पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बाळंतीण होते तेव्हा माझी मम्मी मेथी किंवा इतर पालेभाज्यांमध्ये शिंगाड्याच पीठ बेसना ऐवजी वापरायची.... चांगलं लागायचं. भरपूर लसूण घालायचा मात्र

शिंगाड्याचा शिरा : नेहेमी सारखाच गोडाचा करतो तसा शिरा.
शिंगाड्याची खांडवी... आहाहा. एकदम मऊ लुसलुशीत होते. पीठ दुधात घालुन उकळायचं/ शिजवायचं , साखर वेलची घालायची आणि घट्ट होण्याआधी पसरट ताटलीत ओतुन पसरायचं. मग वड्या कापुन खायच्या.
लापशी : वरच्या सारखंच पण थापायचं नाही आणि पातळच खायचं.

शिगाड्याचा केक/ खांडवी मस्त होते. गुळ आणि खोबरं घालून.
छान तूपात परतून मग गुळाचा पाक घालून वरून खोबरं ,वेलची वगैरे घालून वड्या थापायच्या आणि परत अवनमध्ये ठेवायचे. खुटखुटीत वड्या लागतात गुळ कडक झाला की. आई , अवन न्हवता घरी तेव्हा जुन्या पद्धतीच्या केक भांड्यात खाली वाळू घालून भाजायची. काय लागतात...

खांडवी माहिती नव्हती शिंगाड्याची, मस्त आहे अमितव आणि झम्पी.

आई शिरा, लापशी करायची.

https://www.maayboli.com/node/60967 इथे आहेत काही कृती.
फेसबूक वर बरेच गृप आहेत इंपॉचे. मिनिस्ट्री ऑफ करी आणि टू स्लीव्हर्स या ब्लॉग वर पण बघा .

किनवा उपमा ही पाकृ आंतरजालावर पाहून, अनेकदा केली (गाजर, हिरवे वाटणे, फ्रेंच बीन्स घालून). आवडली.

किनवाच्या उपमा व्यतिरिक्त इतर पाकृ हव्या आहेत. झटपट बनणाऱ्या तसेच खास काही असतील वेळ लागत असेल तशाही. कृपया कुणाला माहीत असल्यास सांगावे.
आगाऊ धन्यवाद.

मी किनवा-मसूर (लाल डाळ चपटी) आणि किनवा-दलिया अशा २ प्रकारच्या खिचडी करते. पाणी जास्त घालून मऊसर.
दोन्ही छान लागतात. तिखट जरा जास्त घालते.

धन्यवाद अंजली_१२ आणि योकु.
अंजली_१२ पूर्ण अथवा थोडक्यात पाकृ द्याल का? प्रमाण, शिजवण्याचा वेळ अथवा किती शिट्ट्या वगैरे.

हो शुअर.

किन्वा १ वाटी
मसूर डाळ अर्धी वाटी/ कधी मूग १-२ चमचे मिक्स करते.
हे एकत्र धुवून ठेवा डाळ - तांदळासारखे.

तेलाची नेहमीसारखी फोडणी (मोहरी, हिंग, कढीपत्ता, आवडत असेल तर हिरवी मिरची तुकडे कींवा ठेचा)
या फोडणीत कधीकधी मी दुधीच्या मोठ्ठाल्या फोडी करुन टाकते किंवा मटार (काही नसले तरी चालते)
हे सगळे कुकरमधे परतले की धुतलेले किन्वा-मसूर घालून पाणी ६-७ वाट्या घालते. तुम्हाला सबररीत मऊ खिचडि नको असेल तर पाणी कमी घाला. पण माझ्यामते किन्वाला जास्त पाणी लागते शिजायला. एकदा फडफडीत फारशी कोणाला आवडली नव्हती मग तेव्हापासून पाणी जास्त घालायचीच सवय लागली. आता यात मीठ, तिखट, सांबार मसाला किंवा बिशिब्याळे चा एमटीआर चा मसाला घालते. भाजलेले दाणे पण घालू शकता. मस्त लागते एकदम.
सगळे ढवळून शिट्ट्या करा. या पण जास्त लागतात रेग्युलर भातापेक्षा. मी ५ करते.
वाफ निवल्यावर मस्त साजूक तुप घालून गट्टम करा विथ पापड.

दलिया चे पण असेच प्रमाण किन्वा १ आणि दलिया अर्धा. बाकी कृती सेम.

Pages