पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्वारीच्या लाह्यांचं पीठ नुसतंच दूध साखर किंवा दही साखर घालून खायला छान लागतं. धिरडे करताना त्यात थोडे बेसन आणि कणिक मिसळावी लागेल असं वाटतंय.
थालीपीठ खमंग लागेल याचे Happy

डाळे भाजून कुटून त्यात ज्वारीच्या लाह्यांचं पीठ ,गूळ,तूप ,सुंठ पावडर घालून लाडू छान होतात.तंबीटाचे लाडू म्हणतात.मैत्रिण आणायची.

बटाटा आणि टोफू वापरुन पराठे वाचले होते ईथे. खुप शोधले पण मिलत नाहियेत. प्लिज कोणाला माहीत असल्यास लिंक द्या.

मी_मस्तानी, मी स्ट्फ्ड बटाटा पराठ्यांसारखेच करते. त्यात चीज, पनीर किंवा टोफु घालायचा... मसाल्यात कधी ही मि + आलं लसूण पेस्ट, कधी कोथिंबीर/पालक/मेथी, कधी गरम मसाला , कधी पावभाजी मसाला, कधी हरिसा पेस्ट अस काय काय घालते.

मला पण हेच विचारायचे होते.मागे एक मसाला डोसा आणलेला त्या सोबत दिलेली खोबर्याची चटणी वेगळीच होती.घरी बनवली की अशी चटणी होतच नाही. Sad

धन्यवाद मितान आणि येळेकर. मी माझ्याकडच्या आंबोळीच्या पिठात थोडं ज्वारी लाह्यांचं पीठ घातलं. छान झाल्या आंबोळ्या. लाडू वगैरे करणं सध्यातरी अशक्य गोष्ट आहे. Happy

mala gulab jamun chi receipe havi aahe khawa vaprun...tyat kanik mix karaychi ki maida...kuthla mix karun jast changle hotil gulab jamun....

रागी(नाचणी) डोशाची रेसिपी कुणी सांगू शकेल का? माझ्याकडे एक रेडिमिक्स आहे. त्यात नाचणी, रवा, तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ आणि मेथी आहे. पण प्रमाण छापलेले नाही. शिवाय त्यात सोडा आहे. चवीला छान आहे. पण ते पीठ भिजवल्यावर जरा वेळाने वरच्या बाजूला हिरवट रंग येतो. सोड्यामुळे येत असेल क?

ब........गीट्स चे कर ... ... त्यावर लिहिले आहे तसेच कर ..गुळ्गुळीत होतात ..... चितळे मिक्स झिन्दाबाद ...लाजवाब गुलाबजाम ...

वावे........ <<<<<<<पण ते पीठ भिजवल्यावर जरा वेळाने वरच्या बाजूला हिरवट रंग येतो. सोड्यामुळे येत असेल क?>>>>>>>> होय ...........जरा विचार करुनच वापरा पिठ ......

babdi >>>>>> माव्याचे गु जा करताना....माव्यामधे कॉर्नफ्लोअर मिक्स करायचा.....मावेल इतका कॉर्नफ्लोअर मिक्स करुन छान मळुन घ्यायचा मावा नाहीतर गोळे तुपात टाकल्यावर फुटतील....कणिक मिक्स केले तर गुलाब जाम खुप खुप कडक होतात....

बासुंदी पुरी करायची आहे.. लेकीला आणि मला पटकन खोकला होतो, त्यामुळे कमीत कमी तेल पिणारी पुरीची पाकृ हवी आहे. कणकेच्या पुर्‍या अपेक्षित आहेत.

मी साधारण अशी पाकृ करते -
१. २ वाट्या कणकेमध्ये थोडीशी साखर (१ टी स्पून), १.५ टी स्पून बारीक रवा आणि मीठ चवीनुसार घालते.
२. पीठ हाताने सारखे करते.
३. त्यात १ डाव मोहन घालते.
४. पोळीच्या पिठापेक्षा घट्ट मळून ठेवते.
५. २ तासांनी तेल मध्यम आचेवर तापवते
६. व त्यात पुर्‍या तळते.
७. तळलेल्या पुर्‍या टिश्यू पेपर मध्ये काढते.

