Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे फक्त पाककृतींबद्द्ल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
असं वर हेडरमधे लिहिलंय.
सध्या माझ्याकडे स्विटकॉर्न चे
सध्या माझ्याकडे स्विटकॉर्न चे दाणे आहेत. सुप, भेळ आणि कटलेट सोडून दुसरे काय करता येईल?
सध्या माझ्याकडे स्विटकॉर्न चे
सध्या माझ्याकडे स्विटकॉर्न चे दाणे आहेत. सुप, भेळ आणि कटलेट सोडून दुसरे काय करता येईल?>> cheese corn balls ,Sweet Corn Paratha (sanjeev kapoor )
आरतीने धिरडे लिहीले होते
आरतीने धिरडे लिहीले होते कॉर्नचे. शिवाय, उपीटही करता येईल.
मक्याच्या कणसांची धिरडी.
मसाले भात कर्त येइल..सोउम्य
मसाले भात कर्त येइल..सोउम्य असा..चन्गला लग्तो
स्विट कॉर्न बॉल कसे करतात
स्विट कॉर्न बॉल कसे करतात माहीत आहे का सृष्टी ?
प्राची धिरडेही करायला हरकत नाही पण त्यात काही मिक्स करावे लागेल का? बघते मी आरतीची लिंक. धन्स.
स्वीटकॉर्नची भुर्जी मस्त होते
स्वीटकॉर्नची भुर्जी मस्त होते जागू. शिवाय कॉर्न+कॅप्सिकम भाजी, कॉर्न सलाद, भाजलेल्या कॉर्नचे सलाद / चाट इत्यादी अनेक प्रकार आहेत. पिझ्झा केलास तर त्यावर टॉपिंग म्हणून...
उपमा करून बघ जागू. भरड
उपमा करून बघ जागू. भरड वाटलेला मका + भिजवून भरड वाटलेली चनाडाळ याचा उपमा मस्त होतो.
अरे वा बरेच प्रकार आहेत. अकु
अरे वा बरेच प्रकार आहेत.
अकु भाजलेल्या कॉर्नचे सलाद कसे?
अनघा धन्स.
महाबळेश्वर प्रसिद्ध कॉर्न पॅ
महाबळेश्वर प्रसिद्ध कॉर्न पॅ टिस करा ताई. एक स्पिनॅच कॉर्न बेक पण आहे. फार पूर्वी मे केला होता. कृती शोधून देते,. मस्त लागतो.
जागु ता ई .. मागे अगो ने
जागु ता ई .. मागे अगो ने केले होते माझ्या विपुत तिने असे लिहिले आहे.
( कॉर्न-चीज आप्पेच केले मी पार्टीसाठी पण मैदा घालून आप्पेपात्रात जमले नाहीत. चिकटत होते. मग रवा-पोहे आणि थोडे तांदळाचे पीठ, भरपूर कोथिंबीर, भरडलेले कॉर्न, किसलेले चीज, मीठ-मिरपूड-आलंलसूण पेस्ट, चिमूटभर इनो घालून आप्पे केले. मस्त झाले ते. सगळ्यांना आवडले. )
मि केले ते मका पीठ , कोथिंबीर, भरडलेले कॉर्न, किसलेले चीज, मीठ-मिरपूड-आलंलसूणपेस्ट , मिठ - मी गोळे करुन डीप फ्राय केले . ( youtube वर बघायला मिळेल cheese corn balls recipe by sanjeev kapoor )
@जागू, अगं भाजलेले स्वीट
@जागू, अगं भाजलेले स्वीट कॉर्नचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, बा. चि. टोमॅटो, बा. चि. हिरव्या मिरच्या / ठेचा, पुदिना, कोथिंबीर, लिंबाचा रस, सैंधव - शेंदेलोण-पादेलोण इत्यादी एकत्र मिसळायचे.
त्यात ऑ ऑ, थोडा चिरलेला लसूण घातला तर आणखी वेगळी चव येते.
मंजूडी लिंकबद्दल धन्यवाद! कसे
मंजूडी
लिंकबद्दल धन्यवाद! कसे शोधायचे म्हणजे अशी लिंक मिळते
माधवी., या पानावर उजव्या या
माधवी., या पानावर उजव्या या धाग्याच्या ग्रूपाचं नाव आहे - 'आहारशास्त्र आणि पाककृती', त्यावर क्लिक करा. नंतर विषयवार यादीवर क्लिक करा.
