काढल्याने कन्फूजन झालं Proud

नी, सेम पिंच Happy
आई ने ही सुखी चटणी केली की लगेच फन्ना उडायचा Happy यात आई खोबर्‍याचा किस पन घालायची बहुतेक...दह्यातल्या चटणीसाठी ++१००

ओल्या चटणीत आई भिजवलेली चण्याची डाळ घालायची वाटताना आनि वरतुन मोहरी, हिम्ग, कढीपत्ता, लाल मिरचीची चरचरीत फोडणी.... आहाहा.... मस्त!

मी या सुक्या चटणीमध्ये तीळ, दाण्याचं कुट, सुक्या खोबर्‍याचा कीस, डाळवं, हिरवी मिरची घालते. पद्ध्त नीरजाने सांगितल्यासारखी तेलावर परतून.

Pages