पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेल्प! हेल्प!! हेल्प!!!
****************************************************************************************************
मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत भाग घेऊन जिंकता येईल अशी चीज्/पनीर मका + फळे वाली पाकृ अर्जंट हवी आहे. कुणाला माहिती आहे का?
असल्यास कृपया विपूत लिहा ही नम्र विनंती.
****************************************************************************************************
ठ्यांकींग यू इन अँटीसिपेशन.
(बक्षिस मिळाल्यास पाकृ सांगणार्‍या/रीस त्यातील योग्य तो वाटा देण्यात येईल.)

>>>मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत भाग घेऊन जिंकता येईल अशी चीज्/पनीर मका + फळे वाली पाकृ अर्जंट हवी आहे. कुणाला माहिती आहे का?
असल्यास कृपया विपूत लिहा ही नम्र विनंती.<<

अहो त्यात काय, गूगल करा. मिळतील हजारो पाकृ. जिन्नस सोपे आहेतच. स्ट्राबेरी चीज केक, चीज व बेरी पाय(pie) अंड्याशिवाय करा... मग त्यातले जरासेच जिन्नस व कृती इथे तिथे फेरफार करा... म्हणजे कसे तर जिथे कृतीत टोपात शिजवा असेल तिथे टोपाएवजी तव्यावर करा... अवन एवजी गॅस वर करा ...अर्ध्या वाटीएवजी पुर्ण वाटी घ्या बारीक खिसलेले खोबर्‍याएवजी जाडं खिसलेले घाला आणि लिहा की स्वप्रयोग व कमवा बक्षीस. Proud

इब्लिस - जागूने कॉर्न बॉल्स च्या पाकृतीत डाळिंबाचे दाणे/सफरचंदाचा कीस्/कच्ची पपई चांगली लागेल असं मला वाटतं प्रयोग करुन पहायला हरकत नाही.

रोचीन,

गवारीची / फरसबीची कुठलीही पाककृती डिंगर्‍यांसाठी चालेल. त्या कच्च्या खाल्ल्या तर तिखट लागतात पण शिजल्यावर तिखटपणा जातो.
त्यांच्या तिखटपणाचा फायदा घेत कोशिंबीरही करता येते.

अन्जलि, जशीच्या तशी पाकृ नाही देता येणार. पण सर्वसाधारण पणे चिकणी सुपारी, दुप्पट भरडी सुपारी, १|२ बिब्बे (चालत असतील तर) लवंग, जायफळ, थोडी बडीशेप हे सगळं थोड्या तुपावर परतून मग जाडसर कुटावे.
माझी आजी अशी सुपारी करत असे तेव्हा त्यात थोडा अस्मांतारा पण घालायची मस्त स्वाद येत होता.

धन्यवाद!! Happy पहिल्यांदाच करणार, तर म्हटलं, विचारावं!!! Happy आता करते आणि सांगते. कोशिंबीर फोडणीची नेहेमी करतो तशी करायची का??

Delivery नंतर देतात तो मुखवास कसा करतात? >>>
बडीशेप, धनाडाळ, गुंजाचा पाला, तिळ, सैंधव मिठ, खोबरे, ओवा, जेष्टमध पावडर, बाळशोपा हे साहित्य वापरतात. मिठ व जेष्टमध पावडर सोडून बाकी सगळे भाजून घ्यायचे. थंड झाले की मिक्सरवर बारीक करायचे. त्यात वरून भाजलेले जवस घालायला हरकत नाही.

घरी स्मूथ पीनट बटर ची बरणी आहे. कोणालाही फारसे आवडले नाही. आमटी वगैरे करून पहिली. पण नाही आवडली. अजुन काय करता येईल त्याचं?

पीनट बटर कूकीज बनवा... माझ्याकडे एक नेटवरची रेसीपी आहे ट्राय केलेली(आपण नाही बुवा रेसीपी इथून तिथून उचलून स्वप्रयोग म्हणून खपवत)

बरं, असो.. तुम्हाला लिंक हवी असेल तर देते.
मला खूपच आवडतात .. म्हणून बनवा व मला द्या. Happy

केया - त्यात पाच 'ख' पदार्थ असतात खोबर्,खरिक, खडीसाखर, खवा व खसखस मी करते त्यात खोबर, खसखस, पिठीसाखर, बदाम, खारिक, वेलदोडा/जायफळ व तळलेला डिंक

डिंक तळायचा नसल्यास तुपाचा हात लावून माय्क्रोवेव्ह मध्ये ठेवल्यास(म्हणजे ठेउन पावर ऑन करुन) मस्त फुलतो.

ब्राऊन राईस चांगला होण्यासाठी युक्ती सांगा. मी रोजच्या भातासाठी बासमती ब्राऊन राईस आणला आहे. पण कधी तो गिच्गोळा (पाणी ४ पट घालून जास्त वेळ शिजवला तर) तर कधी दाणे पूर्ण न शिजता अर्धेच शिजतात (प्रत्येक दाण्यात आत कच्चटपणा जाणवतो), किंवा कधी पाणी एकीकडे आणि अर्धवट भात एकीकडे असं होतं. प्रेशरकुकर मधली रेस्पी असेल तर सोने पे सुहागा.

हिट्ट अशी पाकृ आहे का कुणाकडे? आधी तांदूळ भिजवल्यास नीट होतो पण मदत कराच. नेहमी नीट जमला पाहिजे. १ वाटी तांदूळ + २-२.५ वाट्या पाणी आणि किंचीत मीठ घालते.

मी वापरते ब्राऊन बासमती. आधी थोडा वेळ भिजत घालते साधारण १५-२० मिनिटं. मी एका वाटीला ३ वाट्या पाणी घालते. कुकर मधे नॉर्मल पेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. साधारण १०-१५ मिनिटं.

Pages