हा प्रश्न कुठे विचारावा हे न
हा प्रश्न कुठे विचारावा हे न कळल्याने इथे विचारते आहे, माफ करा.
माझ्या कडे एलजी चा कन्वेक्शन मावे आहे आणि माला त्यात ब्रेड करून बघायचा आहे तर त्यात आईस्क्रीम चा डब्बा (अल्युमिंनियमचा) जो आडवा असतो तो वापरला तर चालेल का.
धन्यवाद
Pinky 80 please do not put
Pinky 80 please do not put any metal stuff in the microwave oven. It will spark and burn. only put microwave safe proven dishes inside the microwave.
अ मामी, कन्वेक्शन मोडमध्ये
अ मामी, कन्वेक्शन मोडमध्ये मेटल पॅन चालतो हो.
पिन्की, मॅन्युअलमध्ये लिहीलंय का बघा.
thanku अमा
thanku अमा
शोधावे लागेल mannual.
शोधावे लागेल mannual. बघते.
thanku लोला
इथे
इथे http://kitchen.manualsonline.com/manuals/mfg/lg/lws3081st.html
किंवा त्यांच्या साईटवर आहे का पहा. असल्या उपकरणांची मॅन्युअल्स, वॉरन्टी कार्ड इ. गोष्टी हाताशी ठेवाव्यात. वापरायला सुरुवात करायच्या आधी वाचाव्यात.
धन्यवाद.
पीच भरपुर आहेत घरात . जवळ जवळ
पीच भरपुर आहेत घरात . जवळ जवळ ३०/ ३५ .काय काय करता येइल ?
पिच पाय, पिच जाम, पिच स्मुदी,
पिच पाय, पिच जाम, पिच स्मुदी, पिच ओव्हन मधे अर्धवट बेक करुन व्हॅनिला आईस्क्रिम बरोबर खाणे,..असे बरेच प्रकार.
पिच पिकप फार्म ला जाऊन आलेली दिसतेस.
हो बरोबर. मला काय काय करावे
हो बरोबर. मला काय काय करावे ह्या बरोबर कसे कसे करावे हेहि माहिति पाहिजे आहे. जाम महित आहे फक्त.
पीच साल्सा, चटणी, लोणचं,
पीच साल्सा, चटणी, लोणचं, रेलिश, कॉब्लर, सूप.
http://allrecipes.com.au/reci
http://allrecipes.com.au/recipes/tag-1214/peach.aspx
आणि
http://www.browneyedbaker.com/2012/08/06/50-of-the-best-peach-recipes/
आणि
http://www.eatingwell.com/recipes_menus/recipe_slideshows/fresh_peach_re...
काजूची वस्त्रगाळ पावडर कशी
काजूची वस्त्रगाळ पावडर कशी करावी, रंग न बदलू देता?
कन्वेक्षन मोड मध्ये चालतही
कन्वेक्षन मोड मध्ये चालतही असेल. मॅन्युअल मध्ये वाचून त्याप्रमाणे करा पिंकी८०. रविवारी तुम्ही उत्साहात काही करायला जाऊन तुम्हाला इजा होऊ नये म्हणून गडबडीत लिहीले. ब्रेड छान झाला कि लिव्हा इथे कृती.
मी काल कटाची आमटी बिघडवली. अर्धे इन्ग्रेडिअंटस नव्हते. आता सर्व खरेदी करून मगच ट्राय करणार. मातोश्रींच्या हातच्या आमटीची फार आठ्वण आली. त्यांची जणू रेशमी भरजरी साडी तर आमचा हातरुमाल झालेला. यू टूब वर रेशीपी आहे.
अकु, अश्विनी मामी धन्स. हे पण
अकु, अश्विनी मामी धन्स. हे पण करुन बघेन.
सृष्टी धन्स आप्प्यांची आयडीया आवडली. आज संध्याकाळी करेन.
धन्स लोला
धन्स लोला
घरी हिरवी द्राक्षं खूप
घरी हिरवी द्राक्षं खूप आहेत.काय करता येईल त्यांचे?
Pages