सध्या टम्म फुगली पुरी तरी तेल पूर्ण निथळून टिश्यू पेपरमध्ये पुन्हा पिळून लेकीला देते.. त्या मुळे पुॠ खाण्याची मज्जा तिला मिळत नाही.. म्हणुन दुसरा काही खटाटोप आहे का ते शोधतेय.

Bruschetta च्या काही रेसिपिज माहित आहेत का? इंडियात मिळणार्या ingredients पासून बनवता येतील अश्या?

जाईजुई, मला नक्की माहिती नाही, पण पुर्‍या लाटल्यावर हलक्या, अर्धवट भाजून घ्यायच्या गरम तव्यावर आणि मग तळायच्या, म्हणजे जास्त तेलकट होत नाहीत असे वाचल्याचे आठवते.

तुम्ही रागी डोसा कसा करायचा ते विचारल होत तर माझी रेसिपी अशी
१/२ वाटी अख्खे उडीद
१ १/२ वाटी रागी फ्लॉवर
१/२ टी स्पून मेथी दाणे
४ सुक्या लाल मिरच्या
४/५ कढीपत्याची पान (कातरून)
मिठ -चवीनुसार
पाणी- पीठ सरसरीत करण्याकरता

कृती: ऊडीद, मेथी आणि मिरच्या भिजत टाका. ५/६ तासांनी गुळ्गुळीत वाटा. त्यात रागी फ्लॉवर चांगल मिक्स करून घ्या. आवश्यकते नुसार पाणी घालून सरसरीत करुन घ्या. ७/८ तास (वा हवामानानुसार) पीठ आंबवत ठेवा. अगदी तांदळाच्या डोश्या-सारख वर येत. रेड वा मरून कलरच दिसत. डोसे करायच्या आगोदर कातरलेली कढीपत्याची पान अणि मीठ घाला. पातळ कुरकुरीत डोसे होतात.

धन्स प्राची.. तू के लायस का हा उद्योग? नुसती परतू पुरी? की थोडी फुलवायची? ४ करून सांगते उद्या काय होते ते.

Bruschetta
चांगला इटालियन किंवा बागेत ब्रेड हवा. मॉडर्न / ब्रिटानियाच्या स्लाइसेस वापरुन कसं लागेल कल्पना नाही.

ब्रेड स्लाइस करुन घ्या. थोडे ऑ ऑ घालून टोस्ट करुन घ्या . लसणीची पाकळी अर्धी चिरुन प्रत्येक स्लाइसवर उगाळल्यासारखी लावा - एकाच बाजूला.

त्यावर टॉमेटो + कांदा + मीठ + मिरपूड + ऑऑ चं मिश्रण थोडं थोडं घाला.
सौम्य चवीचे छोले, चणे असं काही सुद्धा घालू शकता एकेक चमचा
इतर चॉइसेस
रोस्टेड रेड पेपर्स + हमस
आर्टिचोक हार्ट्स + ऑलिव्ह्स चॉप करुन ;
लाल कांदा + कॅनमधले सार्डीन्स + कोथिंबीर + लिंबू
बाबा गनुज

आपल्याकडे पाव मिळतात त्याच्या घरी स्लाइसेस करून घेतल्या तर चांगल्या लागतील.
ब्रून मस्काही (अती कडक नसेल तर) वापरता येईल.

जाईजुई,
नुसती हलकी भाजून घ्यायची. फुलवायची नाही.
जेव्हा मोठ्या प्रमाणावर पुर्‍या करायच्या असतात. तेव्हा अश्या पुर्‍या आधी लाटून, हलक्या भाजून ठेवायच्या आणि ऐनवेळी लगेच तळून द्यायच्या. ऐनवेळी लाटण्याचा वेळ वाचतो, पटकन् तळल्याही जातात आणि जास्त तेलही पीत नाहीत.

Pages