पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हसरी, वर नमूद केलेल्या धागा क्र.१ च्या शेवटच्या काही पानांवर किंवा युक्ती सांगा बाफवर हा प्रश्न विचारला गेला आहे, आणि त्यावर सविस्तर उत्तरेही दिलेली आहेत. तुम्ही कृपया ते धागे वाचून पाहणार का?

कोशिंबीरीत फोडणीच्या ऐवजी थोडे थोडे घालून संपवता येईल.
ब्रेडला लावून खाता येईल.
गाजर-फ्लॉवर-मटार घालून ऐनवेळचे ताजे लोणचे करता येईल.
पराठे बिनातेलाचे भाजून त्यावर लावून खाता येईल.
दहीभात करून त्यात थोडे घालून खाता येईल.
धिरड्यांबरोबर खाता येईल.
दाण्याची चटणी किंवा दाण्याचा कुट + तेल असे खिचडीवर खाता येईल.
पापडाचा खुळा करून त्यात हे तेल आणि दाण्याचा कुट घालून खाता येईल.

मी मागच्या धाग्यावर गरम मसाला कसा बनवावा, याची कृती विचारली होती. मी यासाठी विचारले होते कि, मसाल्याचे पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत हे नक्की माहित नाही. कुणी सांगेल का?

मला आणखी एक विचारायचय- मोड आलेल्या कडधान्याची मी उसळच करते. पण त्याऐवजी भाज्यांमध्ये ते अ‍ॅड करता येतील का? एकदा कोबीच्या भाजीत अंकुरीत चणे वापरलेले पाहिले होते. अशाप्रकारे आणखी कोणत्या भाज्या बनवता येतील?

अमि, आम्ही फरसबी-मटकी, पडवळ-डाळींब्या (कडवे वाल), अळू-डाळींब्या अश्या भाज्या करतो.

तसेच मोड आलेले मूग, काबूली चणे इत्यादी सॅलडमधे पण वापरता येतात. पावटे घालून मोकळ भाजणी करतो त्याला 'मिठाणे' म्हणतो आम्ही. Happy

ही जुन्या मायबोलीवरची 'मसाल्यां'ची लिंक

अमि, मसाल्याचे प्रमाण प्रयोग करुन ठरवले तर चांगले. बाजारचे मसाले, जरा उग्रच असतात. आपल्याला ज्या मसाल्याचा वास आवडतो, ते जास्त घ्यायचे.

मोड अलेली कडधान्य घालून, सुरण (चणे), कोहळा (मटकी) , कच्ची केळी (काळे वाटाणे), अशा भाज्या करता येतात. बटाट्याबरोबर तर कुठलेही कडधान्य वापरता येते. (मसुर, मूग), कुळीथाला पण मोड काढून भाजीत वापरता येतात.

तळलेला पदार्थ चालणार असेल तर नाचणीच्या पिठाची शेव पण अफलातून होते. ठाण्याला प्रशांत (?) नावाच्या दुकानातून विकत घेतली होती. मस्त चव होती.

मृण्मयी मला तळणीच नको. मुंबई वरुन येताना मी नाचणी ची बिस्किटं आणली होती ती पण छान लागायची. आता इथे फक्त नाचणीच पीठच मिळणार ना, म्हणुन बाकी काही करता येते का त्याचे माहीती हवी होती.

नाचणीचे दोदोल (गोड बर्फी) करता येते. (कृति आहे इथे). रागी मुद्दी असा एक कर्नाटकी प्रकार असतो.
ताक घालून ढोकळा करता येतो. पिठ तूपावर भाजून शिरा / लाडू करता येतात.

रचु ,समप्रमाणात तांदूळ पिठ घालुन त्यात थोडे आंबट दही व चवीला लसूण मिरची घालून डोसे करता येतात नाचणी पिठाचे किवा नाचणी पीठात थोडी कणीक दूध चवीला गुळ आणि वेलची घालून पॅनकेक घालायचे Happy

चिन्नू, किसून उकडून, मिरची घालून कोशिंबीर करता येईल. पराठे करता येतील.
चण्याची डाळ घालून भाजीही करता येईल.

स्टफ पराठे (न उकडता किसून, मुळ्याचे करतात तसे), उकडून कणकेत घालून ठेपले / पराठे, कटलेट /टिक्की..
मागे कुणीतरी बीटच्या कढीचा पण उल्लेख केला होता.

cutepraju रेसिपी देऊ शकाल का बीट कटलेट्सची... बीट आणलेले केसांसाठीच्या मेंदीत टाकायला. ३ उरलेत... कटलेट्स करून बघीन. बीटरूटची बर्फी कशी करतात दिनेशदा? गोड आवडतं. उकडलेला बटाटा व ओलं खोबरं टाकून बर्फी करतात असं ऐकलेय... पण प्रमाण वगैरे नाही माहीत.

...

बीटरुटची बर्फी आहे इथे, क्वीक रेफ साठी, बीट उकडून किसून पाऊणपट साखर मिसळून आटवायला घ्यायचे. थोडे तूप सोडायचे. रस जरा आटला, कि किसाच्या अर्ध्या प्रमाणात मिल्क पावडर घालायची. घट्ट गोळा जमला कि थापून वड्या कापायच्या. किसाच्या अर्ध्या प्रमाणात, उकडलेल्या बटाट्याचा लगदा किंवा ओले खोबरे घातले तरी चालते. समजा वड्या नाहीच जमल्या, तर हलवा म्हणूनही खाता येतो.

धन्यवाद दिनेशदा, अल्पना. स्टफ पराठे करून पाहीन. प्राजु, कटलेट करायचं डोक्यात नाही आलंच नाही गं. रेसीपीबद्दल थॅंक्यु.
dreamgirl, जुन्या माबोवर सुपरमॉमची रेसीपी आहे बीटरूट नी ओल्या नारळाच्या लाडवांची. साखर आणि बटाटा नाहीये त्या रेसीपीत. शोधून बघ.

Pages